राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१४ GS-1

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१४ GS-1 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.

पुढील दोन विधानांपैकी कोणते बरोबर आहे ?

भारत जेंव्हा ऑगस्ट 1947 मध्ये स्वतंत्र झाला तेव्हा त्याच्या समोर मोठी संकटे होती.

(a) फाळणीमुळे पाकिस्तानातून भारतात आलेल्या 80 लाख आश्रितांकरता निवास व उदरनिर्वाह साधन शोधणे.

(b) दुसरे मोठे संकट होते भारतातील स्वतंत्र राज्ये; जवळपास 50 एव्हढ्या संख्येत, जी महाराजा वा नवाबाच्या अधिपत्याखाली होती - त्यांना भारतात विलीन होण्यास राजी करणे.

पर्यायी उत्तरे :

42.

कराची येथील काँग्रेसच्या सभेत :
(a) मूलभूत हक्कांबाबतचा महत्वाचा ठराव मंजूर केला गेला.

(b) काही उद्योगांचे राष्ट्रीयकरण करावे यास पसंती दिली गेली.

वरील दोन विधानांपैकी कोणते अयोग्य आहे ?

43.

'उगवती पिढी केवळ निवेदने इत्यादींनी समाधानी होणार नाही .... दहशतवाद संपविण्याचा एकच मार्ग मला दिसतो आहे व तो म्हणजे सत्याग्रह' असे 25 फेब्रुवारी 1919 रोजी गांधीजींनी पत्राद्वारे कोणाला कळविले ?

44.

माँटेग्यू-चेम्सफर्ड सुधारणा जाहीर झाल्यावर लोकमान्य टिळकांनी केसरीत कोणता लेख लिहीला?

45.

भारतीय राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष व्योमेशचंद्र बॅनर्जी यांनी राष्ट्रीय सभेची पुढीलपैकी कोणती उद्दिष्टे सांगितली ?

(a) भारतात सुधारणा घडवून आणणे.

(b) राष्ट्रीय भावनेचा विकास करणे.

(c) देशाला स्वातंत्र्य मिळवुन देणे.

(d) भारतीयांच्यात ऐक्याचा विकास करणे.

पर्यायी उत्तरे :

46.

असहकार चळवळ मागे घेतल्यानंतर काँग्रेस दोन भागात विभागली गेली.

(a) एक गट ज्यात वल्लभभाई पटेल, सी. राजगोपालाचारी आणि राजेन्द्रप्रसाद अग्रगणी होते असे समजत होता की काँग्रेसने निवडणुकीत भाग घ्यावा व विधीमंडळात आतून हल्ला चढवावा.

(b) ज्या गटाचे पुढारी सी.आर. दास, मोतीलाल नेहरु व विठ्ठलभाई पटेल होते तो गट निवडणुकीच्या विरोधात होता.

(c) काँग्रेसच्या 1922 च्या पटना येथील सभेत, ज्या सभेचे अध्यक्षपद सी.आर. दास यांच्याकडे होते, निवडणुकीचा प्रस्ताव अमान्य करण्यात आला.
वरील तीन पैकी कोणते विधान बरोबर आहे? पर्यायी उत्तरे :

47.

सतीप्रथा बंद करण्यासाठी 18 जून 1823 ला एक विनंती अर्ज ब्रिटिश पार्लमेंटकडे पाठविला होता. त्या अर्जावर भारतीय लोकांच्या वतीने पुढीलपैकी कोणी स्वाक्षरया केल्या होत्या ?

48.

भारत स्वतंत्र झाल्यावर मोठ्या कारखान्यांच्या उभारणीवर व मोठ्या धरणांच्या बांधकामावर अधिक लक्ष केंद्रित केले गेले. महात्मा गांधींच्या शिष्या मीरा बेन यांच्या मते मात्र आपण त्याऐवजी अधिक भर कशावर द्यावयास हवा होता?

(a) कृषी क्षेत्रावर

(b) प्राथमिक शिक्षणावर

(c) नैसर्गिक संतुलन राखण्यावर

पर्यायी उत्तरे :

49.

मॉर्ले मिंटो सुधारणांचे श्रेय मॉर्ले यांना नसून मिंटोनाच आहे. असे लेडी पिंटो यांचे म्हणणे होते. परंतु मॉर्ले व्यापक सुधारणा करू इच्छित होते म्हणून त्यांचेही महत्त्व होते. मॉर्ले यांच्या पत्र व्यवहारातील पुढीलपैकी कोणत्या सूचनांवरून हे स्पष्ट होते ?

(a) लोकांसाठी सुधारणा करण्याच्या दिशेने आपण पावले उचलावीत.

(b) आपण सुधारणा केल्या नाहीत तर मागण्या वाढतील व त्यांना राष्ट्रीय स्वरूप प्राप्त होईल.

(c) सुधारणांची सुरुवात तळापासून करावी.

(d) जिल्हा लोकल बोर्ड आणि नगरपालिकात अधिक प्रमाणात भारतीय प्रतिनिधी नेमावेत व त्यांना जास्त अधिकार मिळतील असे करावे.

पर्यायी उत्तरे :

50.

बॉम्बे प्रेसिडेन्सी अॅसोसिएशन संस्था स्थापन करण्यास पुढीलपैकी कोणत्या नेत्यांनी योगदान दिले?
(a) फिरोजशाह मेहता

(b) बाळशास्त्री जांभेकर

(c) भाऊ महाजन

(d) बद्रुद्दीन तैयबजी

पर्यायी उत्तरे :

51.

इ.स. 1875 च्या शेतक-याच्या उठावाला 'दख्खनचे दंगे' म्हणतात ते पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात पसरले होते ?

(a) पूणे

(b) नाशिक

(c) अहमदनगर

(d) कोल्हापूर

पर्यायी उत्तरे :

52.

आपल्या संविधानाचा क्रांतीकारी भाग म्हणजे सर्व प्रौढांना मताचा अधिकार, वयाचे 21 वर्ष पूर्ण झालेल्या प्रत्येक भारतीयाला मताधिकार बहाल करण्यात आला !

युनायटेड किंगडम व युनायटेड स्टेटस् सारख्या इतर देशात हा अधिकार टप्या-टप्याने बहाल करण्यात आला.

(a) प्रथम जंगम मालमत्ता असणा-यांनाच मताचा अधिकार होता.

(b) शिक्षित पुरुषांना नंतर या यादीत समाविष्ट केले गेले.

(c) कष्टकरी पुरुषांना हा अधिकार प्रलंबित लढ्यानंतर प्राप्त झाला.

(d) महिलांना मताचा अधिकार युनायटेड किंगडम व युनायटेड स्टेटस् मध्ये अंतिमत्तः एका चिवट व कडव्या लढ्यानंतर प्राप्त झाला.

वरील चार पैकी कोणते/कोणती विधान/विधाने अयोग्य आहे/आहेत ?

53.

(A) आणि (B) विधाने वाचून उत्तराचा योग्य पर्याय निवडा.
(A) भाऊराव पाटील यांना जैन वसतिगृह सोडावे लागले.

(B) ते कोल्हापुर येथील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या वसतिगृहाच्या उद्घाटन प्रसंगाला उपस्थित राहिले होते.
पर्यायी उत्तरे :

54.

 खालील विधानांपैकी कोणते सर सय्यद अहमद खान बाबत खरे नाही ?

55.

सन 1956 मध्ये भाषेच्या निकषावर भारतातील राज्ये पुनर्घटीत केली गेली. आपण दक्षिणेवर हिंदी लादली नाही व क्षेत्रीय भाषांना विकसित होण्यास मुभा दिली. परंतु,
(a) पाकिस्तानने पूर्व पाकिस्तानवर उर्दू लादली.
(b) श्रीलंकेने उत्तर श्रीलंकेवर सिन्हाला लादली.
(c) जवाहरलाल नेहरु व सरदार पटेल यांना अशी भीती होती की भाषावार राज्यांची पुनर्रचना भारताच्या ऐक्याला धोका आहे?
वरील तीन पैकी कोणते विधान अयोग्य आहे ?

56.

पुढे दिलेल्या पुढा-यांच्या त्यांच्या सांकेतिक नावाबरोबर जोड्या जुळवा. 

57.

1915 मध्ये दक्षिण आफ्रिकेहून परत आल्यावर ‘गांधी म्हणजे स्थानिक प्रश्न हाती घेऊन त्याबद्दल ठोस पाऊले उचलणारा' अशी त्यांची ख्याती पसरली होती. पुढीलपैकी कोणते प्रश्न त्यांनी यशस्वीपणे हाताळले?

(a) फक्त चंपारण निळीच्या शेतक-यांचे प्रश्न

(b) फक्त अहमदाबाद मधील कापड गिरण्यांच्या कामगारांचे प्रश्न

(c) फक्त बार्डोली शेतक-यांचे प्रश्न

पर्यायी उत्तरे :

58.

भारत प्रजासत्ताक झाल्यानंतर भाषेच्या आधारावर राज्यांची निर्मिती करण्यास्तव सर्वत्र आंदोलने झाली. सर्वप्रथम सर्वात तीव्र आंदोलने मात्र केली गेली :

59.

चौदा जणांच्या पहिल्या नेहरु मंत्रीमंडळात पाच जण काँग्रेसचे नव्हते. हे पाच जण कोण ?

60.

खान अब्दुल गफ्फार खान ज्यांना बादशहा खान असेही म्हंटले जाई, बाबत काय खरे नाही ?

(a) ते नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रॉव्हिन्सचे पश्तून लीडर होते.

(b) ते खुदाई खिदमतग्रस् चे संस्थापक होते.

(c) त्यांनी भारताच्या फाळणीबाबत काँग्रेसला दोष दिला.

पर्यायी उत्तरे :

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१४ GS-1 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.