राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१४ GS-2

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१४ GS-2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
61.

पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?

(a) सन 1964 साली नियुक्त झालेल्या मुदलियार आयोगाने प्रथम 15 वर्षाच्या त्रिस्तरीय अभ्यासक्रमाबाबत शिफारशी केल्या.

  (i) पहिली ते दहावी प्राथमिक व माध्यमिक     

  (ii) अकरावी व बारावी उच्च माध्यमिक
  (iii) पदवी शिक्षण तीन वर्षीय

(b) डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन आयोगाने विद्यापीठ स्तरीय अभ्यासाबाबत शिफारशी केल्या.

पर्यायी उत्तरे : 

62.

खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
(a) मध्य प्रदेशात सर्वात जास्त दैनिके प्रकाशित होतात.

(b) मराठीतले सर्वात पहिले दैनिक 'दर्पण' हे होते.

(c) 'बॉम्बे समाचार' हे आजही प्रकाशित होणारे सर्वात जुने वर्तमानपत्र आहे.

(d) भारतीय भाषेत प्रकाशित झालेले सर्वात पहिले वर्तमानपत्र 'समाचार दर्पण' हे होते. योग्य पर्याय निवडा : 

63.

2009 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये, खालील राजकीय पक्षांची सर्वात जास्त ते सर्वात कमी मतांची टक्केवारी, यानुसार मांडणी करायची झाल्यास, खालीलपैकी कोणता पर्याय योग्य ठरेल?

64.

2009 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुका संदर्भात, स्तंभ II मधील जिंकलेल्या जागांच्या संख्येबरोबर स्तंभ 1 मधील राजकीय पक्षांच्या जोड्या जुळवा.

65.

2014 मध्ये, भारतीय निवडणूक आयोगाने खालीलपैकी कोणत्या पक्षांना महाराष्ट्रात राज्य पक्ष म्हणून मान्यता दिली आहे ?

(a) शेतकरी कामगार पक्ष

(b) शिवसेना

(c) महाराष्ट्र नवनिर्माण सेना

(d) जन सुराज्य पक्ष

(e) भारतीय कम्युनिस्ट पक्ष

योग्य पर्याय निवडा :

66.

पुढील विधाने वाचून ‘प्रसार भारती' विषयी योग्य विधाने निवडा.
(a) वैधानिक स्वायत्त मंडळ आहे.

(b) 1977 मध्ये प्रसार भारतीची स्थापना झाली.

(c) आकाशवाणी, दूरदर्शन आणि FM केंद्रे प्रसारभारतीच्या स्थापनेनंतर तिचे घटक बनले आहेत.

पर्यायी उत्तरे :

67.

खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

(a) सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महाराष्ट्र शासनाने शिक्षण शुल्क समिती आणि प्रवेश नियंत्रण समितीची स्थापना केली.

(b) प्रवेश नियंत्रण समितीमध्ये एक सदस्य चार्टर्ड अकाउण्टण्ट असावेत.

(c) प्रवेश शुल्क समितीमध्ये एक सदस्य विद्यापीठाचे कुलगुरु असावेत.

(d) प्रत्येक समितीत 5 पेक्षा जास्त सदस्य असू नयेत.

योग्य पर्याय निवडा :

68.

खालीलपैकी कोणती विधाने असत्य आहेत ?
(a) निवडणूक आयोगाने राष्ट्रीय जनता दलाला 2007 मध्ये राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता दिली.

(b) राष्ट्रीय जनता दलाने त्याकरता आवश्यक अटींची पूर्तता बिहार, झारखंड, मणीपूर आणि मिझोराममधून केली.

(c) निवडणूक आयोगाने घातलेल्या अटींची पूर्तता, नंतर झालेल्या निवडणुकांमध्ये राष्ट्रीय जनता दल करू शकले नाही. 

(d) रा.ज.द. ची राष्ट्रीय पक्ष म्हणून असलेली मान्यता 2010 मध्ये रद्द झाली. योग्य पर्याय निवडा : 

69.

पुढीलपैकी कोणते पर्याय दबाव गटाची कार्ये वर्णन करतात ?

(a) शासन आणि जनता यांतील दुवा

(b) हितसंबंधाचे अभिव्यक्तीकरण

(c) हितसंबंधाचे सुसूत्रीकरण

(d) राजकीय सहभाग वाढवणे

पर्यायी उत्तरे :

70.

महाराष्ट्रातील 'दलित पँथर' विषयीची पुढील विधाने वाचून त्यापैकी चुकीचे विधान कोणते ते सांगा.

71.

दुस-या प्रशासकीय सुधारणा आयोगाने अशी शिफारस केलेली आहे, की नगर पंचायती वगळता शहरी स्थानिक शासनात त्रिस्तरीय प्रशासन असावे. ते आहेत :

(a) नगर परिषद

(b) नगर समित्या

(c) प्रभाग समित्या

(d) क्षेत्र समित्या

पर्यायी उत्तरे :

72.

1994 पूर्वी, पंचायत समिती (मध्य पंचायत) कशी ओळखली जात होती ? 

73.

राष्ट्रीय ई-शासन योजनेअंतर्गत ई-पंचायत हे मिशन मोड प्रकल्पापैकी एक म्हणून ओळखले जाते. या प्रकल्पाचा उद्देश :

(a) पंचायत प्रक्रियेअंतर्गत संगणकीकरण,

(b) तळागाळातील नियोजन प्रक्रियेत माहिती तंत्रज्ञानाचा वापर करण्यास पंचायतींना सक्षम करणे.

(c) माहिती-तंत्रज्ञानाच्या परिणामकारक वापरास लोकांना सक्षम करणे.

(d) सर्व पंचायतराज संस्थांच्या कार्यप्रणालीत पारदर्शकता आणणे.

पर्यायी उत्तरे :

74.

पुढील दोन विधानांपैकी कोणते खरे आहे?

(a) राज्य निवडणूक आयोगाचे कार्य आणि त्यांची निवडणूक प्रक्रिया यासाठी अर्थसंकल्पीय सहाय्य आणि आवश्यक निधी राज्य पुरविते.

(b) जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका जिल्हाधिकारी राज्य निवडणूक आयोगाच्या अधिपत्याखाली घेतात.

पर्यायी उत्तरे :

75.

कोणत्या राज्यांना 73 व्या घटना दुरुस्तीतील तरतुदीपासून सूट देण्यात आली आहे ?

(a) मिझोराम

(b) मेघालय

(c) नागालैंड

(d) अरुणाचल प्रदेश

पर्यायी उत्तरे :

76.

पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?

(a) विधीमंडळातील एक सदस्य एकाच दिवशी ताराचिन्ह करून तोंडी उत्तरासाठी असलेल्या प्रश्नांच्या सुचिमध्ये जास्तीत जास्त दोन प्रश्न दाखल करू शकतो.

(b) दोन पेक्षा अधिक प्रश्न असल्यास ते पुढच्या दिवशी घेतले जातात.

पर्यायी उत्तरे :

77.

महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेसारखी संस्था त्या त्या राज्यात कशी संबोधिली जाते ?

(a) जिल्हा परिषद - ओडिशामध्ये

(b) जिल्हा विकास परिषद - पंजाबमध्ये

(c) महाकामा परिषद - पश्चिम बंगालमध्ये

वरीलपैकी कोणती विधाने अयोग्य आहेत ?

78.

दुस-या प्रशासकीय सुधार आयोगाची शिफारस काय आहे ?

79.

"आपण जे संविधान तयार करतो आहोत त्यात जरी त्याला फारच कमी अधिकार दिले असले तरी एखादा राज्यपाल गैर असल्यास बरीच गडबड करू शकतो". संविधान सभेतील हे विधान कोणाचे आहे?

80.

1984 मध्ये जिल्हा नियोजनाच्या बाबतीत हनुमंतराव समितीने खालीलपैकी कोणत्या सूचना केल्या होत्या?
(a) स्थानिक पातळीवर विकेंद्रित नियोजन,

(b) जिल्हाधिका-यांच्या अधिपत्याखाली स्वतंत्र जिल्हा नियोजन संस्था.

(c) जिल्हाधिकारी हा समन्वयक म्हणून पंचायती संस्थेशी जोडलेला असावा.

(d) जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेची स्थापना.

पर्यायी उत्तरे :

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१४ GS-2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.