कर सहाय्यक गट - क परीक्षा २०१६

कर सहाय्यक गट - क परीक्षा २०१६ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.

“निदान कामाच्या पहिल्या दिवशी तो लवकर यावा.'' - हे कोणत्या प्रकारातील वाक्य आहे?

22.

'अर्धामुर्धा' हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारातील आहे?

23.

“तो मोठा मतलबी मनुष्य आहे. त्याच्या _______ हे चांगले!''
- रिकाम्या जागी पुढीलपैकी कोणता वाक्प्रचार योग्य ठरेल? 

24.

'उदार' या विशेषणापासून भाववाचक नाम घडविण्यासाठी कोणते प्रत्यय उपयोगात येतात ?

25.

'दशभुजा' हा कोणत्या प्रकारचा समास आहे ?

26.

“साने गुरुजी अतिशय संवेदनशील होते." - या वाक्याचे उद्गारार्थी वाक्यात रूपांतर पुढीलपैकी कोणते असेल?

27.

खालील म्हणीचा योग्य अर्थ सांगा.
'उथळ पाण्याला खळखळाट फार.'

28.

“आर्थिक वाढ पाच टक्क्यांवरून आठ टक्क्यांवर नेण्यासंबंधी रघुराम राजन यांचे मत प्रतिकूल होते.”
- या वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर करताना पुढीलपैकी कोणता पर्याय उपयोगात आणता येईल?

29.

'पळणा-यास एक वाट, शोधणायास बारा वाटा' या म्हणीतून काय व्यक्त होते ?

30.

''समारंभास नागरिक (मोठी संख्या) ने उपस्थित होते." - कंसातील शब्दांचे कोणते रूप येथे योग्य ठरेल?

31.

पर्यायी उत्तरांतील 'नकारार्थी वाक्य' ओळखा.

32.

"सातपुडा परिसरात होळीच्या आठ दिवस आधी भोंगच्या बाजार भरतो.'' - या वाक्यातील उद्देश्य कोणते ? 

33.

‘तपोधाम' ही संधी पुढीलपैकी कोणत्या प्रकारे सोडवता येईल?

34.

पुढीलपैकी कोणत्या शब्दास विविध अर्थ नाहीत?

35.

"माधुरी पुरंदरे यांनी शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे पुस्तक लिहिले आहे." - अधोरेखित शब्द पुढीलपैकी कोणत्या स्वरूपाचे आहेत?

36.

पुढीलपैकी कोणत्या वाक्यामध्ये प्रयोजक क्रियापद आहे?

खालील उतारा वाचून त्यापुढे दिलेल्या प्रश्न संख्या 36 ते 40 ची उत्तरे लिहा.
          एखादं व्याख्यान म्हणा, प्रवचन म्हणा - फक्त ऐकलं, म्हणजे फक्त श्रवणभक्ती केली, तर ऐकताना काहीतरी समजल्यासारखं वाटतं. व्याख्यान फारच प्रभावी असेल तर आपण अगदी भारावून जातो. पण कसोटीच्या वेळी त्यातलं फारसं काही स्मरत नाही. अर्थात हे सारं क्षुल्लक चकाट्यांच्या संदर्भात नसून ज्ञानलक्ष्यी विवेचनाच्या संदर्भात घ्यायचं आहे. आपण स्वत: पुस्तकं वाचली, टिप्पणी तयार केली तर बरचं सखोल ज्ञान होतं पण स्वत: प्रयोग करून पाहिले तर मात्र ज्ञान पक्कं होतं. विज्ञान शिक्षणाच्या बाबतीत आपण हे अनेक वेळा ऐकतो आणि ते खरंही आहे.
          पण याचा पुढचा भाग अधिक महत्त्वाचा आहे. दुसया कुणीतरी प्रयोगाचं साहित्य जमवून टेबलावर मांडून ठेवलं असेल, प्रयोग कसा करायचा वगैरे सर्व ठरवलं असेल तर प्रयोग करून थोडं फार कौशल्य येतं यात शंका नाही. पण विज्ञानाचं खरं मर्म समजून घ्यायचं असेल तर संपूर्ण प्रयोगाचं नियोजन आपण केलं पाहिजे. प्रयोग कशासाठी करायचा आहे, त्यासाठी किती सामुग्री लागेल, कोणती उपकरणं लागतील, त्यातलं एखादं उपलब्ध नसेल तर दुसरं कोणतं वापरता येईल, प्रयोग यशस्वी झाल्याच्या खुणा कोणत्या, 'अयशस्वी' म्हणजे काय वगैरे प्रश्नांची उत्तरे आपल्याला ठाऊक पाहिजेत. या प्रश्नांची उत्तरं शोधणं यातच अनेकदा प्रयोगाचं रहस्य दडलेलं असतं. वरकरणी अयशस्वी ठरलेल्या कित्येक प्रयोगांनी विज्ञानाची नवी क्षेत्रं खुली केली आहेत. प्रयोगाचं मर्म समजू लागलं की 'अयशस्वी' आणि 'अनपेक्षित' यातला फरक ओळखता येऊ लागतो. योजकता वाढीस लागते. पण बहुधा अशी संधी फारशी कोणाला मिळत नाही. वाट्याला येतो तो फक्त प्रयोगशाळेत कवायत करण्याचा तास. अशी कवायत करून प्रयोग-विज्ञानाचा संस्कार घडत नसतो.
           हे सारं विज्ञानाच्या विद्यार्थ्यांसाठीच असतं, इतरांना त्याचा स्पर्श झाला नाही तरी चालेल - हा एक फार मोठा गैरसमज. 'विज्ञान' ही व्यावसायिक वैज्ञानिकांची मिरास नव्हे. ज्यात विज्ञानाचा फारसा काही संबंध नाही असं वाटत होतं अशा ज्ञानशाखांखालून अस्सल विज्ञानाचा केवढा मनगटाएवढा झरा वाहत आहे याची कल्पना आता येऊ लागली आहे. विज्ञान सर्वत्र आहे. त्याचे संस्कार सर्वांवर व्हायला हवेत. तरच आगामी शतक सुखाचं जाईल.
           दुसरा गैरसमज असा की, विज्ञानाचे संस्कार विद्यार्थी शाळेत किंवा कॉलेजात गेल्यावर घडतील. 'विभास किती लहान आहे, पद्मजा तर परकरी पोर आहे' या वृत्तीमुळेच कर्तबगारीची बीजं कुजवली जातात. नियोजनाचे संस्कार लहानपणापासून घडवता येतात. घडवावे लागतात म्हणूनच लहान मुलांना बाजारहाट करताना बरोबर घेऊन जाणं, प्रवासात सामान किती घ्यावं, बॅग कशी भरावी याचं नियोजन करू द्यावं. पिशवीत बटाटे किंवा सुरण खाली घालून टोमॅटो अगदी वर ठेवावे ही समजूत आपण समजतो तितकी सामान्य नाही.

37.

प्रयोगाचे रहस्य अनेकदा कशात दडलेले असते?

38.

प्रस्तुत उताऱ्यास कोणते शीर्षक योग्य ठरेल? 

39.

स्वतः प्रयोग करून पाहिल्याने ज्ञान पक्के होते,हे केव्हा खरे ठरते ?

40.

लेखक येथे कोणता विचार मदत आहेत ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

कर सहाय्यक गट - क परीक्षा २०१६ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.