जळगाव जिल्हा पोलीस शिपाई भरती 2019

जळगाव जिल्हा पोलीस शिपाई भरती 2019 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
81.
22 माणसे 16 दिवसांत एक विहीर खणतात, तर 32 माणसे तिच विहीर
किती दिवसांत खणतील ?

82.
एक आगगाडी 3 सेकंदात 60 मिटर अंतर जाते, तर त्या आगगाडीचा ताशी वेग किती ?

83.
नेहाचे 13 वर्षापुर्वी वय 21 वर्षे होते, तर ती किती वर्षानी 45 वर्षाची होईल ?

84.
5 वर्षापुर्वी रिना आणि रोहिणीचे सरासरी वय 25 वर्षे होते, आज रिना, रोहिणी व ज्योतीचे सरासरी वय 35 वर्षे आहे, तर 10 वर्षापुर्वी ज्योतीचे वय किती होते ?

85.
एका स्पर्धा परिक्षेत बरोबर उत्तरासाठी 2 गुण मिळतात व चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण कमी होतो, जर एका उमेदवाराने 30 प्रश्न सोडवून त्यास 30 गुण मिळाले असतील तर त्याचे किती प्रश्न बरोबर असतील ?

86.
जळगाव येथे प्रचारादरम्यान काही आमदार जमले होते, त्या सर्वानी एकमेकांशी हस्तांदोलन केले तेव्हा एकूण 66 हस्तांदोलने झाली तर प्रचारसभेत एकूण किती आमदार असतील ?

87.
परिक्षेत बसलेल्या 130 विद्यार्थ्यापैकी 62 विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले, 52 विद्यार्थी गणितात नापास झाले, तर 24 विद्यार्थी इंग्रजी व गणित दोन्ही विषयात नापास झाले, तर शेवटी पास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती ?

88.
पाच मित्र A, B, C, D आणि E एका रांगेत दक्षिणेकडे तोंडे करून उभे आहेत. परंतु याच क्रमाने असणे आवश्यक नाही. फक्त B हा A आणि E यांच्यामध्ये आहे, C हा E ला जोडून डावीकडे आहे आणि D हा A ला जोडून डावीकडे आहे. या माहितीच्या अनुसरून खालीलपैकी कोणते विधान निश्चीत सत्य आहे ?

89.
एका वर्तुळाभोवती सहा घरे आहेत. ज्योती आणि सिमा परस्परसमोर राहतात. मेरी लिलाजवळ राहते, अमन सिमाजवळ राहत नाही. शफी मेरीच्या समोर राहतो, तर ज्योतीजवळ कोण राहते ?

90.
P, Q व R ही तीन गावे आहेत. P व Q मधील अंतर 60 किमी असून P व R मधील अंतर 80 किमी आहे. Q हे P च्या पश्चिमेस आहे आणि R हे P च्या दक्षिणेला आहे तर Q आणि R मधील अंतर किती ?

91.
5 तास 33 मिनीटे = ....... तास ?

92.
997= ?

93.
7056 या संख्येचे वर्गमुळ किती ?

94.
गौरीचा जन्म शुक्रवार दि. 10/09/1993 रोजी झाला तर तिचा तिसरा वाढदिवस कोणत्या वारी आला असेल ?

95.
खाली दिलेल्या समिकरणात + म्हणजे X,  - म्हणजे ÷,  X म्हणजे -  व ÷ म्हणजे + असेल तर येणाऱ्या समिकरणाचे उत्तर काय  असेल ?
14 ÷ 48 - 8 x 4 + 5

96.
5 बगळे, 5 मासे 5 मिनीटात खातात, तर 1 बगळा 1 मासा किती मिनीटात खात असेल ?

97.
माणसांच्या एका गटात काही जोडपी आहेत. उरलेले लोक एकएकटेच आहेत. यापैकी विवाहीत लोकांची संख्या 60% आहे आणि पुरुषांची संख्या 54% आहे, तर या गटात एकएकट्या स्त्रीयांची संख्या किती टक्के आहे ?

98.
समान आकारमानाचे 2 ग्लासेस अनुक्रमे 1/3  व  1/4 दुधाने भरलेले आहेत. त्यानंतर ते दोन्ही ग्लास पुर्ण भरेपर्यंत त्यात पाणी ओतण्यात आले आणि त्यानंतर त्या दोन्ही ग्लासेस मधील द्रव्य एका भांडयात एकत्रीत करण्यात आले तर त्या भांडयातील दुध व पाण्याचे प्रमाण काय असेल ?

99.
दोन शहरे A व B एकमेकांपासून 360 किमी अंतरावर आहेत एक कार A पासून B पर्यंत 40 किमी/तास वेगाने जाते व परतीचा प्रवास 60 किमी / तास या वेगाने करते, तर त्या कारचा सरासरी वेग किती ?

100.
मेंढपाळ व मेंढया यांचे प्रमाण 1:4 असून त्यांच्या पायांची संख्या ही डोक्यांच्या संख्येच्या 4 पटीपेक्षा 10 ने कमी आहे, तर मेंढपाळांची संख्या किती ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जळगाव जिल्हा पोलीस शिपाई भरती 2019 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.