राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१७  GS-4

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१७  GS-4 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
61.

खालील विधाने विचारात घ्या.

(a) औद्योगिक पायाभूत सुविधा उन्नतीकरण योजना 2014 मध्ये सुरु केली.

(b) नवकल्पना वृद्धी ग्रामीण उद्योग, आणि उद्योजकता योजना 2015 मध्ये सुरु केली.

(c) डिसेंबर 2012 मध्ये सरकारने हातमाग क्षेत्रासाठी संस्थात्मक पतपुरवठा जाहीर केला.

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने असत्य आहे/आहेत ?

62.

बाजारपेठेतील प्रबळ स्थानाचा गैरवापर करण्यावर बंधन घालण्यासाठी, 2002 साली खालीलपैकी कोणता कायदा पास झाला?

63.

1 एप्रिल, 1999 रोजी स्वर्णजयंती ग्राम स्व-रोजगार योजना कोणत्या योजनांच्या एकत्रिकरणाने सुरु झाली ?

64.

भगवती समितीच्या 1973 च्या अहवालानुसार सरकारने रोजगार पुरविण्यासाठी खालील उपाय योजना सुरु केल्या

(a) ग्रामीण कार्य कार्यक्रम

(b) कृषी-सेवा केंद्र

(c) क्षेत्र विकास कार्यक्रम

(d) किसान क्रेडीट कार्ड योजना

वरीलपैकी कोणता/ते पर्याय चुकीचा/चे आहे/आहेत ? 

65.

राष्ट्रीय सैम्पल स संस्थेकडून बेरोजगारीची संकल्पना विकसीत करण्यात आली आहे ती खालील प्रमाणे

(a) बेरोजगारीची सामान्य स्थिती दर्जा

(b) बेरोजगारीचा चालू आठवड्याचा दर्जा

(c) बेरोजगारीचा चालू दैनंदिन दर्जा

(d) बेरोजगारीचा चालू वार्षिक दर्जा

वरीलपैकी कोणता/ते पर्याय चुकीचा/चे आहे/आहेत ? 

66.

खालील विधाने विचारात घ्या.

(a) अॅडम स्मिथ ने तुलनात्मक खर्च सिद्धांत मांडला.

(b) अन्योन्य मागणी सिद्धांत व्यापार शर्तीची निश्चिती स्पष्ट करतो. 

(c) डेनिस रॉबर्टसन यांनी वृद्धिचे इंजिन म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार असे वर्णन केले आहे.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

67.

खालीलपैकी कोणत्या जलसिंचनाच्या स्रोताने भारतामध्ये 2007-08 या काळात नेत्रदिपक प्रगती केली ?

68.

खालीलपैकी कोणते देश बहुराष्ट्रीय कंपन्यांचे प्रमुख देश आहेत ?

69.

खालील विधाने विचारात घ्या.

(a) नाफेड ही देशातील सहकारी विपणन सर्वोच्च (शिखर) संस्था आहे.

(b) शेती विपणन केंद्राची स्थापना 1988 मध्ये झाली.

(c) केंद्रीय वखार महामंडळाची स्थापना 1957 मध्ये झाली.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ? 

70.

जमीन सारा पद्धतींपैकी खालीलपैकी कोणत्या पद्धतीत जमीन महसूल भरण्याची जबाबदारी जमीन कसणान्याची होती ? 

71.

लक्ष्यकेंद्रित सार्वजनिक वितरण पद्धतीमध्ये प्रत्येक गरीब कुटुंबासाठी _____________ कि.ग्रे. अन्नधान्य उच्च अर्थसहाय्यित किंमतीमध्ये पुरवले जाते. 

72.

खालीलपैकी कोणती संकल्पना महिलांच्या क्षमतेपेक्षा त्यांच्या संधी वर लक्ष केंद्रीत करते ?

73.

जागतिक व्यापार संघटनेच्या उरुग्वे फेरीमधे जाहिर केलेल्या शेतीविषयक कराराची खालीलपैकी कोणती उद्दिष्ट्ये नाहीत?

74.

हरित स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या,

(a) 1990 मध्ये हरित स्थूल देशांतर्गत उत्पादन ही संकल्पना विकसित करण्यात आली.

(b) या संकल्पनेत मानवी कल्याणावर परिणाम करणारे प्रदूषण आणि कमी झालेल्या नैसर्गिक साधन सामुग्रीची होणारी किंमत या घटकाचा विचार केला जातो.

(c) सन 2000 पासून चीन मध्ये हरित स्थूल देशांतर्गत उत्पादनाचे मोजमापन सुरु केले.

वरीलपैकी कोणती विधान/ने बरोबर आहेत ? 

75.

खालील विधाने विचारात घ्या.

(a) 2005-06 मध्ये भारत सरकारने राष्ट्रीय फलोत्पादन अभियान सुरु केले. 

(b) 2005 मध्ये महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळाची स्थापना झाली.

(c) 2015-16 पासुन एकात्मीक विकास फलोत्पादनासाठीचे अभियान 50 जिल्ह्यात राबविले.

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने चूक आहे/त?

76.

खालील विधाने विचारात घ्या.

(a) दुग्ध विकास आणि पशुधनाची उत्तम नोपज साठीचा राष्ट्रीय कार्यक्रम 2014 मध्ये सुरु केला.

(b) एन.पी.बी.बी.डी.डी. च्या अंमलबजावणीसाठी 12 व्या योजनेत ₹ 2000 कोटी रुपयांची अंदाजपत्रकीय तरतूद केली.

(c) राष्ट्रीय दुग्ध योजना मार्च 2013 मध्ये सुरु केली.

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने चूक आहे/त?

77.

खालील विधाने विचारात घ्या.

(a) भारतातील पंजाब हे मोठ्या प्रमाणात गहू उत्पादन करणारे राज्य आहे.

(b) भारतातील मध्य प्रदेश हे सर्वात जास्त प्रमाणात डाळीचे उत्पादन करणारे राज्य आहे.

(c) भारतातील महाराष्ट्र हे कापसाचे प्रमुख उत्पादन करणारे राज्य आहे.

(d) भारतातील पश्चिम बंगाल हे ऊसाचे मुख्य उत्पादन करणारे राज्य आहे.

यापैकी कोणते/ती विधान/ने चुकीचे आहे/त? 

78.

खालील विधाने विचारात घ्या. 

(a) लोकसंख्या संक्रमण सिद्धांतानुसार पहिल्या अवस्थेत जन्म व मृत्यूदर जास्त असतो.

(b) लोकसंख्या संक्रमण सिद्धांतानुसार दुस-या अवस्थेत लोकसंख्या वाढीचा वार्षिक दर 2.0% किंवा त्यापेक्षा जास्त असतो.

(c) लोकसंख्या संक्रमण सिद्धांतानुसार तिस-या अवस्थेत जन्मदर सातत्याने कमी होतो आणि लोकसंख्या वृद्धी कमी होते.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ? 

79.

खालील विधाने विचारात घ्या. 

(a) देशातील पशुधनाच्या गणनेची सुरुवात 1919 या वर्षापासुन झाली. 

(b) जगातील दुग्ध उत्पादक देशामध्ये भारताचा प्रथम क्रमांक आहे. 

(c) दुग्ध उद्योजक विकास योजना सप्टेंबर 2014 मध्ये सुरु झाली. 

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने चूक आहे/त?

80.

खालीलपैकी कोणते गॅट कराराचे प्रमुख उद्दिष्ट होते ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१७  GS-4 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.