मुंबई : नाशिक महानगर प्रदेशामध्ये आधुनिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था प्रणाली विकसित करण्यासाठी मेट्रो प्रकल्प राबविण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. यात ३३ किलोमीटर लांबीची मुख्य मार्गिका व २६ किलोमीटरची अंतर्गत भागातील पूरक मार्गिका यांचा समावेश असेल. वीज आणि बॅटरी या दोन्ही ऊर्जास्रोतांचा वापर या प्रकल्पात होणार असल्याने देशातील तो अभिनव प्रकल्प ठरणार आहे.
नाशिकमध्ये वीज आणि बॅटरी अशा दोन्ही तंत्रावर चालणारी मेट्रो सुरू करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले होते. त्यानुसार बुधवारी त्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. परवडणारी, प्रदूषणमुक्त व हरित, अशी मेट्रो सुरू करण्यात येणार असून अरुंद, दाटीवाटीच्या रस्त्यांची गरज लक्षात घेऊन ही मेट्रो रेल्वे बांधण्यात येणार आहे.
नाशिक मेट्रो दोन मुख्य मार्गिकांवर विजेवर चालवण्यात येईल. यात गंगापूर ते नाशिक रोड रेल्वे स्थानक ही मुख्य उन्नत मार्गिका असेल. त्याची लांबी २२.५ किमी असेल तर २० स्थानके असतील. गंगापूर ते मुंबई नाका ही दुसरी मुख्य उन्नत मार्गिका १०.५ किमी लांबीची असेल. त्यात १० स्थानके असतील. या दोन मुख्य मार्गिकांची क्षमता वाढविण्यासाठी मुंबई नाका ते सातपूर कॉलनी असा ११.५ किमी आणि नाशिक स्थानक-नांदुर नाका मार्गे शिवाजीनगर असा १४.५ किमी असा एकूण २६ किमीचा पूरक मेट्रो मार्ग बांधण्यात येईल. या पूरक रस्त्यांवर बॅटरीवर धावणारी मेट्रो चालविण्यात येईल. या संपूर्ण प्रकल्पासाठी सुमारे २१०० कोटी रुपये खर्च येईल.
या प्रकल्पाची अंमलबजावणी केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. (महा-मेट्रो) या विशेष कंपनीद्वारे करण्यात येईल. या प्रकल्पात राज्य सरकार, केंद्र सरकार, नाशिक महानगरपालिका, सिडको, एमआयडीसी यांचा आर्थिक सहभाग असेल.
मुंबई : राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लागू असलेल्या पाचव्या आणि सहाव्या वेतन आयोगातील वेतनश्रेणीतील त्रुटी दूर करण्याचा के.पी. बक्षी समितीचा अहवाल बुधवारी सरकारला सादर करण्यात आला. मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर या अहवालातील शिफारशींची अंमलबजावणी केली जाईल आणि त्याचा लाभ राज्यातील सुमारे एक लाख अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मिळेल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे नेते ग. दि. कुलथे यांनी दिली.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग कशा प्रकारे लागू करावा, याचा अभ्यास करून सरकारला शिफारशी करण्यासाठी गृह विभागाचे माजी अप्पर मुख्य सचिव के. पी. बक्षी यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली होती. .
दीड वर्षांहून अधिक कालावधी घेऊन समितीने आपला अहवाल सादर केला. त्यानंतर राज्य सरकारने १ जानेवारी २०१६ पासून पूर्वलक्ष्यी प्रभावाने सातवा वेतन आयोग लागू केला. त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी १ जानेवारी २०१९ पासून करण्यात आली. मात्र या आधी लागू करण्यात आलेल्या पाचव्या आणि सहाव्या वेतन आयोगातील त्रुटी कायम होत्या. त्या दूर करण्याची मागणी संघटनांनी केली होती.
त्यानुसार त्याची जबाबदारीही बक्षी समितीवर देण्यात आली होती. त्यानुसार समितीने वेतन सुधारणा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना सादर केला.
वाशीम जिल्हय़ातील अनसिंग येथील विवान सरनाईक या अवघ्या चार वर्षांच्या चिमुरडय़ाला चक्क २०२ देशांच्या राष्ट्रध्वजाची ओळख आहे. सर्वात कमी वयातील विविध सहा विश्वविक्रम त्याने आपल्या नावावर केले आहेत. विवानच्या या अतुलनीय कामगिरीची दखल घेऊन चेन्नई येथील तामिळ विद्यापीठाने त्याला मानद आचार्य पदवी प्रदान केली.
अनसिंग येथील रहिवासी डॉ. पराग व डॉ. योगीता सरनाईक यांचा मुलगा विवानने आपल्या अचाट बुद्धिमत्तेच्या जोरावर अत्यंत लहान वयात सहा विश्वविक्रम केले. वेळेत व्यासपीठावरून हजारो जनसमुदासमोर सर्वात कमी वयात राष्ट्रगीत, वंदे मातरम्चे सादरीकरण, चिमुकल्या वयात २०२ देशांच्या राष्ट्रध्वजाची ओळख, अत्यल्प वेळेत १०० राष्ट्रध्वजांची ओळख, एका मिनिटांत ८५ देशांच्या राष्ट्रध्वजाची ओळख आदी विक्रम विवानने केले आहेत.
त्याची नोंद विविध ‘रेकॉर्ड बुक’मध्ये घेण्यात आली. त्याने सुमारे आठ महिन्यात पाच विश्वविक्रम प्रस्थापित केले. सहावा विश्वविक्रम करून त्याने आपलाच पहिला विक्रम मोडीत काढत एका मिनिटात ८५ विविध देशांचे राष्ट्रीय ध्वज ओळखले, असे त्याचे वडील डॉ. पराग सरनाईक यांनी सांगितले.
विवानच्या कर्तृत्वाची दखल चेन्नई येथील तामिळ विद्यापीठाने घेतली. अल्पवयात विविध विक्रम करणाऱ्या विवानला तामिळ विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या हस्ते २५ ऑगस्टला चेन्नई येथे मानद आचार्य पदवी बहाल करण्यात आले.
केंद्र सरकारने देशभरात ७५ नवी वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीत यास मंजूरी देण्यात आली आहे. केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी कॅबिनेट बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती दिली. या वैद्यकीय महाविद्यालयांची २०२१-२२ पर्यंत उभारणी होणार असून, ज्या ठिकाणी अशी महाविद्यालये नाहीत अशा ठिकाणी ही महाविद्यालये सुरू केली जाणार आहेत.
यावेळी केंद्रीयमंत्री जावडेकर यांनी सांगितले की, नव्या वैद्यकीय महाविद्यालयांसाठी २४ हजार ३७५ कोटी रूपयांचा खर्च येणार आहे. यामध्ये एमबीबीएसच्या १५ हजार ७०० जागा असणार आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील हा सर्वात मोठी विस्तार आहे.
याचबरोबर केंद्र सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी देखील मोठी घोषणा केली आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ६० लाख मॅट्रिक टन उत्पादनासाठी सबसिडी देण्याचा आणि साखर निर्यातीचं अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचा महत्त्वपूर्ण घेतला आहे. त्यानुसार ६० लाख मॅट्रिक टन साखर निर्यातीवर केंद्र सरकारने ६ हजार २६८ कोटी रुपयांचं अनुदान जाहीर केलं आहे.
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेणे हा भारताचा सार्वभौम निर्णय आणि अंतर्गत मुद्दा असल्याचे सांगून, भारत व पाकिस्तान यांच्यातील प्रलंबित मुद्दे संवादाच्या माध्यमातून सोडवले जावेत, यावर रशियाने बुधवारी भर दिला.
जम्मू-काश्मीरबाबत भारताने घेतलेला निर्णय हा देशाच्या घटनेला अनुसरून असून, रशियाचा या मुद्दय़ावर आपल्या या मित्रदेशाला संपूर्ण पाठिंबा आहे, असे रशियाचे राजदूत निकोलाय कुदाशेव म्हणाले.
जम्मू-काश्मीरबाबत भारताचा निर्णय हा सार्वभौम निर्णय आहे व तो त्याच्या राज्यघटनेनुसार आहे. या मुद्दय़ावरील आमची भूमिका भारताच्या भूमिकेसारखीच आहे, असे कुदाशेव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. भारत व पाकिस्तान यांनी सर्व प्रलंबित मुद्दे संवादातून आणि सिमला करार व लाहोर घोषणापत्राच्या आधारावर सोडवावेत, असेही ते म्हणाले.
काश्मीर हा भारताचा अंतर्गत मुद्दा आहे, अशीच भूमिका १६ ऑगस्टला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत काश्मीरबाबत झालेल्या बंदद्वार चर्चेत रशियाने घेतली होती, असे रशियन दूतावासाचे उपप्रमुख रोमान बाबुकशिन यांनी सांगितले. भारत व पाकिस्तान यांनी त्यांचे मुद्दे द्विपक्षीय चर्चेतून सोडवावेत असे आमचे मत होते.
आंतरराष्ट्रीय परमाणु चाचणी विरोधी दिन / भारतीय क्रीडा दिन / तेलगु भाषा दिन
महत्वाच्या घटना
१४९८: वास्को द गामा कालिकतहुन पोर्तुगालला परत निघाला.
१८२५: पोर्तुगालने ब्राझीलच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली.
१८३१: मायकेल फॅरेडे याने विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचा शोध लावला.
१८३३: युनायटेड किंगडमच्या साम्राज्यात गुलामगिरीवर बंदी घातली.
१८९८: गुडईयर कंपनीची स्थापना झाली.
१९१८: टिळकांनी मुंबई येथे काँग्रेसचे विशेष अधिवेशन बोलावले.
१९४७: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृव्ताखाली घटना समिती स्थापन झाली.
१९६६: द बीटल्स यांनी शेवटचा स्टेज शो केला.
१९७४: चौधरी चरणसिंग यांनी भारतीय लोक दल या राजकीय पक्षाची स्थापना केली.
२००४: मायकेल शुमाकर यांनी पाचव्यांदा फॉर्मुला वन ड्राईव्हर्स चॅम्पियनशिप जिंकले.
जन्म
१७८०: नव-अभिजात फ्रेंच चित्रकार ज्याँओगूस्ट डोमिनिक अँग्र यांचा जन्म.
१८३०: आर्जेन्टिनाचे राष्ट्रपिता हुआनबॉतिस्ता अल्बेर्डी यांचा जन्म.
१८६२: ऑस्ट्रेलियाचे ५वे पंतप्रधान अँड्रु फिशर यांचा जन्म.
१८८०: स्वातंत्र्यसैनिक लोकनायक माधव श्रीहरी तथा बापूजी अणे यांचा जन्म. (मृत्यू: २६ जानेवारी १९६८)
१८८७: भारतीय डॉक्टर आणि राजकारणी जीवराज नारायण मेहता यांचा जन्म. (मृत्यू: ७ नोव्हेंबर १९७८)
१९०१: सहकारमहर्षी पद्मश्री विठ्ठलराव एकनाथराव विखे पाटील यांचा जन्म. (मृत्यू: २७ एप्रिल १९८०)
१९०५: भारतीय हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचा जन्म. (मृत्यू: ३ डिसेंबर १९७९)
१९१५: स्वीडीश अभिनेत्री इन्ग्रिड बर्गमन यांचा जन्म. (मृत्यू: २९ ऑगस्ट १९८२)
१९२३: भारतीय क्रिकेट खेळाडू हिरालाल गायकवाड यांचा जन्म.
१९२३: इंग्लिश चित्रपट निर्माते, दिग्दर्शक अभिनेते रिचर्ड अॅटनबरो यांचा जन्म.
१९५८: अमेरिकन पॉप गायक, गीतलेखक, संगीतकार मायकेल जॅक्सन यांचा जन्म. (मृत्यू: २५ जून २००९)
१९५९: दक्षिण भारतीय चित्रपट अभिनेता अक्किनेनी नागार्जुन यांचा जन्म
मृत्यू
१५३३: पेरूचा शेवटचा इंका राजा अताहु आल्पा यांचे निधन.
१७८०: पंथीयन चे सहरचनाकार जॅकजर्मन सोफ्लॉट यांचे निधन. (जन्म: २२ जुलै १७१३)
१८९१: सायकल चे शोधक पियरे लेलेमेंट यांचे निधन. (जन्म: २५ ऑक्टोबर १८४३)
१९०४: ओट्टोमन सम्राट मुराद (पाचवा) यांचे निधन.
१९०६: मराठी ख्रिस्ती वाङमयाचे जनक बाबा पद्मनजी मुळे यांचे निधन.
१९६९: लोकशाहीर मेहबूबहुसेन पटेल ऊर्फ शाहीर अमर शेख यांचे निधन. (जन्म: २० ऑक्टोबर १९१६)
१९७५: आयर्लंड प्रजासत्ताकाचे पहिले राष्ट्राध्यक्ष इमॉनडी व्हॅलेरा यांचे निधन. (जन्म: १४ ऑक्टोबर १८८२)
१९७६: इस्लाम क्रांतिकारक बंगाली कवी काझी नझरुल इस्लाम यांचे निधन. (जन्म: २५ मे १८९९)
१९८२: स्वीडीश अभिनेत्री इन्ग्रिड बर्गमन यांचे निधन. (जन्म: २९ ऑगस्ट १९१५)
१९८६: पुणे विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक गजानन श्रीपत तथा अण्णासाहेब खेर यांचे निधन. (जन्म: १५ जून १८९८)
२००७: स्वातंत्र्यसैनिक आणि हरयाणाचे मुख्यमंत्री बनारसीदास गुप्ता यांचे निधन. (जन्म: ५ नोव्हेंबर १९१७)
२००८: मराठी हिंदी चित्रपट अभिनेत्री जयश्री गडकर यांचे निधन. (जन्म: २१ फेब्रुवारी १९४२)
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.