राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१८ - Paper 2

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१८ - Paper 2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :

पुढील उतारावाचून त्यावर आधारित 41 ते 45 प्रश्नांची उत्तरे द्या :
               ‘ज्ञान हे उपयुक्त असो वा नसो; त्याचे पावित्र्य स्वत:सिद्ध आहे. जिज्ञासापूर्तीचा निरागस आनंद, मानवाच्या अंत:शक्तीचा स्वतंत्र विलास व संपूर्ण विकास हेच ज्ञानाचे खरे प्रयोजन आहे' असा पक्ष हिरीरीने मांडला जातो. पण ज्ञानाचे चिरंतन, पावित्र्य व त्याची देशकालसापेक्ष उपयुक्तता यांमध्ये मुळातच विरोध आहे असे मानण्याचे कारण नाही. मानवी बुद्धीला आपल्या सामर्थ्याचा प्रत्यय आणून देणारे सत्यज्ञानाचे नवे उन्मेष नि:संशय आनंददायक असतात. त्या वेळी विद्यावंताची मन:स्थिती कळो न ये सुखदुःख । तान हरपली भूक अशी होत असेल. त्याची सामाजिक अस्मिता, किंबहुना बाह्यसृष्टी व मनुष्यत्त्व यांतील द्वैत ही ह्या अनुभवात क्षणभर विरून जात असेल. स्वान्त:सुखाच्या हाा क्षणावरील त्याचा नैसर्गिक हक्क कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. मात्र ज्ञानसमाधीचा हा फक्त क्षणच असतो, तो ज्ञानोपासकाच्या जीवनाचा स्थायी भाव होऊ शकत नाही. विद्यानंद हा आत्मनिष्ठ व अलौकिक आहे हे मान्य केले, तरी विद्याभिवृद्धीचा सामाजिक संदर्भ, त्यासाठी खर्ची पडलेले सामूहिक श्रम व संपत्ती यांचा विचार लौकिक दृष्टीनेच करावा लागेल. ज्ञानाची निर्मिती, विकास आणि प्रसार ही कार्ये सातत्याने चालू राहायची असतील, तर विद्यावंतांना आपली सामाजिक जबाबदारी टाळता येणार नाही. मात्र त्यासाठी त्यांनी आपले ज्ञानैकनिष्ठेचे ब्रीद सोडण्याची. किंवा विचारस्वातंत्र्याला पारखे होण्याची मुळीच गरज नाही. विज्ञानाची मूळ प्रेरणा जरी मानवाच्या अंतिम हिताची असली, तरी प्रत्येक शास्त्रीय शोध वा सिद्धान्त तात्कालिक दृष्ट्या उपयुक्त ठरलाच पाहिजे असे कोणीही म्हणणार नाही. कोणतीही नवी उपपत्ती जेव्हा मांडली जाते तेव्हा एकंदर सामाजिक जीवनावर तिचे दूरगामी परिणाम काय होतील याची खात्रीशीर निर्णय करणे कोणालाच शक्य नसते. कोणत्याही सिद्धान्ताच्या उपयोजनेसाठी विचाराच्या व व्यवहाराच्या प्रांतांत पुरेसे अनुकूल वातावरण नसेल तर तो काही काळ अगदी निरुपयोगी किंवा विघातकही ठरण्याचा संभव असतो. म्हणून एखाददुस-या सिद्धान्ताच्या उपयुक्तते पेक्षा ज्ञानोपासकांच्या भूमिकेचा प्रश्न अधिक महत्त्वाचा आहे.
              नैसर्गिक शास्त्रे व सामाजिक शास्त्रे यांत दुसराही एक मूलभूत फरक आहे. नैसर्गिक शास्त्रे बाह्य सृष्टीचा शोध घेतात. मानवाचे जीवन समृद्ध व सुखावह करणे हेच त्यांचे मूळ प्रयोजन होय, शास्त्रीय शोधांचा वापर मानवाच्या सुखासाठी न होता संहारासाठी होऊ लागला म्हणजे ज्ञाननिष्ठ की मानवनिष्ठ असा प्रश्न शास्त्रज्ञां पुढे उभा राहतो. सामाजिक शास्त्रे तर व्यक्ती, जाती, वर्ग, प्रदेश, राष्ट्रे व मानवसमाज यांच्या प्रवृत्तींचा व परस्परसंबंधांचा विचार करतात. हा प्रवृत्ती, हे संबंध, कधी परस्परपूरक तर कधी परस्परविरोधी असतात. एकाला जे लाभदायक ते दुस-याला हानिकारक ठरण्याचा संभव असतो. शिवाय जाती, वर्ग, प्रांत यांसारखा कोणताही घटक पूर्णपणे एकजिनसी नसतो. त्यात एकमेकांना छेद देणारी दद्वे असतात. अशा वेळी समाजजीवनाबद्दल काही निष्कर्ष काढावयाचे तर सामाजिक कलहात औपपत्तिक पातळीवर का होईना; पण निश्चित बाजू घ्यावी लागते.

41.

ज्ञानोपासकांची सुखदुःखाची व तहानभुकेची जाणीव का हरपू जात असते ?

अ. बाह्यसृष्टी व मनुष्यत्त्व यातील अद्वैत संपून जात नाही.

ब. सत्यज्ञानाने जिज्ञानासापूर्तीचा आनंद व अंतःशक्तीचा विकास झाल्यामुळे

क. ज्ञान पवित्र व देशकाळ उपयुक्त नसल्याच्या अजाणीवेमुळे

ड. आपल्या सामाजिक जवाबदारीचे भान असल्यामुळे

42.

सत्यज्ञानावर आधारलेल्या सिद्धांताच्या उपयोजनासाठी कोणती परिस्थिती आवश्यक असते ?

अ. काळावर होणारे दुरगामी परिणाम

ब. वैचारिक व व्यावहारिक क्षेत्रातील अनुकुल वातावरण

क. काळाची समुचितता

ड. ज्ञानोपासकांची भूमिका

43.

विज्ञानाचे प्रमुख उद्दिष्ट कोणते ?

अ, मानवाचे जीवन समृद्ध व सुखावह करणे.

ब. व्यक्ती व मानवसमाज यांच्यातील परस्पर संबंधांचा विचार करणे.

क. शोधांचा वापर सुखापेक्षा संहारासाठी करणे

ड. सृष्टीतील सत्यांचा शोध घेणे

44.

ज्ञानोपासकांना कोणते लौकिक मान ठेवावे लागते ? 

अ. ज्ञाननिर्मिती व प्रसार ही आपली सामाजिक जवाबदारी आहे

ब. ज्ञानसाधना हाच आपल्या जीवनाचा स्थायीभाव आहे.

क. ज्ञानवृद्धीचा सामाजिक संदर्भ कोणता आहे.

ड. ज्ञानवृद्धीसाठी उपयुक्त ठरलेले समूहाचे श्रम व संपत्ती यांचे मूल्य कोणते आहे. 

45.

ज्ञानाची पवित्रता आणि देशकाल सापेक्ष उपयुक्तता यामध्ये कोणते नाते असणे आवश्यक आहे ? 

अ. ज्ञानवंत व समूह यांच्या आनंदमयते चे

ब. समन्वयाचे

क. सामाजिक अस्मितेचे

ड. मानव समूहाच्या अंतिम हिताचे

Read the following passage and answer the questions from 46 to 50:
            In the Soumya case, the Supreme Court acquitted the accused for murder but convicted him to life imprisonment for rape, which Justice Katju criticised in his writing. The subsequent incidents were wholly unwarranted. The court invited the former judge to defend his statements in person, then chose to take umbrage at his writing, issued a contempt notice against him, and then asked security staff to escort him outside the premises. Why did the court have to go through this theatrical public confrontation, when it could have issued a contempt notice on the basis of the blog post alone?
                The second aspect is even more troubling: the relevance of contempt law in a free society where criticism of the judiciary is inevitable. Judges have vast powers and people will not remain silent about the exercise of such powers. Just as decisions of other branches of government attract criticism, judicial decisions would also invite the same.
              The Supreme Court has held that for the judiciary to function effectively, the dignity and authority of the courts must be respected and protected at all costs. But the need to respect the "authority and dignity of the court" is borrowed from a bygone era; it has no basis in a democratic system. The law of contempt should be employed only to enable the court to function, not to prevent criticism. In many countries, contempt jurisdiction is regarded as archaic and exercised sparingly. In the US, courts no longer use contempt to silence comments on judges or legal matters. The First Amendment to the US Constitution forbids imposition of contempt sanctions on a newspaper.
                   The English position is best demonstrated by the Spycatcher's case in the late 1980s. After the House of Lords delivered the Spycatcher judgment, the Daily Mirror published an upside-down photograph of the Law Lords captioned, "You Old Fools". But no contempt action was initiated against the newspaper.

46.

The writer feels that criticism of judiciary is inevitable because

a. People live in a free society

b. People will not remain silent

c. Other branches of government also attract criticism

d. Authority of courts is limited

47.

Umbrage means

a. Shady

b. Appreciate
c. Resent

d. Offended

48.

Upside-down' means

49.

Which analogy was used for the judges in the Spycatcher's case ? 

50.

The Supreme Court invited Justice Katju to defend his statements; but then, what did the court do?

a. Took offense and asked him to go away

b. Insulted him by asking the security to remove him

c. Exhibited public confrontation

d. Jailed him

51.

3 मी, 5 मी 10 सेमी, 12 मी 90 सेमी अशी लांबी असलेले कापडाचे तीन तुकडे अचूक मोजण्यासाठी जास्तीत जास्त मोठ्या मापाची मोजपट्टी किती लांबीची असायला हवी, हे शोधा.

52.

“भारतात बनवा” या अभियानासंदर्भात लेखकाने नोंदवलेले निरीक्षण अभ्यास :

भारतातील श्रम कायदे आणि श्रमांचा दर्जा उच्च गुणवत्तेच्या औद्योगिक उत्पादनांच्या गरजांशी अजिबात ताळमेळ खात नाहीत. उदाहरणार्थ, 100 पेक्षा अधिक कामगार असलेल्या कारखान्याला वा उद्योगाला कामगार कमी करण्याची परवानगी मिळायला हवी, जी क्वचितच दिली जाते. यामुळे कंपन्यांना धाडसाने विचार करण्याऐवजी फार काही न करण्याला प्रोत्साहन मिळते. यात भर म्हणून आमच्या कुशल व अकुशल कामगारांकडे आधुनिक उत्पादनांसाठी उपयुक्त क्षमता नसतात. कामगारांचे शिक्षण कमी दर्जाचे असते, तसेच त्यांच्याकडे कारखान्यांत लागणारी कामाची शिस्त नसते. उदयोन्मुख बाजारांत व प्रमुख आग्नेय आशियायी देशांत भारतीय कामगारांची उत्पादन क्षमता सर्वात किमान आहे. वरील माहितीसंबंधातील उचित अर्थनिर्वचन/ने निवडा.

अ. श्रमिक कायदे आणि कामगारांची गुणवत्ता हे, भारतात बनवा' हे अभियान यशस्वी करण्यासंबंधात अडथळे
ठरणारे दोन घटक आहेत.

ब. दर्जाहीन शिक्षणामुळे आणि कारखान्यात काम करण्यासाठीच्या शिस्तीच्या अभावामुळे भारतातील कामगारांची उत्पादकता किमान आहे.

क. कंपन्या छोटा विचार करून कमी पगारात काम करायला तयार असणारे अकुशल श्रमिक नोकरीला ठेवतात
त्यामुळे भारतातील कामगारांची उत्पादकता किमान आहे.

ड. आधुनिक उत्पादनांसाठी आवश्यक क्षमता प्राप्त करण्यासाठी साहाय्य देणा-या शिक्षणाची सुविधा आपल्याकडे नाही.

पर्यायी उत्तरे :

53.

पुढील विधाने अभ्यास :
जर विक्षिप्त हुकूमशहाने अस्त्राचे बटन दाबले, तर परिणामी सुरू झालेले तिसरे जागतिक युद्ध शक्यतो पटकन संपतानाच संस्कृतींचाही शेवट होईल. फक्त त्याच्यासारख्याच लोकांची दादागिरी आणि अण्विक शक्तिचा गैरवापर या युद्धाला तोंड फोडेल.

पुढील पर्यायांमधून वरील विधानांच्या संदर्भात सर्वात योग्य ठरेल, असे अनुमान निवडा :

54.

पुढील विधानांचे परीक्षण करा :

अ. या खेड्यातील सर्व कांक्रीटची घरे पांढरी रंगवली आहेत.

ब. काही घरांना प्रशस्त द्वारमंडप आहेत.

क. उदारीकरणानंतर बांधलेल्या काँक्रिटच्या घरांना प्रशस्त द्वार मंडप आहेत.

ड. सर्व घरे कांक्रीटची नाहीत.

वरील विधानांच्या आधारे पुढील पर्यायांमधून सर्वात यथार्थ निष्कर्ष निवडा :

55.

पुढे दिलेला तीन विधाने व त्याखालील निष्कर्ष अभ्यासा व विधानांच्या आधारे तर्कदृष्ट्या यथार्थ निष्कर्ष चा
पर्याय निवडा.

विधान :

I. धनवंतांखेरीज कोणालाही वातानुकूलीत वाहने परवडत नाहीत.

II. वातानुकूलीत वाहनाने प्रवास करणा-यांपैकी काहींना प्रदूषित हवेपासून संरक्षण मिळते.

III. वातानुकूलीत वाहनाने प्रवास करणा-यांपैकी काहींना आरोग्याच्या समस्या नसतात.

निष्कर्ष :

अ. वातानुकूलीत रहित वाहनाने प्रवास करणा-यांना हवा प्रदूषणाचा त्रास होतो.

ब. सर्व धनवंत वातानुकूलीत वाहनाने प्रवास करत नाहीत.

क. सर्व धनवंतांना आरोग्याच्या समस्या नसतात.

ड. वातानुकूलीत वाहनाने प्रवास करणारे सर्व धनवंत असतात.

पर्यायी उत्तरे : 

56.

काही मालासह तीन गुन्हेगारांना ताब्यात वेतले. चौकशीच्या वेळी फक्त एकजण खरे बोलत होता आणि इतर दोघांपैकी प्रत्येकजण एकदा खरे आणि आणि एकदा खोटे बोलत होते. ते म्हणाले

अनी : जानूने दरवाजा तोडला. मनूने किमती सामान गोळा केले.

मनू : अनीने दरवाजा तोडला. मी किमती सामान गोळा केले.

जानू : मी पिशव्या दुकानाबाहेर आणल्या. मनूने दरवाजा तोडला.

किमती सामान कोणी गोळा केले ?

57.

पुढे दिलेलो विधान व निष्कर्ष अभ्यासा व विधानांच्या आधारे तर्कदृष्ट्या यथार्थ निष्कर्ष चा पर्याय निवडा.
विधान :

एका शासकीय कंपनीने तिच्या कर्मचा-यांना त्यांचे उत्पन्न आणि मालमत्ता घोषित करण्यास सांगितले. परंतु कर्मचारी संघटनेने त्याला जोरदार विरोध केला आणि एकाही कर्मचा-यांने त्याचे/तिचे उत्पन्न घोषित केले नाही. निष्कर्ष :

I. या कंपनीतील कर्मचा-यांचे त्यांच्या पगाराव्यतिरिक्त कोणतेही अधिकचे उत्पन्न असलले दिसून येत नाही.

II. सर्व वरिष्ठ अधिका-यांनी आपले उत्पन्न आधी घोषित करावे, अशी कर्मचारी संघटनेची इच्छा आहे.

पर्यायी उत्तरे :

58.

जेव्हा शर्यतीत जिंकण्यासंबंधी चौकशी केली, तेव्हा पिया, दिया आणि निया यांनी पुढील विधाने केली.

पिया : सेतू किंवा लालू यापैकी एकजण शर्यत जिंकला.

दिया : सेतू शर्यत जिंकला.

निया : सेतू किंवा लालू यापैकी एकानेही शर्यत जिंकली नाही.

जर फक्त व्यक्ती नेहमी खोटे बोलत असेल तर कोणी शर्यत जिंकली ?

59.

ल्युसीकडे, झीनत आणि जया यांच्याकडे असलेल्या नारळांच्या बेरजेच्या दुपटीपेक्षा 10 नारळ कमी आहेत. जयाकडे झीनतच्या दुप्पट नारळ आहे. जर ल्युसीने झीनतला 15 व जयाला 5 नारळ दिले, तर झीनत व जया यांच्याकडे प्रत्येकी ल्युसीकडे सुरुवातीला असलेल्या नारळांच्या अर्ध्या संख्येइतके नारळ असतील. झीनंतकडे सुरुवातीला असलेल्या नारळांची संख्या दर्शवणारा पर्याय निवडा. 

60.

शहर A पासून शहर B चे दोन तिकिटांचे आणि शहर A ते शहर c चे तीन तिकिटांचे एकूण बस भाडे ₹ 77 आहे. परंतु शहर A पासून शहर B चे तीन तिकिटांचे व शहर A ते शहर c चे दोन तिकिटांचे एकूण बस भाडे ₹ 73 आहे. तर शहर A पासून शहर B व शहर C चे अनुक्रमे बस भाडे किती होईल ? 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१८ - Paper 2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.