राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१४ GS-2

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१४ GS-2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.

भारतातील निवडणूक अधिनियम 1961 नुसार कोणत्याही एका संसदीय मतदार संघासाठीच्या कमाल खर्चाच्या मर्यादेसंबंधी पुढील विधाने वाचा :

(a) कोणत्याही एका संसदीय मतदारसंघातील निवडणूक खर्चाची कमाल मर्यादा रु. 70,00,000 इतकी आहे.

(b) अरुणाचल प्रदेश, गोवा, सिक्किम या लहान राज्यात मात्र खर्चाची कमाल मर्यादा रु. 56,00,000 इतकी आहे.

(c) दिल्लीसह सर्व केंद्रशासित प्रदेशांमध्ये निवडणूकीच्या खर्चाची कमाल मर्यादा रु. 54,00,000 इतकी आहे.

योग्य पर्याय निवडा:

42.

घटनेच्या अनुच्छेद 326 मध्ये मतदानाच्या अधिकारासंदर्भात अपात्रतेचे निकष कोणते आहेत ? 

(a) अधिवास नसणे

(b) मनोदुर्बलता

(c) दिवाळखोरी

(d) सिद्ध झालेली गुन्हेगारी

(e) मतदार यादीत नाव नसणे

योग्य पर्याय निवडा:

43.

खालील विधाने पहा :

(a) सावित्रीबाई ज्योतीराव फुले पुरस्कार शैक्षणिक क्षेत्रात भरीव काम करणा-या स्त्री-पुरुषांना दिला जातो.

(b) हा पुरस्कार सावित्रीबाई फुलेंच्या 150 व्या जयंतीचा योग साधून सुरू करण्यात आला.

(c) हा पुरस्कार प्राप्त करण्यासाठी वय 50 वर्षे पूर्ण असावे लागते.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?

44.

पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे ?
(a) ज्या चित्रपटांना UA दाखला आहे ते 12 ते 18 वयाची मुले केवळ आई/वडिलांसोबत पाहू शकतात.

(b) ज्या चित्रपटांना 'S' दाखला आहे ती केवळ विशिष्ट गटांसाठीच असतात.

 पर्यायी उत्तरे :

45.

खालील वाक्ये पहा :
(a) सर्व शिक्षा अभियान 2001 साली सुरू करण्यात आले.

(b) सर्व शिक्षा अभियानाचा एक उद्देश 80% नोंदणी करणे हा आहे.

(c) 'प्राथमिक शिक्षणात मुले आणि मुली यांच्यातील तफावत भरून काढणे' हाही सर्व शिक्षा अभियानाचा उद्देश आहे.

कोणती विधाने बरोबर आहेत ?

46.

पुढील विधाने वाचा :
(a) भारतीय महिला राष्ट्रीय फेडरेशन (NFIW) ही संघटना भारतीय साम्यवादी माक्र्सवादी पक्षाशी संबंधित आहे.

(b) अखिल भारतीय लोकशाही महिला संघटना (AIDWA) ही संघटना भारतीय साम्यवादी पक्षाशी संबंधित आहे.

योग्य पर्याय निवडा :

47.

भारतीय निवडणूक आयोगाच्या सुव्यवस्थित मतदार शिक्षण आणि निवडणूकीय सहभाग (SVEEP) उपक्रमामध्ये पुढीलपैकी कोणकोणत्या कार्यक्रमांचा समावेश होतो?

(a) मतदारांचे वर्तन सर्वेक्षण. 

(b) शासकीय विभागाबरोबर सहकार्य. 

(c) राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करणे.

(d) नागरी समाज संघटना, प्रसारमाध्यमे संघटना यांच्याशी सहकार्य. 

(e) राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर आयकॉन यांची निवड करणे.

(f) निकाल त्वरित जाहीर होण्यास्तव सनियंत्रण.

पर्यायी उत्तरे : 

48.

पुढीलपैकी कोणती विधाने अयोग्य आहेत ?
(a) वर्तमानपत्रांवर देखरेख ठेवण्याचे कार्य प्रेस कॉउन्सिल ऑफ इंडिया करते.

(b) कॉउन्सिलचे अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश असतात.

(c) कॉउन्सिलमध्ये एकूण 30 सदस्य असतात.

(d) वीस सदस्य वर्तमानपत्र जगताचे असतात.

(e) सात सदस्य संसदेतील असतात. (लोकसभा 4 राज्यसभा 3)

(f) एक साहित्य अकादमीतून

(g) एक बार कॉउन्सिल ऑफ इंडियामधून

(h) एक विद्यापीठ अनुदान मंडळातून

पर्यायी उत्तरे : 

49.

व्यावसायिक शिक्षणसंस्थामधील रिक्त जागांचे विश्लेषण करण्यास्तव स्थापन केलेल्या समितीच्या शिफारशींबाबत पुढील दोन विधानांपैकी काय खरे आहे ? 

(a) नव्या तंत्रशिक्षण संस्थांना परवानगी देऊ नये, केवळ सद्यस्थिती संस्थांना जागा वाढविण्यास अनुमती द्यावी.

(b) हॉटेल व्यवस्थापन व कॅटरिंग तंत्रशिक्षण वगळून इतर एमबीए अभ्यासक्रमातील प्रवेश क्षमता कमी करावी.

पर्यायी उत्तरे :

50.

खालील विधाने पहा :

(a) महाकवि कालिदास संस्कृत साधन पुरस्कार महाराष्ट्र शासनातर्फे संस्कृत दिनी दिला जातो हा दिवस बुद्ध पौर्णिमेला पडतो.

(b) संपूर्ण महाराष्ट्रातून सात आणि महाराष्ट्राबाहेरील एक अश्या एकूण आठ व्यक्तींना पुरस्कार दिले जातात.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ? पर्यायी उत्तरे : 

51.

समुदाय रेडियो (Community Radio - सीआर) विषयी पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ते सांगा.

52.

2001 नंतर महाराष्ट्रात लोकसभेच्या मतदारसंघांचे परिसीमन झाले, त्यासंदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?

(a) अनुसूचित जातींकरता जागा वाढवण्यात आल्या.

(b) अनुसूचित जमातींकरता जागा वाढवण्यात आल्या.

(c) अनुसूचित जातींकरता जागा तेवढ्याच राहिल्या.

(d) अनुसूचित जमातींकरता जागा तेवढ्याच राहिल्या.

(e) अनुसूचित जातींकरता जागा कमी करण्यात आल्या.

(f) अनुसूचित जमातींकरता जागा कमी करण्यात आल्या.

योग्य पर्याय निवडा :

53.

भारताच्या राजकीय आणि निवडणुकीय इतिहासात 1967 हे वर्ष 'मैलाचा दगड' मानण्यात आले कारण : 

(a) 1967 च्या निवडणुकीनंतर काँग्रेसने केंद्रात सत्ता राखली परंतु कमी बहुमताने आणि अनेक राज्यात सत्ता गमावली.

(b) 'सिंडीकेट' गट आणि इंदिरा गांधींचा गट यांच्यात ताणतणाव वाढले.

(c) भारताच्या सरन्यायाधीशांची नेमणूक हा वादग्रस्त मुद्दा बनला आणि न्यायमंडळ आणि शासन यांतील तणाव वाढला.

पर्यायी उत्तरे :

54.

खालील विधाने पहा :
(a) भारताच्या निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील 6 पक्षांना स्थानिक पक्ष म्हणून मान्यता दिली आहे.

(b) दूरदर्शनवरील राजकीय प्रक्षेपणाकरिता उपलब्ध कालावधी पक्षांच्या राष्ट्रीय अथवा राज्य पक्ष म्हणून असलेल्या मान्यतेवर आधारित असतो. 

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहेत ?

55.

'एक शैक्षणिक पोर्टल (प्रवेशद्वार)' या स्वरूपात देशातील नागरिकांचे अध्यापन आणि शिकण्याची क्रिया सुधारण्यासाठी आजवर वंचित राहिलेल्या समाजगटांपर्यंत, ग्रामीण/अल्पविकसित भागात पोहोचण्यासाठी आणि एकूणच उच्च शिक्षणातील नावनोंदणी संख्या वाढविण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या पोर्टलचे नाव, 

56.

1990 मधे माहितीचा अधिकार चळवळ सुरू झाली जेंव्हा _________ संघटनेने राजस्थानमधील दुष्काळ निवारणाच्या कामासंबंधी नोंदी आणि कामगारांचे लेखे यांची मागणी केली होती.

57.

दूरदर्शनविषयी पुढील विधाने वाचा आणि त्यापैकी अयोग्य विधाने कोणती ते सांगा.
(a) विकास संसूचन विभाग (DCD) 2001 मध्ये स्थापन करण्यात आला.

(b) शासनाची खाती आणि सार्वजनिक उपक्रम यांच्यासाठी प्रसारण गृह आणि मार्केटिंग विभाग म्हणून एक खिडकी स्वरूपात हा विभाग कार्य करतो.

(c) व्यक्तीब्यक्तीतील संदेशवहन, संपर्क आणि सामाजिक सक्रीयता यांच्यामार्फत दूरचित्रवाणीचा संदेश पोहोचवण्याचे काम 'दूरदर्शन कल्याणी क्लब' करीत आहेत.

(d) कल्याणी मोहीमेला नामांकित गेटस मलेरिया अवार्ड 2004 मिळाले.

(e) हा पुरस्कार ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कार्पोरेशनकडून दिला जातो.

(f) हा पुरस्कार कॉमनवेल्थ ब्रॉडकास्टिंग असोशिएशनकडून दिला जातो.

पर्यायी उत्तरे :

58.

खालीलपैकी कोणत्या व्यक्ती चित्रपटांना प्रमाणपत्र प्रदान करणाच्या केंद्रीय मंडळाच्या अध्यक्ष नव्हत्या?

(a) शबाना आझमी

(b) शर्मिला टागोर

(c) अनुपम खेर

(d) अमोल पालेकर

(e) महेश भट्ट

(f) लीला सॅमसन

योग्य पर्याय निवडा : 

59.

सर्व शिक्षा अभियाना (SSA) संबंधी पुढील विधाने वाचा आणि त्याविषयी चुकीचे विधान पुढील विधानांतून शोधा.

60.

भारतातील इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांसंबंधी (EVMs) पुढील विधाने वाचा आणि त्यातील योग्य विधाने निवडा.

(a) EVMs मुळे बोगस मतदान आणि मतदानकेंद्रे ताब्यात घेण्याचे प्रकार मोठ्याप्रमाणावर कमी करणे शक्य आहे.

(b) मतदानपत्रिका पद्धतीपेक्षा अशिक्षित लोकांना EVMs अधिक अवघड वाटतात.

(c) मतदानपत्रिका पेट्यांपेक्षा EVMs ची ने-आण करणे तुलनेने सुलभ आहे.

(d) 2004 च्या सर्वसाधारण निवडणुकांपासून भारतात ई-लोकशाही सुरू झाली.

पर्यायी उत्तरे :

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१४ GS-2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.