राज्यसेवा पूर्व परीक्षा  २०१३ - Paper 2

राज्यसेवा पूर्व परीक्षा  २०१३ - Paper 2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.

जगातील काही वाईट प्रथा मोडीत निघाल्या कारण -

(a) काही लोकांना हा प्रश्न कळाला.

(b) काही स्त्री-पुरुषांनी या वाईट प्रथा सहन करणा-या लोकांच्या जागी 'स्वत:ला ठेवून पाहिलं.

(c) काही लोकांचा लोककल्याणामध्ये विश्वास असतो.

(d) सहानुभूती व न्याय या दोन गोष्टींमुळे या प्रथा मोडीत निघतील असा काही जणांचा विश्वास होता.

पर्यायी उत्तरे :

प्रश्न क्रमांक ४२ ते ४५ :
| समाजशास्त्रज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ आणि धर्मशास्त्राचे जाणकार हे 'धर्म' या संकल्पनेचा अर्थ अनेक छटांसह मांडतात. सर्वसामान्य माणसाला मात्र 'धर्म' म्हणजे काय, ते सहसा माहीत नसते किंवा ते अचूक शब्दांत मांडणे जमलंच पाहिजे असाही त्याचा अट्टाहास नसतो. धर्माचा अभिमान मात्र त्याला असतो. धर्माची निवड आपल्या हाती नाही, ती जन्मजात आहे. मग ज्याची निवडही आपण केलेली नसते, त्याचा अभिमान आपल्याला का असतो? कसा जडतो? तर तो जड़तो संस्कारांतून, सवयीतून. लहानपणापासून त्या धर्माशी, त्या धर्मातील विधी-उपचारांशी, सणांशी एक जवळीक निर्माण होते. या जवळीकीतून प्रेम निर्माण होते. या प्रेमात, जवळीकीत कुठेतरी सुरक्षितता वाटते. कुठल्याही गोष्टीची सवय जडण्यामागे सातत्य असावंच लागतं, सातत्य म्हणजे सुसंगत, समान, निरंतर अस्तित्व. या सातत्यासाठी एक व्यवस्था अपरिहार्य ठरते. व्यवस्था काही अचानक निर्माण होत नाही. तिच्यामागे निश्चित विचारप्रक्रिया असते. धर्मव्यवस्था तयार होण्यामागेही विचारप्रक्रिया असते. ती कोणती?
| आपल्या भोवतालच्या विराट सृष्टीचं आकलन जसंजसं माणसाला झालं असेल, तसंतसं या सृष्टीतलं आपलं स्थान काय, ते शोधण्याची इच्छाही त्याच्या मनात उत्पन्न झाली असेल- इवलसं मूल जन्मताना पाहून माणूस आनंदला असेल, तितकाच कुणाच्या मृत्यूने तो कासावीस झालाच असेल, आपलं जगणं क्षणभंगूर आहे, अशाश्वत आहे, परावलंबी आहे, कालबद्ध आहे, याची जाणीव त्याला झाली असेल. त्याचवेळी या सृष्टीतला जीवनप्रवाह मात्र अखंड, अनंत, मुक्त, कालातीत आणि शाश्वत आहे याची खोल जाणीव त्याला झालीच असेल. जीवनातील शाश्वत-परमोच्च सत्याचा शोध, हेच मानवी जीवनाचं खरं ध्येय असलं पाहिजे, हेही त्याला जाणवलं असावं. ध्येय साधायचं तर विचार आणि कृती या दोन्हींची गरज असते. त्यात चिकाटी आणि सातत्यही पाहिजे, ध्येयावरील विश्वासाचं निष्ठेत, श्रद्धेत रूपांतर झालं की मग ती निष्ठाच माणसाला कार्यप्रवण करते. तेव्हा ध्येयाचं भान जागविणारी अशी व्यापक व्यवस्था किंवा मार्ग म्हणजेच धर्म, ध्येय ज्या व्यवस्थेतून साधायचं आहे, त्या व्यवस्थेत कालानुरूप सुधारणा होतात. त्यामुळे धर्मातही सुधारणा होणे, नवा धर्म-पंथ निर्माण होणे उचितच ठरते.

42.

धर्माचा अभिमान सर्वसामान्यांना का असतो?

(अ) धर्म जन्मजात असतो.

(ब) धर्मामुळे माणसाला सुरक्षित वाटते.

(क) धर्माची सवय माणसाच्या मनात धर्माबद्दल प्रेम निर्माण करते.

(ड) धर्म निरंतर असतो.

पर्यायी उत्तरे :

43.

धर्म माणसाला कार्यप्रवण करतो असे का म्हटले जाते?

(अ) कारण माणूस धर्मावर निष्ठा ठेवतो आणि ही निष्ठाच त्याला कार्यप्रवण करते.

(ब) धर्म माणूस चिकाटीने पाळतो.

(क) कारण धर्म पाळणे म्हणजे ध्येयाचे भान ठेवणे असते.

(ड) कारण धर्म ही सवय असते.

पर्यायी उत्तरे :

44.

मृत्यूच्या जाणिवेमुळे माणसाला प्रगल्भता का येते?

(अ) कारण आपले जगणे शाश्वत आहे हे त्याला कळते.

(ब) कारण आपले जगणे पराधीन आहे हे त्याला कळते.

(क) कारण आपल्या मृत्यूने संपूर्ण सृष्टिचक्र थांबणार नाही हे त्याला कळते.

(ड) कारण जगणे कधीतरी संपणारच पण त्यापूर्वी आपण काहीतरी अर्थपूर्ण केले पाहिजे हे माणसाला कळते.

पर्यायी उत्तरे :

45.

सर्वसामान्य माणसाला धर्म म्हणजे काय ते का माहीत नसते ?

(अ) कारण 'धर्म' या संकल्पनेला अनेक छटा असतात.

(ब) कारण धर्म त्याने एक सवय म्हणून स्वीकारलेला असतो.

(क) धर्माचा त्याला अभिमान असतो.

(ड) धर्म म्हणजे काय ते जाणून घेण्याचा अट्टाहास त्याने केलेला नसतो.

पर्यायी उत्तरे :

Question number 46 to 48 :
Is India becoming a proponent of apartheid ? Not apartheid based on race, but on gender? The recent proposal to create special banks which will cater only to women customers has created a controversy. While the 'women's bank' has been widely hailed by many as a socially progressive idea in that most women would feel more comfortable dealing with other women in a women-only situation, there are dissenting voices which say that such proposals, well-meant though they are, will serve to further ghettoise women in an already oppressively male-centric scheme of things.
Proponents of this point of view argue that what is needed is not to co-coon women in protective environments specially reserved for them - be they in the form of 'ladies' coaches in trains or in the Metro, or 'pink' auto-rickshaws meant only for women passengers - but to enable them to share common public spaces and services with their male counterparts without fearing for their safety.
। 'Women's only banks, and similar facilities, isolate women from the social mainstream, Such discrimination, as well-intentioned as it undoubtedly is, constitutes a form of apartheid based not on race or skin colour but on gender. At best, it is like the 'equal but separate' policy that some southern American states followed, whereby coloureds' and white people had segregated schools and separate seats on public transport
In effect, this is another way of saying that the 'solution' to violent gender crimes like rape - which is a horrifyingly everyday occurrence in India - is to lock up women in the safe custody of their homes and not allow them out in public. The response to such 'solutions', of course, is that it is not the presence of women in public places which is the cause of rape but the predatoriness of men, who are the ones who should be kept under lock and key where they can't do harm to anyone.
The only real and lasting solution to crimes against women is to stop discriminating against them, even with the best of intentions. Instead of being protected from men, women want men to be educated - or rather, re-educated - on gender issues so that they no longer pose a danger to women.
It's a long-haul solution. But it's the only one that we can all bank on, women as well as mern.

46.

Worner's barik in a Way :

47.

"Ghetto is a :

48.

What would women want ?

Question number 49 and 50 :
A terrible combat ensued. The shark had seemed to roar, if I might say so, the blood rushed in torrents from its wound. The sea was dyed red, and through the opaque liquid I could distinguish nothing more. Nothing more, until the moment, when like lightning, I saw the undaunted captain hanging on to one of the creature's fins, struggling as he was, hand to hand with the monster and dealing successive blows at his enemy. Yet unable to give a decisive one.

49.

'A terrible combat ensued' here implies :

50.

The writer describes the captain as __________.

51.

फळांच्या तीन करंड्यात आंबे, केळी, चिकू व पेर ही फळे भरलेली आहेत. आंबे व केळी या फळांची संख्या समान आहे. चिकू केळींच्या दुप्पट आहेत. पेरची संख्या चिकू व केळी मिळून होणाच्या संख्येच्या 3/4 इतकी आहे. तीन करंड्यात मिळून 1000 फळे आहेत तर त्यात पेर व चिकू यांची अनुक्रमे संख्या किती असेल ?

52.

हा संकेत कोणत्याही आकारात काढला तरी त्याचा अर्थ आहे, x+5 आणि   हा संकेत कोणत्याही आकारात काढला तरी त्याचा अर्थ आहे, जेथे ४ आणि ५ या संख्या आहेत, तर दिलेल्या राशीची किंमत किती ?

53.

200 मीटर लांबीची एक मालगाडी ताशी 48 किमी वेगाने प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या माणसाला पार करते. त्याचवेळी उलट्या दिशेने ताशी 60 किमी वेगाने जाणारी 150 मीटर लांबीची गाडीही त्या माणसाला पार करते. त्या दोन गाड्यांना त्या माणसाला पार करायला लागणाच्या वेळेत कितीचा फरक पडतो ?

54.

एका शब्द संयोजन यंत्रास जेव्हा शब्दांची एक ओळ इनपुट म्हणून दिली जाते, त्यावेळी ते यंत्र त्या ओळीला एका पायरीत एका विशिष्ट नियमानुसार व्यवस्थित संयोजित करते. खाली इनपुट म्हणून दिलेली माहिती व संयोजनाच्या पायच्या दिलेल्या आहेत.


55.

एका क्रिकेट खेळाडूची चेंडू फेकण्याची सरासरी 24.85 धावा प्रति विकेट होती. एका मॅचमध्ये त्याने 52 धावा देऊन 5 विकेट घेतल्या. त्यानंतर त्याची चेंडू फेकण्याची सरासरी 0.85 एवढी कमी झाली तर अंतिम मॅच खेळण्यापूर्वी त्याने घेतलेल्या विकेटची संख्या किती होती ?

56.

0, P, Qहे कप व बशांचे संच आहेत. विशिष्ट क्रमाने नसलेल्या या संचांविषयी पुढील माहिती वाचा.

(a) एकरंगी कपांचा रंग निळा, पांढरा व पिवळा आहे.

(b) एकरंगी बशांचा रंग लाल, गुलाबी आणि पांढरा आहे.

(c) कोणताही संच एका रंगाचा नाही.
(d) संच 0 च्या कपाचा रंग पिवळा नाही.

(e) संच P च्या कपाचा रंग निळा नाही.

(f) संच Qच्या कपाचा रंग पांढरा नाही.

(g) संच Qच्या बशीचा रंग लाल नाही.

(h) संच 0 ची बशी पांढरी आहे.

संच P च्या बशी व कपाचा अनुक्रमे रंग कोणता ?

57.

(a) P, Q, R,S, T आणि U हे सहा विद्यार्थी आहेत, जे वेगवेगळ्या विषयात पदव्युत्तर पदवीसाठी अध्ययन करीत आहेत. त्यांचे विषय आहेत, इंग्रजी, इतिहास, तत्त्वज्ञान, भौतिकशास्त्र, सांख्यिकी आणि गणित परंतु त्याच क्रमाने असतील असे नाही.

(b) त्यांच्यापैकी दोन जण वसतीगृहात राहतात, दोघे पेईंगगेस्ट म्हणून राहतात आणि उर्वरित दोघे आपापल्या घरी राहतात.

(c) R पेईंग गेस्ट नाही आणि तत्त्वज्ञानाचे अध्ययन करतो.

(d) इतिहासाचे अध्ययन करणारा विद्यार्थी आपल्या घरी राहतो आणि सांख्यिकीचे अध्ययन करणारा विद्यार्थी पेईंग गेस्ट म्हणून राहत नाही.

(e) T गणिताचे तर S भौतिकशास्त्राचे अध्ययन करतो.

(f) U आणि S वसतीगृहात राहतात. 

g) T पेईंग गेस्ट म्हणून राहतो आणि Q आपल्या घरी राहतो.

तर खालीलपैकी कोणती जोड़ी बरोबर नाही ? 

58.

प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.

जर Audio = 85 असेल, Video = 80 असेल, तर Radio = ? 

59.

A, B, C, D, E, F, G, H, I आणि ) हे दहा सदस्य, X आणि Y या दोन टीममध्ये विभागलेले आहेत. प्रत्येक टीममध्ये पाच सदस्य आहेत. दोन्ही टीमच्या सदस्यांना समोरासमोर दोन रांगांमध्ये असे बसविले आहे की 'X' टीमच्या एका सदस्याच्या बरोबर समोर Y टीमचा एक सदस्य आहे व त्यांची तोंडे एकमेकांकडे आहेत. 'X' टीमच्या सदस्यांची तोंडे उत्तर दिशेला आहेत. D, A च्या उजवीकडे तिसरा आहे आणि G च्या एकदम समोर बसला आहे. B, G च्या निकटतम उजवीकडे बसलेला आहे आणि त्याचे तोंड दक्षिणेकडे आहे. H, B च्या उजवीकडे तिसरा आणि F च्या एकदम समोर बसला आहे. C हा A आणि E च्या मध्ये असून | च्या समोर बसलेला आहे. खालीलपैकी कोणता व्यक्तीसमूह एकाच रांगेत बसलेला आहे ?

60.

एका परीक्षेत एकूण विद्यार्थ्यांच्या 35% विद्यार्थी हिन्दी या विषयात अनुत्तीर्ण झाले; 45% विद्यार्थी इंग्रजीत अनुत्तीर्णझाले आणि 20% विद्यार्थी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झालेत. तर एकूण विद्यार्थ्यांच्या शेकडा किती विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा पूर्व परीक्षा  २०१३ - Paper 2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.