ASO 2017 - Main Paper 2 Questions And Answers:
'प्रधानमंत्री उज्वला योजनेबाबत' खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
'स्कीम फॉर अॅग्रोमरीन प्रोसेसिंग अँड डेव्हलपमेंट ऑफ अॅग्रो प्रोसेसिंग क्लस्टर्स' या योजनेचे नाव बदलून कोणते नाव ठरविण्यात आले आहे ?
जोड्या लावा (अरुण साधु यांचे साहित्यिक कार्य)
अल्पसंख्याकांचे सक्षमीकरण उद्देश असलेल्या कोणत्या योजनेचा प्रारंभ जानेवारी, 2016 मध्ये जम्मू व काश्मिर येथे झाला ?
किदांबी श्रीकांत बाबत खालील विधाने विचारात घ्या :
अ. तो ऑस्ट्रेलियन ओपन जिंकणारा पहिला भारतीय पुरुष बॅडमिंटन खेळाडू आहे.
ब. तो इंडोनेशिया ओपन जिंकणारा पहिला भारतीय पुरुष बॅडमिंटन खेळाडू आहे.
क. तो चीन ओपन जिंकणारा पहिला भारतीय पुरुष बॅडमिंटन खेळाडू आहे.
ड. तो स्वीस अँड प्रिक्स गोल्ड जिंकणारा पहिला भारतीय पुरुष बॅडमिंटन खेळाडू आहे.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
भारतातील एका पर्यटन स्थळासाठी शून्य-उत्सर्जन (प्रदूषण) अशी इलेक्ट्रिक बस सेवा सुरू करण्यात आली आहे. हे पर्यटन स्थळ ______ आहे.
भारतीय क्रीडा मंत्रालयाने प्रथमच राष्ट्रीय क्रीडा संग्रहालय स्थापन करण्याचे योजिले आहे. हे संग्रहालय ______ शहरात असेल.
साहित्यात मिळालेला 2017 नोबेल पुरस्काराच्या संदर्भात पुढील विधानांवर विचार करा.
अ. विजेत्याचे नाव काझुओ इशिगुरो आहे.
ब. तो एक ब्रिटिश लेखक आहे.
क. त्यांचा जपानमध्ये जन्म झाला.
वरीलपैकी कोणती विधान/ने बरोबर आहेत ?
ब्रिक्स्-ए.आर.पी.ची स्थापना करण्यासाठी भारत आणि विविध ब्रिक्स देशांमधील एका सामंजस्य करारास (एम ओ यू ) केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या कराराची _______ उद्दिष्ट्ये आहेत.
सुरेश 3 कि.मी. उत्तरेस गेला, नंतर उजवीकडे वळून 6 कि.मी. गेला. पुन्हा उजवीकडे वळून 3 कि.मी. गेला नंतर पुन्हा डावीकडे वळून 6 कि.मी. गेला तर तो मूळ जागेपासून किती दूर आहे आणि कोणत्या दिशेस आहे ?
अंकिता ही संगितापेक्षा मोठी आहे. गिरीश हा संगितापेक्षा मोठा पण अंकितापेक्षा लहान आहे. शिरिष हा श्याम आणि संगितापेक्षा लहान आहे. संगिता ही श्यामपेक्षा मोठी आहे. त्यांच्यात सर्वात लहान कोण आहे ?
विधाने : एकही शिक्षणतज्ज्ञ, संशोधक नाही.
सर्व संशोधक शिक्षक आहेत.
अनुमाने : |. एकही शिक्षक, संशोधक नाही
॥. एकही शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ नाही
III, काही संशोधक हे शिक्षक आहेत
IV. काही शिक्षक हे संशोधक आहेत
खालील आकृतीत गहाळ झालेली संख्या शोधा.
जर 'MACHINE' या शब्दाचा संकेत 19-7-9-14-15-20-11' असा असेल तर 'DANGER' या शब्दाला संकेत तुम्ही कसा लिहाल ?
रसिला बहुत करून तिच्या भावाला त्यांच्या स्थानिक रेल्वे स्थानकात संध्याकाळी 5.56 वाजता भेटते आणि तो तिला त्यांच्या घरी घेऊन येतो. एके दिवशी तिने तिची कचेरी लवकर सोडली आणि ती स्थानकावर संध्याकळी 4.50 वाजता पोहोचली. ती तिच्या घराच्या दिशेने चालू लागली. वाटेत तिला त्यांच्या घरून येणारा भाऊ भेटला आणि ते घरी नेहमीपेक्षा 20 मिनिटे आधी पोहोचले. तर ती किती वेळ चालली ?
पाण्याच्या कमतरतेच्या समस्येबाबत चर्चा करण्यासाठी एक गट जमला आहे. यातील 7 व्यक्ती कन्नड बोलतात, 15 तामीळ बोलतात आणि 8 मराठी बोलतात. यातील सर्वांना इंग्रजी समजते पण कोणीही ती बोलू शकत नाहीत. यापैकी प्रत्येक येथे उल्लेख केलेल्यापैकी एक वा अधिक प्रादेशिक भाषा बोलू शकतात. जर या गटातील 3 व्यक्ती दोन भाषा बोलत असतील आणि फक्त दोन व्यक्ती सर्व भाषा बोलू शकत असतील तर गटातील व्यक्तींची संख्या किती ?
राहुलची आई ही मोनिकाच्या वडिलांची एकूलती एक मुलगी आहे तर मोनिकाच्या पतीचे राहुलशी नाते काय ?
पुढे दिलेले प्रतिपादन आणि कारण अभ्यासा :
प्रतिपादन (A) : गेल्या काही दशकात मोठ्या प्रमाणात जागतिक तापमान वृद्धी होत आहे.
कारण (R) : आर्थिक विकासावर दिलेल्या जोरामुळे वातावरणात उत्सर्जित केल्या जाणा-या हरितगृह वायूंचे प्रमाण धोकादायक प्रमाणात वाढले आहे.
प्रतिपादन आणि कारण यांचे वर्णन करणारा सर्वात उचित पर्याय निवडा.
A, B व C या चढत्या क्रमाने येणा-या तीन विषम संख्या आहेत. जर Aची तिप्पट ही C च्या दुपटीपेक्षा तीनने लहान असेल तर C ची किमंत असलेला पर्याय निवडा.
आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा
Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.