राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८ GS-2

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८ GS-2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.

भारतीय संसदेच्या अधिकारावर असलेल्या मर्यादेबाबत खालील विधाने विचारात घ्या :
(a) बहुतेक विधेयके ही राष्ट्रपतींच्या पूर्व संमतीने संसदेत सादर करावी लागतात.

(b) राज्यघटनेने निर्धारित केलेल्या मर्यादेच्या आत राहून संसदेला कृती करावी लागते. (c) संसदेने मंजूर केलेले कायदे जर राज्यघटनेतील तरतूदीशी विसंगत असतील तर ते सर्वोच्च न्यायालयाकडून घटनाबाह्य म्हणून घोषित होवू शकतात.

(d) राज्यघटनेद्वारा नागरिकांना जे कांही मूलभूत हक्क बहाल केलेले आहेत त्यामूळे संसदेची अधिसत्ता मर्यादित होते.
पर्यायी उत्तरे :

22.

जम्मू आणि काश्मिर राज्यास असलेल्या विशेष दर्जाबाबत खालीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/त?
(a) सर्व कायद्यांना राज्यात लागू करण्यासाठी संसदेला राज्य शासनाची मान्यता आवश्यक असते.

(b) भारतीय संसद राज्य विधिमंडळाच्या संमती शिवाय राज्याच्या सीमा वाढवू अथवा कमी करू शकत नाही.

(c) भारतीय राज्यघटनेचा भाग IV आणि IV-A हा राज्यास लागू आहे.

पर्यायी उत्तरे :

23.

भारताच्या उपराष्ट्रपतींची निवड करण्यासाठीच्या निर्वाचक गणांमध्ये (इलेक्टोरल कॉलेज)
_________ समावेश होतो.

24.

पुढील विधानांपैकी कोणती बरोबर आहेत ?
(a) केंद्रातील मंत्रिमंडळ हे सामूहिकरित्या संसदेला जबाबदार असतात.

(b) लोकसभा व राज्यसभा यांचे सदस्य असलेल्या व्यक्ती ह्या केंद्रीय मंत्रीमंडळामध्ये मंत्री होण्यास पात्र असतात.
पर्यायी उत्तरे :

25.

अनुसूचित जातींसाठीच्या राष्ट्रीय आयोगाची कार्ये कोणती आहेत ?
(a) अनुसूचित जातींसाठीच्या कार्यदेशीर सुरक्षा उपायांशी संबंधित सर्व बाबींची तपासणी व परीक्षण करणे.

(b) संसदेला अहवाल सादर करणे.

(c) अनुसूचित जातींच्या सामाजिक व आर्थिक विकासाच्या नियोजन प्रक्रियेत सल्ला देणे. पर्यायी उत्तरे :

26.

भारतीय राज्यघटनेतील _______ सार्वजनिक स्वरूपात फाशी देण्याविरुद्ध अधिकार प्रदान करते.

27.

भारतीय घटनेच्या तिस-या आणि चौथ्या भागासाठी ‘राज्य' या संज्ञेमध्ये :
(a) भारत सरकार आणि संसद

(b) प्रत्येक राज्याचे सरकार आणि विधीमंडळ

(c) स्थानिक शासन

(d) भारतीय प्रदेशातील किंवा भारत सरकारच्या नियंत्रणाखालील इतर शासकीय संस्था यांचा समावेश होतो

वरीलपैकी कोणते/ती विधान/विधाने बरोबर आहे/त? 

28.

भारतीय संघराज्यासंबंधीची खालील विधाने लक्षात घ्या :
(a) अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियाच्या घटनांमधून भारतीय राज्यघटनेने संघराज्याची वैशिष्ट्ये घेतली आहेत.

(b) घटक राज्यांमधील कराराचे फलित म्हणजे भारतीय संघराज्य.

(c) भारतीय संघराज्यातील घटकांना फुटून निघण्याचा अधिकार आहे.

कोणते विधान/ने बरोबर नाही/नाहीत?

29.

खालील विधाने विचारात घ्या :

(a) धर्मनिरपेक्ष राज्य' म्हणजे राज्य सर्व धर्माचे समान संरक्षण करते आणि कोणताही एक धर्म राज्यधर्म म्हणून मानत नाही,

(b) राज्यघटनेच्या शिल्पकारांनी अनुच्छेद 25, 26 आणि 27 स्विकारून धर्मनिरपेक्षतेला चालना दिलेली आहे.

(c) धर्मनिरपेक्षता हा राज्यघटनेच्या पायाभूत संरचनेचा भाग आहे.

वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/त?

30.

राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाने जानेवारी 2014 पर्यंत भारतातील ________ समुदायांना अल्पसंख्यांक समुदाय म्हणून सूचित केले होते.

31.

खालीलपैकी कोणते विधान/विधाने योग्य आहेत ?
(a) राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष हे त्या सभागृहाचे सदस्य नसतात.

(b) उपाध्यक्ष जेव्हा सभागृहाचे कामकाज चालवतात तेव्हा ते पहिल्या फेरीत मतदान करू शकतात.

पर्यायी उत्तरे :

32.

राज्यसभेचे अध्यक्ष _______ पेक्षा अधिक संख्या नसलेल्या उपाध्यक्षांच्या पॅनेलचे नामांकन करतात

33.

_______  या सध्याच्या राज्यांच्या काही भागांनी मिळून बनलेल्या वेगळ्या बुंदेलखंड राज्याच्या निर्मितीची मागणी करण्यात आली आहे.

34.

खालीलपैकी कोणते विधान भारतीय राज्यघटनेच्या चौथ्या परिशिष्टाचे अचूक वर्णन करते?

35.

खालीलपैकी कोणते आदेश हे फक्त न्यायिक आणि अर्धन्यायिक अधिसत्तेविरोधात काढता येतात ?

36.

2003 मधे राज्यसभेच्या निवडणुकीत कोणते दोन बदल करण्यात आले?
(a) उमेदवार संबंधित राज्याचा निवासी असण्याची आवश्यकता नाही आणि खुली मतदान पद्धती

(b) गुन्हेगारी प्रकरणात नाव असल्यास अपात्र आणि उत्पन्नाची खरी माहिती

(c) राजकीय पक्षाचे सभासदत्त्व आणि 10 वर्षे राजकारणाचा अनुभव

(d) पराभूत उमेदवार नसावा आणि वयोमर्यादा 70 वर्षापेक्षा अधिक नसावी

पर्यायी उत्तरे :

37.

समाजवादी पक्षाबाबत काय खरे आहे?
(a) समाजवादी पक्ष 1938 मध्ये काँग्रेस पासून वेगळा झाला.

(b) आचार्य नरेंद्र देव हे समाजवादी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष होते.

(c) जयप्रकाश नारायण, एस.एम. जोशी, अशोक मेहता हे समाजवादी पक्ष/प्रजा समाजवादी पक्षाचे नेते होते.

पर्यायी उत्तरे : 

38.

भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 19(2) अन्वये भाषण स्वातंत्र्याच्या अधिकारावर लादलेल्या प्रतिबंधाचे आधार कोणते आहेत?
(a) न्यायालयाचा अवमान 
(b) बदनामी

(c) कायदे मंडळाचा अवमान
(d) राज्याची सुरक्षितता

पर्यायी उत्तरे :

39.

'कामराज प्लॅन/योजना' म्हणजे काय?

40.

योग्य कथन ओळखा :
(a) भारताच्या निवडणूक आयोगाची स्थापना 26 नोव्हेंबर 1949 रोजी झाली.

(b) संयुक्त राष्ट्रे व राष्ट्रकुल सचिवालयाच्या सहकार्याने इतर राष्ट्रांतील निवडणूकीसाठी भारताचा निवडणूक आयोग तज्ञ व निरीक्षक उपलब्ध करून देतो.

पर्यायी उत्तरे :

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८ GS-2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.