राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१८ - Paper 2

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१८ - Paper 2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
61.

102 सेमी, 136 सेमी, 153 सेमी व 289 सेमी लांबी असलेल्या चार कांबी आहेत. सगळया कांबींचे समान कमाल लांबीचे तुकडे केले. सर्व कांबीच्या एकूण तुकड्यांची संख्या दर्शविणारा पर्याय निवडा. 

62.

2, 3, 5, 6, 7 आणि 9 या अंकापासून 5 ने भाग जाणारी आणि कोणताही अंक पुन्हा न येता, अशा तीन अंकी किती संख्या तयार होवू शकतील ?

63.

A व B या दोन राशीतील संबंधाचे वर्णन करणारा उचित पर्याय निवडा.

लालू आणि जॉन हे रस्ता शर्यतीच्या स्पर्धेत धावत आहेत. लालू 2 तासात 3/4 शर्यत पूर्ण करतो. लालूला 9/10 शर्यत पूर्ण करायला लागणाच्या वेळेच्या 5/8 वेळेत जॉन 2/3 शर्यत पूर्ण करतो. 

 राशी A                  राशी A              

लालूचा वेग             जॉनचा वेग 

64.

सविता आणि कविता यांच्या आजच्या वया चे गुणोत्तर 3 : 4 आहे. 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4: 5 होईल, तर सविता आणि कविता यांची आजची वये काढा. 

65.


आकृति B आकृति A व B ही चौरस क्षेत्रे आहेत. A चौरसाची बाजू 8 सेमी लांब आहे, तर B चौरसाचा कर्ण 8 सेमी लांबीचा आहे. या दोन क्षेत्रफळातील फरक किती ?

66.

एका रांगेमध्ये 'A' डाव्या बाजूने 11 व्या स्थानावर आहे आणि 'B' उजव्या बाजूने 10 व्या स्थानावर आहे. जर 'A' आणि 'B' यांच्या जागांची अदलाबदल केली तर 'A' डाव्या बाजूने 18 व्या स्थानावर येतो. तर या रांगेमध्ये 'A' आणि 'B' खेरीज किती व्यक्ती असतील.

67.

रीना ने व्याजाच्या दराइतक्या वर्षासाठी सरळ व्याजाने ₹ 1200 कर्ज घेतले जर तिने कर्ज फेडताना ₹ 432 व्याज दिले तर व्याजाचा दर किती होता ?

68.

जर a 60% b आहे, b 40% c आहे, c 20% d आहे, तर 6d हे 208 च्या किती टक्के आहे ?

69.

राम आणि श्याम हॉकी व व्हॉलीबाल मध्ये चांगले आहेत. सचिन व राम हॉकी माणि बेसबाल मध्ये चांगले आहेत. गौरव आणि श्याम, व्हॉलीबाल व क्रिकेट मध्ये चांगले आहेत, सचिन, गौरव आणि सागर, बेसबाल व फुटबॉल मध्ये चांगले आहेत. तर बेसबाल, क्रिकेट, व्हॉलीबाल आणि फुटबॉल या सर्वांमध्ये चांगला कोण आहे ? 

70.

एका सांकेतिक भाषेत “KAMAL" is 1626142615' असेल तर 'NO' साठी कोणता संकेत राहील ?

71.

जर A $ B चा अर्थ A हे B चे वडील आहेत; A # B चा अर्थ A ही B ची बहीण आहे; A * B चा अर्थ A ही B ची मुलगी आहे; आणि A @. B चा अर्थ A हा B चा भाऊ आहे, तर R, T व M ही भावंडे आहेत हे दर्शवणारी नातेसाखळी निवड़ा ? 

72.

X या पारदर्शक कागदाची घडी दाखवणारा पर्याय निवडा.

73.

दिलेल्या पर्यायी आकृत्यातून अशी आकृती निवडा कि ज्या आकृतीमुळे आकृती (X) पूर्ण होईल.

74.

दिलेल्या चौरसात प्रश्न चिन्हाच्या जागी कोणता पर्याय येईल ? 

75.

खाली दोन विधाने आणि त्यावरून काढलेले निष्कर्ष दिलेले आहेत. निष्कर्षाबाबतचा योग्य पर्याय निवडा.

विधान : 

I. काही झाडे फांद्या आहेत.

II. सर्व फांद्या टोप्या आहेत.

विधान ।।

A. काही झाडे टोप्या आहेत.

B. काही टोप्या झाडे आहेत.

C. सर्व टोप्या फांद्या आहेत. 

D. सर्व फांद्या टोप्या आहेत.

पर्यायी उत्तरे ; 

76.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे परीक्षण करताना एका गृह वसाहतीतील इमारतीवर तुम्हाला ITI चा भक्कम नामफलक आढळला. या केंद्राने संपूर्ण जागा व्यापली आहे असे हा फलक सुचवत होता. कोप-यातल्या एक खोली असलेल्या जागेतून संस्था चालवली जात आहे हे संस्थेत तुम्हाला पाऊल ठेवताच आढळले. जेव्हा कचेरी आणि विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव घ्यायला साहाय्य देण्यासाठी अनिवार्य असलेल्या प्रयोगशाळेबाबत विचारणा केली, तेव्हा प्रभारी व्यक्तीने संस्थेची प्रयोगशाळा असल्याचा दावा करून तुम्हाला तळमजल्यावरील स्कूटर दुरुस्ती गॅरेजमध्ये नेले. या व्यक्तीने तुम्हाला आदर्श ITI साठी आवश्यक असणाच्या प्रशस्त सुविधांची सर्व प्रमाणपत्रे दाखवली. तुम्ही;

77.

तुम्ही विविध कामांसाठी माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान वापरण्याचे निर्णय घेण्यासाठी जबाबदार असणा-या विभागाचे प्रमुख आहात. जरी तुमच्या हाताखालील बहुसंख्य लोक चलाख फोन्सचा (smartphones) वापर करत असले तरी ते जनतेचे सेवक म्हणून त्यांच्या अडीअडचणींचा परिचय होण्यासाठी त्यांच्या संपर्कात असणे आवश्यक आहे या बहाण्याखाली सामान्य नागरिकांना ऑनलाइन सेवा पुरवण्याच्या विरोधात आहेत. तुम्ही याच्याशी संबंधित त्यांच्या पळवाटांशी परिचित आहात. पण तरीही तुम्ही भ्रष्टाचार कमी करण्यासाठी, त्यांची शक्ती व पैसे वाचवण्यासाठी अणि लोकांना विविध स्वरूपाच्या छळापासून मुक्त करण्यासाठी जनतेला ऑनलाइन सेवा देण्याचा निर्धार केलेला आहे. तुम्ही.

78.

क्षणाचाही वेळ न लागता दंगली उसळणाच्या भागात व सुव्यवस्था प्रस्थापित करण्याची कामगिरी तुमच्यावर आहे.
या भागात रहाणाच्या एकाच धर्माच्या दोन पंथांत धार्मिक वास्तूच्या मालकीसंबंधाने वाद आहे. त्यापैकी मोठ्या संख्येने असलेले एका गटाचे सदस्य खूपच आक्रमक असून ते दुसच्या अल्पसंख्येने असलेल्या गटावर दादगिरी करू पाहतात. सकाळीच दादागटाने त्या जागेवर जबरदस्तीने मालकी मिळवली आणि याच्या परिणामी तेथील परिस्थिती गंभीर बनली. संख्येने अल्प असलेल्या गटाने या गटाविरोधात तक्रार नोंदवली. गुंतागुंत टाळून शांतता प्रस्थापित करण्यासाठी तुम्ही पोलिस अधिका-याला या गटाच्या नेत्याला अटक करण्याचा आदेश दिला. पोलीस पथक या नेत्याला बनावट चकमकीत ठार मारण्याचा प्रयत्न करत आहे, अशी त्या गटाच्या सदस्यांची समजूत झाली. सायंकाळी लाठ्या व पलिते घेतलेला मोठा जमाव ठाण्यावर हल्ला करून नेत्याची सुटका करण्यासाठी चाल करून येत आहे. तुम्ही;

79.

तुम्ही शहराच्या प्रदूषण नियंत्रणावर देखरेख करणा-या विभागाचे प्रमुख आहात. ‘ग्लोबल (जागतिक) हवा 2017 अहवाल वाचतांना तुमच्या लक्षात आले की भारतातील ओझोनशी संबंधित बालमृत्युंत वाढ होते आहे. तुम्ही,

80.

तुमच्या कचेरीत तुम्ही सर्वात उच्च पदावर आहात. तुमच्या हाताखालील दोन व्यक्तींना वेगवेगळ्या प्रसंगी कचेरीत येत असताना अपघात होऊन त्यांना किरकोळ दुखापतींचा त्रास झाला. भविष्यात अशा प्रकारच्या दुर्दैवी अनुभवांना टाळण्यासाठी त्यांच्या संघटनेचा नेता तुमच्याकडे एका प्रसिद्ध वास्तु तज्ञाचा सल्ला घेऊन कचेरीच्या परिसरात योग्य ते बदल करून घेण्याची विनंती करत आहे. या क्षेत्राच्या जलवायूमानाची (हवामानासंबंधीची) व भौगोलिक परिस्थितीची काळजी घेणा-या वास्तुविद्याविशारदने (आर्किटेक्ट) हे माणूसस्नेही व पर्यावरण संवेदनशील परिसर रचले आहे.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१८ - Paper 2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.