मुंबई : एकापेक्षा तगडय़ा प्रतिस्पर्ध्यांमुळे महाराष्ट्रात मानाचे स्थान मिळवणारी ‘मुंबई-श्री’ शरीरसौष्ठव स्पर्धेचा थरार आजपासून अंधेरी येथील लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लबवर रंगणार आहे. शुक्रवारी संध्याकाळी प्राथमिक फेरीला सुरुवात होणार असून, २००पेक्षा अधिक शरीरसौष्ठवपटू प्रतिष्ठेच्या ‘मुंबई-श्री’ किताबावर नाव कोरण्यासाठी सज्ज झाले आहेत.
गेल्या वर्षी विजेतेपदाच्या शर्यतीत असलेले भास्कर कांबळी, सुशील मुरकर, उमेश गुप्ता, नीलेश दगडे, दीपक तांबीटकर, सुशांत रांजणकरसारखे शरीरसौष्ठवपटू आपले स्वप्न साकार करण्यासाठी उत्सुक आहेत. बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटना तसेच मुंबई उपनगर शरीरसौष्ठव व फिटनेस संघटनेतर्फे होणाऱ्या या स्पर्धेत ५५ ते ९० किलोवरील अशा नऊ गटांमध्ये किताबासाठी चुरस रंगणार आहे. पुरुषांच्या फिटनेस फिजिक प्रकारातही १००पेक्षा जास्त खेळाडू सहभागी होणार आहेत.
गेल्या वर्षीपासून माजी विजेत्यांनाही स्पर्धेत उतरण्याची परवानगी असली तरी ‘मुंबई-श्री’ विजेत्यांनी यंदाही स्पर्धेकडे पाठ फिरवत नवख्या खेळाडूंना हा मान पटकावण्याची संधी दिली आहे. गेल्या वर्षी जेतेपदाचे स्वप्न भंगलेल्या सुशील मुरकरने यंदा जय्यत तयारी केली आहे. भक्कम शरीरयष्टी असलेला निलेश दगडे आणि भास्कर कांबळीच्या आव्हानाला त्याला सामोरे जावे लागेल.
भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध सध्या असमान्य स्तरावर पोहोचले आहेत, आपण भारतासारख्या अतुलनीय देशाचा प्रथमच दौरा केला आणि त्या दौऱ्यात द्विपक्षीय संबंधांमध्ये भरपूर प्रगती झाली असून अमेरिका भारतासमवेत मोठा व्यापार करणार आहे, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.
नोव्हेंबर महिन्यात अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार असून ट्रम्प यांचे प्रतिस्पर्धी बर्नी सॅण्डर्स यांनी ट्रम्प यांच्यावर टीका केली असतानाही ट्रम्प यांनी वरील मत व्यक्त केले आहे. भारत दौऱ्यावरून मायदेशी परतल्यानंतर ट्रम्प येथे वार्ताहरांशी बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महान नेते आहेत, महान गृहस्थ आहेत, भारत हा अतुलनीय देश आहे, असे ट्रम्प म्हणाले. भारतामध्ये आमचे यथोचित स्वागत करण्यात आले, दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये मोठी प्रगती झाली आहे, अमेरिका भारतामध्ये मोठा व्यापार करणार आहे, असे ट्रम्प म्हणाले.
नवी दिल्ली : ईशान्य दिल्लीतील दंगलीसंदर्भात काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने गुरुवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी भेट घेऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची पुन्हा मागणी केली. दिल्लीतील लोकांना शांततेने जगता यावे, यासाठी ‘राजधर्मा’चे पालन करण्याची सूचना केंद्र सरकारला करावी, अशी विनंती राष्ट्रपतींकडे करण्यात आली.
हिंसाचार दिवसागणिक उग्र होत असताना केंद्र सरकार तसेच नवनियुक्त दिल्ली सरकारने दंगल थांबवण्याऐवजी निव्वळ बघ्याची भूमिका घेतली. त्यामुळे रस्त्यांवर अराजक माजले. हा हिंसाचार पूर्वनियोजत होता. झुंडीने मालमत्ता लुटल्या गेल्या आहेत. पण, दंगलखोरांना कोणीही अडवले नाही. त्यातून अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहेत.
राष्ट्रपतींनी काँग्रेसच्या मागण्यांसंदर्भात लक्ष घालण्याचे आश्वासन दिल्याचे सोनिया गांधी यांनी पत्रकारांना सांगितले. राष्ट्रपतींना भेटलेल्या शिष्टमंडळात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, गुलाम नबी आझाद, पी. चिदंबरम, ए.के. अँटनी, आनंद शर्मा, मल्लिकार्जुन खरगे, अहमद पटेल, प्रियांका गांधी आदी नेत्यांचा समावेश होता. दिल्लीतील हिंसाचार ही देशासाठी लाजीरवाणी घटना असून केंद्र सरकारचे अपयश असल्याचा आरोप मनमोहन सिंग यांनी केला.
जॉन ऑलिव्हर यांच्या ‘लास्ट वीक टुनाइट’ या लोकप्रिय टॉक शोचा ताजा भाग (एपिसोड) डिस्नेच्या मालकीच्या हॉटस्टारने अपलोड केलेला नाही. या भागात ऑलिव्हर यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याबाबत, तसेच त्यावरून उसळलेला हिंसाचार हाताळण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या सरकारवर टीका केली होती.
‘मोदी : लास्ट वीक टुनाइट विथ जॉन ऑलिव्हर’ हा ताजा भाग हॉटस्टारच्या वापरकर्त्यांना मंगळवारी सकाळी ६ वाजेपासून उपलब्ध होणे अपेक्षित होते; मात्र मंगळवारी आपल्या अॅपवर लॉग-इन करणाऱ्यांना गेल्या आठवडय़ातील भागच पाहायला मिळाला. याबाबत केलेल्या विचारणेला डिस्ने व हॉटस्टार यांनी प्रतिसाद दिला नाही; तर सरकारचे या विषयाशी काही देणेघेणे नाही, असे माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले.
३० मिनिटांच्या या भागाची १८ मिनिटांची चित्रफीत या शोच्या अधिकृत यूटय़ूब चॅनेलवर मंगळवारी अपलोड करण्यात आली असून, तेव्हापासून ५० लाखांहून अधिक लोकांनी ती पाहिली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला भेट दिल्यामुळे ऑलिव्हरने हा भाग भारतावर केंद्रित करण्याचे ठरवले. ईशान्य दिल्लीत हिंसाचार उफाळला असतानाच ही ३६ तासांची भेट पार पडली होती.
काही दिवसांपूर्वीच तुकाराम मुंढे यांनी नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदाची सूत्र हाती घेतली. आयुक्तपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर पहिल्याच दिवसापासून त्यांनी आपल्या कामांची सुरूवात केली.
याशिवाय कार्यालयांमध्ये उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांनीही त्यांची धास्ती घेतली असून त्यांनीदेखील वेळेत येण्यास सुरूवात केल्याचं समोर आलं आहे. तर दुसरीकडे एकेकाळी ६० टक्क्यांच्या जवळपास असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या आता काही विभागांमध्ये १०० टक्के तर काही विभागांमध्ये ९६ टक्क्यांवर पोहोचली आहे.
२८ जानेवारी रोजी तुकाराम मुंढे यांनी नागपूर मनपाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी जोमानं कामाला सुरूवात केली होती. तुकाराम मुंढे यांनी रूजू झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी लेखा आणि वित्त विभागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी या विभागात कार्यरत असलेल्या चार कर्मचाऱ्यांना दणका देत कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश दिले होते.
आपल्या कामात अनियमितता केल्याचा ठपका या कर्मचाऱ्यांवर ठेवण्यात आला होता. तसंच दुसऱ्या दिवसापासूनच तुकाराम मुंढे यांनी नागपूर महानगरपालिका क्षेत्रातही जनेतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी जनता दरबार सुरू केला. तसंच त्यांनी जनतेच्या समस्या ऐकून घेण्यास सुरूवात केली.
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.