कर सहायक गट क - २०१५

कर सहायक गट क - २०१५ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.

दिलेल्या शब्दातील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा.  

‘आज्ञेबरहुकूम '

22.

पुढीलपैकी कोणत्या उदाहरणात भाववाचक नामांचा विशेषनामासारखा उपयोग केला आहे ?

23.

'शंकर महादेवन् अप्रतिम गाणी गातात. या वाक्याचे कर्मणी प्रयोगात रूपांतर कशा प्रकारे होईल ? 

24.

पर्यायी उत्तरांतील ‘अवधिवाचक कालवाचक क्रिया-विशेषण’ कोणते ?

25.

खालील स्वर कोणत्या प्रकारचा आहे ? 

' ए '

26.

जोड्यांचा योग्य पर्याय निवडा.

27.

दिलेल्या पर्यायांतून स्पर्श व्यंजन ओळखा.

28.

आजन्म, आमरण, आकर्ण या शब्दांमध्ये आलेला उपसर्ग पुढीलपैकी कोणत्या अर्थासाठी उपयोगात येत नाही ? 

29.

पुढे मराठी प्रत्यय व त्यापासून बनलेली धातुसाधिते दिली आहेत. योग्य पर्याय ओळखा.

30.

पुढीलपैकी कोणते शब्द प्राकृत-अपभ्रंश रूपाबरोबर मूळ तत्सम रूपात वापरात येऊ लागले ?

31.

दिलेल्या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. 

‘आईने मुलीला लाडू दिला.'

32.

‘शिवाजी महाराजांनी जिथे स्वराज्याची शपथ घेतली, ते स्थान अजूनही दाखविण्यात येते.’ 

वरील वाक्य कोणत्या प्रकारचे आहे ?

33.

न्यूनत्वबोधक संयुक्तवाक्य तयार करताना कोणत्या उभयान्वयी अव्ययांचा वापर होतो ?

34.

'कानन' या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता ?

35.

संस्कृतमधील उपसर्ग असणारे मराठी शब्द ओळखा. 

पुढील उतारा वाचून प्रश्न क्र. 36 ते 40 या प्रश्नांची उत्तरे लिहा.
                 साहित्याचा अभ्यास किंवा विचार म्हणजे केवळ एकेका साहित्यकृतीच्या कलात्मकतेचा विचार नव्हे. साहित्यकृती ही कलावंतनिर्मित कलावस्तू असते, असे म्हणता येते हे खरे. परंतु अशा कलावस्तू मौखिक परंपरेने वा पुस्तकरूपाने समाजासमोर येऊन त्यांच्या परंपरा होतात. या कलावस्तूंचे समाजावर बरेवाईट परिणाम होतात. आपल्या संतांच्या काव्यनिर्मितीचे उदाहरण डोळ्यांसमोर आणले तर हे स्पष्ट दिसते. संतांच्या काव्यनिर्मितीने मराठी कवितेची अशी भक्कम परंपरा निर्माण केली आहे. तसेच या काव्यनिर्मितीचे मराठी समाजावर व्यापक परिणामही झाले आहेत. आधुनिक काळातील केशवसुत, हरिभाऊ, मढेकर यांसारख्यांच्या निर्मितीच्या संदर्भातही असेच म्हणता येण्यासारखे आहे. त्यामुळे साहित्याला एक सामाजिक अंग असते हे स्पष्ट आहे. एवढेच नव्हे तर, कलावस्तूचा निर्माता कलावंत, कलावस्तूचा आस्वादक रसिक, साहित्यकृतीतून व्यक्त होणारा आशय आणि ज्या भाषेच्याद्वारे कलावस्तू निर्माण होते ती भाषा हे सर्व विशिष्ट समाजाचेच भाग असतात. साहित्याच्या या स्वरूपामुळे साहित्याला सामाजिक अंग प्राप्त होणे अपरिहार्यच असते. व्यक्तीने निर्माण केलेली कलावस्तू एका स्तरावर सामाजिक वस्तू होते. साहित्याच्या सामाजिकतेचा हा अभ्यास हे साहित्याच्या अभ्यासाचेच एक अंग आहे. अशा अभ्यासातून विशिष्ट समाजाच्या साहित्याच्या स्वरूपाचे स्पष्टीकरण होणे शक्य असते. लेखक, साहित्यकृती व वाचक या सर्वांच्या संदर्भातील सामाजिकतेचे स्वरूप असा अभ्यास स्पष्ट करू शकतो.
                  लेखक म्हणजे साहित्यनिर्मिती करण्याची क्षमता असणारी व्यक्ती. साहित्याचा विचार करताना एक प्रतिभावंत म्हणून लेखकाचा विचार करणे योग्य ठरत असले तरी प्रतिभावंत असणारी ही व्यक्ती विशिष्ट समाजाचा एक घटक असते हे विसरता येत नाही; आणि म्हणूनच व्यक्ती व समाज यांच्या संदर्भातील सर्व प्रश्न लेखकाच्या संदर्भातही उपस्थित करता येतात. माणूस एकटा असतो असे माणसाच्या संदर्भात अनेकदा म्हटले जाते आणि ते अनेक दृष्टींनी खरेही आहे. व्यक्ती एकटी जन्माला येते आणि एकटीच जाते. व्यक्तीची सुखदुःखे ख-या अर्थाने व्यक्तीलाच भोगावी लागतात. स्वतःसंबंधीचे अनेक निर्णय व्यक्तीला एकटेपणानेच घ्यावे लागतात. तेव्हा व्यक्तीचे हे एकटेपण खरेच आहे. परंतु त्याचबरोबर व्यक्तीचे या जगात येणे आणि जाणे या घटना मात्र सामाजिक असतात. व्यक्तीच्या सर्व सुखदुःखांना, घेतल्या जाणा-या निर्णयांना कमी-अधिक प्रमाणात सामाजिक परिमाण असते; हे लक्षात घेतले म्हणजे व्यक्तीचे सर्वच जीवन सामाजिक असते, असे म्हणावेसे वाटते. व्यक्तीचे एकटेपण आणि तिची सामाजिकता या परस्परविरोधी बाबी नसून त्यांच्यातील गूढ संबंधातच व्यक्ती आणि समाज यांच्या नात्यातील रहस्य सामावले आहे. म्हणूनच साहित्याचा निर्माता असणारी व्यक्ती व तिची सामाजिकता या प्रश्नाची सोडवणूक कोणत्याही साध्या सरळ नियमांनी करता येत नाही.

36.

साहित्यकृतीचा परिणाम  कोणावर  होतो ?

37.

मराठी कवितेची भक्कम  परंपरा  कोणी निर्माण केली ?

38.

समाजाचे घटके कोणते असतात ?

अ. कलावंत

ब. रसिक

क.आशय   

ड. भाषा

39.

पुढील विधाने वाचून योग्य तो पर्याय निवडा. 

अ. लेखक म्हणजे साहित्यनिर्मिती करण्याची क्षमता नसलेली व्यक्ती. 

ब. प्रतिभावंत व्यक्तीही विशिष्ट समाजाचा घटक असते.

क. एकटी व्यक्ती समाजाचा घटक नसते.

40.

या परिच्छेदाचा आशयाला अनुरूप असे शीर्षक  निवडा. 

अ. व्यक्तीची असामाजिकता

ब. एक व्यक्ती आणि एक समाज

क. साहित्याची सामाजिकता

ड. एक व्यक्ती आणि समष्टी

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

कर सहायक गट क - २०१५ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.