आता 10 हजारांचा दंड भरावा लागेल, जर आधार आणि पॅन ...

Date : 10 March, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :

आता 10 हजारांचा दंड भरावा लागेल, जर आधार आणि पॅन ...: मित्रांनो, आजच पूर्ण करा हे काम नाहीतर भरावा लागेल 10 हजारांचा दंड. नुकतीच शासनाने नवीन नियमावली जाहीर केली असून त्यामध्ये हे ठळकपणे नोंदवले. तुम्ही अजूनही आधार पॅन लिंक केलं नसेल तर अजूनही संधी गेली नाही. आताच लिंक करुन घ्या.

शासनाने आधार कार्ड ला पॅन कार्ड सोबत लिंक करण्यासाठी ३१ मार्च हि अंतिम दिनांक दिली आहे. तुम्ही जर हे आता केले तर सध्या तुम्हाला फक्त १००० रुपये दंड भरून ते लिंक करता येणार आहे.

पण जर तुम्ही हि गोष्ट केली नाही तर ३१ मार्च नंतर तुमच्या पॅन कार्डाचा काही उपयोग होणार नाही. तो केवळ एक प्लॅस्टिकचा कागद उरेल.

जर ३१ मार्च नंतर तुम्हाला तुमचे पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करायचे असेल तर तुम्हाला १०,००० रुपये एवढा दंड द्यावा लागेल. यासाठी आयकर विभागाने सोशल मीडियावर आणि त्यासोबत मोबाईल नंबरवर देखील ग्राहकांना वारंवार आठवण करुन देत आहे.

जर तुम्ही अद्याप आधार कार्ड आणि पॅन कार्ड एकमेकांना लिंक केले नसेल तर आजच हे करून घ्या. कारण नंतर तुम्ही तुमचा इनकम टॅक्स पण भरू शकणार नाहीत. याशिवाय तुमची बँकेची काही कामं अडू शकतात. त्यामुळे तुम्ही वाट पाहू नका.

प्राप्तिकर कायदा 1961 नुसार पॅनला आधारशी लिंक करणे आवश्यक आहे, सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) ने 30 जूनपासून आधारला पॅनशी लिंक करण्यासाठी 500 रुपयांऐवजी 1000 रुपयांचा दंड निश्चित केला आहे.

तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड एकमेकांना लिंक आहे कि नाही हे पाहण्यासाठी 

येथे क्लिक करा

आणि वरील लिंक वरून तुमच्या असे लक्षात आले कि आपला आधार पपण ण शी लिंक नाहीये तर खालील लिंक द्वारे तुम्ही तुमचा आधार पॅन सोबत लिंक करू शकता.

तुमचे आधार कार्ड - पॅन कार्ड सोबत लिंक करण्यासाठी

येथे क्लिक करा

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.