राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१८ - Paper 2

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१८ - Paper 2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :

पुढील उतारावाचून त्यावर आधारित 1 ते 5 प्रश्नांची उत्तरे द्या : 

हरितक्रांतीचे प्रतिकूल परिणाम

         स्वातंत्र्या नंतरच्या काळातील सततचे दुष्काळ व अन्नधान्याचा तुटवडा यातून देशाला सावरण्यात पहिल्या हरितक्रांतीमुळे खूप मोठ्या प्रमाणात मदत झाली यात शंकाच नाही. वेगाने वाढणारी लोकसंख्या व अन्नधान्याचा तुटवड़ा यामुळे अतिशय भयावह स्थिती निर्माण झाली होती. परंतु अशा परिस्थितीत हरितक्रांतीमुळे कृषि उत्पादकतेत वाढ करून अन्नसुरक्षेसारखी गंभीर समस्या हाताळणे सहज शक्य झाले.
         तरीही हरितक्रांतीचे काही प्रतिकूल परिणाम झाले आणि ते दीर्घकाळ अनुभवास येत आहेत. हरितक्रांतीमुळे केवळ गहू व तांदुळ यासारख्या तृणधान्य पीकांच्या उत्पादन वाढीवर अधिक भर देण्यात आला. परंतु याचवेळेस इतर कडधान्य पीके, फळे, भाजीपाला यांचे उत्पादन मात्र घटले. फळे व भाजीपाला उत्पादन वाढीचा सद्य स्थितीतील दर पाहता भविष्यकालीन वाढती मागणी व लोकसंख्येत होणारी वाढ यांचा मेळ घालणे कठीण आहे.
          तथापि, एकाच प्रकारच्या तृणधान्य पीकांचे (तांदूळ, गहू) सातत्याने उत्पादन घेतल्याने मृदेची सुपीकता कमी होत आहे. नापीक होणा-या मृदेत कडधान्ये व भाजीपाला पीके उत्पादित करणे अधिक कठिण होत आहे. एकपीक पद्धतीमुळे (वर्षानु वर्षे सतत एकाच जातीच्या पीकाचे उत्पादन होणे) पीकांची रोगप्रतिकारक्षमता कमी होते व ते विविध प्रकारच्या रोगांना आणि कीटकांना लवकर बळी पाडतात. हेच तर पहिल्या हरितक्रांतीचे सर्वात मोठे प्रतिकूल फली आहे.
        पहिल्या हरितक्रांतीचा दुसरा दोष म्हणजे रासायनिक खते, किटक नाशके व बुरशीनाशकांचा स्वैर वापर होय. यांच्या अतिजास्त वापराचा देशाच्या कृषीव्यवस्थेच्या भवितव्यात फार मोठा धोका आहे. अतिरिक्त आणि अप्रस्तुत असा रासायनिक खते व किटकनाशकांचा वापर विविध प्रकारच्या पर्यावरणीय विनाशास कारणीभूत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण, जलस्त्रोतांचे प्रदूषण, कृषि क्षेत्रातील कामगारांना होणारी विषबाधा ही गंभीर समस्या आहे. पर्यावरणीय दृष्टीकोनातून उपयुक्त किटकांचा व इतर वन्यजीवांचा हास होत आहे.

         पहिल्या हरितक्रांतीने शेतीशी संबंधित इतर घटकांकडे पुरेसे लक्ष दिले नाही. यामध्ये मुख्यत्वे जिरायती व कोरडवाहू शेती, डोंगरील प्रदेश, किनारी प्रदेश, शुष्क व वाळवंटी प्रदेश इत्यादिंचा समावेश होतो हे प्रदेश देखील फलोत्पादन, मध उत्पादन, आळंबे (मशरूम), दूध, मांस इत्यादिंच्या निर्याती करीता सक्षम म्हणून विकसित झाले असते. हरितक्रांतीचे समीक्षक असाही युक्तीवाद करतात कि फक्त मोठे शेतकरी नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करतात कारण त्यांच्याकडे जलसिंचनाच्या सुविधा असतात. रासायनिक खते व बी-बियाणांकरीता त्यांना सहज वित्तपुरवठा होतो. लहान व अल्पभूधारक शेतकरी एकतर हरितक्रांतीपासून दूर राहिले किंवा त्यांचा उत्पादन खर्च अधिक होता व त्या तुलनेत कमी उत्पन्न मिळते. याचबरोबर जमीनदार लोक सतत जमिनीचा दंड वाढवतात किंवा दंडाने दिलेल्या जमिनी परत होतात. हरितक्रांतीमुळे शेतीमध्ये अनावश्यक यांत्रिकीकरण आले. त्यामुळे ग्रामीण भागातील रोजगार कमी होवून मजूरीचे दरही कमी झाले.
       जलसिंचनाच्या सदोष पद्धतींमुळे कृषीयोग्य सुपीक जमिनीमध्ये क्षारांचे प्रमाण वाढले व त्यामुळे शेती योग्य चांगल्या जमिनी नापीक झाल्या, जलसिंचनासाठी मोठ्या प्रमाणावर भूजलाचा उपसा झाल्याने भूजल पातळी प्रचंड प्रमाणात खालावली.

1.

पहिल्या हरितक्रांतीत खालीलपैकी कोणत्या गोष्टींची काळजी घेतली नाही ?

अ. कोरडवाहू प्रदेश

ब. किनारी प्रदेश

क. सुपीक जमीनीचे प्रदेश

ड. वाळवंटी प्रदेश

पर्यायी उत्तरे : 

2.

खालीलपैकी हरितक्रांती संबंधी कोणती टीका बरोबर आहे ?

अ. जल प्रवाहांचे प्रदुषण 

ब. हवेचे प्रदुषण 

क. कृषी क्षेत्रातील कामगारांस होणारी विषबाधा

ड. उपयुक्त कीटकांचा व इतर वन्यजीवांचा हास

पर्यायी उत्तरे : 

3.

खालीलपैकी कोणते/कोणती विधाने हरितक्रांती संबंधी बरोबर आहे ?

अ. तांदूळ व गहू या सारखी तृणधान्ये उत्पादनावर भर होता.

ब. कडधान्ये, फळे आणि भाजीपाला/उत्पादनात घट.

क. कडधान्ये, फळे व भाजीपाला उत्पादनावर भर.

ड. वर्षामागून वर्षे जमीनीच्या सुपीकतेत हळू हळू घट.

पर्यायी उत्तरे : 

4.

हरितक्रांतीच्या काळात खालीलपैकी कोणता/कोणते पर्यावरणावर झालेले परिणाम बरोबर आहेत ?

अ. जलसिंचनाच्या चुकीच्या पद्धती

ब. जमीनीत वाढते क्षारांचे प्रमाण

क. शेती योग्य चांगल्या जमीनीचा नापिक झाल्या

ड. भूजल पातळी खाली जाणे

पर्यायी उत्तरे : 

5.

खालीलपैकी कोणते परिणाम हरितक्रांती संबंधी बरोबर आहेत ?

अ. वर्षामागून वर्षे एकच तृणधान्य पिकविल्यामुळे जमीनीची सुपीकता कमी होत गेली.

ब. जमीनीची सुपीकता घटल्याने कडधान्ये व भाजीपाला पिकविणे अवघड झाले.

क. एकपीक पद्धतीमुळे पीकांची रोगास प्रतिकार क्षमता घटली.

पर्यायी उत्तरे :

पुढील उतारावाचून त्यावर आधारित 6 ते 10 प्रश्नांची उत्तरे द्या :
              मागील अर्धशतकामध्ये सर्व समाजाला आकार देणारी एकमेव आर्थिक शक्ती म्हणजे संवाद तंत्रज्ञान होय. या नव्या संवाद क्रांतीमुळे भौगोलीक व राष्ट्रीय सीमा व कालमर्यादा निरर्थक ठरत आहेत. आजच्या बदलत्या जगात जागतिक पातळीवर इ-कॉमर्स मोठ्या वेगाने वाढत आहे आणि त्यामुळे व्यापाराच्या नवनविन संधी निर्माण होता आहेत ज्या संधी सोडणे कोणत्याही देशास परवडणारे नाही. विज्ञान तंत्रज्ञानातील अशा प्रस्फोटी, नवोपक्रमी विकासाने आंतराष्ट्रीय व्यापाराची दिशा व प्रवृत्ती यावर खोलवर परिणाम केला आहे.
              आर्थिक विकास प्रक्रियेतील आंतरराष्ट्रीय व्यापाराची भूमिका सार्वत्रिक मान्यता पावलेली आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार हा विविध प्रकारचे स्थिर व बदलते लाभ प्राप्त करून देत असल्याने विकासाची क्षमता वाढवित असतो. आंतरराष्ट्रीय व्यापाराचा आकार जेव्हढा जास्त तेव्हढी विकासाची क्षमता जास्त. आर्थिक इतिहासात अशा अनके देशांच्या यशोभाथा दिसून येतात जे सुरूवातीच्या काळात तुलनात्मक दृष्टया विकसनशिल देश होते, मात्र परकीय व्यापाराच्या माध्यमाने विकसित देशात रूपांतरीत झाले.
                  व्यापार ही मानवी संस्कृतिइतकीच जुनी बाब आहे. कारण कोणतीही व्यक्ती व म्हणूनच कोणताही समाज स्वयंपूर्ण असू शकत नाही. पूर्वीच्या काळी व्यापार हा वस्तू विनिमयाच्या स्वरूपात होत होता. नंतरच्या काळात व्यापार केवल वस्तूविनिमय ते पैसा विनिमय इतकाच बदलला नाही तर संगणकाच्या माध्यमाने जगाच्या एका भागातून दुस-या भागात लोक केवळ वस्तु व सेवांचाच नव्हे तर स्टॉक, बॉन्डस् आणि वित्तिय कर्ज तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चलनांचे व्यवहारही करू लागले.
              वेगवान व स्थिर वृद्धीचे निर्यात प्रोत्साहन हे उत्तम माध्यम असल्याने 1960 पासून निर्यात प्रोत्साहनाकडे जास्त लक्ष देण्यात आले आहे. भारतीसाठी निर्यातवृद्धी ही चैनीची बाब राहीली नाही हे आता मान्य झाले आहे. देशाच्या स्वावलंबनाशी तडजोड न करता देशाची विकास गती राखण्यासाठी लागणारे पुरेसे परकीय चलन मिळविण्यासाठी परकीय व्यापार ही पूर्वअट आहे. भारतीय परिस्थितीत निर्यात ही आर्थिक प्रगतीचे इंजिन म्हणून परिणामकारक कार्यभाग साधू शकते.
            निर्यात व्यापार हे भारतीय अर्थव्यस्थेतील स्थितीसाठी एक महत्वाचे अंग आहे. भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये त्याचे अनन्यसाधारण महत्व आहे. निर्यात ही देशातील न वापरलेली नैसर्गिक व मानव संसाधनांचा कार्यक्षम वापर करण्यास मदत करते, देशांतर्गत बाजाराच्या मर्यादा ओलांडते, अर्थव्यवस्थेचे संघटन व सक्षमिकरण करते आणि परकीय मदतीवरील अवलंबित्व किमान करते ज्यामुळे अर्थव्यवस्थेचे परिवर्तन होते असा दीर्घकालीन विश्वास आहे.
             कोणत्याही अर्थव्यवस्थेच्या विकास प्रक्रियेतील महत्वाचा घटक, म्हणजे निर्यात होय, भारतासारख्या विकसनशिल देशाबाबत त्याचा तार्किक आधार म्हणजे निर्यातीपासून मिळणारे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष लाभ होय.

6.

भौगोलिक, राष्ट्रीय सीमा व कालमर्यादा निरर्थक ठरत आहेत कारण 

7.

विकासाची क्षमता खालीलपैकी कोणत्या घटकावर अवलंबून असते ?

8.

व्यापार ही मानवी संस्कृति इतकीच जुनी बाब आहे. कारण

9.

संगणक तंत्रज्ञानामुळे लोक याही बाबतीत व्यापार करू लागले

10.

परिच्छेदास सुयोग्य नावं निवडा. 

पुढील उतारावाचून त्यावर आधारित 11 ते 15 प्रश्नांची उत्तरे द्या :
           विविध साधनांद्वारे प्रकाशाच्या आश्चर्याचा आनंद घेता येतो. आरसे व भिंग हे यापैकी. सपाट आरसा आपणास माहीत आहे. अंतर्वक्र व बहिर्वक्र आरसे प्रकाशाचे अभिसरण वे अपसरण करण्यासाठी गरजेनुसार वापरले जातात, गोलीय आरशाचे नाभीय अंतर त्याच्या त्रिज्येच्या निम्मे असते. वस्तुचे अंतर व प्रतिमेचे अंतर यांच्या गुणाकाराचे व बेरजेचे गुणोत्तर हे आरशाचे नाभीय अंतर असते. बहिर्वक्र व अंतर्वक्र भिंग सुद्धा अशाच वरील हेतूसाठी वापरले जातात. वस्तुचे अंतर व प्रतिमेचे अंतर यांच्या गुणाकाराचे व फरकाचे गुणोत्तर हे भिंगाचे नाभीय अंतर असते.
           नवीन कार्टेशियन चिन्ह संकेतानुसार धृवापासून किंवा मध्यापासून डावीकडे आणि अक्षाच्या खालील मोजमापे ऋण घेतात, तर उजवीकडे आणि अक्षाच्या वरील मोजमापे धन घेतात. भिंगाची अभिसरण किंवा अपसरण क्षमता ही भिंगाची शक्ती, डायॉप्टर एककात असते. एक डायॉप्टर हा नाभीय अंतराचा मीटर एककातील गुणाकार व्यंस्तांक असतो.
                सर्वसाधारणपणे आरसे किंवा भिंग हे वस्तुच्या तुलनेत विशाल प्रतिमा मिळवण्यासाठी वापरले जातात. विशालन हे प्रतिमेची आकार वे वस्तुची आकार यांचे किंवा प्रतिमेचे अंतर व वस्तुचे अंतर यांचे गुणोत्तर असते. आरसे व भिंगांचा वापर टॉर्चेस व हेडलाइर्डटस्, फ्लड लाईटस्, प्रोजेक्टर लॅम्प, सौर उपकरणे आणि भट्टी, कॅमेरा, वर्णपटदर्शक, साधा सुक्ष्मदर्शी, संयुक्त सुक्ष्मदर्शी, दूरदर्शी, चष्मे इत्यादीमध्ये केला जातो. मानवी डोळा हा एक प्रकाशिय उपकरण आहे. प्रकाश पातळ पारपटल, बुबुळ, प्रकाश नियंत्रक व नियमन करणारी व स्वत:चा व्यास बदलू शकणारी, वे परिस्थितीशी जुळवून घेण्याची वृत्ती असलेली बाहुली यांच्यातून प्रवेश करतो. बाहुलीच्या मागे समायोजन शक्ती असणारे द्विवहिर्वक्र स्फटिकमय भिंग असते. शेवटी दृष्टिपटलावर वास्तव व उलट प्रतिमा तयार होते. निरोगी डोळयापासून सुस्पष्ट दृष्टिचे लघुत्तम अंतर 25 सेमी असते.
                परंतु डोळयातील स्नायू पुरेशे शिथिळ न होणे किंवा अशक्त होणे, भिंगाची अभिसारी शक्ती जास्त किंवा कमी होणे, भिंग व दृष्टिपटल यांच्यातील अंतर जास्त किंवा कमी होणे, बुबुल लांबट किंवा लहान होणे यांमुळे लघुदृष्टिता, दूरदृष्टिता व वृद्धदृष्टिता असे विविध अपवर्तन दोष निर्माण होतात. योग्य अंतर्वक्र किंवा बहिर्वक्र भिंग वापरून हे दोष दूर करता येतात. एकाचवेळी दोन्ही दोष देखील आढळून येतात. अशावेळी द्विनाभीय भिंग वापरले जाऊ शकतात.

11.

एका वस्तुची उंची 3 सेमी असून 24 सेमी वक्रता त्रिज्या असणा-या अंतर्वक्र आरशापासून 20 सेमी अंतरावर ठेवली आहे. सुस्पष्ट प्रतिमा मिळवण्यासाठी आरशापासून पडदा किती अंतरावर असावा ? तसेच प्रतिमेचा आकार किती ?

12.

सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर 50 सेमी असणा-या व्यक्तीच्या चष्म्याची नाभीय शक्ती किती असावी ?

13.

यादीतील खालील उपकरणांमध्ये आरशे व भिंग वापरले जातात. त्यानुसार त्यांचे वर्गीकरण करा.

(i) हेडलाइट्स

(ii) दूरदर्शी

(ii) संयुक्त सुक्ष्मदर्शी

(iv) प्रोजेक्शन लॅम्प

(v) फ्लडलाइट्स

(vi) साधा सुक्ष्मदर्शी 

14.

एका व्यक्तीच्या डाव्या डोळ्यात लघुदृष्टिता व उजव्या डोळ्यात दूरदृष्टिता दोष आहेत. त्याच्या चष्म्याचे उजवे व डावे भिंग अनुक्रमे _________ व _________ असायाला हवेत.

15.

1 मिमी x 1 मिमी च्या चौरसाची नक्षी असलेले कार्ड शीट, डोळ्यांच्या अगदी जवळ असलेल्या 9 सेमी नाभीय अंतराच्या बहिर्वक्र भिंगातून 9 सेमी अंतरावरून बघितल्यास, त्या कार्ड शीट वरील चौरस _____________ आकाराचे दिसतील. 

पुढील उतारावाचून त्यावर आधारित 16 ते 20 प्रश्नांची उत्तरे द्या :
              देवाला समर्पित करण्यासाठी फूल उत्कृष्ट सेवा देतात. वैयक्तिक सौंदर्याकरिता ते अमूल्य मदत करतात व कवींकरिता प्रेरणेचा स्रोत आहेत.
            वनस्पतिंकरिता फुले लैंगिक प्रजोत्पादनाचे काम करणारी रचना आहेत. बियाचे अंकुरण झाल्यानंतर झाडांची सतत वाढ होते आणि ते पूर्णपणे परिपक्व होतात. जीवनात एका विशिष्ट वेळी लैंगिक अवस्थेत पदार्पण करून वनस्पती फुलायला लागतात. फुलाच्या देठास पुष्पवृंत असे म्हणतात. फुल साधारणे चार प्रकारच्या अवयवांपासून बनलेले असते. सर्वात बाहेरचा हिरव्या अवयवांचा गट म्हणजे निदलांचे निदलपुंज व त्या नंतर आकर्षक रगांचे दलांचे दलपुंज अंसतात. त्या नतंरचा अवयव पुंकेसर ज्याच्या गटास पुमंग म्हणतात, जे नर लैंगिक अवयवाचे प्रतिनिधित्व करतात फुलाचा मध्यभाग हा मादी लैगिक गट जायांग या अवयवाने व्यापलेले असतो. ज्याचा अडंप हा घटक असतो. जायांग आणि पुमंग ह्यांच्या अस्तित्वानुसार फूल नर, मादी किंवा उभयलिंगी असू शकते. पुकेसरांच्या परागकोषिकामध्ये परागकण तयार होतात. नंतर परिपक्व परागकरण हे अडेपाच्या कुक्षिवर वाहून नेल्या जातात. या प्रक्रियेला परागीकरण असे म्हणतात. कुक्षि परागकणांना नैसर्गिकरित्या अकुंरीत होण्यासाठी लागणारी परिस्थिति उपलब्ध करून देते.
             विविध जैविक व अजैविक घटकांच्या माध्यमातून परागकण कुक्षिवर वाहून नेले जातात. जैविक घटकांमध्ये मधमाश्या, किटक, पक्षी, वटवाघूळ, मुंग्या, पशू इत्यादींचा अंतर्भाव होतो आणि अजैविक घटक हवी आणि पाणी आहेत.
          परागीकरणाची प्रक्रिया अतिशय मूलभूत असून फळे व बीजधारणे करीता महत्त्वाची आहे. त्याच प्रमाणे जैवविविधतेचे संवर्धन होण्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. उत्क्रांतीमध्ये परागीकरण करणारे घटक आणि वनस्पतींची सहउत्क्रांती झालेली आहे. काही वनस्पतींमध्ये फक्त सजीव घटकांची परागीकरण करण्याकरीता नितांत आवश्यकता असते, त्यांच्या अभावी वनस्पती नष्ट होऊ शकतात. यशस्वी परागीकरण जर झाले नाही तर वनस्पतीच्या पुनरूत्पादनाची प्रक्रिया पूर्णपणे थांबेल. म्हणून, वनस्पती वे त्यांचे परागीकरण करणाच्या घटकांचे सुद्धा संवर्धन होणे आवश्यक आहे. परागीकरणाची प्रक्रिया कोणत्याही कारणाने अयशस्वी झाली तर बीजधारणा होण्याची प्रक्रिया थांबेल.

16.

लैंगिक पुनरूत्पादनामध्ये सहभागी होणा-या फुलाच्या विविध अवयवांमध्ये खालीलपैकी काय दुर्लक्षित करता येणार नाही ?

17.

परागीकरणानंतर फुलाचा कोणता अवयव परागकण अंकुरित करण्याचे कार्य करतो ?

18.

जेव्हा मधमाशी एका फुलानंतर दुस-या फुलास भेट देते, तेव्हा कोणती प्रक्रिया होते ?

19.

लैंगिक पुनरुत्पादन तेव्हाच यशस्वी झाले असे म्हणता येईल, जेव्हा

20.

उत्क्रांती दरम्यान वनस्पतीची व परागीकरण करणाच्या घटकांची उत्क्रांती 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१८ - Paper 2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.