PSI Main 2012 - Paper 1

PSI Main 2012 - Paper 1 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
101.

'स्त्री' या शब्दाचा पर्यायवाची शब्द लिहा :

102.

'एके दिवशी युद्ध बंद झाल्याची बातमी येऊन थडकली,' या वाक्यातील विधेयविस्तार कोणते ?

103.

'अठरा गुणांचा खंडोबा' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ पुढील पर्यायातून शोधून काढा.

104.

'गुरूजी म्हणाले, की पृथ्वी सूर्याभोवती फिरते', हे मिश्रवाक्य कोणत्या प्रकारचे आहे ?

105.

पुढीलपैकी अव्ययसाधित विशेषणाचे योग्य उदाहरण कोणते ?

106.

पुढील नामाचा प्रकार ओळखा : 

‘चांगुलपणा' _________ .

107.

'कोबी' हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला?

108.

'आम्ही जातो आमुच्या गावा.' या वाक्यात विधेय कोणते आहे ?

109.

'आमचे शरीर सुदृढ व्हावे. आम्ही योगासने करतो', या वाक्यांचे मिश्रवाक्य करण्यासाठी कोणते अव्यय वापरावे लागेल? 

110.

'तो शाळेत पायी गेला' या वाक्यातील अधोरेखित शब्दाच्या विभक्तीचा कारकार्थ ओळखा.

पुढील उतारा वाचून त्या खालील प्रश्न क्र. 111 ते 115 ची उत्तरे निवडा.
         पावसाळा संपतो आणि निसर्ग हिरव्या रंगाची मुक्त उधळण करत येतो. सरोवरे, शेते, नद्या, नाले या ठिकाणी हिरव्या रंगाचे जणू मुक्त प्रदर्शन भरते. हिरव्या रंगाची विशाल वस्त्रे परिधान करून उभे असलेले गिरिराज, त्याचप्रमाणे हिरवा शालू नेसलेली शेते आणि त्यांच्या कडेला फुललेली तरड, तेरडा, तीळ, झेंडू यांची पिवळी फुले म्हणजे हिरव्या साडीची पिवळी किनारच जणू! सरोवरातील विविध रंगी कमळे पाहून मन आनंदाने तृप्त होऊन जाते. कमळाच्या वर्तुळाकार पानांनी भरलेली सरोवरे पाहिली की, असे वाटते या निसर्गसुंदरीच्या कपाळावर कुणीतरी हिरवी टिकली गोंदली आहे. जास्वंदीच्या झाडातून डोकावून पाहणारी तिची लाल फुले पाहून वाटते, लाल तुयाचा हा कोंबडा जणू पहाटेची बांग देत आहे. झ्याच्या झुळूझुळू वाहणाच्या पाण्याचा आवाज ऐकून वाटते, वनराणी जणू पायात चाळ घालून नृत्य करत आहे. तुरे नाचवणारी लिलीची पांढरी शुभ्र फुले पाण्याच्या कारंजांची आठवण करून देतात. उद्यानातील मोगरा, जाई, जुई इत्यादींच्या फुलवेलींवरील फुले पाहून सुंदर ललना टपोरी फुले केसात माळून नटल्या आहेत असे वाटते. असा हा निसर्गसौंदर्याचा उत्तम आविष्कार पाहून डोळ्यांचे पारणे फिटते.

111.

निसर्गसुंदरीच्या कपाळावरील हिरवी टिकली कोणती ?

112.

हिरव्या रंगाची विशाल वस्त्रे कोण नेसतात ?

113.

हिरव्या रंगाचे मुक्त प्रदर्शन कधी भरते ?

114.

लाल तुऱ्याचा कोंबडा कोणास म्हटले आहे ?

115.

तुरे नाचविणारी फुले कोणती?

पुढील उतारा वाचून त्या खालील प्रश्न क्र. 116 ते 120 ची उत्तरे लिहा.
            शहरांत राहावयाला आलो, तरी निसर्गाची संगत मी सोडलेली नाही. मुंबईत समुद्र हा माझा सोबती आहे. त्याच्या लाटांची अहोरात्र चाललेली मर्मर हे माझ्या जीवनातले पार्श्वसंगीत आहे. भरतीच्या आणि ओहोटीच्या तालावर माझ्या मनोवृत्ती अक्षय नाचत असतात. किना-यावरच्या उंच-उंच माडांच्या नि नारळींच्या झाडांप्रमाणे मीही वायाच्या सोसाट्यामध्ये धुंद होऊन अष्टौप्रहर डोलत असतो. पहाटेच्या वेळी अंगावर लाटांचे तुषार झेलीत ओल्या आणि भुसभुशीत वाळूवर अनवाणी पावलांनी चालण्यात केवढे काव्य आहे? पण पुष्कळ लोक पायांत बूट घालून अन् सारे अंग लोकरी कपड्यांत पॅकबंद करून समुद्रावर हिंडायला येतात. मी त्यांना म्हणतो, "अरे, परमेश्वराचे तीर्थ उडू द्या थोडे अंगावर. त्याचा श्वास शिरू द्या तुमच्या नाकातोंडात, निसर्गाच्या देवळांतही बाहेर जोडे ठेवून शिरायचे असते।'' पण कोण ऐकतोय? निसर्गाला कोणी संधीच देत नाही. समुद्र म्हणजे त्यांना शत्रू वाटतो. अंगात 'चिलखते' घालून त्याला भेटायला येतात. मुंबईच्या सागराप्रमाणे खंडाळ्याचा डोंगरही माझा मित्र आहे. मी बारक्यासारक्या लोकांशी मैत्री करीतच नाही. या डोंगरावर माझे एक घर आहे. पुष्कळदा मी तिथे राहतो. माझे सारे लेखन मी तिथेच करतो. मला काही 'योग' येत नाही, पण खंडाळ्याला गेलो की ताबडतोब माझी 'समाधी' लागते. माणसांचे जग मी पार विसरून जातो. उंच-उंच डोंगरावर निळेभोर आभाळ बसलेले असते. तास न् तास मी त्याच्याशी गोष्टी करीत असतो. आभाळाच्या कापसांत बुबुळे गुंडाळून ठेवली म्हणजे उघड्या डोळ्यांनी झोपल्यासारखे वाटते. झाडाझुडपांच्या आणि झयांच्या संगतीत दिवस कसा निघून जातो हे कळत नाही.

116.

शहरात राहायला येऊनही लेखकाने कोणाची संगत सोडलेली नाही ?

117.

समुद्रकिना-यावर लेखक कोणाप्रमाणे डोलत असतो ?

118.

मुंबईत लेखकाचा सोबती कोण आहे?

119.

लेखकाचा कोणाच्या संगतीत कसा दिवस निघून जातो हे कळत नाही ?

120.

लेखकाच्या जीवनातील पार्श्वसंगीत कोणते ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

PSI Main 2012 - Paper 1 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.