STI Main 2012- Paper 1

STI Main 2012- Paper 1 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :

खालील उतारा वाचून प्रश्न क्र. 121 ते 125 ची उत्तरे द्या.

          आपण झाडे कां पूजतो? अर्थात् इतर वस्तूंची पूजा करण्यास जी कारणे असतील तीच झाडांची पूजा करण्यासहि असली पाहिजेत. जो मनुष्य स्वत: पराक्रमी आहे, किंवा ज्याचा पराक्रमी पुरुषाशी कोणत्याहि प्रकारचा संबंध आहे, अथवा ज्यापासून लोकांचे कोणत्याहि प्रकारचे मोठे हित होत आहे, अशा प्रकारच्या मनुष्याला बहुधा लोकांत मान मिळतो. हाच मान वाढला म्हणजे त्याला पूजा म्हणतात; व ही पूजा करण्याची बुद्धि आपल्या अंतकरणांत उत्पन्न झाली म्हणजे आपण तिला पूज्यबुद्धि म्हणतो. वड, पिंपळ, उंबर, आपटा शमी, तुळस, बेल वगैरे झाडांविषयी आमच्या मनांत जी पूज्यबुद्धि उत्पन्न झाली आहे ती वर थोडक्यात सांगितलेल्या कारणापैकी कोणत्या तरी कारणांनी उद्भवली असावी यात संशय नाही. जिरेनिअमप्रमाणे तुळशीत हवा स्वच्छ करण्याचा गुण फार आहे, म्हणून आम्ही सारे तिचे भक्त बनलो आहो किंवा, सर टी. माधव रावांनी एकदा सुचविल्याप्रमाणे बेल, तुळस आणि गवती चहा याचा चहा ऊर्फ गोडा काढा रोज सकाळी घेतल्यास वातपित्त कफाची विशेष बाधा न होता प्रकृति साफ राहण्यासारखे गुण तीत आहेत, म्हणून आम्ही तिला देवांच्या पूजेतील एक अत्यावश्यक द्रव्य केले आणि सर्व ऋतूत बायकांना तिच्या भोवती प्रदक्षिणा घालण्यास लाविले, हे निश्चयाने सांगता येत नाही ; तथापि एवढे खरे आहे की, ह्या झाडांच्या अंगच्या कसल्या तरी चांगल्या गुणाबद्दल त्याला आमच्या घरात व देवळात इतके महत्वाचे स्थान मिळाले असावे! वड, पिंपळ, उंबर वगैरे मोठ्या गर्द छायेची झाडे आहेत, आणि त्यांपासून पांथांस व इतरास मोठे सुख होते म्हणून त्यास देवत्व प्राप्त झाले असावे असे प्रथमदर्शनी वाटण्याचा संभव आहे. पण वास्तविक कारण तसे दिसत नाही, तसे असेल तर आंबा, बकुळ, फणस वगैरे दाट छायेची झाडे पूज्य का झाली नाहीत? आंबा व फणस छायेला चांगले असून खायलाहि कांही वाईट नाहीत! तेव्हां फायद्याच्या दृष्टीने ही झाडे विशेष पूज्य व्हायला पाहिजे होतीं.

121.

तुळशीत हवा स्वच्छ करण्याचा गुण कशाप्रमाणे आहे?

122.

वातपित्त कफाची विशेष बाधा कशामुळे होत नाही ?

123.

झाडांच्या कोणत्या गुणामुळे त्यांना देवळात स्थान मिळाले ?

124.

पूजा कशाला म्हणतात ?

125.

लोकात मान कोणाला मिळतो ?

खालील उतारा वाचून प्रश्नक्रमांक 126 ते 130 ची उत्तरे द्या.
                 प्रतिभा दैवी वगैरे नसते, ती छान मानवीच असते. फक्त माणसे अपूर्व सुखाची फुलवण करणा-या त्या यातनाघराकडे पाठ फिरवतात. दुःखाना घाबरतात, त्यामुळे अथांग सुखांना मुकतात. स्वत:चे काळीज ज्वाळेवर धरून पाहण्याची कल्पना करा. पण प्रथम काळजाला जखमा होतात. नंतर कधीही न कोमेजणारी या जखमांचीच फुले होतात. प्रतिभा प्रत्येकच व्यक्तीजवळ असते. तिला पैलू पाडता येतात. आपल्या वाट्याला आलेल्या काळाच्या पहाडात सुंदर लेणी खोदता येतात. फक्त वाईटाने आपले मन बेसुमार दुखले पाहिजे. चांगल्याची त्याला अनावर तहान लागली पाहिजे.
             प्रतिभा या शब्दात दोन घटक आहेत. एक घटक आहे 'प्रति' हा आणि दुसरा आहे ‘भा' हा. 'प्रति' म्हणजे दुसरा आणि 'भा' म्हणजे प्रकाश. दुसरा म्हणजे आहे त्याहून वेगळा. हा वेगळा प्रकाश निर्माण करणारी मन:शक्ती म्हणजे प्रतिभा. अनेक मनांमध्ये अंधारच आहे. अनेक जंगलांमध्ये अंधारच आहे. अनेक झोपड्यांमध्ये आणि घरांमध्ये अंधारच आहे. अनेक मुठींमध्ये अंधारच आहे. या सर्व अंधारांपर्यंत पोचणे सूर्याला शक्य होत नाही. ही सूर्याची फार मोठी उणीव होय. मानवी प्रतिभेला ही मर्यादा नाही. सूर्याचा प्रकाश जर जीवनातील हा अनंत अंधार नष्ट करू शकत नसेल तर तो अंधार नष्ट करण्यासाठी दुसरा आणि नवा उजेड निर्माण करण्याची गरज निर्माण होते. मानवी प्रतिभा हे कार्य करते.

126.

प्रतिभा म्हणजे काय?

127.

चांगल्याची अनावर तहान कोणाला लागली पाहिजे?

128.

जीवनातील अंधार कोण नष्ट करू शकते?

129.

या उता-याला योग्य ते शीर्षक द्या.

130.

प्रतिभा कशी असते?

131.

Choose the correct alternative.

_______ carefulness could have saved the situation.

132.

Choose the correct alternative.

Bibliography is :

133.

 In the armed forces, it is considered a great privilege to die in harness.

Choose the correct meaning of the idiom underlined in the above sentence.

134.

Select the correct modal to express obligation.

You ___________ keep your promise.

135.

Which of the following sentences is correct ?

(a) He took out his shoes.

(b) He disposed off his car.

136.

Which one of the following sentences is correct ? 

(a) We should love the God. 

(b) Many are Gods of Hinduism.

137.

Eagle flies highest of all the birds.

Choose the correct positive degree of the sentence.

138.

Pick out the correct sentence from the given alternatives.

139.

I know the owner who is a millionaire.

Identify the underlined clause.

140.

Which of the following sentences is correct ? 

(a) Each of these boys plays games. 

(b) The boy who does best he will get a prize.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

STI Main 2012- Paper 1 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.