राज्यसेवा पूर्व परीक्षा  २०१३ - Paper 2

राज्यसेवा पूर्व परीक्षा  २०१३ - Paper 2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.

खालीलपैकी कोणत्या स्थूल अर्थशास्त्रीय घटकाचे प्रस्तुत परिच्छेदात वर्णन केलेले नाही ?

22.

भारतातील 1991 च्या आर्थिक सुधारणांची सर्वात मोठी त्रुटी म्हणजे _________

प्रश्न क्रमांक 23 ते 27 :
खूप वर्षापूर्वी प्राणी आणि वनस्पती यांचे अवशेष जमिनीत गाडले गेले. त्यावर वरच्या जमिनीचा प्रचंड दाब आणि आतील उष्णता यांचा परिणाम होऊन त्यांचे इंधनात रुपांतर झाले. अशा इंधनाला जीवाश्म इंधन म्हणतात. हे इंधन तयार होण्यासाठी लक्षावधी वर्षांचा काळ जावा लागतो, म्हणूनच जीवाश्म इंधनाचे साठे मर्यादित आहेत. त्यामुळे त्याच्या योग्य वापराची आवश्यकता आता भासू लागली आहे.
| जीवाश्म इंधन स्थायू, द्रव आणि वायू अशा तीन अवस्थांत पृथ्वीच्या पोटात सापडते. त्यात कोळसा, खनिज तेल आणि नैसर्गिक वायू यांचा समावेश होतो. सगळ्या जीवाश्म इंधनांत हायड्रोकार्बनची संयुगे सापडतात. याशिवाय इतरही इंधने आपण रोजच्या व्यवहारात वापरतो. उदा. लाकूड, शेणाच्या गोवया, लाकडी कोळसा इत्यादी.
| खेड्यापाड्यात इंधन म्हणून लाकूडफाटा वापरला जातो. लाकूडफाट्याच्या वापरामुळे जंगले नष्ट होत असून पर्यावरण धोक्यात आले आहे, ही चिंतेची बाब आहे. पृथ्वीच्या पोटात हजारो मीटर इतक्या खोल खनिज तेल सापडते. त्यापासून पेट्रोल, डिझेल, केरोसीन आणि इंधन तेल हे घटक मिळवता येतात.
| नैसर्गिक वायू हे वापरायला अतिशय सोयीचे असे इंधन आहे. ते लवकर पेट घेते आणि त्यातून कोणताही स्थायू पदार्थ शिल्लक राहत नाही. शिवाय मुख्य स्रोतापासून नळाद्वारे त्याचे स्थलांतर करणे सहज शक्य असते. मुख्य म्हणजे नैसर्गिक वायूच्या ज्वलनावर नियंत्रण ठेवता येते. मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्यूटेन इत्यादी नैसर्गिक वायूंचे प्रकार आहेत. ।
| जीवाश्म आणि इतर इंधनांचे साठे हे मर्यादित आहेत. म्हणूनच कोळसा, तेल यांना पारंपारिक किंवा अनवीकरणीय ऊर्जा स्रोत म्हणतात, कारण ते नव्याने बनवता येत नाहीत.
पवनऊर्जा, जलविद्युत ऊर्जा, बायोगॅस, बायोडिझेल असे ऊर्जेचे नवीकरणीय स्रोत वापरात आहेत, तरीही आज ऊर्जा संकटाने आपल्याला ग्रासले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे वाढती लोकसंख्या आणि वाढते उद्योगधंदे. त्यांना लागणारी वाढती ऊर्जा सतत निर्माण करता येणे कठीण आहे. त्यासाठी नवीकरणीय ऊर्जा स्रोताचा वापर करण्याचे मार्ग शोधणे, ही काळाची गरज आहे. अशा परिस्थितीत आपण सौरऊर्जेच्या वापरावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.

23.

कोणता इंधन स्रोत सर्वात अधिक विनाशकारी सिद्ध झाला आहे ?

24.

ऊर्जा संकट ________ नाही.

(a) सामाजिक समस्या

(b) मनुष्यनिर्मित समस्या 

(c) आर्थिक समस्या

(d) पर्यावरणीय समस्या

(e) निसर्गाची देणगी

(f) जागतिक समस्या

योग्य पर्याय निवडा :

25.

कोणता पारंपारिक ऊर्जा स्रोत मानव वापरासाठी सहज-सुलभ आहे ?

26.

ऊर्जा संकट अधिकाधिक तीव्र होत चालले आहे. आपण कशावर भिस्त टाकावयास हवी ?

(a) नैसर्गिक वायूवर कारण तो सुलभतेने वापरता येतो.

(b) नव्याने बनविता येणया स्रोतांकडे लक्ष द्यावयास हवे.

(c) आपण सौर ऊर्जेवर भर घावयास हवा.

(d) आपण नवे स्रोत शोधून काढले पाहिजेत.

पर्यायी उत्तरे :

27.

आपण स्वत:ला ऊर्जा संकटातून कसे सोडवू शकू ?

(a) अनंत वाढणाच्या आपल्या संख्येस रोखून

(b) अधिकाधिक नवीकरणीय स्त्रोताच्या उपयोगाने

(c) औद्योगिकरणांचा वेग कमी करून

(d) अधिक तेल व वायूची आयात करून 

पर्यायी उत्तरे :

प्रश्न क्रमांक 28 ते 32 :
जैवतंत्रज्ञान ही व्यापक संकल्पना आहे. यामध्ये प्रामुख्याने जीवांमध्ये आवश्यक ते बदल करून मानव कल्याणाकरीता त्याचा उपयोग करणे अंतर्भूत आहे. मानवाच्या निरनिराळ्या गरजांसाठी वेगवेगळ्या तंत्राद्वारे जीवांमध्ये बदल घडविले जातात. यामध्ये प्राणीपालन, वनस्पतींची लागवड, वनस्पतींच्या वेगवेगळ्या प्रजाती विकसित करण्यासाठी आवश्यक तो संकर घडवून आणला जातो. यासाठी वापरण्यात येणा-या आधुनिक पद्धतींमध्ये पेशी तसेच उती संवर्धन आणि जनुक अभियांत्रिकी या गोष्टींचा समावेश होतो. संयुक्त राष्ट्रसंघाच्या जैवविविधता विषयक समितीने केलेल्या व्याख्येनुसार 'असे कोणतेही तंत्र ज्यामध्ये जैविक प्रक्रिया, जीव किंवा जैविक उत्पादने जेव्हा विशिष्ट उद्देशासाठी वापरले जातात त्याला जैवतंत्र असे म्हणता येईल.' म्हणजेच ज्यामध्ये प्रगत जीवशास्त्राच्या विविध उपयोजित पैलूंचा वापर जेव्हा विविध उत्पादन निर्मितीत होतो अशा शास्त्रास जैवतंत्र शास्त्र असे म्हणतात.
जैवतंत्रज्ञानामध्ये काही मूलभूत विद्याशाखांचाही समावेश होतो. जसे जननशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, प्राणापेशींचे संवर्धन, रेणूजीवशास्त्र, जीवरसायनशास्त्र, भुणशास्त्र, पेशी विज्ञान त्याचप्रमाणे तत्वत: जीवशास्त्राबाहेरील कक्षेत येणारे रसायन अभियांत्रिकी, जैविक प्रक्रिया अभियांत्रिकी, जैवमाहितीशास्त्र तसेच जैवयंत्रमानवशास्त्र या विषयांचाही समावेश होतो.
आधुनिक जीवशास्त्राच्या बयाच संकल्पना या जैवतंत्रशास्त्राने निधरीित केलेल्या विविध पद्धती व तंत्र यावर अधारलेल्या असतात त्यामुळे ह्या सर्व प्रक्रियांना एकत्रितपणे ‘जीवशास्त्रीय उद्योग' असे नामाभिधान देता येईल.
जैवतंत्रज्ञान हे प्रयोगशाळेत केलेले संशोधन व विकास यावर आधारलेले आहे जे जैवमाहितीशास्त्राच्या आधारे मूल्यवर्धित उत्पादनांचे सर्वेक्षण, शोध, उगम, स्त्रोत तसेच जीवांपासून त्यांची निर्मिती जैव अभियांत्रिकीच्या माध्यमातून शक्य आहे. वरील प्रकारच्या उत्पादनांचे नियोजन, नियमन, विकास व निर्मिती त्यांचे विपणन करणे शक्य आहे. ही उत्पादने शाश्वत मुल्यांच्या आधारे वापरून त्यांच्यावर बौद्धिक मालमत्ता हक्क प्रस्थापित करणे आवश्यक आहे. (राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील कायदेशीर मान्यता.)

28.

पुढील विधानांचा विचार करा.
(a) जैवतंत्रज्ञान बौद्धिक मालमत्ता हक्क प्रस्थापित करण्यास्तव मुख्यत: वापरतात. (b) जैवतंत्रज्ञानाचा अर्थशास्त्राशी काहीही संबंध नाही.

पर्यायी उत्तरे : 

29.

पुढील दोन विधानांचा विचार करा.

(a) जैवतंत्रज्ञानात जीव वा त्याच्या अंशाचा भाग नेहमी असतोच असे नाही.

(b) जैवतंत्रज्ञानात मुळतः शुद्ध व काही प्रमाणात उपयोजित विज्ञान दोन्ही संम्मीलित आहेत

पर्यायी उत्तरे :

30.

जैवतंत्रज्ञानाचे अंतिम उद्दीष्ट काय आहे?

31.

जैव तंत्रज्ञानाची प्रमुख संकल्पना खालीलपैकी कोणती आहे ?

32.

खालील विधानांचा विचार करा.
(a) जैवतंत्रज्ञान सर्व जीवित प्राण्यांमध्ये चालणारी एक नैसर्गिक जैविक प्रक्रिया आहे. (b) जैवतंत्रज्ञानातील उत्पादन बरेच वेळा अपघाती असतात व त्यांना विशिष्टपणे योजावयाची आवश्यकता नसते.

पर्यायी उत्तरे :

प्रश्न क्रमांक 33 ते 36 :
वने स्वत:साठी आवश्यक असलेल्या खतांची निर्मिती स्वत:च करतात व इतर खनिजांबरोबर स्वत:लाच त्यांचा पुरवठा करतात. जंगलातील काही जमीन पाहिली असता आपणास असे दिसते की तेथे सर्व प्रकारचा पालापाचोळा व प्राण्यांचे अवशेष यांचा सतत संचय होत आहे. कवक व जीवाणू या सर्व कच-याचे रुपांतर खत-मातीमध्ये करत आहेत. ही क्रिया सुरुवातीच्या टप्प्यामध्ये ऑक्सिडेशन या प्रक्रियेवरती अवलंबून असते. ही प्रक्रिया सुरु झाल्यानंतर ती पूर्ण होण्यासाठी हवेची आवश्यकता नसते. ही प्रक्रिया पूर्णपणे आरोग्यकारक स्वरूपाची आहे. या प्रक्रियेचा कुणालाही कसलाही त्रास होत नाही, कुठलाही वाइट वास नाही, माश्या नाहीत, कचरापेट्या नाहीत, कचरा भट्टया नाहीत, कृत्रिम मळप्रवाह पद्धत नाही, दुषित पाण्याने होणारे रोग नाहीत, नगर परीषदा नाहीत आणि उंदरे नाहीत. उलटपक्षी जंगलांमध्ये असलेली मुबलक सावली व ताजी। हवा या गोष्टींमुळे या ठिकाणांचा उपयोग सहलींसाठी एक उत्तम पर्यटनस्थळ म्हणून केला जातो. सुट्टीच्या कालावधीमध्ये म्हणजेच साधारणतः जुलै व सप्टेंबर महिन्यात पालापाचोळा, प्राण्यांचे अवशेष व इतर कच-याचे खत मातीत रुपांतर होण्याची प्रक्रिया कधी नव्हे तितकी जलद असते. | वृक्षांसाठी व खाली उगवलेल्या झुडुपांसाठी जमिनीमधील खनिज पदार्थ पाण्यामध्ये मिसळून पातळ द्रावण तयार होते व वनस्पतींच्या मुळांमार्फत वनस्पतींना या गोष्टीचा पुरवठा केला जातो; तसेच ही मुळे झाडांना जमिनीत पक्के रोवून ठेवतात. एखाद्या ठिकाणावरील मातीमध्ये फॉफ्सरसचे प्रमाण कमी असले तरी त्या ठिकाणावरील वनस्पतींना या पदार्थाचा योग्य प्रमाणात पुरवठा होतो. पोटॅशियम, फॉस्फेट व इतर खनिज पदार्थ आहे तेथेच एकत्र केली जातात व प्रस्वेदन प्रवाहाद्वारे ते वनस्पतींच्या पानांपर्यंत पोहचविले जातात. तद्नंतर त्यांचा उपयोग एकतर वनस्पतींच्या वाढीसाठी होतो किंवा ते जमिनीवरती पालापाचोळ्याच्या स्वरूपात जमा होतात व त्यांचा उपयोग खत-मातीच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेला एक घटक म्हणून केला जातो. ही खत माती पुन्हा वनस्पतींच्या वाढीसाठी वापरली जाते. वनांमध्ये दिसून येणा-या या नैसर्गिक शेतीचे दोन गुणविशेष आहेत. वनस्पतींनी शोषलेले खनिज पदार्थ सतत एका ठिकाणापासून दुस-या ठिकाणी फिरत असतात व जमिनीमधून नव-नवीन खनिज पदार्थ घेऊन या खनिजांच्या संख्येत सातत्याने वाढ होते.

33.

 परिच्छेदानुसार वनांना खनिजे कुठून मिळतात ?

(a) पालापाचोळ्यातून
(b) प्राण्यांच्या अवशेषातून

(c) कवक व जीवाणूकडून 
(d) मातीतून पर्यायी उत्तरे :

34.

खालील विधानांचा विचार करा.

(a) वनखते तयार होण्याची प्रक्रिया वायुजीवी व बिनवायुजीवी असते.

(b) वन खते प्रक्रिया सतावणारी नसते असे नाही

पर्यायी उत्तरे :

35.

खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?

(a) वनखते प्रक्रिया निरंतर चालू असते

(b) पावसाळ्यात ती अतिशय शीघ्र असते

(c) वने येथे, उत्पादक, पुरवठादारक व उपभोक्ता असतात

(d) मानवाचा हस्तक्षेप त्यात नसतो

पर्यायी उत्तरे :

36.

खालील विधाने पहा :
(a) पोटॅश व फॉस्फेट इतर ठिकाणाहून आणली जातात.

(b) त्यांचा उपयोग केवळ खत निर्मितीत होतो.

आता सांगा :

प्रश्न क्रमांक 37 ते 41 :
सहानुभूती हे आयुष्यातील मोठे गुपित आहे. पापी प्रवृत्तीवर मात करून चांगलेपणा तो अधिक सशक्त व दृढ करते. कोणताही विरोध मोडून काढण्याची क्षमता तिच्यात आहे. कठोरातील कठोर हृदयास पाझर फुटेल ही क्षमता देखील सहानुभूतीमध्ये आहे. मानवी स्वभावातील चांगुलपणा या भावनेमुळे अधिक बलवान होत जातो. ती पूर्णपणे प्रेमावर वसलेली भावना आहे. निस्वार्थीपणा व निर्लोभी भावना म्हणजेच सहानुभूती होय. जेव्हा आपण एखाद्याला सहानुभूती दाखवितो तेव्हा आपण स्वत:ला त्याच्या जागी ठेवतो. म्हणूनच आपण त्याची मदत करतो, त्याला करुणा दाखवितो, त्याला मुक्त करतो. सहानुभूतीशिवाय प्रेम असू शकत नाही. तसेच सहानुभूती शिवाय मैत्री देखील असू शकत नाही. करुणेप्रमाणेच सहानुभूती व दानशूरपणा देखील दोन्ही बाजूंना पवित्र करतात. देणा-याला व घेणा-याला दोघांनाही त्याचे फळ मिळतं. देणा-याला यामुळे आत्मिक सुखाचा, आनंदाचा अनुभव घेता येतो. तर घेणाच्यामध्ये यामुळे चांगुलपणा व दानशूरपणा निर्माण होऊन तो दृढे होत जातो.
| मानवी हृदयामध्ये प्रेम निर्माण करणारी सहानुभूतीपेक्षा कदाचितच दुसरी कोणती भावना असेल. कठोरातील कठोर माणूस देखील याच्या प्रभावापासून अलिप्त राहू शकत नाही. शक्तीच्या जोरापेक्षा सहानुभूतीमुळे माणूस आज्ञापालन करण्यास तयार होतो. ज्यांच्या समोर सर्व शक्ती निष्प्रभ ठरल्या असतील त्यांच्यावरती एका हळूवार शब्दाचा, एका प्रेमळ नजरेचा प्रभाव पडू शकतो. जिथे सहानुभूतीमुळे आपल्याला प्रेम व आज्ञापालन करणा-यांची संख्या वाढते, तिथे निष्ठुरतेने आपल्याला फक्त तिरस्कार व विरोधच मिळतो.
सहानुभूतीमुळे मानवतेला श्रेष्ठत्व प्राप्त होते. सहानुभूती म्हणजेच प्रेम, प्रेमाची भावना होय. यामुळेच दबलेल्या व दु:खी व्यक्तींना आपण मदत करू शकतो. जिथे जिथे क्रूरता, अडाणीपणा व दु:ख असेल तिथे-तिथे आपण सहानुभूतीमुळे त्यांच्या जखमांवर कुंकर घालू शकतो, त्यांच्या यातना कमी करू शकतो. अती दु:खाची किंवा शोकाची दृश्ये करुणामय व्यक्तीच्या मनात घर करून राहतात. तो त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. सहानुभूती व न्याय यामुळे जगातील अनेक वाईट चालीरिती संपुष्टात आलेल्या आहेत. मग ती अमेरिका, इंग्लंड व फ्रान्स मधील गुलामगिरी असेल, लोकांचा अडाणीपणा असेल किंवा तळागाळातील लोकांची अप्रगत परिस्थिती असेल. जगातील थोर स्त्री-पुरुषांमध्ये असलेल्या सहानुभूतीमुळेच हे सगळं बदलू
शकलं.

37.

जगातील हुकूमशहा क्रुरतेपेक्षा सहानुभूतीमुळे जास्त यशस्वी होऊ शकतात कारण -
(a) मानवी हृदयाला स्पर्श करण्याची क्षमता कदाचितच सहानुभूतीशिवाय दुस-या कोणत्या भावनेमध्ये असेल.

(b) आम्हाला कोणाची व केशाची पर्वा नाही हे अयोग्य धोरण आहे.

(c) एक चांगला प्रेमळ शब्द नियंत्रण मिळविण्यामध्ये कामाला येतो.

(d) सहानुभूतीमुळेच आज्ञापालन व प्रेम करणारे लोक मिळू शकतात.

पर्यायी उत्तरे :

38.

सहानुभूती हे जगातील मोठे गुपित का आहे?

(a) कारण याशिवाय आयुष्य जगणे शक्य नाही.

(b) जगात शांतता प्रस्थापित करण्याचे हे एक साधन आहे.

(c) अडाणी लोकांवरती राज्य करणं यामुळे शक्य होतं.

(d) थोडीशी सहानुभूती दाखविल्यास आपण लोकांची मनं जिंकू शकतो.

पर्यायी उत्तरे :

39.

सहानुभूतीला 'ट्वाईस ब्लेसिंग' (दुहेरी आशीर्वाद) असे का म्हटले आहे ?

40.

सहानुभूतीमुळे आपण जगामध्ये एकता साधू शकतो कारण :

(a) सहानुभूतीची व्याप्ती मोठी आहे.

(b) जगाची एकता हा देखील लोककल्याणाचा एक भाग आहे.

(c) भेदभाव न करता सर्वांची उन्नती साधणे हाच सहानुभूतीचा हेतू आहे.

(d) बंधुभाव व शांतता यासाठी आपल्याला सहानुभूती ही भावना एकत्र बांधते.

पर्यायी उत्तरे :

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा पूर्व परीक्षा  २०१३ - Paper 2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.