राज्यसेवा पूर्व परीक्षा  २०१३ - Paper 2

राज्यसेवा पूर्व परीक्षा  २०१३ - Paper 2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
61.

क्रमाने येणारी पुढील आकृती दिलेल्या पर्यायांमधून निवडा. 


62.

माणसे नसणाच्या देशातील एका गावात माणसांच्या मेंदूची रचना अशी झाली आहे की लोक चौकशीचे उत्तर दोन वाक्यात देतात. यातील एक वाक्य नेहमीच्या तथ्याचे वर्णन करते व दुसरे अस्तित्वात नसलेल्या तथ्यांचे वर्णन करते. यांच्यापैकी एकजण या भागातील सर्वोत्तम धनुर्धारी आहे. स्वत:च्या धनुकौशल्याचा विकास करण्यासाठी त्याच्याकडून सूचना मिळविण्यासाठी तुम्ही तेथे गेला आहात. त्या ठिकाणी पोहोचल्यावर वडाच्या छायेत बसून गप्पांचा आनंद लुटणाच्या तीन व्यक्ती तुम्हाला आढळल्या. यातील दोघे स्वत:च्या धनुष्याची डागडुजी करत होते. जेव्हा तुम्ही चौकशी सुरू केली तेव्हा त्यांनी पुढील प्रतिसाद दिला,

अनू म्हणाला, ''हे माझे धनुष्य आहे, पण मी आमच्यातील श्रेष्ठ धनुर्धारी नाही."

बनू म्हणाला, " हे माझं धनुष्य नाही, अनू गावातील सर्वोत्तम धनुर्धारी आहे.''

चानू म्हणाला, "मी कधीच धनुष्याला स्पर्श करत नाही. बनु सर्वोत्तम धनुर्धारी आहे.'' तुम्हाला कोणाकडून धनुकौशल्याची सूचना मिळतील?

63.

एका निवडणूकीत 8% मतदारांनी मतदान केले नाही. या निवडणूकीत फक्त दोनच उमेदवार होते. निवडून आलेल्या उमेदवारास एकूण मतांच्या 48% मते मिळून त्याने 1100 मतांनी दुस-या उमेदवाराचा पराभव केला. तर निवडणूकीत एकूण मतदार किती होते ?

64.

ताशी 60 कि.मी. वेगाने गेल्यास मोनोरेल वेळेवर पोहचते. जर वेग 20 कि.मी. ने वाढविला तर एक तास लवकर पोहोंचते, तर मोनोरेल एकूण किती अंतर कापते ?

65.

66.

प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.

67.

सारणीत पाच राज्यांची, पाच वर्षांची लोकसंख्या लाखात दिलेली आहे.

 

राज्य A आणि B मिळून, सर्व वर्षाच्या सरासरी लोकसंख्येचे, राज्य, C, D आणि E मिळून सर्व वर्षाच्या सरासरी लोकसंख्येशी अनुक्रमे प्रमाण काय?

68.

दिलेल्या व्यवस्थेचे अध्ययन करून निम्नलिखित शृंखलेतील क्रमाने येणारे पुढील पद शोधा :

69.

खालील अक्षर त्रिकोणावरून ती व्यवस्था काय आहे ते ओळखा. त्या व्यवस्थेच्या आधारावर सर्वात खालच्या ओळीवर तुमच्या उजवीकडून तिसरे अक्षर कोणते ?

70.

त्रिकोण ABC हा समभुज त्रिकोण आहे. तर OBC हा समद्विभूज त्रिकोण आहे. जर ZBOC हा 100° चा असेल तर ZACO किती असेल?

71.

पाच एकसारखे डबे आहेत. त्यात वेगवेगळ्या वस्तू बंद असून, आतील सामग्रीचे विवरण दर्शक लेबल डब्यावर पुढील प्रमाणे लावलेले आहेत.

कोणीतरी या डब्यांचे लेबल्स अशा प्रकारे बदलविले की, कोणत्याही डब्यामध्ये ती सामग्री नाही, जिचे लेबल त्या डब्यावर आहे. जर WB आणि PP लेबल लावलेले डबे उघडले आणि त्यातील चार वस्तुपैकी कोणतीही घड्याळ नसेल तर WW असे लेबल ज्या डब्यावर असेल त्या डब्याच्या बाबतीत कोणते विधान सत्य असेल?

72.

A, B, C, D, E, F आणि एका कुटुंबाचे सदस्य आहेत, ज्यामध्ये चार वयस्कर असून तीन बालके आहेत, त्यापैकी दोन F आणि G मुली आहेत. A आणि D हे भाऊ असून A डॉक्टर आहे. E एक इंजिनियर असून दोन भावांपैकी एकासोबत विवाहबद्ध असून E ला दोन अपत्ये आहेत. B, D सोबत विवाहित आहे; आणि त्यांचे अपत्य आहे. तर C कोण आहे?

73.

एक काम पूर्ण करायला कबीरला अक्षयपेक्षा 10 दिवस कमी लागतात. तर तेच काम करायला सत्यमला अक्षयपेक्षा15 दिवस जास्त लागतात. जर कबीर आणि अक्षय दोघे मिळून हे काम 12 दिवसांत पूर्ण करत असतील तर अक्षय आणि सत्यमला हे काम पूर्ण करायला किती दिवस लागतील?

राज्यसेवा पूर्व परीक्षा - २०१३ प्र.क्र. ७४ ते ८० चे पर्यायनिहाय गुण दर्शविले असून ते "ANSWER" मध्ये नमूद केली आहेत.

74.

एका सुस्थापित उद्योजकाच्या पत्नीने प्रशासकीय अधिकारी म्हणून तुमच्याकडे दोन मुली असल्यामुळे छळ होत असल्याची तक्रार केली आहे. स्वत:च्या आईवडिलांची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने ते तिला याबाबतीत मदत करू शकत नाहीत असेही तिने तुम्हाला सांगितले आहे. तुम्ही काय कराल?

75.

परीस्थिती : शासनाने राज्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाकडे स्वच्छतालय असावे यासाठी धोरण निश्चीत केले आहे, कारण बहुतांशी रोगराई आणि साथरोग मनुष्यप्राण्याच्या विष्ठेत आढळून येणारे ई-कोली जंतू पाण्यात मिसळून ते दुषित झाल्याने होत असतात. या रोगांमुळे जीवितहानी, वाया जाणारे मनुष्यदिवस आणि रोजगार हानी तसेच औषधोपचारासाठी होणारा खर्च प्रचंड असतो. महिलांची होणारी कुंचबणा ही एक महत्वाची बाब आहेच. जीवनाचा अधिकार म्हणजे प्रतिष्ठेने जगणे असे सर्वोच्च न्यायालयही म्हणते. त्याचप्रमाणे गावातील पर्यावरणही दुषित होते. वस्तुतः मनुष्यविष्ठा शास्त्रोक्त पद्धतीने हाताळल्यास तो सेंद्रिय खताचा एक महत्वाचा स्त्रोत आहे.असे असतांनाही आणि शौचालय न वापरण्याचे गंभीर परिणाम होत असुनही शौचालय असणा-या राज्यातील ग्रामीण कुटुंबाची संख्या 60 टक्के आहे व या 60 टक्क्यापैकी 50 टक्के त्याचा प्रत्यक्ष वापर करतात. या अपयशाचे कारण जे सांगितले जाते ते असे की, शासनाचे शौचालय बांधकाम धोरण हे बांधकाम प्रणित'' असुन त्यामध्ये शौचालयाचा वापर न केल्यामुळे होणाच्या गंभीर परिणामाबाबत जनमानसात जागृति करणे वा त्यांना शिक्षीत करणे याचा अभाव आहे. त्यामुळे प्रखर लोकशिक्षण अभियानाची आज नितांत आवश्यकता आहे असे वाटते. प्रश्न : जर तुम्हाला अशा लोक जागृती अभियानाचा ढाचा तयार करण्यास सांगितल्यास त्यामध्ये प्राधान्यक्रमानुसार
आपण कोणते संदेश अंतर्भूत कराल.

(a) शौचालयाच्या नियमीत वापरामुळे उघड्यावर शौचास बसण्यामुळे आरोग्यावरील होणारे घातक परिणाम कमी
होतील.

(b) गावातील स्वच्छ वातावरण टिकवून ठेवता येईल.

(C) मानवी प्रतिष्ठा, विशेषत: महिलांची प्रतिष्ठा राखता येईल.

(d) कृषी उत्पादकता व अर्थव्यवस्थेला उभारी मिळेल,

पर्यायी उत्तरे : 

76.

शासन प्रतिनिधी व समिती सदस्य म्हणून दोन वर्षाची सरकारी शिष्यवृत्ती देण्यासाठी तरुण कलाकारांची निवड करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. बरेच प्रस्थ असलेला एक मान्यवर कलाकारही तज्ज्ञ म्हणून या समितीचा सदस्य आहे. या प्रतिष्ठेच्या शिष्यवृतीसाठीची मर्यादित यादी अभ्यासताना समितीच्या दुस-या एका सदस्याने तुमच्या लक्षात आणून दिले की अनेक कलाकार हे या मान्यवर कलाकाराच्या संस्थेतील आहेत वा त्याच्या माजी विद्याथ्र्यांच्या संस्थांतील आहेत. तुम्ही काय कराल?

77.

तुम्ही जातीयदृष्ट्या संवेदनशील भागाचे प्रशासकीय प्रमुख आहात. दोन वेगवेगळ्या जातीच्या प्रमुख व्यक्ती प्रक्षोभक भाषणे देऊन आपापल्या जातीतील लोकांमध्ये असंतोष पसरवत आहेत. अशा वेळी तुम्ही. 

78.

परिस्थिती : 1973 सालचा भीषण दुष्काळ आणि वर्ष 2012-13 मध्ये जाणवत असलेला दुष्काळ यामध्ये एक मुलभूत फरक असा की, 1973 सालच्या दुष्काळात अन्नधान्यांची टंचाई मोठया प्रमाणावर होती तर 2012-13 मध्ये पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. हजारो खेडयांना योग्य प्रतीचे सोडाच, परंतु किमान आवश्यक तेवढे पिण्याचे पाणी सुद्धा उपलब्ध नाही. बरीच रब्बी पिके जमिनीत ओलावा नसल्याने पेरताच आलेली नाहीत.

जेथे थोड़े बहुत पाणी उपलब्ध आहे तेथेही नायट्रेड, फ्लोराईड सारख्या रासायनिक प्रदुषणामुळे ते पिण्यास वापरल्यास त्यातुन आरोग्याचे गंभीर प्रश्न निर्माण होतील. मान्सुन सुरु होईपर्यंत कसेही करुन मानवी जीवन वाचविणे हीच मुख्य काळजी आहे. प्रश्न : अशा परिस्थितीत ही तातडीची परिस्थिती हाताळण्याची जबाबदारी आपणावर आल्यास खालीलपैकी कुठली उपाययोजना आपण प्राधान्याने अमलात आणाल.

(a) सर्व सार्वजनिक आणि खाजगी पाणी साठे फक्त पिण्याकरीता राखुन ठेवणे.

(b) शेतक-यांच्या रब्बीचे पिक वाया जावून त्यांचे उत्पन्न बुडू नये, तसेच पिण्याच्या पाण्याची गरज सुद्धा भागविली जावी म्हणून उपलब्ध पाणी या दोन्ही बाबींसाठी 50-50 टक्के वाटप नियोजन करणे.

(c) गरीब शेतक-यांचे उत्पादनाचे एकमेव स्त्रोत संपुष्टात येणार असल्याने आणि त्याचे गंभीर आर्थिक परिणाम पाहता अन्न उत्पादनाला प्राधान्य देवून प्रथम आवश्यक तेवढे पाणी शेतीकरीता राखीव करणे,

(d) पाण्याचे दुर्भिक्ष लक्षात घेऊन आणि दुसरा कोणताही पर्याय नसल्याने रासायनिक प्रदुषित पाणी सुद्धा त्यामुळे होणारे आरोग्यावरील दुष्परिणाम विचारात घेऊनही, मान्सुन सुरु होईपर्यत वापरण्याला प्रोत्साहन देणे, कारण मानवी जीव किमान टिकल्यास अशा रोगावर कालांतराने यथायोग्य उपचार करता येईल.

पर्यायी उत्तरे :

79.

तुमच्या मित्राने त्याचे दुकान एका दुकानदाराला भाड्याने दिले आणि त्या दुकानदाराने मागील एक वर्षापासून भाडे दिलेले नाही व आता तो दुकान रिकामेही करण्यास नकार देत आहे. दुकानदाराने तुमच्या मित्रास दुकान विकत देण्याची मागणी केली आहे परंतु दुकानदाराची खरेदी किंमत बाजार भावाच्या 50% आहे. दुकानदाराने त्याच्या
ओळखीचा वापर करून पोलीसाकडे जाऊ नये म्हणून तुमच्या मित्राला धमकावले आहे. अशा परिस्थितीत तुम्ही एक पोलीस अधिकारी म्हणून कोणता सल्ला द्याल? 

80.

तुम्ही लोकसेवा आयोगाच्या मुलाखतीसाठी जात आहात. रस्त्यात झालेल्या अपघातात काही माणसे अडकलेली तुम्हाला दिसतात. अशा वेळी तुम्ही काय कराल?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा पूर्व परीक्षा  २०१३ - Paper 2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.