चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०१ ऑक्टोबर २०१९

Date : 1 October, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
भारतानं आक्रमण करून काश्मीर ताब्यात घेतलं; मलेशियाच्या पंतप्रधानांनी तोडले तारे :
  • काश्मीर मुद्द्यावरुन मलेशियाने संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत भारताविरोधी भुमिका घेतली आहे. भारताने जम्मू आणि काश्मीर आक्रमण करुन ताब्यात घेतला अशा प्रकारे अकलेचे तारे तोडणारे विधान मलेशियाचे पंतप्रधान महाथिर मोहम्मद यांनी येथे शुक्रवारी केले. तसेच भारताने पाकिस्तानसोबत चर्चा करुन या विषयावर तोडगा काढावा, असा फुकटचा सल्लाही त्यांनी दिला आहे.

  • मोहम्मद म्हणाले, जम्मू-काश्मीरमध्ये भारताच्या कारवाईची कारणे असू शकतात. मात्र, त्यांनी कलम ३७० हटवण्याची केलेली कारवाई चुकीची आहे. महासभेत ठरावादरम्यान त्यांनी जम्मू-काश्मीर भारताने आक्रमण करुन ताब्यात घेतल्याचा आरोप केला.

  • भारताने संयुक्त राष्ट्रांकडे दुर्लक्ष केल्याने इतरांनाही संयुक्त राष्ट्र आणि कायद्याच्या निर्णयाकडे दुर्लक्ष होऊ शकते, अशा शब्दांत त्यांनी काश्मीरबाबत भारताच्या भुमिकाला विरोध दर्शवला. तसेच यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना मलेशियाचे पंतप्रधान मोहम्मद म्हणाले, भारताने आक्रमणाद्वारे काश्मीर ताब्यात घेण्याऐवजी पाकिस्तानशी चर्चेद्वारे हा प्रश्न सोडवावा.

  • दरम्यान, भारताला हवा असलेला इस्लामिक धर्मप्रचारक झाकिर नाईकच्या प्रत्यार्पणाबाबत भारताने मलेशियासोबत चर्चा केल्याचे वृत्त होते. मात्र, हे वृत्त मलेशियाच्या पंतप्रधानांनी फेटाळून लावले होते. १७ सप्टेंबर रोजी बोलताना ते म्हणाले होते, मोदींनी रशिया दौऱ्यादरम्यान आपल्याकडे नाईकच्या प्रत्यार्पणाबाबत विनंती केली नव्हती.

अमेरिका दौऱ्यात नवभारताविषयीच्या आशावादाचा प्रत्यय :
  • चेन्नई : आपल्या अमेरिका दौऱ्यात अनेक उच्चस्तरीय बैठका झाल्या. त्यामध्ये नवभारताबाबतचा आशावाद हा समान धागा होता, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी येथे स्पष्ट केले. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारतीय समुदायाने जागतिक स्तरावर स्वत:चा ठसा निर्माण केला आहे, असेही मोदी यांनी नमूद केले.

  • भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या (आयआयटी) ५६व्या दीक्षान्त समारंभात मोदी बोलत होते. अद्वितीय संधींची भूमी म्हणून जग भारताकडे पाहात असतानाच पदवी घेऊन विद्यार्थी बाहेर पडत आहेत, असे ते म्हणाले.

  • अमेरिकेच्या दौऱ्यात आपण अनेक देशांच्या नेत्यांना, उद्योगपतींना, गुंतवणूकदारांना भेटलो, त्या वेळी झालेल्या चर्चेत नवभारताबाबतचा आणि भारतातील तरुण वर्गाच्या क्षमतेबद्दलचा आशावाद हा समान धागा होता, असेही मोदी म्हणाले.

  • केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या तरुण अधिकाऱ्यांशी सध्या आपण चर्चा करीत आहोत, त्यापैकी काही जण आयआयटी पदवीधर आहेत, त्यामुळे तुम्हीही भारताला अधिक विकसित देश करीत आहात, असेही पंतप्रधान म्हणाले.

पाकिस्तानचे निमंत्रण मनमोहन सिंग स्वीकारणार नाहीत :
  • कर्तारपूर कॉरिडॉरच्या उद्घाटनासाठी पाकिस्तान सरकारने माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना निमंत्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या निमंत्रणाचा मनमोहन सिंग स्वीकार करणार नसल्याची माहिती, काँग्रेस सुत्रांच्या हवाल्याने एएनआय वृत्तसंस्थेने दिली आहे.

  • काही वेळापूर्वीच नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या कर्तारपूर कॉरिडॉरच्या उद्घाटनसाठी इम्रान खान सरकारने मनमोहन सिंग यांना निमंत्रण देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी दिली असल्याची बातमी आली होती. विशेष म्हणजे पाकिस्तानने यासाठी पंतप्रधान मोदी यांना निमंत्रण दिले नसल्याने सर्वत्र चर्चा सुरू होती. त्यात आता काँग्रेस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मनमोहन सिंग हे पाकिस्तानच्या निमंत्रणाचा स्वीकार करणार नसल्याचे समोर येत आहे.

  • कर्तारपूर कॉरिडॉर पाकिस्तानसाठी खूप महत्वाचा आहे. सविस्तर चर्चा केल्यानंतर आम्ही भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना उद्घाटनासाठी निमंत्रित करण्याचा निर्णय घेतला अशी माहिती कुरेशी यांनी दिली होती. मनमोहन सिंग यांना याबाबत औपचारिक निमंत्रण पाठवण्यात येईल असेही कुरेशी यांनी सांगितले होते. तसेच,  मनमोहन सिंग यांच्याबद्दल पाकिस्तानात प्रचंड आदर आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला आम्ही त्यांना बोलावण्याचा निर्णय घेतला आहे असे कुरेशी म्हणाले होते. कर्तारपूर साहिब कॉरिडॉरचे ९ नोव्हेंबरला उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान मोदींऐवजी मनमोहन सिंग यांना निमंत्रण देण्याच्या पाकिस्तानच्या निर्णयामुळे दोन्ही देशातील संबंध बिघडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

भाजपाकडून तीन खेळाडू निवडणुकीच्या मैदानात :
  • भाजपाने हरियाणा विधानसभेसाठी एकुण ९० पैकी ७८ उमेदवारांची घोषणा केली आहे. या यादीत काही दिवसांपुर्वीच भाजपात प्रवेश केलेल्या लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावणारा कुस्तीपटू योगेश्वर दत्त, भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार संदीप सिंग व महिला कुस्तीपटू बबिता फोगाट यांचा देखील समावेश आहे. तर, भाजपाच्या यादीनुसार मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर करनालमधून निवडणूक लढवणार आहेत.

  • या यादीमध्ये ३८ विद्यमान आमदारांना तिकिटं देण्यात आली आहेत, तर सात आमदारांची तिकिटं कापण्यात आली आहेत. योगेश्वर दत्त यांना सोनीपतच्या बडोदा व संदीप सिंग यांना पेहोवा विधानसभा मतदारसंघातुन उमेदवारी देण्यात आली आहे. याचबरोबर बबिता फोगाट दादरी येथून निवडणूक लढवणार आहेत.

  • भाजपाने हरियाणातील आगामी विधानसभा निवडणुकीत ९० पैकी ७५ जागांवर विजयी होण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी भाजपाच्या दिग्गज नेत्यांनी जिल्हास्तरावरील नेते व कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्यासही सुरूवात केली आहे. अशावेळी योगेश्वर दत्त, संदीप सिंग व बबिता फोगाट यांच्या भाजपा प्रवेशाने आता त्यांचा प्रसिद्धीचा भाजपाला नक्कीच फायदा होणार असल्याचे दिसत आहे.

  • महाराष्ट्र आणि हरियाणा येथे मतदान होणार असून २४ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होईल. हरियाणा विधानसभेची मुदत २ नोव्हेंबरला आणि महाराष्ट्र विधानसभेची मुदत ९ नोव्हेंबरला संपत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ४ ऑक्टोबर आणि अर्ज परत घेण्याची तारीख ७ ऑक्टोबर रोजी असेल. लोकसभा निवडणुकीनंतर यंदाची ही पहिली राज्य निवडणूक आहे.

मतदार यादीतील तुमचं नाव असं तपासा :

राज्यातील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या जोरात सुरू आहे. २१ ऑक्टोबर २०१९ रोजी राज्यात मतदान होणार आहे तर २४ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. प्रत्येक नागरिकाला मतदानाचा हक्क सविंधानाने दिला आहे. मतदान करायला जाण्यापूर्वी आपले नाव मतदार यादीत आहे की नाही हे तपासून पाहावे. फक्त चार स्टेपद्वारे तुम्ही तुमचे नाव मतदार यादीत आहे का नाही हे तपासून पाहू शकता.

  • सर्वप्रथम निवडणुक आयोगाच्या National Voters पोर्टलवर जा
  • डाव्या साईडला एक सर्चबार असेल.
  • त्यानंतर तुम्हाला एक मेसेज येईल, तो व्यवस्थित वाचा आणि पुढे जा
  • त्यामध्ये सर्व माहिती भरा आणि सबमिट बटनवर क्लिक करा
  • तुमची मतदार यादीमधील सर्व माहिती येईल
  • डाव्याबाजूला आणखीवर क्लिक केल्यास मतदान ओळखपत्रावरील सर्व माहिती येईल.
दिनविशेष :
  • आंतरराष्ट्रीय कॉफी दिन / आंतरराष्ट्रीय वृद्ध व्यक्ती दिन / आंतरराष्ट्रीय संगीत दिन

महत्वाच्या घटना 

  • १७९१: फ्रेन्च संसदेचे पहिले अधिवेशन सुरू झाले.

  • १८३७: भारतातील पहिले टपाल कार्यालय सुरू झाले.

  • १८८०: थॉमस एडिसनने विद्युत दिव्यांचा कारखाना सुरू केला.

  • १८९१: स्टॅनफोर्ड विद्यापीठाची स्थापना झाली.

  • १९४३: दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांच्या फौजांनी नेपल्स शहरावर ताबा मिळवला.

  • १९४६: युनायटेड किंग्डममधे मेन्सा इंटरनॅशनल या संस्थेची ची स्थापना झाली.

  • १९४९: संगीत रंगभूमीवरील गायक,अभिनेते जयराम शिलेदार यांनी स्वत:ची मराठी रंगभूमी नाट्यसंस्था स्थापन केली.

  • १९५८: भारतात दशमान (मेट्रिक) पद्धत वापरण्यास सुरूवात झाली.

  • १९५९: भुवनेशप्रसाद सिन्हा यांनी भारताचे ६ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

  • १९६०: नायजेरियाला (युनायटेड किंगडमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.

  • १९६९: कॉनकॉर्ड विमान प्रथमच ध्वनीगती पेक्षा जोरात उडण्यात यशस्वी झाले.

  • १९७१: अमेरिकेतील वॉल्ट डिस्ने वर्ल्ड सुरु झाले.

  • १९८२: सोनी कंपनीने पहिले कॉम्पॅक्ट डिस्क प्लेयर प्रकाशित केले.

  • १९९२: कार्टून नेटवर्क सुरु झाले.

  • २००२: भारतीय दंड संहिता, मोटार वाहन कायदा, १९८८ आणि मुंबई प्रतिबंधक कायदा १९४९ अंतर्गत सलमान खान वर गुन्हा दाखल. तसेच मुंबई पोलिसांनी सलमान विरुद्ध भारतीय दंड संहिता कला ३०४(भाग-२) अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला.

जन्म 

  • १८४७: थिऑसॉफिस्ट, सामाजिक कार्यकर्त्या व भारतीय स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या अ‍ॅनी बेझंट यांचा जन्म. (मृत्यू: २० सप्टेंबर १९३३)

  • १८८१: बोईंग विमान कंपनीचे संस्थापक विल्यम बोईंग यांचा जन्म. (मृत्यू: २८ सप्टेंबर १९५६)

  • १८९५: पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांचा जन्म. (मृत्यू: १६ ऑक्टोबर १९५१)

  • १९०६: संगीतकार व गायक सचिन देव बर्मन यांचा जन्म. (मृत्यू: ३१ ऑक्टोबर १९७५)

  • १९१९: गीतकार, कवी, लेखक, पटकथाकार, अभिनेते गजानन दिगंबर तथा ग. दि. माडगूळकर यांचा जन्म. (मृत्यू: १४ डिसेंबर १९७७)

  • १९१९: दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते शायर, गीतकार आणि कवी मजरुह सुलतानपुरी यांचा जन्म. (मृत्यू: २४ मे २०००)

  • १९२४: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकेचे ३९ वे राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांचा जन्म.

  • १९२८: दाक्षिणात्य अभिनेते विझुपुरम चिन्नया तथा शिवाजी गणेशन यांचा जन्म. (मृत्यू: २१ जुलै २००१)

  • १९३०: कर्नाटकचे १५ वे मुख्यमंत्री जयदेवप्पा हलप्पा तथा जे. एच. पटेल यांचा जन्म. (मृत्यू: १२ डिसेंबर २०००)

मृत्यू 

  • १८६८: थायलंडचा राजा मोंगकुट ऊर्फ राम (चौथा) यांचे निधन. (जन्म: १८ ऑक्टोबर १८०४)

  • १९३१: नाट्यछटाकार शंकर काशिनाथ गर्गे तथा दिवाकर यांचे निधन. (जन्म: १८ जानेवारी १८८९)

  • १९५९: इटलीचे पहिले अध्यक्ष इरिको डी निकोला यांचे निधन. (जन्म: ९ नोव्हेंबर १८७७)

  • १९९७: जगातील सर्वात बुटकी व्यक्ती (२२.१”) गुल मोहम्मद यांचे निधन.

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.