ASO 2017 - Main Paper 2

ASO 2017 - Main Paper 2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
61.

सचिवालय विभागाची योग्य पदसोपान परंपरा (hierarchy) _______ अशी आहे. 

62.

कॅबीनेट सचिवालयाची खालीलपैकी कोणते/ती कार्य/ये आहेत ?
अ. कॅबीनेटच्या बैठकीची विषयपत्रिका तयार करणे

ब. कॅबीनेट समित्यांना सचिवालयात्मक सहाय्य पुरविणे

क. मंत्र्यांना आर्थिक साधनांचे वाटप करणे

खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.

63.

खालील विधाने विचारात घ्या.

अ. 95 व्या घटनादुरुस्ती अधिनियम - 2009 अन्वये लोकसभा आणि राज्याच्या विधानसभेतील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी राखीव जागांची मुदत 2020 पर्यंत वाढविण्यात आली आहे.

ब. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद - 334 यात स्थानिक संस्थांमध्ये महिलांसाठी राखीव जागेची तरतूद नाही आणि म्हणून महिलांसाठी राखीव जागा या विशिष्ट मुदतीसाठी मर्यादित नाहीत. 

64.

खालीलपैकी कोणते केन्द्रीय कार्यकारी विभागाचे अंग आहेत ?

अ, राष्ट्रपती
ब. मंत्रिमंडळ

क. महान्यायवादी 
ड. भारताचा नियंत्रक व महालेखापरीक्षक

65.

भारतीय राज्यघटनेतील सातव्या परिशिष्टातील राज्यसूचीमध्ये नमूद केलेला/ले कोणता/ते विषय राष्ट्रीय राजधानी दिल्ली शासनाच्या कार्यक्षेत्रातून विशेषत्वाने वगळण्यात आला/ले ?

अ. सार्वजनिक सुरक्षा
ब, पोलिस

क. जमीन

ड. कर 

66.

राज्याच्या महाधिवक्त्यासंबंधी खालील विधाने विचारात घ्या.
अ. उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यासाठी जी अर्हता असते ती त्याच्याजवळ असणे आवश्यक . असते.

ब. उच्च न्यायालयाच्या न्यायधीशास असणारे सर्व विशेषाधिकार फायदे के संरक्षण त्याला असते.

क. उच्च न्यायालयाच्या न्यायधीशास जे मानधन असते ते त्यास मिळते.

ड. राज्य मंत्रिमंडळाची मर्जी असेपर्यंत तो आपल्या पदावर राहतो.

वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहेत ?

67.

भारतीय संविधानाच्या कोणत्या तरतूदीनुसार मंत्र्यांची संख्या मर्यादित होते ? 

68.

भारतातील राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीकरीता उमेदवाराचे नामांकन ________ कडून सूचित केले जाते.

69.

भारतातील संविधानाचे कलम 75 चे खालील कोणत्या तरतूदी आहेत ?
अ. राष्ट्रपती पंतप्रधानाच्या सल्ल्यावरून मंत्र्यांची नियुक्ती करेल

ब. मंत्रिपरिषद लोकसभेस सामूहिकरीत्या जबाबदार असेल

क. राष्ट्रपतीला सल्ला व मदत देण्यासाठी पंतप्रधानाच्या नेतृत्वात मंत्रिपरिषद असेल

ड. मंत्र्यांचे वेतन व भत्ते संसदेकडून ठरविले जातील

खालील दिलेल्या संकेतातून योग्य उत्तर निवडा.

70.

भारताचे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या वाढविण्याचा अधिकार कोणाला आहे ?

71.

खालीलपैकी कोणत्या मान्यवरांस पदग्रहण करण्यापूर्वी भारतीय राज्यघटनेचे रक्षण करण्याची शपथ घ्यावी लागते ?

अ. राष्ट्रपती
ब. उपराष्ट्रपती

क. पंतप्रधान
ड. लोकसभा सभापती 

72.

खालील विधाने विचारात घ्या :
अ. भारतीय राज्यघटनेचे अनुच्छेद-332 मध्ये राज्याच्या विधानसभेतील अनुसूचित जाती आणि अनुसूचित  जमातीसाठी राखीव जागांची तरतूद करण्यात आली आहे.

ब. सध्या महाराष्ट्रात 29 विधानसभा मतदारसंघ हे अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी राखीव आहेत.

क. सध्या महाराष्ट्रात 25 विधानसभा मतदारसंघ हे अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी राखीव आहेत.
वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहेत ?

73.

'शून्य प्रहर' बाबत खालील विधाने विचारात घ्या :
अ. प्रश्नोत्तराच्या तासानंतर तो असतो.

ब. त्याचा उल्लेख कामकाज पद्धतीच्या नियमांमध्ये आहे.

क. संसदीय कार्यप्रणालीतील भारतातील ही एक नाविण्यपूर्ण उपक्रम आहे.

ड. कोणतीही पूर्वसूचना न देता लोकहिताचा कोणताही मुद्दा शून्य प्रहरात उपस्थित करण्यास सदस्य स्वतंत्र असतात. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ? 

74.

राज्याच्या राज्यपालांच्या विधिविषयक अधिकारांबाबत खालील विधाने विचारात घ्या :

अ. ते राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलावू शकतात अथवा संपुष्टात आणू शकतात आणि राज्य विधानसभा बरखास्त करू शकतात. 

ब. ते राज्य विधिमंडळाच्या बैठका स्थगित करू शकतात.

क. ते प्रलंबित असलेल्या विधेयकाबाबत राज्य विधिमंडळास संदेश पाठवू शकतात.

ड. जर विधेयक मार्गदर्शक तत्त्वाविरुद्ध असेल तर ते राष्ट्रपतींच्या विचारार्थ विधेयक राखून ठेवू शकतात.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

75.

महाराष्ट्रातील विधिमंडळ समिती पद्धतीबाबत खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे ?

76.

खालील विधाने विचारात घ्या :
अ. भारतीय संघराज्य हे राज्यांमधील कराराचा परिणाम आहे.

ब. ‘नाशवंत घटकांचा अविनाशी संघ' (Indestructible Union of Destructible Units) असे भारतीय संघराज्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदवले आहे.

क. ‘अविनाशी राज्यांनी बनलेला एक अविनाशी संघ' (Indestructible Union composed of । Indestructible States) असे अमेरिकन संघराज्याबाबत त्यांच्या सर्वोच्च न्यायालयाने वर्णन केले आहे.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ? 

77.

विधान (A) : भारत सरकार कायदा, 1935 अनुसार शेषाधिकार केन्द्रीय विधिमंडळाकडे दिलेले होते.
कारण (R) : भारत सरकार कायदा, 1935 अनुसार संघराज्यीय, प्रांतिक आणि समवर्ती अशा तीन सूच्यांमध्ये विषयांची विभागणी केली गेली होती.

78.

खालील विधाने विचारात घ्या
अ. स्वातंत्र्यप्राप्तिनंतरचे मुंबईचे पहिले शेरिफ हे शांताराम महादेव डहाणूकर होते

ब . शेरिफ हा उच्च न्यायालयाचा अधिकारी असतो

क. मुंबई शेरीफचा कार्यकाळ पाच वर्षे आहे

ड. शेरीफचा मान महापौरांच्या खालोखाल असतो 

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ? 

79.

खालील विधाने विचारात घ्या :
अ. राष्ट्रपतीला, संघराज्याच्या कार्यकारी अधिकाराच्या व्याप्तीत येईल अशा कोणत्याही बाबी संबंधीची कार्ये राज्य शासनाच्या संमतीशिवाय त्या शासनाकडे किंवा त्याच्या अधिका-यांकडे सशर्त अथवा बिनशर्त सोपवता येतील

ब. एखाद्या राज्याच्या राज्यपालाला राज्याच्या कार्यकारी अधिकाराच्या व्याप्तीत येत असेल अशा कोणत्याही बाबी संबंधीची कार्ये, भारत सरकारच्या संमतीने, त्या सरकारकडे किंवा त्याच्या अधिका-यांकडे सशर्त अथवा बिनशर्त सोपवता येतील.

80.

खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ? 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

ASO 2017 - Main Paper 2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.