महाराष्ट्र राज्य आज एकसष्टावा वर्धापनदिन साजरा करत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा जनतेला उद्देशून संदेश पाठविला आहे. तसेच, एक नवीन व बलशाली महाराष्ट्र घडविण्यासाठी सर्व नागरिकांना एकत्र येण्याचे आवाहन करत महाराष्ट्र दिनाच्या या मंगल प्रसंगी राज्यातील जनतेला राज्यपालांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या एकसष्टाव्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्रातील जनतेला माझ्या मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा. महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी प्राणांचे बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना मी भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो.
आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त देखील मी सर्व श्रमिक बंधू भगिनींना शुभेच्छा देतो.
राज्यनिर्मितीच्या आजच्या दिवशी, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षि छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या थोर विभूतींचे आणि समाजसुधारक नेत्यांचे स्मरण करणे औचित्यपूर्ण ठरेल.
कोविड - एकोणीसच्या संकटावर मात करीत असताना, राज्याची अर्थव्यवस्था सांभाळत, वंचित-उपेक्षित, शेतकरी, महिलांना न्याय देतानाच राज्याच्या प्रगतीचा आलेख उंचावला जाईल यासाठी माझे शासन कार्य करीत आहे.
देशात करोनाचं संकट अधिक गडद होत चाललं आहे. लसीकरणाचा वेग मंदावल्याने करोना रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे. त्यात आयपीएल स्पर्धेचं बायोबबलमध्ये आयोजन करण्यात आलं आहे. स्पर्धा सुरु होण्यापूर्वी काही खेळाडूंना करोनाची लागण झाली होती. तर काही खेळाडूंनी करोनाच्या भीतीपोटी स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्यामुळे आता आयसीसी टी २० विश्वचषकाचं आयोजन कसं करणार? असा प्रश्न बीसीसीआयला पडला आहे. त्यासाठी या विश्वचषकाचं आयोजन युएईला ठेवण्याचा विचार बीसीसीआयने केला आहे.
या वर्षी १८ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर दरम्याना आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धा आहे. मात्र करोना स्थिती पाहता हे आयोजन संकटात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे बीसीसीआयनं प्लान बी तयार ठेवण्याची तयारी केली आहे. बीसीसीआयचे जनरल मॅनेजर धीरज मल्होत्रा यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली.
‘या स्पर्धेसाठी माझी डायरेक्टर म्हणून नियुक्ती केली आहे.आपल्या देशात विश्वचषकाचं आयोजन व्हावं यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आमचं करोना स्थितीवर लक्ष आहे. या स्थितीवर आम्ही आयसीसीशी बोलत आहोत. तसेच आम्ही यूएईत स्पर्धेचं आयोजन करण्याची रणनिती आखत आहोत. मात्र यावर बीसीसीआय अंतिम निर्णय घेईल’, असं बीसीसीआयचे जनरल मॅनेजर धीरज मल्होत्रा यांनी सांगितलं आहे.
राज्यात शनिवारपासून म्हणजेच १ मे पासून १८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरण सुरू होणार की नाही? सुरू झालं तर ते व्यापक स्तरावर होणार की मर्यादित स्वरूपात? किती लोकांना आणि कुठे दिलं जाणार? असे अनेक प्रश्न निर्माण झाले होते. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सोशल मीडियावरून जनतेशी संवाद साधताना उत्तर दिलं आहे. त्यासोबतच केंद्र सरकारकडे लसींचा पुरवठा वाढवण्याची मागणी देखील मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
“१८ ते ४४ वयोगटातील ६ कोटी नागरिकांच्या लसीकरणासाठी जे १२ कोटी डोस आपल्याला आवश्यक आहे. हे सर्व १२ कोटी डोस एक रकमी खरेदी करण्याची तयारी महाराष्ट्राची आहे. मी केंद्राला पुन्हा विनंती करतो की आमची पूर्ण तयारी आहे.
कृपया आपण यात लक्ष घालून आम्हाला जास्तीत जास्त लसीचा साठा उपलब्ध करून दिला, तर महाराष्ट्र लवकरात लवकर या कोविडच्या संकटावर मात करून दाखवल्याशिवाय राहणार नाही”, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
करोना लसीकरणाचा तिसरा टप्पा एक मे पासून सुरु होत आहे. या लसीकरण मोहिमेमध्ये लस घेण्यासाठी कोविन पोर्टलच्या माध्यमातून दोन दिवसांमध्ये २ कोटी २८ लाख भारतीयांनी नोंदणी केली आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने यासंदर्भातील माहिती दिली आहे.
देशभरात एकूण १५ कोटी २१ लाख लोकांचे लसीकरण पूर्ण झाल्याचेही मंत्रालयाने सांगितलं आहे. २८ एप्रिल रोजी दुपारी चार वाजल्यापासून लसीकरणाला सुरुवात झाली आहे. म्हणजेच केवळ ५३ तास ३० मिनिटांमध्ये २ कोटी २८ लाखांहून अधिक जणांनी लसीकरणासाठी नोंदणी केलीय.
“आज दिवसभरात देशात २० लाख जणांचे लसीकरण करण्यात आलं. हा आकडा सायंकाळी आठ वाजेपर्यंतच आहे. तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणासाठी कोविन पोर्टलवरुन २ कोटी २८ लाख लोकांनी दोन दिवसात नोंदणी केली आहे.
रात्री साडेनऊ वाजेपर्यंतच्या माहितीनुसार २ कोटी २८ लाख ९९ हजार १५७ जणांनी करोना लसीकरणासाठी कोविन पोर्टलवरुन नोंदणी केलीय,” असं मंत्रालयाने गुरुवारी रात्री जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
सध्या जगभरामध्ये करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. अनेक देशांमध्ये करोनाची दुसरी आणि तिसरी लाट आली आहे. भारतामध्येही करोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलं आहे. असं असतानाच दुसरीकडे भारताने एक मे पासून करोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु होत आहे.
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण हा उत्तम पर्याय असल्याचे मानले जाते. असं असतानाच दुसरीकडे मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक आणि जगातील आघाडीच्या उद्योजकांपैकी एक असणाऱ्या बिल गेट्स यांनी लसींसंदर्भात एक वक्तव्य केल्याने ते चर्चेत आलेत. विकसनशील देशांच्या हाती लसींचा फॉर्म्युला देण्यात येऊ नये.
लसनिर्मिती करणे हे फार जबाबदारीचं काम असतं, असं गेट्स यांनी म्हटलं आहे. विशेष म्हणजे त्यांनी हे वक्तव्य करताना भारताचं उदाहरण दिलं आहे. यावरुन नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
करोनाच्या दुसऱ्या लाटेनं आरोग्य व्यवस्था खिळखिळी करून ठेवली आहे. दररोज लाखो लोकांनाचा संसर्ग होत असून, हजारो लोकांचे बळी जात आहेत. देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या उद्रेकानं भयंकर स्थिती निर्माण झाली असून, अनेक देशांनी भारतातून येणाऱ्या नागरिकांना दरवाजे बंद केले आहेत. इतर देशांपाठोपाठ अमेरिकेनंही भारतासोबतचा प्रवास बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारतात त्सुनामीसारखीच करोनाची दुसरी लाट आली आहे. ज्वालामुखीच्या उद्रेकाप्रमाणेच भारतात रुग्णसंख्येचा विस्फोट झाला असून, बेड, ऑक्सिजन, औषधींसाठी रुग्ण आणि नातेवाईकांना हालअपेष्टा सोसाव्या लागत आहेत.
स्मशानभूमींमध्येही अंत्यसंस्कारासाठी रांगा लागल्या असून, देशातील या भयावह परिस्थितीनंतर अनेक देशांनी भारतातून येणाऱ्यांना प्रवेश बंदी वा निर्बंध लादले आहेत. इतर देशांपाठोपाठ अमेरिकेनंही भारतातून प्रवासी येणाऱ्या पायबंद घालण्यासाठी प्रवास बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ४ मे पासून या निर्णय लागू होणार आहे.
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.