ASO 2012 - Main Paper 1

ASO 2012 - Main Paper 1 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
101.

घर फिरले म्हणजे घराचे वासेही फिरतात. ही म्हण इथे उपयुक्त आहे.

102.

'काम न करता परत येणे' या अर्थाचा वाक्प्रचार कोणता ?

103.

कृष्णाचे वडील आजारी पडले, त्यातच 

त्याच्या आईचा पाय मोडला म्हणतात ना!

104.

जीवाचे रान करणे' समानार्थी वाक्प्रचार सांगा.

105.

नाविक शब्दाचा विग्रह करा

106.

'नाकी नऊ येणे' या वाक्प्रचाराचा योग्य उपयोगासाठी खालील पर्यायातून अचूक वाक्य लिहा.

107.

कोणत्याही क्षेत्रात हळूहळू होणारा बदल म्हणजे.

108.

ज्या माणसांजवळ विद्वता बेताचीच असते तो खूप बढाया मारताना आढळतो.पण ज्याच्याजवळ सखोल ज्ञान असते
तो शांत असतो.   

यासाठी योग्य अर्थाची म्हण सांगा.

109.

शेवटी ती वेल वाळून गेली. हे उदाहरण __________  प्रयोगाचे आहे.

110.

‘क्षुद्र माणसे क्षुद्र वस्तूंना भाळतात’ या वाक्यासाठी योग्य अर्थाची म्हण लिहा

Q.No.111 ते 115: 

‘संस्कृति' म्हणजे त्या त्या देशाची, त्या मानव समूहाची, समाजपुरुषाची खरी “संपन्नता' होय. हर एक देशांत एक ‘सद्गुणसमूह' असतो. तो ‘सद्गुण-समूह' च त्या देशाची संस्कृति' बनवीत असतो. त्या संस्कृती प्रमाणे त्या त्या देशवासीयांची जडण-घडण होऊन तीच त्यांची अस्मिता' जागृत राहते, अर्थात् त्यारूपाने ‘स्वदेशाभिमान जागृत राहात असतो. यांतील भाव असा की, सत्संस्कारमूलक-चांगल्यासंस्कारपूर्वक ज्या ज्या ‘सत्कृति' चांगल्या कृति, सात्त्विक कृति झाल्या, त्या त्या सत्-कृतीवद्दल त्या त्या आजूबाजूच्या मानवसमाजाच्या मनीं - मानसीं आदरभाव निर्माण होतो. त्यांतूनच हळूहळू विशिष्ट अशी संस्कृति' बनत असते. किंबहुना ! ती संस्कृति' हेच त्या देशाचे भूषण-स्थान' होय. केवळ उत्तुंग इमारतींचे, रमणीय उपवनांचे महावनांचे, सुशीतल मोठ्या जलाशयाचे वा विस्तीर्ण अशा भूभागाचे ‘रक्षण म्हणजे ‘स्वदेशरक्षण', असे मुळीच नव्हे; तर उपर्युक्त स्वरूपाच्या संस्कृती' चे रक्षण म्हणजे खरे व उचित देशाचे रक्षण होय; समाजपुरुषाचे, लोकसंस्थेचे रक्षण होय. किंबहुना ! आपल्या संस्कृतीच्या, मानवी-अस्मितेच्या, मानवी ‘जीवनमूल्यांच्या रक्षणार्थच देशाचे व देशांतील इतर निसर्गदत्त व स्वोपार्जित सर्वपदार्थांचे, भोगसमृद्धीचे रक्षण करावे लागते, म्हणजेच मानव समाजांत सद्गुण समूह, जीवनमूल्ये हीं नांदतात आणि त्यामुळे मानवाचे-मानव समूहाचे जीवन बेरंग, बेचैन आणि दुखरे बनत नाहीं.

111.

संस्कृती म्हणजे

112.

देशरक्षण म्हणजे

113.

लेखकाच्या मतानुसार अस्मिता म्हणजे

114.

मानवाचे जीवन दुखरे, बेरंग, बेचैन कशामुळे बनते ?

115.

सदर उताच्यास योग्य शीर्षक द्या

पुढील उत्तारा वाचून त्या खालील प्रश्न क्र. 116 ते 120 ची उत्तरे लिहा :

या देशाचे प्राचीन संस्कृत नांव आर्यावर्त किंवा भरतखंड असे आहे. परंतु तार्तर देशांतून जे मोंगल मुसलमान लोक जिंकण्याकरिता हिंदुस्थानांत शिरले होते, त्यांस हे लोक काळे असे भासले म्हणून त्यांनी तद्वाचक हिंदु असे नांव त्यास दिलें व त्यामुळे हिंदुस्थान हेही नांव या देशाचे त्यांनीच ठेविले. त्याचाच भावार्थ पुढे काळे लोक काळी पलटण असा झाला.

 

युरोपखंडांत किती एक राज्ये व संस्थाने आहेत; आणि हा एकटा हिंदुस्थान देशच अर्ध्या युरोपखंडाएवढा आहे. म्हणून या देशास एक देश आहे म्हणणे वास्तविक पाहिले तर योग्य नाही. कारण की, हे खरेंच एक मोठे खंड आहे व त्यांत अनेक देश आहेत. एकंदर प्रजा यांत 20 कोटी आहे व विलायतेत सारी दोन कोटी प्रजा आहे. तेणेकरून विलायतेचे दसपट हा देश मोठा आहे. आता विलायतेची वसाहत जरी फार दाट आहे, तरी हिंदुस्थानची लांबीरुंदी 15/16 पट त्यापेक्षा अधिक येईल. या देशांत जिकडे तिकडे ब्राम्हणांचा अधिकार, संस्कृत भाषा व धर्म एकसारखा आहे, इतकेच काय ते ऐक्यतेचे चिन्ह आहे. परंतु तसा युरोपखंडांतही सर्वत्र एकच धर्म चालतो. तथापि देश व राज्ये पृथक मानिली जातात व युरोपांतील लोक मोठे पराक्रमी आहेत. अस्तु. 

हिंदुस्थानचे दक्षिण भागास चार भाषा आहेत. कानडी, मलबारी, तैलंगी आणि द्राविडी. यांपैकी द्राविडीस ‘तामळ' किंवा ‘आरवी' असेही म्हणतात. या चारी भाषा एका पद्धतीच्या आहेत. यांमध्ये व मध्य हिंदुस्थानचे भाषेत एक मोठा भेद असा आहे कीं, मनुष्यजातीखेरीज सर्व पदार्थ नपुंसक लिंगांत जातात. घोडा, घोडी; बैल, गाय यांचा भेद नाहीं. मनुष्याव्यतिरिक्त बाकी जिवांस त्या भाषांत एकच नपुंसक लिंग समजतात. या चार भाषा सोडून मध्य हिंदुस्थानांत किंवा दक्षिणेकडे आले म्हणजे तेथे सहा भाषा एकाच तहेच्या आढळतात. 1 मराठी, 2 गुजराथी, 3 मेवाडी, 4 मारवाडी, 5 कच्छी, व 6 सिंदी. नंतर पूर्वेस फिरलें म्हणजे 1 माळवी, 2 रांगडी, 3 ब्रिज, 4 मुलतानी, 5 काश्मिरी व 6 पंजाबी; आणि याचेही पूर्वेस वळल्यावर 1 हिंदी, 2 बंगाली, 3 उडियी, आणि 4 नेपाळी अशा 4 आहेत. या सर्व पूर्वेच्या भाषा एकसारख्या पद्धतीच्या व एकमेकींस जवळजवळ आहेत. एकूण 20 भाषा झाल्या. आता या सर्व भाषा बोलणारे लोक पाहिले तर वेगळ्या स्वभावाचे व वेगळ्या पोषाकाचे आणि वेगवेगळे रीतिभातीचे आहेत. या वीसही जातींचे लोकांत चांगले लोक ब्रिज भाषा बोलणारे हे आहेत. हे स्वरूपाने, स्वाभाविक गुणाने व शौर्यानेही फार चांगले आहेत व इंग्रजी पलटणींत जे बहुतकरून लोक असतात, ते याच प्रदेशांतील. यांचे मनामध्ये कपट नसून मित्रभाव चांगला असतो व प्रसंगी हे आपले जिवाकडेही पाहावयाचे नाहीत, असे हे खरे क्षत्रिय लोक आहेत.

116.

हिंदुस्थानचे प्राचीन संस्कृत नांव काय आहे ?

117.

हिंदुस्थान देश केवढा आहे ?

118.

हिंदुस्थानची प्रजा किती कोटी आहे ?

119.

विलायतेच्या किती पट हा देश मोठा आहे 

120.

द्राविडी भाषेस काय म्हणतात ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

ASO 2012 - Main Paper 1 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.