PSI Main 2012 - Paper 1

PSI Main 2012 - Paper 1 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :

खालील उताच्यातील प्रश्न क्र. 121 ते 125 ची उत्तरे द्या.
               'सत्य' आणि 'अहिंसा' या दोन मूल्यांचा गांधीजींनी सातत्याने पुरस्कार केला. भित्रा माणूस कधीही सत्यवादी असू शकत नाही. निर्भय बनण्यासाठी सत्यनिष्ठ बनले पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता, पं. नेहरू त्यांच्याविषयी लिहितात, 'गांधीजींच्या इतका सत्यनिष्ठ पुरूष मला तरी माहीत नाही. राजकारणी मनुष्यात इतकी सत्यनिष्ठा असणे म्हणजे हा धोक्याचा सद्गुण होय; कारण असा पुरुष स्वत:चे मत बोलून दाखवितो आणि मनातील फेरबदल, मनातील घडामोडी तो लोकांसमोर इतक्या उघड्या करून ठेवतो की त्यांनी पहावे.' अहिंसेची व्याख्या गांधीजींनी फार व्यापक केलेली आहे. अन्यायाला प्रतिकार अहिंसेने करणे हे केव्हाही श्रेष्ठ, असे ते मानते होते. परंतु भीतीमुळे अन्याय सहन करण्यापेक्षा हिंसेने उत्तर दिले तर योग्य ठरेल अशी त्यांची भूमिका होती. 'भीती व हिंसा असे दोनच पर्याय उपलब्ध असतील तर मी हिंसेच्या बाजूचा आहे.' असे गांधी म्हणत असत. त्यांना बलवानाची अहिंसा अभिप्रेत होती. गांधीजींचा साधन शुचितेवर भर होता, आणि म्हणूनच स्वातंत्र्यलढ्यामध्ये अहिंसात्मक मार्गाचा अवलंब करीत असताना हिंसेचे गालबोट लागू नये असा त्यांचा कटाक्ष होता.
                    गांधीजचे सारे तत्त्वज्ञान मानवाच्या कल्याणाचा विचार करणारे आहे, 'आदर्श भारता' विषयी आपले मनोगत व्यक्त करताना गांधीजी लिहितात ' हा देश आपला आहे असे जेथे त्यांना वाटेल, जेथे वरिष्ठ व कनिष्ठ असे वर्गभेद लोकांत मुळीच नाहीत, जेथे सर्व जमाती सलोख्याने एकजीव नांदत आहेत ... ह्याभारतात अस्पृश्यता, मादक पेये व अमली पदार्थ ह्या उपाधींना जागाच नाही... स्त्रियांना पुरुषांचे सारे हक्क असतील ..... असा भारत देश असावा असे माझे मनोराज्य आहे.'

121.

 'आदर्श भारता' विषयी म. गांधीजींचे मनोगत कोणते ?

122.

अन्यायाचा प्रतिकार कसा करावा?

123.

म. गांधीजींचे तत्त्वज्ञान कोणता विचार करते?

124.

निर्भय बनण्यासाठी कसे बनले पाहिजे ?

125.

कोणता मनुष्य सत्यवादी असू शकत नाही?

खालील उतारा वाचून प्रश्न क्र. 126 ते 130 या प्रश्नांची उत्तरे द्या.
      आकाश निरभ्र होते. सूर्यबिंब लाल झाले होते ; पण ती पराक्रमाची लाली वाटत नव्हती. श्रेष्ठ व महान पुरुष आपत्काळीसुद्धा विलक्षण धैर्याने वागतो त्या वेळी त्याच्या मुखावर जी एक अपूर्व शोभा झळकत असते, तशीच ही शोभा वाटत होती. क्षणभरसुद्धा विसावा न घेता, कसल्याही फळाची आकांक्षा न धरता, जगाची एवढी सेवा करणारा हा कर्मवीर जगातील कृतघ्नतेच्या जाणिवेमुळे जणू काही कष्टी झाला आहे, असे वाटत होते. जगाचा कानाकोपरा आपल्या प्रकाशाने उजळणारा, अनंत जिवांना प्रेरणा नव्हे, जीवनसत्त्वे देणारा प्रवासी एक मुक्काम करून दुस-या मुक्कामाकडे जायला निघाला होता. एखाद्या वर्तमानपत्राचा बातमीदार बातम्या देण्यासाठी घाईघाईने आपल्या कार्यालयाकडे धावपळ करीत जाताना दिसतो, त्याप्रमाणे जगातील सर्व घडामोडींचा साक्षीदार जगाचे इतिवृत्त विश्वनिर्मात्याकडे रुजू करण्यासाठी जात असावा, त्याने काय पाहिले असेल, याची संपूर्ण कल्पना कुणालाही येऊ शकत नाही. मनुष्य जे जे काही करीत असतो, त्याचे साक्षीदार सृष्टीतील प्रभावी द्रव्ये असतात. चंद्र, सूर्य आणि ही भूमी ह्या सर्वांना मनुष्य शरीराने जे करतो आणि मनाने जे चिंतितो ते सारे अवगत असते, असे धर्मशास्त्र सांगते. हे खरे असेल काय? आणि तसे असेल तर माझ्या मनातले विचार हा सूर्यनारायण खास जाणीत असला पाहिजे.

126.

या उताच्यातील वर्णन कोणत्या वेळचे आहे?

127.

या उता-यावरून सूर्याचा कोणता विशेष गुण दिसून येतो?

128.

'निरभ्र' म्हणजे काय?

खालील उतारा वाचून प्रश्न क्र. 126 ते 130 या प्रश्नांची उत्तरे द्या.
         आकाश निरभ्र होते. सूर्यबिंब लाल झाले होते ; पण ती पराक्रमाची लाली वाटत नव्हती. श्रेष्ठ व महान पुरुष आपत्काळीसुद्धा विलक्षण धैर्याने वागतो त्या वेळी त्याच्या मुखावर जी एक अपूर्व शोभा झळकत असते, तशीच ही शोभा वाटत होती. क्षणभरसुद्धा विसावा न घेता, कसल्याही फळाची आकांक्षा न धरता, जगाची एवढी सेवा करणारा हा कर्मवीर जगातील कृतघ्नतेच्या जाणिवेमुळे जणू काही कष्टी झाला आहे, असे वाटत होते. जगाचा कानाकोपरा आपल्या प्रकाशाने उजळणारा, अनंत जिवांना प्रेरणा नव्हे, जीवनसत्त्वे देणारा प्रवासी एक मुक्काम करून दुस-या मुक्कामाकडे जायला निघाला होता. एखाद्या वर्तमानपत्राचा बातमीदार बातम्या देण्यासाठी घाईघाईने आपल्या कार्यालयाकडे धावपळ करीत जाताना दिसतो, त्याप्रमाणे जगातील सर्व घडामोडींचा साक्षीदार जगाचे इतिवृत्त विश्वनिर्मात्याकडे रुजू करण्यासाठी जात असावा, त्याने काय पाहिले असेल, याची संपूर्ण कल्पना कुणालाही येऊ शकत नाही. मनुष्य जे जे काही करीत असतो, त्याचे साक्षीदार सृष्टीतील प्रभावी द्रव्ये असतात. चंद्र, सूर्य आणि ही भूमी ह्या सर्वांना मनुष्य शरीराने जे करतो आणि मनाने जे चिंतितो ते सारे अवगत असते, असे धर्मशास्त्र सांगते. हे खरे असेल काय? आणि तसे असेल तर माझ्या मनातले विचार हा सूर्यनारायण खास जाणीत असला पाहिजे.

129.

हा कर्मवीर कशामुळे व्यथित झाला असावा?

130.

खालीलपैकी कोणता शब्द 'सूर्य' या शब्दाचा समानार्थी शब्द नाही ?

131.

Fill in the blank with appropriate conjunction :

We had lots of fun ___________ the bus broke down. 

132.

We walked as fast as we
Fill in the blank with suitable option:

133.

Punctuate the following. Choose the correct option. 

I would rather die he exclaimed than join the oppressors of my country.

134.

Fill in the blank with a suitable preposition. Sandip was working ___________ a call centre

when the idea struck him.

135.

Explain the following Idiom and choose the correct alternative.

They were held up by bandits. The meaning of held up is.

136.

He is not talkative but a man __________ .

Choose the correct option from the following.

137.

Choose the correct option and fill in the blank : 

She told me many ________ `stories. 

138.

Fill in the blank with correct tense form.

He _________ all day yesterday. Choose the correct option. 

139.

Complete the following sentence choosing an appropriate alternative. 

__________ is a scientific study of sun, moon, Stars, planets, etc.

140.

Fill in the blank with appropriate option :

There are __________  places worth visiting in India.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

PSI Main 2012 - Paper 1 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.