राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१३ - Paper 1

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१३ - Paper 1 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
81.

खालीलपैकी कोणत्या एका राज्याने भारतात सर्वप्रथम ''सेझ'' विषयक धोरण रद्द केले?

82.

उच्च न्यायालयाच्या खालीलपैकी कोणत्या मुख्य अधिकार कक्षा आहेत ? 

(a) मूळ अधिकारिता

(b) अपिलीय अधिकारिता 

(c) पर्यवेक्षकीय अधिकारिता

(d) सल्लागारी अधिकारिता

83.

युद्ध, परकीय आक्रमण किंवा लष्करी उठाव यामुळे निर्माण होणा-या आणीबाणीच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी घटनेने केंद्र शासनाला कोणते विशेष अधिकार दिले आहेत?

योग्य पर्याय निवडा.

(a) केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये महसूल वाटपाच्या संदर्भात असलेल्या तरतुदींमध्ये केंद्र बदल करु शकते.

(b) राज्यांना त्यांचे कार्यकारी अधिकार वापरण्यासंदर्भात केंद्र शासन आदेश देऊ शकते.

(c) राज्य सूचीमध्ये अंतर्भूत कोणत्याही विषयावर संसद कायदे करु शकते. 

(d) उच्च न्यायालयाचे न्यायाधीश तसेच राज्य सरकारच्या कर्मचा-यांच्या पगारात कपात करण्याचे आदेश केंद्र शकते.  

84.

रिकामी जागा योग्य शब्दाने भरा.

एका शासकीय नोकरास लाच घेताना पकडण्यास्तव तयार केलेल्या सापळ्यात फेनॉफथेलीन पावडर लावलेल्या नोटा वापरल्या गेल्या. गुन्ह्यासाठी पुरावा म्हणून त्यावर शिंपडलेले सोडियम कार्बोनेट _______ रंगाचे व्हावयास हवे.

85.

भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये व जगातील इतर राज्यघटनेची उसनवारी यांच्या जोड्या लावा. (योग्य पर्याय निवडा)


86.

ऑस्कर पिस्टोरियस इतक्यात बातम्यांत होता. त्याच्याबद्दल पुढीलपैकी काय खरे नाही ? 

(a) त्याला ऑलिम्पिक ‘ब्लेड रनर' म्हणून ओळखले जाते.

(b) त्याने त्याच्या प्रेयसीला - रोव्हा स्टोनकॅम्पला व्हॅलेन्टाइन डे ला गोळ्या घालून ठार केले.

(c)  त्याने लंडन ऑलिम्पिकमध्ये भाग घेऊन पॅराऑलिम्पिकमध्ये पारितोषिके मिळविली.

(d) तो युनायटेड किंगडमचा धावपटू आहे.

(e) त्याच्या खालील पायांना हाडे नाहीत व तो कृत्रिम पायांनी धावतो.

(f) त्याचा दावा आहे की त्याने चोर समजून त्याच्या प्रेयसीचा खून केला परंतु हा पूर्वनियोजित कट होता असा त्याच्यावर आरोप आहे. 

87.

सन 2011 च्या जनगणनेनुसार भारतातील सर्वात अधिक लोकसंख्या असलेली पाच शहरे त्यांच्या उतरत्या लोकसंख्येच्या क्रमात कोणती आहेत ?

88.

एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना हटवता येऊ शकते जर :
(a) राज्यसभा किंवा विधान परिषदेच्या दोन तृतीयांश सदस्यांनी तसा ठराव केला.
(b) राज्यपालांच्या मते राज्यामधे घटनात्मक सरकार व्यवस्था ढासळली आहे.

(c) विधान सभेने अविश्वास ठराव मंजूर केला.

(d) राज्य कायदेमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी अविश्वास ठराव मंजूर केला.

पर्याय : 

89.

खालीलपैकी कोणती व्यक्ती, संस्था, चळवळी संबंधी सन 2012-2013 मध्ये शताब्दी नव्हती ?

90.

73व्या घटनेदुरुस्तीनुसार पंचायती संस्थांच्या रचनेबद्दलच्या कोणत्या तरतुदी राज्य सरकारांसाठी ऐच्छिक आहेत ?

(a) 2-3 स्तरीय रचना

(b) निश्चित कार्यकाळ

(c) ग्राम सभेची भूमिका व व्याप्ती 

(d) जिल्हा नियोजन समिती

91.

महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायद्यात पदाधिकाच्याविरुद्धच्या अविश्वास ठरावाच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?

92.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांचा निर्धारित कार्यकाळ :

93.

भारतीय नागरिकांना उपलब्ध असलेल्या घटनात्मक संरक्षणाच्या हक्काच्या खालीलपैकी कोणत्या तरतुदी आहेत ?

अचूक उत्तराचा योग्य तो संकेत निवडा.

(a) मूलभूत हक्कांची अंमलबजावणी व्हावी यासाठी नागरीक न्यायालयात दाद मागू शकतात.

(b) मूलभूत हक्कांची अंमलबजावणी व्हावी, यासाठी सर्वोच्च न्यायालय परमादेश काढू शकते.
(c) संसद दोन तृतीयांश बहुमताने (जे संपूर्ण सभासद संख्येच्या अध्र्या पेक्षा जास्त असेल), घटनात्मक संरक्षणाचा हक्क निलंबित करु शकते.

(d) सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारांना धक्का न पोचवता इतर न्यायालयांना या हक्कांच्या अंमलबजावणीचे अधिकार संसद देऊ शकते.

94.

भारतातील लोकपाल व लोकायुक्त ही पदे खालील कोणाशी साधर्म्य दर्शविणारी आहेत ?

95.

महाराष्ट्रात दारू पिऊन गाडी चालवणे बेकायदेशीर आहे. पुढील बाबींसाठीही परवाना लागतो -

(a) अधिकृत दुकानातून दारू विकत घेण्यासाठी.

(b) हॉटेल वा ''बार '' मध्ये दारू पिण्यासाठी.

(c) आपल्या घरात दारू ठेवण्यासाठी.

(d) एका जागेवरुन दुसरीकडे दारू नेण्यासाठी.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने चुकीचे/चुकीची आहे/आहेत ? 

96.

केन्द्र सरकारने सुरू केलेल्या थेट रोख रक्कम लाभ हस्तांतर योजनेसंबंधी काय खरे नाही ?

(a) ही योजना 1 जानेवारी 2013 रोजी सुरू केली.

(b) प्रायोगिक तत्वावर ती प्रथमतः 51 जिल्ह्यात ठरवून 20 जिल्ह्यात सुरू केली गेली. (c) या योजनेत अपेक्षित लाभधारकांच्या आधारजुडित बँक अकाऊंटमध्ये रोख रक्कम सरळ भरली जाईल.
(d) या योजनेद्वारे भ्रष्टाचार व गळत्या वाटपाला रोखणे अपेक्षित आहे.

(e) ज्या दिवशी ही योजना महाराष्ट्रात सुरू केली गेली त्या दिवशी ही अडचण सांगितली जात होती की पुरेसे आधारजुडित अकाऊंटस् नाहीत्. 

97.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसंदर्भात खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे ?

98.

खालील विधाने पहा.

(a) 1 जानेवारी 1950 रोजी प्रजासत्ताक चीनला मान्यता देणारा भारत हा प्रथम देश होता.

(b) संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेतील चीनच्या कायम सदस्यत्वासाठी भारताने आक्षेप घेतला होता.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहेत ?

99.

जर एखाद्या व्यक्तीची राष्ट्रपती म्हणून झालेली निवडणूक सर्वोच्च न्यायालयाने रद्दबादल केली तर त्या व्यक्तीने तत्पुर्वी केलेले आदेश :

100.

पुढील विधाने पहावीत.

(a) राजीव गांधींच्या हत्येकरता नलिनीला ठोठावलेली देहदंडाची शिक्षा राज्य मंत्रीमंडळाने शिफारस केली व काँग्रेस प्रमुख सोनिया गांधीनी तसे आवाहन केले म्हणून आजन्म कारावासात बदलली गेली.

(b) न्यायमूर्ती के.टी. थॉमस, ज्यांनी सर्वोच्च न्यायालयात मृत्यू दंड नक्की केला होता यांना आता असे वाटते की राजीव गांधींच्या हत्येकरिता उर्वरीत तिघांना देहदंड देणे योग्य होणार नाही कारण आरोपींचा पुर्वेतिहास, स्वभाव व चारित्र्य मृत्यू दंड निश्चित करताना पाहीले गेले नव्हते.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१३ - Paper 1 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.