STI Main 2012- Paper 1

STI Main 2012- Paper 1 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
101.

खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा 

'अद्वैत'

102.

'वाटेत मोटार नादुरुस्त झाली म्हणून मला यावयास उशीर झाला.'   

वरील वाक्य संयुक्त वाक्याच्या कोणत्या प्रकारातील आहे? 

103.

‘तो घरी खात्रीने येईल' या वाक्याचे योग्य वाक्यरूपांतर कोणते ?

104.

खाली म्हणी व त्यांचा अर्थ दिला आहे. त्यातील चुकीच्या अर्थाची जोडी ओळखा

105.

'विजयनगरच्या साम्राज्याचा जेथे अंत झाला'

या वाक्यातील उद्देश्य कोणते ?

106.

खालील पर्यायातील योग्य पर्याय कोणता? 

‘कुणकुण लागणे'

107.

खालील म्हण पूर्ण करा.

संग तसा __________ .

108.

एका केवल वाक्यात रूपांतर करा. 

‘हे लोकशाहीचे युग आहे. वेळीच जागे व्हावे.'

109.

'मग त्यावर आकाशातल्या पणत्या तेवत असतात.'

वरील वाक्यातील विधेय विस्तार सांगा.

110.

“अं व अ: हे _________ आहेत.

खालील उतारा वाचून त्याखालील प्रश्न क्रमांक 111 ते 115 यांची उत्तरे द्या -
             एका घराचे दगड काढून दुसन्या घरास लावावयाचे असले तरी किती त्रास पडतो हे सर्वांस माहीत आहेच. पण हेच दगड चुन्यात पक्के बसविलेले असले तर फारच त्रास पडतो, आणि त्यांतहि पहिली इमारत बांधल्यापासून बरीच वर्षे लोटली असलीं, व चुन्याचा आणि दगडांचा एकजीव होऊन गेला असला, तर एकेक दगड सोडविण्यास किती मारामार पडते, हे कोणास सांगावयाला पाहिजे असे नाही ; तात्पर्य, कोणत्याहि जड द्रव्यांचा संनिकट संयोग करून त्यापासून एक पिंड केला असता तो पिंड मोडून त्याच्या घटकांचा निराळा पिंड बनविणे हे अतिशय कष्टाचे काम आहे, हे प्रत्येकाने कबूल केले पाहिजे.
           सामाजिक घडामोडींचाहि असाच प्रकार आहे, प्रथम व्यक्तीच्या शरीररचनेचा विचार करा. आरंभी हे शरीर समजातीय व्याचे झालेले असून, पुढे ते जसजसे वाढत जाते तसतसे त्यांत विषमजातित्व उत्पन्न होते ; व ज्या मानाने त्यात विषमजातित्व उत्पन्न होते त्या मानाने त्यात अधिकाधिक दाढर्य उत्पन्न होऊन बाह्य संस्कारात ते अधिकाधिक प्रतिबंध करू लागते. कोवळे वेळू लहान झाडांच्या फांद्या किंवा तरुण मुलांचे अवयव यात किती लवचिकपणा असतो बरे? वाढ खुटून प्रत्येक अवयवात काठिण्य आल्यावर, कोणत्याहि मनुष्यास चांगली कसरत शिकता येत नाही, ही प्रत्येकाच्या पाहण्यातली गोष्ट आहे. सामाजिक शरीरातहि परिणतीमुळे अशाच तहेचे काठिण्य उद्भूत होते. कोणताहि समाज एकदा वाढीस लागला, आणि श्रमविभागामुळे त्यास भिन्नावयवित्व प्राप्त झाले, व त्यात निरनिराळे वर्ग उत्पन्न होऊन ते निरनिराळ्या क्रिया करू लागले म्हणजे त्याचे रूपांतर करू पाहणाच्या गोष्टीस त्याकडून मोठा प्रतिबंध होऊ लागतो. राज्य, धर्म, सैन्य, लोकाचार यासंबंधाने ज्या रीति एकदा रूढ होऊन जातात त्यात फिरून बदल करणे अत्यंत दुरापास्त होऊ लागते, पूर्वापार चालत आलेल्या चालीत विचारदृष्टया कितीहि विसंगतता दिसली तरी त्या सोडणे किती जिवावर येते हे बाल-विवाह, केशवपन, सुतक इत्यादि प्ररूढ चालीचा विचार करता, तेव्हांच लक्षात येणार आहे. समाजातील शेकडा नव्याण्णव लोकांची स्थिति अंधपरंपरेप्रमाणे असते. मळलेल्या वाटेच्या बाहेर एक पाऊल टाकल्यानेसुद्धा आपणावर मोठा भयंकर प्रसंग गुदरेल असा धाक त्यास क्षणोक्षणी वाटत असतो.

111.

उताच्याला योग्य शीर्षक द्या :

112.

कोणत्या संबंधाने रीती रूढ होतात?

113.

चांगली कसरत केव्हा करता येत नाही?

114.

सामाजिक शरीरांमध्ये काठिण्य कशामुळे उद्भवते ?

115.

लवचिकपणा कोणात असतो?

खालील उताच्यावरील प्रश्न क्र. 116 ते 120 या प्रश्नांची उत्तरे लिहा.
उतारा

                 गाडगे महाराज हे महान समाजसुधारक संत होऊन गेले. दारिद्रय, अज्ञान, अंधश्रद्धा, देवधर्म, कर्मकांड, भोळेपणा, जातपात व व्यसने यांत बुडून गेलेल्या समाजाला त्यांनी नवा मार्ग दाखवला. त्यासाठी त्यांनी केवळ भाषणबाजी केली नाही. त्यांच्या हातातील खराटा हेच त्यांचे साधन होते. गावातील गलिच्छ वस्त्या ते झाडून स्वच्छ करीत. पुढे जनमानसातील कचरा साफ करण्याचे अखंड व्रत आयुष्यभर चालवले. फुकटचे त्यांनी स्वत: कधी खाल्ले नाही व इतरांना खाऊ दिले नाही. श्रमांना प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. गरिबीचे मूळ अज्ञानात, व्यसनात, गलिच्छपणात व आळसात आहे हे त्यांनी लोकांना पटवले. लक्षावधी रुपये वर्गणीरूपाने जमवून त्यांनी धर्मशाळा, गोशाळा, पाठशाळा, पाणपोया बांधल्या व लोकहिताची कामे केली. यात्रा-मेळे यांना ते जात ते जनताजनार्दनांच्या सेवेसाठी. आंधळ्यांची, अपंगांची, रंजल्यागांजल्यांची सेवा हीच त्यांनी विठ्ठलाची भक्ती मानली. लक्षावधी रुपये जमवून त्यांतील पैचाही विनियोग त्यांनी कधी स्वत:साठी केला नाही. पै-पैचा हिशोब ते वहीत टिपून ठेवत. ती चोपडी सदैव त्यांच्या गळ्यात अडकवलेली असे. कुणीही येऊन त्यांचे हिशोब पाहू शकत असे. त्यांचा व्यवहार कसा खुल्लमखुल्ला होता. स्वत:च्या बायकोने आजारपणात गोशाळेतील गाईचे दूध घेतले, म्हणून तशाही अवस्थेत त्यांनी तिला सबंध गोशाळा साफ करण्याची शिक्षा दिली. सार्वजनिक जीवनात आर्थिक व्यवहार सांभाळणारा मनुष्य किती स्वच्छ असावा याचा गाडगेबाबा हे एक अत्युच्च आदर्शच होते.

116.

उता-यातील 'विनियोग' या शब्दाचा अर्थ -

117.

गाडगे महाराजांनी गोशाळा साफ करण्याची शिक्षा कुणाला दिली?

118.

गाडगेबाबा यात्रेला का जात ?

119.

गरिबीचे मूळ कशात आहे, असे गाडगेबाबा म्हणत ?

120.

गाडगे महाराजांनी कोणती विठ्ठलभक्ती मानली ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

STI Main 2012- Paper 1 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.