दुय्यम निरीक्षक व सहाय्यक पेपर १ (मुख्य परीक्षा) २०१८

दुय्यम निरीक्षक व सहाय्यक पेपर १ (मुख्य परीक्षा) २०१८ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.

‘बालवयातच मोठ्यांसारखे कष्ट उपसणारी मुले पाहून सर्वांचेच मन द्रवते.' - या वाक्याचे प्रश्नार्थक वाक्य कसे होईल? 

42.

“निघून जाणे' याअर्थीचा पुढीलपैकी कोणता वाक्प्रचार वाईट अर्थाने वापरात असतो?

43.

'मी दारात पाऊल ठेवले तोच दिवे गेले.' 

- यातील मुख्य व गौण वाक्यांचे परस्पर रूपांतर कसे होईल? 

44.

'पिच्छा पुरविणे' याअर्थी पुढीलपैकी कोणता वाक्प्रचार उपयोगात येतो?

45.

‘मेल्या म्हशीला मणभर दूध!' - या म्हणीतून काय सूचित होते ?

46.

‘सगळेच मुसळ केरात!' ही म्हण कशासाठी वापरली जाते ?

47.

पुढीलपैकी कर्मणी प्रयोगातील वाक्य कोणते ?   

(अ) निशा फार वेगात धावते.   

(ब) निनादने चित्रपट पाहिला. 

पर्यायी उत्तरे : 

48.

पुढीलपैकी कोणते लेखन योग्य आहे? 

(अ) संव्हार  

(ब) संहार   

(क) सौहार

पर्यायी उत्तरे :

49.

पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?

(अ) नामास विभक्ती प्रत्यय लागला की सर्वच विशेषणांचे सामान्यरूप या-कारान्त होते

(ब) ऊ-कारान्त विशेषणांचे सामान्यरूप होत नाही. 

पर्यायी उत्तरे :

50.

'पाहता पाहता शेवटी उजाडले' या वाक्यातील ‘उजाडले' हे क्रियापद कोणत्या प्रकारातील आहे ?

51.

धातूला विविध प्रत्यय लागून क्रिया अपूरी दाखविणा-या शब्दांना काय म्हणतात ?

52.

भूपति' या शब्दाला समानार्थी शब्द सांगा. 

(अ) रमापती 

(ब) उमापती   

(क) नरेश 

(ड) दशानन

पर्यायी उत्तरे : 

53.

पुढील वाक्य कोणत्या प्रकारातील आहे? - ‘एकेक विषय संपवीत संपवीत प्रसादने महिनाभरात सर्व अभ्यास पूर्ण केला.'

54.

‘परिस्थिती नेहमी सारखीच असते, असे नाही, ती बदलत असते.' हे सांगण्यासाठी कोणती म्हण उपयोगात येते ?

55.

पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा - 'पुण्यात्मके पापे स्वर्गा जाईजे',

खालील उतारा वाचा व त्यावरील प्रश्न क्र. 56 ते 60 सोडवा.

           शिक्षणक्रमात नीतिशिक्षणाची सोय करावयास पुष्कळ जागा आहे. सामान्य शिक्षणच नीट सुधारले - ते देण्याची पुस्तके व पद्धती बदलून हव्यात तशा केल्या म्हणजे मुलांची नीतिमत्ता वाढविण्यास पुष्कळ वाव मिळेल,
            सगळ्या नीतिमत्तेचे मूळ सामाजिक जीवितात आहे. इतरांशी कोणत्याही हेचा संबंध नाही, कोणास उपद्रव नाही, कोणाचा संपर्क नाही-कोणाचे साहाय्य नको-कोणाचे कर्ज नको, अशा स्थितीत, सारांश-माळेतून तुटून निघालेल्या मण्याप्रमाणे एकाकी स्थितीत जन्म घालविणे माणसाला शक्य व इष्ट असते तर ज्या वर्तननियमांस आज आपण नीतिनियम म्हणतो त्यांचा संभव झाला नसता. अशा माणसांच्या आचरणात नीतिचा विचारच शिरत नाही. वाहते वारे आणि तापते ऊन, खालची जमीन आणि वरचे आकाश, याशिवाय दुस-या कोणाची ज्यांस ओळख नसणार किंवा कोणाशी प्रसंग नसणार, झाडपाला, कंदमुळे आणि धोटभर पाणी याशिवाय ज्यांस कशाची जरूर नसणार, अशा फटिंगभाईस नीती-अनीतीचे कारणच नाही. सर्व मानवजाती जर
शीच असती तर तिलाही नीती-अनीतीचे कारण नसते. परंतु असले एकाकी जीवित मनुष्यास कधी आवडले नाही आणि अनुभवता आले नाही. मनुष्याच्या मानवेतर पूर्वजांसही लाखो पिढ्यांच्या मार्गपर्यंत एकटे राहा आजच्याहून अन्य मार्ग जोपर्यंत सृष्टीस सापडणार नाही तोपर्यंत मनुष्यास एकटे राहणे शक्य नाही-इष्ट नाही.
            एकाची दोन झाली की नवे संबंध-नवे भाव-नवे विचार-नव्या प्रेरणा आल्या, वागण्यात सामान्यतः ठराविकपणा ठेवण्याची जरूर आली आणि नीतिचा उगम झाला. आज मनुष्य एकटा नाही, दुकटा नाही, असंख्य टा' - नवीन शब्द बनविला तर-झाला आहे. त्याप्रमाणे त्याचे चरित्रही तितकेच असंख्य रंगांचे आणि असंख्य घटकांचे झाले आहे. नित्य नवे प्रसंग-नित्य नवे संबंध - नित्य नवे लागेबांधे निर्माण होत आहेत आणि मनुष्याच्या ऐहिक जीविताचे जाळे घोटाळ्याचे बनत आहे-बनले आहे. त्यामुळे या चक्रव्यूहात्मक संसारात दिशाभूल न होता, वाट फारशी न चुकता; आपापला कार्यभार वाहून नेण्यास मनुष्याच्या आचरणास होकायंत्राप्रमाणे काही ठरीव वळणे लागलेली पाहिजेत. ती लावावयाची म्हणजे ज्या सामाजिक जाळ्यामुळे त्यांची जरूर लागली आहे ते लहानशा प्रमाणावर मुलांच्या आयुष्यात आणि संसारात उत्पन्न करावयाचे. त्यांचे दुस-यांशी संबंध वारंवार घडवून आणावयाचे. आज दोन मुलांशी - उद्या तिहींशी, परवा चारांशी - अशा रीतीने त्यांस खेळायास आणि जोडीने काम करायास लावायाचे आणि अशा प्रसंगी सगळे गाडे सुरळीत चालण्यासाठी अवश्य असेच वर्तन त्यांचे हातून घडवायचे. तसे न वागल्याचे परिणाम त्यांना भोगायास लावायचे, नीतिशिक्षणाचा हा मार्ग अवलंबण्याचे शिक्षकाने मनात आणिल्यास त्यांना ते हल्लीही करता येणार आहे.

56.

एकाकी राहणा-या माणसाला नीतिची जरूर का नसते ?

57.

नीतिशिक्षणाचा कोणता मार्ग लेखक सुचवितात ?

58.

मनुष्यास एकटे राहणे शक्य वा इष्ट की नाही? 

(अ) एकाकी जीवन त्याला आवडत नाही. 

(ब) वंशरक्षणासाठी सामूहिक जीवनाखेरीज अन्य पर्याय नाही. 

पर्यायी उत्तरे : 

59.

सामूहिक जीवनात नीतिनियमांची जरूर को भासते ?

60.

प्रस्तुत उता-यास कोणते शीर्षक योग्य ठरेल?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

दुय्यम निरीक्षक व सहाय्यक पेपर १ (मुख्य परीक्षा) २०१८ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.