कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती 2019

कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती 2019 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.
गोपाळ 100 पायऱ्या चढून एका देवालयात जातो. वर जाताना त्याने प्रत्येक पायरीवर तिच्या क्रमांकाएवढी फुले ठेवल्यास, त्यास किती फुले बरोबर न्यावी लागतील ?

42.
एका पाकिटात काही 5 रुपयांच्या व काही 10 रुपयांच्या नोटा आहेत. नोटांची एकूण किंमत 350 रु. आहे. 5 रुपयांच्या नोटांची संख्या 10 रुपयांच्या नोटांच्या संख्येच्या दुपटीपक्षा 10 ने कमी आहे, तर पाकिटात 5 रुपयांच्या व 10 रुपयांच्या किती नोटा आहेत ?

43.
जोसेफचे वजन त्यांच्या लहान भावाच्या वजनाच्या दुप्पट आहे. दोघांचे मिळून वजन 63 किग्रॅ आहे, तर जोसेफचे वजन किती ?

44.
एका खोक्याची लांबी 20 सेंमी रुंदी 10.5 सेंमी व उंची 8 सेंमी असल्यास त्याचे घनफळ किती ?

45.
एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 1386 चौसेमी असेल तर त्याचा परीघ किती असेल ?

46.
राहुलने पाच एकदिवशीय सामन्यांत सरासरी 48 धावा केल्या. पहिल्या ● तीन सामन्यांत त्याने सरासरी 40 धावा काढल्या असून, चौथ्या सामन्यात त्याने 70 धावा केल्या आहेत; तर त्याने पाचव्या एकदिवसीय सामन्यात किती धावा केल्या असतील ?

47.
एका नावेत सरासरी 25 किग्रॅ वजनाची 40 मुले बसलेली आहेत. नावाड्यासह सर्वाचे सरासरी वजन 26 किग्रॅ आहे; तर नावाड्याचे वजन किती ?

48.
20  मीटर कापडाची किंमत रुपये 3600 आहे, तर 16 मीटर कापडाची किंमत किती ?

49.
4 मीटर लांबी व 3 मीटर रुंदी असलेल्या एका भिंतीला रंग द्यायचा आहे, एका चौरस मीटरला 25 रुपये मजुरी असल्यास रंग देण्यासाठी किती मजुरी द्यावी लागेल ?

50.
दुपारी 3 वाजून 45 मिनीटांनी सुरु झालेला चित्रपट अडीच तासांनी संपला, म्हणजे तो किती वाजता
संपला ?   

51.
चार अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून तीन अंकी लहानात लहान संख्या वजा केली तर येणारी संख्या कोणती ?

52.
एका विद्यार्थी वसतिगृहातील 20 विद्यार्थ्यांचा 10 दिवसांचा खर्च रुपये 5,000/- होतो, तर त्याच वसतिगृहातील 32 विद्यार्थ्यांचा 7 दिवसांचा खर्च किती होईल ?

53.
एका ट्रॅक्टरच्या चाकाचा व्यास 2.1 मी आहे. त्या चाकाने 250 फेऱ्यात काही अंतर कापले, तर कापलेले अंतर किती ?

54.
एका आयताची लांबी व रुंदी यांची बेरीज 8 सेमी व वजाबाकी 2 सेमी 'आहे, तर त्याचे क्षेत्रफळ किती ?

55.
प्रियंका व दीपिका यांच्या वयांची बेरीज 34 वर्षे आहे. प्रियंका दीपिकापेक्षा, 6 वर्षांनी मोठी आहे, तर त्यांचे वय काढा.

56.
एका प्राणिसंग्रहालयात सिंह आणि मोर यांची एकूण संख्या 50 आहे. त्यांच्या पायांची एकूण संख्या 140 आहे, तर प्राणिसंग्रहालयातील सिहांची व मोरांची संख्या काढा.

57.
रुपये 200 च्या वस्तुची किंमत 20% ने वाढवली. नंतर ही वाढवलेली किंमत 20% ने कमी केली, तर या वस्तूची शेवटची किंमत तिच्या मूळ किमतीपेक्षा कितीने कमी किंवा जास्त होईल ?

58.
इ.स. 1848 ते 1856 या काळात अनेक संस्थाने कोणी खालसा केली?

59.
1857 च्या उठावास “स्वातंत्र्ययुध्द " असे कोणी संबोधिले?

60.
"पॉव्हर्टी ॲन्ड अनब्रिटीश रूल इन इंडीया" हा ग्रंथ कोणी लिहीला ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती 2019 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.