चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०१ एप्रिल २०२१

Date : 1 April, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
‘भारत बायोटेक’च्या लस आयातीस ब्राझीलकडून नकार :
  • येथील ‘भारत बायोटेक’ कंपनीत तयार केल्या जात असलेल्या कोव्हॅक्सिन लशीला आयातीची परवानगी देण्यास ब्राझीलच्या आरोग्य नियामक संस्थेने नकार दिला आहे. या कंपनीच्या प्रकल्पाकडून सध्याच्या लस उत्पादन गरजा व अटींचे पालन होताना दिसत नाही, असा शेरा त्यांनी मारला आहे.

  • आयात बंदीच्या निर्णयावर ‘भारत बायोटेक’ कंपनीने म्हटले आहे की, प्रकल्पातील काही घटकांच्या अटी पूर्ण केल्या जातील. ब्राझील सरकारने २ कोटी लस मात्रांची मागणी आयातीच्या माध्यमातून नोंदवली होती, तो प्रस्ताव अजून बाद झालेला नाही. अ

  • जूनही ब्राझील ती लस आयात करेल फक्त त्यासाठी आम्हाला काही गोष्टी बदलाव्या लागणार आहेत. ब्रेसिसा मेडिकॅमेंटॉस या कंपनीशी हा करार झाला होता. उत्कृष्ट उत्पादन पद्धतींचे अनुपालन न केल्याने ब्राझीलने ही आयात थांबवली आहे, असे ‘अ‍ॅनव्हिसा’ने संकेतस्थळावर म्हटले आहे

  • जर्मनीत ऑक्सफर्ड लशीच्या वापराला स्थगिती - रक्ताच्या गुठळ्या होत असल्याच्या कारणास्तव काही वयोगटांसाठी जर्मनी व कॅनडा यांनी या लशीचा वापर थांबवला आहे. या लशीचे उत्पादन भारतात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने ‘कोव्हिशिल्ड’ नावाने केले आहे.

लिंगभाव समानता निर्देशांकात भारत १४० व्या क्रमांकावर :
  • जागतिक आर्थिक मंचाच्या लिंगभाव समानता २०२१ अहवालात भारत १५६ देशात १४० क्रमांकावर राहिला असून भारताचे स्थान २८ क्रमांकांनी घसरले आहे. दक्षिण आशियात वाईट कामगिरी असलेला भारत हा तिसरा देश ठरला आहे. या अहवालानुसार लिंगभाव समानतेत भारताची टक्केवारी ६२.५ टक्के राहिली असून २०२० मध्ये भारत १५३ देशात ११२ व्या क्रमांकावर होता. आता तो १४० व्या क्रमांकावर फेकला गेला आहे.

  • आर्थिक सहभाग व संधी उपनिर्देशांकात भारताची घसरण झाली असून या वर्षी या काही पैलूत भारतातील लिंगभाव समानतेतील दरी ३ टक्क््यांनी वाढली असून ती ३२.६ टक्के आहे. राजकीय सक्षमीकरणात भारताला मोठा फटका बसला असून त्यात १३.५ टक्के नोंद आहे. २०१९ मध्ये भारताची टक्केवारी २३.१ होती ती २०२१ मध्ये ९.१ टक्के झाली आहे.

  • कामगार- कर्मचारी यात महिलांचा घटता सहभाग हे याचे प्रमुख कारण ठरले असून हा सहभाग २४.८ टक्क््यांवरून २२.३ टक्के झाला आहे. याशिवाय व्यावसायिक व तंत्रज्ञानात्मक भूमिकात महिलांचा सहभाग कमी होऊन तो २९.२ टक्के राहिला आहे. वरिष्ठ व व्यवस्थापकीय पातळीवर महिलांचा सहभाग कमीच असून १४.६ टक्के वरिष्ठ पदांवर महिला आहेत. व्यवस्थापकीय पदांवर महिलांचे प्रमाण ८.९ टक्के आहे. पुरुषांच्या तुलनेत महिलांचे उत्पन्न भारतात एक पंचमांश आहे. त्यामुळे भारत खालच्या दहा देशात गेला आहे.

  • महिलांविरोधातील भेदभाव जास्त असून आरोग्य व जीवन संघर्षात टिकून राहण्याच्या निर्देशांकात भारताने खराब कामगिरी केली आहे. भारत त्यामुळे यात घटक निर्देशांकात खालच्या पाच देशात आहे.

अखेर सरकारने आधार-पॅनकार्ड लिंक करण्यासाठी ३० जूनपर्यंत दिली मुदतवाढ :
  • Adhaar Card आणि Pan Card लिंक करण्यासाठी ३१ मार्च ही अंतिम तारीख सरकारकडून देण्यात आली होती. त्यामुळे शेवटच्या दिवशी मोठ्या संख्येने नागरिकांनी यासाठी देण्यात आलेल्या संकेतस्थळावर आधार आणि पॅन लिंक करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यातल्या अनेक नागरिकांना हे करताना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत होता.

  • या पार्श्वभूमीवर सरकारने ही मुदत अजून वाढवून द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. अखेर केंद्र सरकारने ही मुदत आता ३० जून २०२१ पर्यंत वाढवली आहे. त्यामुळे ज्यांना आज Adhaar-Pan Link करता आलेले नाही, त्यांना ३० जूनपर्यंत ते करता येणार आहे.

  • करोना परिस्थितीमुळे वाढवली मुदत - करोना काळात नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यातच कोविड-१९च्या काळात काही भागांमध्ये लॉकडाऊन तर काही भागांमध्ये कठोर निर्बंध घालून देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सामना कराव्या लागत असलेल्या परिस्थितीमध्ये ही मुदत ३० जूनपर्यंत वाढवून देण्यात येत असल्याचं आयकर विभागाकडून ट्वीट करून जाहीर करण्यात आलं आहे.

आणखी ३ राफेल लढाऊ विमाने आज भारतात होणार दाखल :
  • फ्रान्सच्या संरक्षण उत्पादक डॅसॉल्ट एव्हिएशन यांनी बनविलेले आणखी तीन राफेल लढाऊ विमानांची नवी तुकडी बुधवारी भारतात दाखल होणार आहे. येणारी तीन राफेल लढाऊ विमाने अंबाला येथील आयएएफच्या गोल्डन अ‍ॅरो स्क्वॉड्रॉनमध्ये सामील होतील त्यामुळे या स्क्वॉड्रॉनमधील विमानांची संख्या १४ होईल.

  • फ्रान्सचे भारतातील राजदूत इमॅन्युएल लेनाईन यांनी मंगळवारी सांगितले होते की, पाच अतिरिक्त राफेल विमाने एप्रिल अखेरपर्यंत भारतात आणण्यात येणार आहेत. ही विमाने बुधवारी दाखल होणाऱ्या तीन राफेल व्यतिरिक्त असतील, असेही ते म्हणाले. या गोष्टीला “मोठ्या अभिमानाची बाब” म्हणत ते म्हणाले की, “कोविड -१९ महामारी असूनही आम्ही वेळेपेक्षा आधी आम्ही हे वितरित करू शकलो आहोत.”

  • फ्रान्सचे राजदूत म्हणाले की, “आत्तापर्यंत २१ राफेल विमाने भारतात पोहचवली गेली आहेत, ११ आधीच भारतात आणले गेले आहेत, तीन विमाने सध्या येत आहेत आणि एप्रिलच्या अखेरीस अतिरिक्त ५ विमाने आणण्यात येतील,’ असे भारतातील फ्रान्सचे राजदूत म्हणाले.

  • ते पुढे म्हणाले, “२०२२ मध्ये एकूण ३६ विमाने करारानुसार देण्यात येतील.” गेल्या वर्षी जुलै ते ऑगस्टच्या कालावधीत या विमानाने हवाई दलाच्या ताफ्यात सामील होण्यास सुरुवात केली होती आणि हवाई दलाने कमीतकमी वेळेत ते कार्यान्वित केले आहेत.

०१ एप्रिल चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.