ASO 2012 - Main Paper 1

ASO 2012 - Main Paper 1 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :

खालील उता-यातील प्रश्न क्र. 121 ते 125 ची उत्तरे द्या : 

         गांधींसारखे युगप्रवर्तक नेते कुणा महापुरुषाच्या छायेत वाढत नाहीत. स्वत:चे जीवन ते स्वत:च घडवतात. गांधींच्या व्यक्तिमत्त्वावरही कोणतीही पंरपरा व संप्रदाय, धर्मग्रंथ किंवा गुरू यांची एकसुरी छाप दिसत नाही. अनेक ग्रंथ आणि संप्रदाय यांच्यामधून त्यांनी काही विचार, प्रेरणा व तत्त्वे आत्मसात केली आणि त्याप्रमाणे वर्तन करण्याची उमेद बाळगली. मात्र, केवळ एखादे पुस्तक वाचून त्यांनी आपले विचार घडविले असे झाले नाही. लौकिक व्यवहाराच्या कसोटीवर त्यांनी प्रत्येक नवी संकल्पना घासून पाहिली. ते म्हणतात, “जे विचार मी प्रकट केले आहेत ते माझे आहेत आणि माझे नाहीत. ते माझे आहेत कारण की त्याप्रमाणे वर्तन करण्याची मला उमेद आहे, ते जणू माझ्या आत्म्यात घडलेले आहेत. ते माझेच नाहीत, कारण की तसे विचार मीच केले आहेत असे नाही. कित्येक पुस्तके वाचल्यानंतर ते बनले आहेत. मनाच्या आत खोल खोल जे मी पाहत होतो त्याला या पुस्तकांचा आधार मिळाला.''

         असा आधार मिळाल्यामुळेच त्यांनी उत्स्फूर्तपणे स्वीकारलेल्या तत्त्वांवरील त्यांच्या श्रद्धेला बळकटी आली. त्यांचा आत्मविश्वास दुणावला. बालपणापासून गांधींनी सत्य हे जीवनातील सर्वश्रेष्ठ मूल्य म्हणून पत्करले होते. हे सत्य केवळ वाचेतील नसून त्याला विचारांचा आधार होता. ते सापेक्ष होते तसे निरपेक्षही होते. असे निरपेक्ष (स्थलकालातीत) सत्य म्हणजे परमेश्वर सत्याच्या रूपाने नेहमी परमेश्वराचाच साक्षात्कार होतो अशी त्यांची श्रद्धा होती. सत्यावरील निष्ठा हा त्यांच्या जीवनाचा मुख्य आधार होता. प्रत्येक माणसाच्या हृदयात परमेश्वराचे वास्तव असल्याने स्वत:च्या हृदयातच त्याला सत्याची प्रचीती येते. कितीही हालअपेष्टा सोसाव्या लागल्या, कितीही किंमत मोजावी लागली तरी स्वत:ला प्रतीत झालेल्या या सत्याला धरून आचारण करणे ही नीती होय. प्रत्येक माणसाच्या या नैतिक कर्तव्यालाच धर्म असे नाव आहे. स्वत:ला पटलेली ही नीतितत्त्वे जीवनाच्या सर्व क्षेत्रांत उतरविण्यासाठी गांधी जन्मभर अविश्रांत धडपडले. म्हणूनच आपल्या आत्मचरित्राला त्यांनी ‘सत्याचे प्रयोग' असे नाव दिले आहे.

121.

महात्मा गांधींचे व्यक्तिमत्त्व घडले ते

122.

महात्मा गाधींना ___________ म्हटले आहे.

123.

अयोग्य विधान निवडा.

124.

गांधींजींचे विचार हे त्यांचे आहेत आणि त्यांचे नाहीत' म्हणजे

125.

या उता-याला योग्य शीर्षक द्या. 

खालील उत्तारा वाचून प्रश्न क्र. 126 ते 130 या प्रश्नांची उत्तरे द्या. 

श्रीमंताचा व गरीबाचा या जगांत दूरचा संबंध आहे. तरी परलोकामध्ये फार जवळचा संबंध आहे. याकरितां दया हा आपला एकामेकांचा प्रथम धर्म आहे. सर्व धर्माचे सार दया आहे. गरीब हा श्रीमंताचे जुलमाने होतो. कांहीं जन्मत: कोणी गरीब नसतो. याकरितां सर्वांवर दया करावी. हा उत्तम मार्ग. सर्वदा न्याय दयेच्या अनुसंगाने करावा. आणि असे मनांत वागवावें कीं, आम्हीं मरणानंतर ईश्वरापाशीं दया मागू. त्याचे दयेवांचून आमचा परिणाम लागणार नाही. म्हणून जर आपण दुस-यापाशी दया मागण्यास सिद्ध आहों तर तसेच आपण करून दाखविले पाहिजे. तरच आपले मागणे पसंत होईल. सर्व जीवजंतु ज्ञात अज्ञात हे दयेस पात्र आहेत. परंतु हिंदू धर्मात यज्ञादिक निर्दय कर्मे आहेत, तीं ईश्वरापासून झाली असतील, असे मला वाटत नाहीं. दुस-या जनावरांवर आपलें पाप ठेवून त्याजला मारावे. म्हणजे त्याचे दु:खानें आपलें पाप जाईल ही गोष्ट विचारास विरुद्ध आहे. परंतु याप्रमाणे चाल बहुत दिवसांपासून आहे. ज्या काळीं ईश्वराने माणसे निर्माण केली, त्या काळीं तीं अमक्याच कारणाकरिता केली, असे पक्के समजत नाही. परंतु अमुक रीतीने चालावे व अमुक रीतीने न चालावे हे ईश्वराने प्रत्येक माणसाचे बुद्धीत पेरिलें आहे, हे खचित आहे. ईश्वराने आपली बढाई वाढवावी म्हणून माणसे केली, असे नाहीं. ईश्वरास माणसाच्या कीर्तनाने अधिक थोरपणा येतो, हे मिथ्या आहे. तथापि मनुष्यांनी जो आपला निर्माणकर्ता असेल त्याची सेवा करावी हाच धर्म योग्य आहे. व नीतीने वागावे म्हणजे सुख होते. परंतु यज्ञ करण्यास सांगितले असेल, असे वाटत नाहीं. यज्ञ करणे हे अनुचित व अविचारी कर्म आहे. हे बहुधा मनुष्यांनीं योजिले असावे. प्रथम मला वाटते ईश्वराने इतकाच धर्म लावून दिला असेल की, त्यांनी चांगली वर्तणूक करावी, आणि ईश्वरावर भार ठेवून वागावें. एवढाच धर्म होता. हे अशावरून वाटते की, इतर धर्म सर्व माणसांस लागू पडत नाहींत. जर इंग्रजांचा धर्म खरा म्हणावा तर आलीकडे उत्पन्न झाला. तेव्हा त्याचे मागें ते ज्या देशांत तो धर्म माहित पडला नाही, त्या देशांतील माणसे नर्कात गेली की काय ? हे बरोबर नाहीं. तशीच मुसलमानाचे धर्माची अवस्था आहे. ईश्वरप्रेरित धर्म सर्वास सारखा कळावा. जशी त्याणे लोकांस खाण्यापिण्याची सोय करून दिली, तद्वत धर्माचीही तयारी केली असेल, व जर जनावरांचे यज्ञ हा धर्म म्हणावा, तर त्याविषयीही ऐक्यता होणार नाहीं. व जनावरे वेगळा प्रत्येक देशांत आहेत. तेव्हा त्यांपैकी कोणत्या जनावराच्या रक्ताने ईश्वर संतुष्ट होतो तेंही बरोबर कळत नाहीं.

126.

सर्व धर्माचे सार काय आहे ?

127.

सर्व जीवजंतू ज्ञात अज्ञात कशास पात्र आहेत ?

128.

ईश्वरास माणसाच्या कीर्तनाने अधिक थोरपणा येतो, हे मत कसे आहे ?

129.

योग्य धर्म कोणता ?

130.

उता-यास योग्य शीर्षक द्या.

131.

Fill in the blank choosing the correct alternative :

Newton __________ that the force of gravitation makes apples fall.

132.

From the following group of words choose the mis-spelt word(s).

a. transendent 

b. tyranny 

c. tendancy 

d. privilege

133.

He is so old that he cannot walk.

Which of the following option is correctly converted from the above complex sentence 

into a simple sentence ?

134.

Give a single word for 

'a school for infants and young children'. 

135.

Choose the correct article from the following alternatives and fill in the blank. 

__________ lion is the king of animals.

136.

Choose the correct word to complete the following sentence meaningfully. 

The play _____ at eight O'clock.

137.

Choose the correct option and fill in the blank : 

A person who is a hundred or more years old is called __________ .

138.

Choose a word to complete the following sentence meaningfully.

His English is almost __________ . 

139.

Fill in the blank with the correct option: 

People who watch a match or a show are called _________ .

140.

Choose the correct meaning of the idiom underlined in the following sentence.

The trade union's seemingly rightful demand is only a stalking horse to blackmail the management.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

ASO 2012 - Main Paper 1 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.