सातारा जिल्हा पोलीस भरती 2019

सातारा जिल्हा पोलीस भरती 2019 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
81.
A, B व C हे तीन मित्र एका वर्तुळाकृती मैदानाभोवती एक फेरी अनुक्रमे 12, 18 आणि 20 सेकंदात पुर्ण करतात तर किती मिनीटानंतर हे तिघे पुन्हा एकदा आरंभ बिंदुजवळ भेटतील ?

82.

जर x +(1/ x) = 19 तर x 2 +(1/x)=?

83.
सफरचंदाच्या झाडांना प्रत्येकी 16 सफरचंदे लागली होती. पहिल्या तोडीवेळी त्यातील 9 झाडावरील सर्व सफरचंदे काढण्यात आली. तर झाडांवर किती सफरचंदे शिल्लक राहीले ?

84.
पुणे ते कोल्हापुर आणि कोल्हापुर ते पुणे विनाथांबा बसच्या दिवसभरात 5 फेऱ्या पूर्ण झाल्या. बसमध्ये प्रत्येक वेळी 45 प्रवासी होते. बसचे तिकिट प्रत्येकी 80 रू. असल्यास दिवसभरात त्या बसचे एकूण उत्पन्न किती ?

85.
रमेशला सुरेशच्या पगाराच्या निमपट तर महेशला रमेशच्या पगाराच्या तिप्पट पगार आहे जर महेशचा पगार रु. 4500 असल्यास सुरेशचा पगार किती ?

86.
एका जंगलामध्ये काही मोर व काही हरिण उभे आहेत. त्यांच्या पायांची एकूण संख्या ही त्यांच्या डोक्यांच्या एकूण संख्येच्या दुप्पटीपेक्षा 76 ने अधिक आहे. तर त्यातील हरिणांची संख्या किती ?

87.
अमित, अनिल व आशिष यांच्या वयाचे गुणोत्तर 2:5:3 आहे. जर तिघांचे एकुण वय 60 वर्षे असल्यास आशिषचे वय किती ? 

88.
एका क्रिकेट खेळाडुची 10 सामन्यांतील रनांची सरासरी 100 आहे जर तो 11 वा सामना खेळला तर रनांची सरासरी 5 ने वाढते तर त्याने शेवटच्या सामन्यात किती धावा केल्या ?

89.
दोन समान लांबीच्या रेल्वेगाड्या एकमेकींच्या विरुद्ध दिशांनी धावत आहेत. त्यांचा वेग अनुक्रमे 56 आणि 70 किमी प्रतितास आहे. जर त्या दोन्ही गाडया परस्परांना 18 सेकंदामध्ये ओलांडतात, तर त्यांची प्रत्येकी लांबी किती ?

90.
एक व्यक्ती P या बिंदु पासून 20 किमी प्रतितास या वेगाने Q या बिंदुकडे निघालेला आहे. आणि त्याचवेळी दुसरा व्यक्ती Q या बिंदूपासून 30 किमी प्रतितास या वेगाने P या बिंदुकडे निघालेला आहे. जर ते दोघे एकमेकांना 18 सेकंदामध्ये भेटत असतील तर P ते Q हे अंतर किती असेल ?

91.
18 कामगार रोज 8 तास काम करुन एक काम 12 दिवसात पूर्ण करतात. तर तेच काम रोज 9 तास याप्रमाणे काम करुन 16 दिवसात पूर्ण
करण्यासाठी किती कामगार लागतील ?

92.
20 स्त्रियांना 150 चादरीवर विणकाम करण्यासाठी 27 दिवस लागतात. तर 300 चादरीवर 24 दिवसात विणकाम करण्यासाठी किती स्त्रिया लागतील ?

93.
P या नळाने एक टाकी 12 तासात भरते. आणि Q या नळाने तीच टाकी 15 तासात रिकामी होते. जर दोन्ही नळ एकत्र सुरु केले, तर ती टाकी भरण्यास किती वेळ लागेल?

94.
एका संख्येची 40% किंमत जर 120 असेल तर त्या संख्येची 55%
किंमत किती ?

95.
A चा पगार 18,800 रुपये आहे तसेच B चा पगार 4,000 रुपये आहे.
तर A चा पगार B च्या किती % आहे?

96.
एका व्यक्तीच्या पगारामध्ये 50% घट झाली. नंतर त्या घट झालेल्या पगारामध्ये 50% वाढ झाली तर त्या व्यक्तीला किती तोटा झाला ? 

97.
एका गावची लोकसंख्या 6000 आहे. त्या गावातील 20% लोक दरवर्षी दुसरीकडे स्थलांतर करतात, तर 2 वर्षानंतर त्या गावची लोकसंख्या किती असेल ?

98.
एका दुकानदाराने 18 पेन जेवढया रुपयात खरेदी केले, तेवढयाच रुपयात 15 पेन विकले तर या व्यवहारात त्याला होणारा नफा किती ?

99.
 A आणि B या दोघांनी अनुक्रमे 1,40,000 आणि 1,50,000 रुपये गुंतवुन एक व्यवसाय सुरु केला. जर एक वर्षाच्या अखेरीस त्यांना 1,16,000 रुपयांचा नफा होत असेल तर प्रत्येकाला अनुक्रमे किती रुपये मिळाले पाहिजेत?

100.
एका त्रिकोणाचा पाया 15 सेमी आणि उंची 12 सेमी आहे. तसेच दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 20 सेमी आणि क्षेत्रफळ पहिल्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या दुप्पट आहे. तर दुसऱ्या त्रिकोणाची उंची किती ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

सातारा जिल्हा पोलीस भरती 2019 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.