AMVI Pre 2017

AMVI Pre 2017 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
61.

प्रतिपादन व त्यापुढील युक्तिवाद अभ्यासा. प्रतिपादनाला तर्कसंगत व कायदेशीररित्या पाठबळ देणारा/रे युक्तिवाद निवडा.

प्रतिपादन :

गर्भलिंग निदान विरोधी कायद्याची कठोर अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.

युक्तिवाद :

(a) "एखाद्याला बहीण, सून व पत्नी कोठून मिळेल?''

(b) गर्भ विकृत असल्याखेरीज कोणाही स्त्रीला गर्भपाताची परवानगी दिली जाऊ नये.

(c) शासनाच्या आरोग्य सेवामार्फत प्रत्येक स्त्रीला सुरक्षित गर्भपात सुविधा मिळणे हा तिचा हक्क आहे.

(d) गर्भपात हा स्त्रीचा हक्क असायला हवा.

पर्यायी उत्तरे :

62.

b व a या दोन गावांना जोडणाच्या रस्त्याच्या नकाशाचा अभ्यास करा आणि b ते a पर्यंत, कोणत्याही चौकातून पुन्हा न येता वाहतुकीसाठी उपलब्ध सर्व शक्य मार्ग दर्शवणारा पर्याय निवडा :

63.

विसंगत घटक निवडा :

64.

जेव्हा लालX आहे, हिरवा Y आहे. जेव्हा हिरवा Y नाही, निळा Z आहे. पण जोवर लालX असेल निळा Z असणार नाही. ही सर्व माहिती सत्य आहे तर पुढीलपैकी सत्य विधान निवडा.

65.

 नाझीर, जो सोळा वर्षांचा आहे, तो वयाने त्याच्या बहिणीच्या चार पट मोठा आहे. नाझीर त्याच्या बहिणीच्या वयाच्या दुप्पट मोठा असेल तेव्हाचे त्याचे वय दर्शवणारा पर्याय निवडा.

66.

तीन पिढ्यांच्या संयुक्त कुटुंबाची माहिती अभ्यासा.
A, B, C, D, E व F हे सदस्य व दोन जोडपी असून प्रत्येक सदस्य केळे, चिकू, अननस, द्राक्षे, पेरू व संत्रे यापैकी विशिष्ट फळाला विशेष पसंती देतो. एकही पुरुष सदस्य केळे वा पेरू विशेष पसंत करत नाही. D, जो E चा जावई आहे, त्याला द्राक्षे सर्वात जास्त आवडतात. B, चे F हे भावंड आहे आणि तो C चा मुलगा आहे, तो संत्रे विशेष पसंत करतो. F हे A चे नातवंड आहे आणि त्याला केळे आवडते. A, व्यक्तिला पेरू विशेष पसंत असून तिची जोडीदार व्यक्ती चिकू विशेष पसंत करते. पुढील संचातील या माहितीच्या संदर्भात सत्य नसलेली विधाने निवडा.

विधाने : 

(a) C च्या फळाची पसंती निश्चित करण्याच्या दृष्टीने माहिती पुरेशी नाही.

(b) C ही A-E यांची मुलगी आहे.

(c) D हे F चे वडील आहेत पण F ही व्यक्ती B ची बहीण नाही.

पर्यायी उत्तरे :

67.

रिकाम्या जागेसाठी तर्कसंगत शब्द वा वाक्प्रदाय निवडा.
वारंवार पाणी दिले नाही व काळजीपूर्वक देखरेख नसली तरी कोरफड सहज _______; त्यामुळे कामात व्यग्र असणा-या परंतु बागकामात रस असणान्यांसाठी कोरफड ही कदाचित उत्तम निवड ठरते.
शब्द :
(a) सुलभतेने

(b) खाते

(c) गिळते

(d) फोफावते

(e) प्रगत होते

पर्यायी उत्तरे :

68.

कोणती आकृती प्रश्नचिन्हाऐवजी ठेवता येईल?

69.

खालील माहिती काळजीपूर्वक वाचून विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर द्या.
पाच डॉक्टर A, B, C, D आणि E, चार इंजिनीअर्स G, H, K आणि L आणि सहा शिक्षक M, N, 0, P, Q आणि R मधून काही संघ तयार केले. यापैकी A, B,G, H, 0, P आणिQ ह्या महिला आहेत आणि उर्वरित पुरुष आहेत. संघ बनविताना खालील अटी आहेत :

(a) ज्यात पुरुष डॉक्टर असेल, त्यात महिला शिक्षिका नसेल

(b) ज्यात पुरुष इंजिनीअर असेल, त्यात महिला डॉक्टर नसेल

(c) कोणत्याही संघात दोन पुरुष शिक्षकांपेक्षा, अधिक शिक्षक असता कामा नये

जर संघामधे दोन डॉक्टर, तीन स्त्री शिक्षिका आणि दोन इंजिनीअर असतील तर संघातील सदस्य पुढीलप्रमाणे असतील :

70.

पुढील माहिती अभ्यासा आणि save more money” साठी सर्वात उचित संकेत निश्चित करा.

"time and money” चा संकेत “tis nim jes" आहे. "manage money judiciously” चा संकेत "lopxer nim” आहे. "save more time” चा संकेत “jes kib dob” आहे. "save enough judiciously” चा संकेत "xer kib hix" आहे.

71.

नोमने त्याच्या मूळ स्थानाला भेट देण्यासाठी 2130 कि.मी. प्रवास केला. एकूण प्रवासापैकी एक तृतियांश अंतर त्याने विमानाने कापले. त्याने केलेला रेल्वेचा प्रवास त्याने बसने केलेल्या प्रवासाच्या तीन पंचमांश आहे. त्याच्या भेटीच्या दरम्यान त्याने बसने कापलेले अंतर निवडा.

72.

सोबत दिलेल्या 8 एकसारख्या जाड कागदाच्या चौरस तुकड्यांचा गट अभ्यासा आणि त्यांचा तळापासून वरपर्यंतचा क्रम निवडा.

 

73.

जर a आणि b यातील सहसंबंध c वे d यांच्याप्रमाणे असेल तर खालील आकृतींपैकी कोणती प्रश्नचिन्हाच्या जागी येईल?

74.

रिकाम्या जागेसाठी प्रतिमा निवडा :

75.

पुढील परिच्छेदातील काही विधाने त्यांच्यापुढील वर्णाक्षर क्रमाने दाखवली आहेत. त्यांच्या आधारे परिच्छेदातील अधोरेखित विधानाला पुष्टी देणारा पर्याय निश्चित करा.
          वीडमेन फ्रांझ यांनी निश्चित केलेल्या वैज्ञानिक नियमानुसार साधारणपणे जे पदार्थ चांगले वीजवाहक आहेत ते चांगले उष्णतावाहकही असतात हे आपण क्रमिक पुस्तकातून शिकलो आहोत (a). व्हॅनेडियमपासून व्हॅनाडियम डायॉक्साईड हे निळे असेंद्रिय संयुग बनते (b). हे संयुग उत्तम वीजवाहक आहे परंतु त्याची उष्णता वाहून नेण्याची क्षमता नगण्य आहे (c). 67 अंश सेंटिग्रेडपेक्षा कमी तापमानाला व्हॅनेडियम सर्वसाधारण अधातूंप्रमाणे पूर्णतया उष्णतारोधक बनतो (d). त्याहून जास्त तापमानाला तो सामान्य धातूंप्रमाणे उत्तम वीजवाहक व उष्णतावाहक असतो (e). याचा अर्थ तो विशिष्ट तापमानानुसार धातू-अधातू गुणविशेष दाखवतो. याचा अर्थ पदार्थाची उष्णता वहनाची क्षमता सर्वस्वी त्या पदार्थातील मुक्त इलेक्ट्रॉन्सवर अवलंबून नसते. विविध वैशिष्ट्ये बाळगून असलेले हे “चलाख द्रव्य'' त्याच्या उष्णतारोधकत्वामुळे औष्णिक इंजिनांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी उपयुक्त ठरेल.

76.

जेव्हा मालक काही इच्छा व्यक्त करतो तेव्हा त्याचा जादूचा आयताकृती कापडाचा तुकडा लांबीकडून 1/2 ने आटतो आणि रुंदीकडून 1/3 ने आटतो. तीन इच्छा पूर्ण केल्यावर त्याचे क्षेत्र 4 वर्ग से.मी. झाले. जर त्याची मूळ रुंदी 9 सें.मी. होती तर त्याची मूळ सें.मी. लांबी निर्देशित करणारा पर्याय निवडा.

77.

एका नगराच्या वाहतुक विभागाने त्यातील वाहनांची माहिती गोळा केली आहे. यात खाजगी वाहनांच्या तिप्पट सार्वजनिक वाहने आहेत. 20 टक्के सार्वजनिक वाहने पर्यायी इंधनावर धावतात; पैकी 40 टक्के जैविक इंधनावर धावतात, 20 टक्के हाइड्रोजन वापरतात आणि उरलेली नैसर्गिक वायूचा उपयोग करतात. 25 टक्के खाजगी वाहने 5 पेक्षा कमी वर्षे वापरात आहेत आणि हेच प्रमाण नैसर्गिक वायूचा वापर करणा-या सार्वजनिक वाहनांच्या बाबतीत निम्मे आहे. या नगरातील किमान 5 वर्षे वापरात असलेल्या व नैसर्गिक वायूवर चालणा-या सार्वजनिक वाहनांची टक्केवारी दर्शवणारा पर्याय निवडा :

78.

पुढील तथ्ये सत्य मानून त्यांचे परीक्षण करा व त्यावर आधारित तर्कसंगत अनुमान/ने निवडा.

विवेकी विचार करण्याचा गुणविशेष प्रदर्शित करणारे सर्व विद्यार्थी विज्ञान अध्ययनात आनंद घेतात. ज्या विद्यार्थ्यांना विज्ञानात रस नसतो ते बहुधा सर्जनशील असतात. विवेकी विचार करणारे काही विद्यार्थी विज्ञान जीविकेचा पाठपुरावा करतात.
अनुमाने :

(a) सर्जनशील विद्यार्थी विवेकी विचार करण्याचा गुणधर्म कधीही प्रदर्शित करत नाहीत.

(b) सर्जनशील विद्यार्थी हे बहुधा वैज्ञानिक होऊ शकत नाहीत.

(c) विवेकी विचार करणारे सर्जनशील विचार करत नाहीत.

(d) फक्त विवेकी विचार करणारे विद्यार्थी विज्ञान जीविकेचा पाठपुरावा करू शकतात.

पर्यायी उत्तरे :

79.

सीमा तिच्या वर्गातील सर्वात उत्तम असलेल्या धावकात 50 वी तसेच सर्वात वाईट असलेल्या धावकातही 50 वी आहे तर त्या वर्गातील विद्यार्थ्यांची एकूण संख्या दर्शवणारा पर्याय निवडा :

80.

माशाच्या नमुन्याची मापने पुढीलप्रमाणे दिली आहेत. त्याच्या डोक्याची लांबी 9 सें.मी. आहे. त्याच्या डोके व शेपटी यांच्या दरम्यानच्या शरीराची लांबी डोके व शेपटी यांच्या लांबीच्या बेरजेइतकी आहे. शेपटीची लांबी डोके आणि डोके व शेपटी यांच्या दरम्यानच्या शरीराच्या लांबीच्या एक चतुर्थांश यांच्या बेरजेइतकी आहे. माशाची एकूण लांबी दर्शवणारा पर्याय निवडा.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

AMVI Pre 2017 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.