राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१८ - Paper 2

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१८ - Paper 2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :

पुढील उतारावाचून त्यावर आधारित 21 ते 25 प्रश्नांची उत्तरे द्या :
                                                    आम्लपर्जन

सर्वसाधारणपणे पावसाच्या पाण्याचा pH 5.6 असुन तो त्याच्यातील H+ आयन्स तयार झालेल्या पावसाच्या पाण्यात व कार्बनडायऑक्साईड (वातावरणातील) यांच्यातील अभिक्रियेमुळे.
                                             H20 (l) + CO2 (g) = H2C03 (aq)

                                             H2CO3 (aq) = H (aq) + HC03° (aq)

ज्यावेळी पावसाच्या पाण्याचा pH 5.6 पेक्षा कमी असतो त्यालाच आम्ल पर्जन म्हणतात. आम्ल पर्जन हा वेगवेगळया मानवी क्रियापासुन वातावरणात बाहेर पडणाच्या सल्फर व नायट्रोजन ऑक्साईड चा उपपदार्थ आहे. जैवइंघनाच्या कोळसा आणि तेल ज्वलनातुन (वीजगृहातुन) आणि भट्टयातुन किंवा पेट्रोल आणि डिझेल च्या यंत्रातुन निघणा-या सल्फरडायऑक्साईड व नायट्रोजन डायऑक्साईड ऑक्सडिकिरणातून आणि पाण्याच्या अभिक्रियेतून निघणारे प्रमुख घटक आम्लपर्जन तयार करतात. आम्लपर्जन शेतीसाठी, बनस्पतीसाठी, झाडे यांच्यासाठी हानीकारक आहे कारण तो वाढीच्या अन्नघटक विरघळवतो किंवा धुवून टाकतो. मनुष्यप्राण्यामध्ये तो श्वसनाचे आजार निर्माण करतो. पाण्याखालचे परिसंस्थेवर परिणाम करतो. त्यामुळे जलवाहिन्या आतुन गंजतात त्याला Fe, Pb आणि Cu चे थर बसतात व पिण्याच्या पाण्यात उतरतात. इमारती आम्लपर्जनाने खराब होतात, तसेच धातु तसेच शिल्प वस्तुही खराब होतात. भारतातील
ताजमहलावर आम्लपर्जनामुळे परिणाम झालेला आहे. 

21.

पर्जण्यास आम्ल पर्जन म्हणतात जेव्हा, pH चे मुल्य _____________ असते.

22.

कार्बन डायऑक्साइडची पाण्याबरोबर अभिक्रिया होऊन ___________ हे बनते

23.

जीवाश्म इंधन आणि पेट्रोलियमच्या ज्वलनातुन ____________ हे वायु मिळतात.

24.

आम्लपर्जन्य, वनस्पतीसाठी हानीकारक आहे कारण 

25.

भारतातील ताजमहल ह्यावर कशाने परिणाम झाला

पुढील उतारावाचून त्यावर आधारित 26 ते 30 प्रश्नांची उत्तरे द्या :
            अरूण तिवारी ने मला माझ्या आठवणी त्याला सांगण्याची विनंती केली. तो त्या नोंदवून ठेवणार होता. तो माझ्या प्रयोगशाळेत 1982 पासून काम करीत होता, पण फेब्रुवारी 1987 मध्ये हैद्राबादच्या निझाम इंन्स्टिट्युट ऑफ मेडीकल सायन्सेसच्या हदयाला रक्त पुरवठा करणाच्या रक्तवाहिन्यांसंदर्भातील अति दक्षता विभागात मी त्याला भेटालो तोपर्यंत मी त्याला फारसे ओळखत नव्हतो. तो अवघ्या 32 वर्षांच्या होता, पण त्याचा जीव वाचविण्यासाठी बहादुरीने लढत होता. मी तुझ्यासाठी काही करावे असे तुला वाटते का असे मी त्याला विचारले. “सर, मला तुमचे आशिर्वाद हवे आहेत जेणेकरून मला दीर्घायुष्य लाभेल आणि मी तुमचा किमान एक तरी प्रकल्प पूर्ण करू शकेन.
              त्या तरूण माणसाच्या निष्ठेने मन हलवून सोडले आणि मी रात्रभर त्याला बरे वाटावे म्हणून प्रार्थना केली. परमेश्वराने माझी प्रार्थना ऐकली आणि तिवारी एका महिन्यात कामावर परत येऊ शकला. 'आकाश' क्षेपणास्त्राची एअरफ्रेम अगदी शून्यातून साकारण्याच्या कामात मदत करण्याचे उत्कृष्ठ काम तीन वर्षाच्या छोटया कालावधीत त्याने केले. त्यानंतर त्याने माझी कथा कालक्रमानुसार लावण्याचे काम हाती घेतले. गेल्या वर्षभरात सहनशीलता दाखवत त्याने माझ्या कथेच्या विखुरलेल्या तुकड्यांची नक्कल केली आणि त्याचे एका प्रवाही कथे मध्ये रूपांतर केले. त्याने माझे वैयक्तिक ग्रंथालय बारकाईने धुंडाळले, त्यामधून मी वाचता वाचता खुणा करून ठेवलेल्या कविता निवडल्या आणि त्यांचा माझ्या कथेच्या संहितेमध्ये समावेश केला.
                 मला असे वाटते की ही कथा केवळ माझ्या वैयक्तिक यशाची आणि दु:खाची नाही तर तंत्रज्ञानाच्या आघाडीवर स्वत:ला स्थापित करण्यासाठी संघर्ष करणाच्या आधुनिक भारतातील प्रस्थापित शास्त्र विषयक समूहाच्या यशाची आणि त्यांना बसलेल्या झटक्यांची, त्यामुळे झालेल्या तात्पुरत्या पिछेहाटीची कहाणी आहे. ती राष्ट्रीय आकांक्षेची आणि सहकार्यावर आधारित प्रयत्नांची कहाणी आहे. आणि माझ्या दृष्टीने शास्त्रीय बाबतीतील स्वयं सिद्धतेचा आणि तांत्रिक कौशल्याचा शोध घेणा-या भारताची शौर्यकथा आपल्या काळातील एक बोधकथा आहे.
                  या सुंदर ग्रहावरील प्रत्येक जीव ईश्वराने विशिष्ठ भूमिका पार पाडण्यासाठी निर्माण केला आहे. आयुष्यात मी जे काही मिळवले आहे ते त्याच्या मदतीद्वारेच, ती त्याच्या इच्छेची अभिव्यक्ती होती. काही विलक्षण प्रतिभेच्या शिक्षक आणि सहका-यांच्या माध्यमातून त्याने माझ्यावर त्याच्या कृपेचा वर्षाव केला
आणि या प्रतिभावान व्यक्तींप्रती मी माझी कृतज्ञता व्यक्त करतो तेव्हा मी केवळ त्याच्या वैभवाचे कौतुक करीत असतो. ही सर्व रॉकेट्स आणि क्षेपणास्त्रे हे ए.पी.जे. अब्दुल कलाम या नावाने ओळखल्या जाणा-या छोट्या माणसाच्या माध्यमातून केलेले त्याचे काम आहे.

26.

वरील उताच्याचे लेखक ____________ आहेत.

27.

उता-यावरून असे सूचित होते की अशोक तिवारी यांनी एक _____________ लिहिली/लिहिले/लिहिला/लिहिण्यास मदत केली.

28.

कलाम हे __________ होते. (खालील पर्यायांमधून अधिक परिपूर्ण वर्णन निवडा)

29.

आकाश क्षेपणास्त्राची ___________ कालावधीत तयार करण्यात आली. 

30.

अरूण तिवारी _________ ग्रासलेले होते.

पुढील उतारावाचून त्यावर आधारित 31 ते 35 प्रश्नांची उत्तरे द्या :
             अतिरिक्त उत्पादनाला आवर घालून त्यामुळे कोसळणा-या शेतमालाच्या किमतींवर नियंत्रण आणून शेतक-यांना मदत करण्यासाठी एग्रिकल्चरल अडजस्टमेंट एक्ट हा कायदा आला. शेतक-यांनी धान्य लागवड आणि गुरांची पैदास करू नये यासाठी त्यांना मोबदला दिला जाई, शेते न पिकवता मोकळी ठेवली जाते आणि अतिरिक्त उत्पादन नष्ट केले जाई. या धोरणावर बरीच टीका झाली. अमेरिकेत आणि जगातही कोट्यावधी लोकांना अन्न परवडत नसतानाही त्याची गरज होतीच, पण ते अन्न त्यांना देण्याचा कोणताच मार्ग राजकीयदृष्ट्या शक्य नव्हता.
                    सरकारने दक्षिणेकडे 6,40,000 चौरस मैलांवर पसरलेल्या क्षेत्रात टेनेसी नदी खो-याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला. पहिल्या महायुद्धात अलाबामामध्ये मसल शोल्स येथे सरकारने धरण आणि दारूगोळा कारखाना उभारला होता. शांतता काळात तो विकण्याचे प्रयत्न फसले होते. आता 1933 मध्ये सरकारने टेनेसी खोयाचे महामंडळ, (टीव्हीए) ही स्वायत्त सरकारी संस्था सुरू केली, की जिच्या माध्यमातून या कारखान्यांत वीज आणि खते निर्माण करायची होती. याखेरीज, टीव्हीएने पुढे अनेक अतिरिक्त धरणे आणि वीज संयंत्रे उभारली, की ज्यामुळे आजूबाजूचा प्रदेश सुधारला. स्वस्त वीज उपलब्ध झाली. ज्या पुरांमुळे या खोप्याची प्रगती खुटली होती, ते पूर आटोक्यात आले. शेती तज्ञ पाठवून लोकांना जमिनीचा योग्य वापर करून अधिक उत्पादन कसे घ्यावे, हे दाखवले जात असे. काही वर्षांपूर्वीपर्यंत मागास असणारा हा प्रदेश धडधडणा-या कारखान्यांनी आणि बहरलेल्या मळ्यांनी समृद्ध झाला.
                    भविष्याकडे लक्ष ठेवून न्यू डील कार्यक्रमात सामाजिक सुरक्षा कायदा पास केला गेला, की ज्याद्वारे लोकांचे बहुतेक सर्वसामान्य अशा त्रासदायक गोष्टींपासून रक्षण केले जाते. आजतागायत चालू असलेल्या या कार्यक्रमात कामगारांना बेरोजगारीचा विमा, वृद्धांना निवृत्ती वेतन, परावलंबी बालकांना मदत, गरजवंतांना काही लाभ दिले जातात. संघराज्याचा निधी ही राज्य सरकारे वितरित करतात आणि त्या द्वारे या सुरक्षा योजनेत आपले योगदान देतात. या योजनेला कामगार, मालक, राज्य आणि स्थानिक सरकारेदेखील आपले योगदान देतात.

31.

सामाजिक सुरक्षा कायद्याचा हेतू काय होता ?

32.

किमंती कोसळण्यामागे कोणत्या गोष्टीला जवाबदार मानले गेले ?

33.

अॅग्रिकल्चरल अॅडजस्टमेंट अॅक्ट वर टीका का केली गेली ?

34.

खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे ?

35.

टेनेसी खोप्याचे महामंडळ (टीव्हीए)

पुढील उतारावाचून त्यावर आधारित 36 ते 40 प्रश्नांची उत्तरे द्या : .
                                                 मानवी वंशाचे जागतिक वितरण
वंश म्हणजे जीवशास्त्रीय दृष्ट्या सर्व मानवी सदस्य, गुणसुत्रे, शारीरिक विशिष्ट्ये समान असलेल्या समूहाला वंश म्हणातात, प्रत्येक मानवाला एक डोके दोन हात, दोन पाय, दोन डोळे, दोन कान असे अवयव असतात.
विज्ञानाच्या दृष्टीने वंश या घटकाचा विचार केल असता वंशाच्या वर्गीकरणामध्ये त्वचेचा रंग, उंची, डोक्याचा आकार, चेहरा, नाक, डोळे, केसांचा रंग व आकार इ. घटकांचा समावेश होतो.
त्वचेचा रंग - या घटकानूसार जगातील अनेक भागात विविध रंगाच्या त्वचेचे लोक आढळतात. यामध्ये त्वचेचा रंग पांढरा, काळा, पिवळसर, गहूवर्णी असी आढळतो. त्यानूसार उत्तर अमेरिकन लोक पांढ-या रंगाच्या त्वचेचे आहेत. अफ्रिकेमध्ये काळ्या रंगाच्या त्वचेचे लोक आहेत. अणि पिवळसर रंगाच्या त्वचेचे लोक मंगोलिया चीन, जपान, या देशात आढळतात.

उंची - या घटकानुसार सहजपणे उंची मोजता येते. लोकांच्या उंचीनूसार अधिक उंचीचे, मध्यम उंचीचे व कमी उंचीचे लोक असे मांडता येते. यामध्ये साधारणपणे यूरोपीयन व उत्तर अमेरिकन लोक अधिक उंचीचे असून मंगोलियन लोक कमी उंचीचे आढळतात.
डोक्याचा आकार - यामध्ये लोकांच्या डोक्याचा आकार मोजता येतो. त्यानूसार लांब डोक्याचे लोक युरोप व उत्तर अमेरिकेत आढळतात. मध्यम व लहान डोक्याचा आकाराचे लोक आफ्रिका व अशियामध्ये आढळतात.
नाकाचा आकार -नाकाच्या उंचीनूसार लोकांच्यामध्ये विविधता दिसून येते. यामध्ये लांब नाकाचे लोक यूरोपियन प्रदेशात आहेत. अफ्रिकेतील लोकांच्या नाकाचा आकार अधिक असतो. त्यांना निग्रो लोक असेही म्हणतात.

चेह-याचा आकार - चेह-याचा आकाराने, ठेवणाने विविध वंशाची जागतिक ओळख दिसून येते. चेह-यामध्ये लांबट व मोठा आकार दिसून येतो. चीनी व मंगोलियन लोकांच्या चेह-याचा आकार लांबट व मोठा दिसून येतो स्कॅडेनिटीया मध्ये लोकांच्या चेह-यांचा आकार लहान आढळतो.

डोळे - मानवी वंशाची विशिष्ट ओळख ही डोळ्यांमूळे होते. यामध्ये काळे डोळे, घारे डोळे, निळे डोळे असे दिसून येते. काळे डोळे हे अफ्रिकेतील लोकांचे वैशिष्ट्य आहे. घारे डोळे हे मंगोलिया, चीन व जपानी लोकांचे दिसून येतात, आणि निळे डोळे यूरोप व उत्तर अमेरिकन लोकांचे दिसून येतात.
केस-मानवी वंशामध्ये केसांचे महत्त्व आहे. यामध्ये केसांचा आकार, जाड केस, कुरळे केस, सरळ केस अशी विविधता दिसून येते. यामध्ये कॉकेशिअस वंशाच्या लोकांचे केस कुरळे असतात तर निग्रोईड वंशाच्या लोकांचे केस काळे व जाड तर मंगोलाईड वंशाच्या लोकांचे केस सरळ आढळतात.

36.

मंगोलियन लोकांच्या त्वचेचा रंग कोणता आहे ?

37.

विविध वंशाची ओळख खालीलपैकी कोणत्या वैशिष्ट्याच्या आधारे करता येते ?

अ. नाकाची रुंदी व उंची

ब. चेह-याचा आकार

क. केसाचा रंग

ड. त्वचेचा रंग

पर्यायी उत्तरे : 

38.

मानवी वंशाच्या कोणत्या वैशिष्ट्याचे सहजपणे मोजमाप करता येते ?

अ. उंची 

ब. डोक्याचा आकार

क. त्वचेचा रंग

ड. केसाचा रंग

पर्यायी उत्तरे :

39.

उत्तर अमेरिकन लोकांचं वैशिष्ट्ये दर्शविणारा पर्याय निवडा.

40.

कोणत्या लोकांच्या चेह-याचा आकार मोठा आढळतो ? 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१८ - Paper 2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.