राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१७ - मराठी व इंग्रजी

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१७ - मराठी व इंग्रजी Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.

'लक्ष्मी' या शब्दाला समानार्थी शब्द ओळखा. 

(a) कमला

(b) रमा

(c) वैष्णवी 

(d) ज्योत्स्ना 

पर्यायी उत्तरे : 

42.

(a) शब्दयोगी अव्यये सामान्यत: नामांना जोडून येत नाहीत.

(b) शब्दयोगी अव्यये क्रियापदे आणि क्रियाविशेषणे यांना केंव्हा केंव्हा जोडून येतात. 

वरील दोन्ही वाक्ये काळजीपूर्वक वाचून खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.

43.

'समाजात वावरणारे असले 'साप' ठेचून काढले पाहिजेत' या वाक्यातील साप' या शब्दाला कोणती शब्दशक्ती प्राप्त झाली आहे?

44.

'बोका' शब्दाचा लिंग बदल सूचित करणारा शब्द कोणता?

(a) बोकी 

(b) भाटी 

(c) बोकीन 

(d) भाटीन  

पर्यायी उत्तरे 

45.

'राजाने शत्रूला युद्धात हरवूनही शत्रू सैन्याला अभय दिले.' या वाक्यात आलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ खालील पर्यायी उत्तरातून अचूक निवडा.

खाली दिलेला परिच्छेद वाचून प्रश्न क्रमांक 46 ते 50 ची उत्तरे लिहा.
        युवकांचे वाढते सामान्यज्ञान, स्पर्धात्मक परीक्षांमुळे घडणारी बुद्धीची मशागत, दैनंदिन जीवनात प्रसंगपरत्वे घडणाच्या सहज चर्चेमुळे वाढणारा आवाका या गोष्टी व्यक्तीच्या वक्तृत्वक्षमतेचे संगोपन करण्यास साह्यभूत झाल्याशिवाय राहणार नाहीत.
       फक्त एक भीती आहे. दिवसेंदिवस साधनशरणता वाढते आहे. कोणतीही गोष्ट करवून घेण्याकडे सर्वांचा कल आहे. पूर्वी गणिताचा काही भाग तोंडीच उरकला जात असे. आता गुणाकार, भागाकार व बेरोज यासाठीसुद्धा हाती उपकरण लागते.
आहे. स्वत: करणे किंवा करून पाहणे वृत्तीत राहिले नाही. जीवनाच्या सर्व क्षेत्रात बसून पाहणे किंवा पाहत बसणे हा भाव बळावत चालला आहे. माणसे कर्तेपणापासून दूर जात चालली आहेत. मैदानात न उतरता खेळाडू होणार कसा? आखाड्यात पाऊल न टाकता मल्ल होणार कसा? शस्त्र न हाताळता सैनिक होणार कसा? पीठ न मळता स्वयंपाक करणार कसा? कल्पवृक्षाची झाडे लावून व त्याखाली बसून मनोरथाची पूर्तता करून घेण्याचा सुलभ मार्ग केवळ स्वप्नसृष्टीतच असू शकेल. प्रत्यक्ष वहिवाटली जाणारी पायाखालची वाट खडतर असते, हे ठेचा लागल्यावरच कळते. नव्या पिढीला वक्तृत्व मार्गावरच्या ठेचा अनुभवाव्या लागतील. टाकीचे घाव घ्यावे लागतील. 
         अंगी पात्रता असूनही घडणारी उपेक्षा सहन करावी लागेल. वक्तृत्वाच्या क्षेत्रातही प्रस्थापितांचे चक्रव्यूह भेदून आत शिरावे लागेल. विद्याव्यासंगाची कवचकुंडले धारण करून मोठ्या निर्धाराने पुढे जावे लागेल. मैफलीच्या निमंत्रणाची वाट न पाहता आपल्याच मनात एक मैफल भरवून रियाझ करणाच्या गायकाच्या निष्ठेने प्रसंगी आपल्याच मनाशी बोलत राहिले पाहिजे. कोणत्याही सामन्यात कधीही खेळता आले नाही व पुढेही कदाचित मिळणार नाही हे माहीत असूनही बॅट पर जून कोठेही खेळात रममाण होणाच्या क्रीडाप्रेमी क्रिकेटवीराची तन्मयता वक्त्याच्या अंगी असली पाहिजे. मुलामुलींनी वारंवार मनात डोकावून पाहावे व भेटेल त्या व्यक्तीशी मनोभावे बोलावे. उगाच पाल्हाळ माजवू नये. अकारण आखडते घेऊ नये. चालणाराची पावले नकळत पडत राहतात. जेथे पोचायचे ती जागा दिसताक्षणी ती आपोआप थांबतात. कधी ती माजघराजवळ थांबतील, कधी ती कार्यालयाजवळ स्थिरावतील. कधी एखाद्या मंदिराजवळ, तर कधी बसस्टॉपजवळ ती आपोआप थांबतील. निघणे, चालणे, पोचणे व थांबणे या क्रिया सहज व विनासायास घडतात. हे कर्मकौशल्य अंगी बाणले म्हणजे चालता चालता माणूस जगाचा प्रवासी होतो.
          बोलण्याच्या बाबतीत तसेच काही घडू शकते. माणसांच्या या जगात सतत माणसे भेटत राहतात. मित्र, शेजारी, भावंडे, आप्तस्वकीय, गुरुजन, पाहुणे, मार्गावरचे परिचित व अपरिचित, या सर्वांशी कारणपरत्वे बोलावे लागतेच. ते बोलणे साक्षीत्वाने, तन्मयतेने, निरामय तटस्थतेने आणि तरीही तल्लीनतेने करण्याची सवय लावून घेतली, तर अंतर्यामी वक्तृत्वाचा एक वेलू मूळ धरील, नकळत तो गगनाकडे वळेल, मग गगन हेच त्याचे सदन होईल.

46.

वक्तृत्व क्षमतेचे कौशल्य विकसित करण्यासाठी साह्यभूत ठरणाच्या खालीलपैकी कोणत्या गोष्टी उता-यात दिल्या आहेत? 

(a) युवकांचे वाढते सामान्यज्ञान 

(b) स्पर्धात्मक परीक्षांमुळे घडणारी बुद्धीची मशागत 

(c) वाढती साधनशरणता 

(d) दैनंदिन जीवनात प्रसंगपरत्वे घडणाच्या सहज चर्चा

पर्यायी उत्तरे :

47.

कोणती कर्मकौशल्ये अंगी बाणली म्हणजे चालता चालता माणूस जगाचा प्रवासी होतो ? 

(a) निघणे, चालणे 

(b) बोलणे, चालणे 

(c) पोचणे, थांबणे

(d) नियोजन करणे थांबणे 

पर्यायी उत्तरे :

48.

उताच्यासाठी सुयोग्य शीर्षक कोणते ?

49.

लेखकाला कशाची भीती वाटत आहे?

50.

खालीलपैकी कोणती विधाने असत्य आहेत?

(a) जीवनाच्या सर्व क्षेत्रात बसून पाहणे किंवा पाहत बसणे ही भाव बळावत चाललेला नाही. 

(b) माणसे कर्तेपणापासून दूर चालली आहेत. 

(c) दिवसेंदिवस साधनशरणता वाढते आहे. 

(d) माणसांच्या या जगात सतत माणसे भेटत राहतातच असे नाही. 

पर्यायी उत्तरे :

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१७ - मराठी व इंग्रजी Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.