जगभरात क्रिकेटप्रेमी ज्या सामन्याची वाट पाहत असतात तो सामना अखेरीस, निश्चीत झालेला आहे. दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान आणि भारत हे दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी आमने-सामने येणार आहेत. पाकिस्तानने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात अफगाणिस्तानवर ६ गडी राखून मात करत उपांत्य फेरीचं तिकीट मिळवलं. ४ फेब्रुवारी रोजी हा सामना रंगणार आहे.
अफगाणिस्तानचा १८९ धावांवर बाद केल्यानंतर, विजयासाठीचं १९० धावांचं लक्ष्य पाकिस्तानने सहज पार केलं. मंगळवारी होणारा उपांत्य फेरीचा सामना हा भारतीय संघासाठी महत्वाचा असणार आहे. २०१८ साली न्यूझीलंडमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत पृथ्वी शॉच्या भारतीय संघाने उपांत्य फेरीत पाकिस्तानवर मात करुन अंतिम फेरीचं तिकीट मिळवलेलं होतं.
भारतीय संघाने त्यावेळी २०३ धावांनी सामना जिंकला होता. भारतीय संघाने ५० षटकात ९ गड्यांच्या मोबदल्यात २७२ धावा केल्या…प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानचा संघ केवळ ६९ धावांवर गारद झाला होता.
नवी दिल्ली : भारताचे माजी क्रिकेटपटू मदनलाल, रुद्र प्रताप सिंग आणि सुलक्षणा नायक यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) क्रिकेट सल्लागार समितीवर नियुक्ती केली आहे.
राष्ट्रीय निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद आणि सदस्य गगन खोडा यांच्या जागी दोन नवे सदस्य नेमण्याची जबाबदारी या समितीवर असणार आहे. क्रिकेट सल्लागार समितीचा कार्यकाळ एक वर्षांचा असेल, असे ‘बीसीसीआय’चे सचिव जय शाह यांनी म्हटले आहे.
देशाच्या विविध संघांचे प्रशिक्षक निवडण्याची जबाबदारीसुद्धा क्रिकेट सल्लागार समितीकडेच असते. गतवर्षी कपिल देव, अंशुमन गायकवाड आणि शांता रंगास्वामी यांनी हितसंबंधांचे आरोप झाल्यामुळे क्रिकेट सल्लागार समितीचा राजीनामा दिला होता.
जगप्रसिद्ध आयबीएमच्या (इंटरनॅशनल बिझनेस मशिन्स) विशेष कार्यकारी अधिकारीपदी (सीईओ) अरविंद कृष्णा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अनेक वर्षांपासून सीईओ असणाऱ्या व्हर्जिनिया रोमेटी यांच्याकडून अरविंद सहा एप्रिल रोजी कार्यभार स्वीकारतील. यासंदर्भात आयबीएमनेच पत्रक जारी करुन माहिती दिली आहे.
६२ वर्षीय रोमेटी या कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहतील. ४० वर्षांपासून कंपनीच्या सेवेमध्ये असणाऱ्या रोमेटी या २०२० च्या शेवटी निवृत्त होणार असल्याचंही कंपनीने जारी केलेल्या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे.
कोण आहेत अरविंद कृष्णा - ५७ वर्षीय अरविंद सध्या आयबीएमच्या क्लाऊड आणि कग्नेटीव्ह विभागाचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. क्लाऊड तंत्रज्ञान आणि डेटासंदर्भातील कामे या विभागांकडून पाहिली जातात. आयबीएम क्लाऊड, आयबीएम सिक्युरिटी, कग्नेटीव्ह अॅप्लिकेशन्स, आयबीएम रिसर्च अशा चार मुख्य शाखांचे नेतृत्व अरविंद करत आहेत. त्याआधी ते आयबीएमच्या सिस्टीम्स आणि टेक्नोलॉजीच्या डेव्हलपमेंट आणि निर्मिती विभागामध्ये महाव्यवस्थापक म्हणून काम पाहत होते. त्याआधी १९९० साली कंपनीमध्ये नियुक्ती झाल्यानंतर ते आयबीएमच्या डेटासंदर्भातील उद्योग विभागामध्ये होते. आयआयटी कानपूरमधून अरविंद यांनी पदवी पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. त्यानंतर त्यांनी अमेरिकेतील इलिनॉयमधील उर्बाना चॅम्पियन विद्यापिठातून इलेक्ट्रीक इंजिनियरिंगमध्ये पीएचडीचे शिक्षण पूर्ण केले.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या आज अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा हा दुसरा अर्थसंकल्प आहे. तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन याही अर्थमंत्री म्हणून दुसऱ्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. इंदिरा गांधी यांच्यानंतर केंद्रीय अर्थमंत्रीपदापर्यंत पोहचलेल्या त्या दुसऱ्या महिला आहेत. 2020-2021 साठीचा केंद्रीय अर्थसंकल्प त्या आज सादर करतील. सकाळी 11 वाजता अर्थसंकल्पाचं वाचन सुरु होईल.
दरम्यान आर्थिक सर्वेक्षण अहवाल संसदेत सादर करण्यात आला असून त्यात देशाच्या अर्थव्यवस्थेबाबतची आकडेवारी समोर आली आहे. देशाचा आर्थिक विकास दर 6 ते 6.5 टक्के राहिल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
2016 पर्यंत फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या दिवशी बजेट सादर करण्याची प्रथा होती. मात्र माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 2017 पासून 1 फेब्रुवारीला बजेट सुरु करण्यास सुरुवात केली. मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममध्येही हीच प्रथा सुरु आहे. काय स्वस्त होणार? काय महाग होणार? रेल्वेला काय मिळणार? शेतकऱ्यांना काय मिळणार? टॅक्स स्लॅब बदलणार की जैसे थेच राहणार? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आज मिळणार आहेत.
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.