राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१३ - Paper 1

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१३ - Paper 1 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.

खालील नद्यांचा त्यांच्या खो-यांच्या क्षेत्रफळानुसार उतरता क्रम लावा.

(a) ब्रह्मपुत्र

(b) कृष्णा

(c) तापी

22.

कोणत्या प्रदेशामध्ये वस्त्यांचे वितरण पूर पातळीद्वारा निश्चित होईल?

23.

जर जागतिक तापमान 2° से. वाढले तर पृथ्वीवर खालीलपैकी कोणते परिणाम होण्याची शक्यता आहे?

(a) वार्षिक पूर

(b) कीटकांमुळे होणारे आजार जसे मलेरिया

(c) शेती विभागात बदल

(d) प्राणी आणि वनस्पतींच्या बयाच प्रजाती नष्ट होतील

24.

खालील नकाशात पूर्व हिमालय प्रदेशातील चार पर्वत रांगा 1, 2, 3, 4 अंकांनी दाखविलेल्या आहेत.

या पर्वत रांगांचा पश्चिमेकडून पूर्वेकडे कोणता क्रम बरोबर आहे?


 

25.

खालीलपैकी कोणता विशेष गुणधर्म उष्ण व दमट विषुववृत्तीय हवामानात आढळत नाही ?

26.

भारतात मासेमारी अत्यल्प प्रमाणात केली जाते कारण :
(a) मोठ्या प्रमाणावर अन्नधान्यावर अवलंबून राहणे.

(b) मासे साठवण्याच्या मर्यादित सोई.

(c) सरकार मासेमारीस प्रोत्साहन देत नाही.

(d) जास्त चांगली बाजारपेठ नाही.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

27.

आपल्या देशाचे बरेच क्षेत्र मृदा धूपीमुळे प्रभावित आहे. मृदा धूपीखाली सर्वाधिक क्षेत्र असलेले राज्य कोणते ?

28.

ऊसापासून साखर करताना उसाच्या एकूण वजनाच्या किती टक्के रूपांतर होऊ शकते ?

29.

खाली दिलेल्या भारताच्या नकाशात काढलेली दाट (thick) रेषा - दाखविते :

30.

खालील विधाने पाहावीत व त्यातील कोणते योग्य नाही ते सांगावे.
(a) भारतात गाळाची मृदा सर्वात अधिक पसरलेली आहे.

(b) एकूणच गाळाची मृदा अत्यंत सुपीक असते.
(c) तिच्या वयोमानाप्रमाणे गाळाची मृदा 2 वर्गवारीत मोडते - जुनी-बांगर आणि नवी-खादर,

(d) खादर मृदा बांगर पेक्षा अधिक सुपीक असते.

(e) गाळाच्या मृदेत पुरेशा प्रमाणात पोटॅश, फॉस्फोरिक अॅसिड व लाइम असते.
(f) गाळाची मृदा ऊस, भात, गहू व कडधान्यांकरता उत्कृष्ट असते.

31.

भारतातील काही प्रजाती पुढीलप्रमाणे :

(a) वाघ

(b) भारतीय चित्ता

(c) सँलमेंडर

(d) गीब्बन

(e) माळढोक

(f) दोनशिंगी गेंडा

वरीलपैकी कोणती/कोणत्या प्रजाती नष्ट झाली/झाल्या आहे/आहेत ?

32.

सुपोषण-बाबत विधाने
(a) प्राथमिकरित्या डोंगराळ भागातील वाहत्या पाण्यामध्ये सुपोषण होते.

(b) सुपोषण हे थांबलेल्या पाण्यात होते आणि त्यामध्ये जिवांचा आणि त्यांनी उत्पादित केलेल्या बाबींचा हळूहळू संचय होतो.

(c) सुपोषणामुळे तयार झालेल्या शेवाळाचा पुंज हा अन्न म्हणून उपयोग होऊन माशांच्या वाढीसाठी पोषक ठरतो.

(d) सुपोषित पाणी हे ऑक्सीजन संपन्न असते आणि कुठलीही प्रक्रिया न करता मानवी वापरास सुरक्षित असते.

वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहेत ?

33.

शास्त्रज्ञांनी दिलेले वातावरण बदलांचे काही सिद्धांत 'खालीलप्रमाणे :

(a) सर जॉर्ज सिम्पसन सिद्धांत

(b) सौर डागांच्या चक्रावर आधारित सिद्धांत

(c) खगोलशास्त्र विषयक सिद्धांत

(d) वातावरणातील वायू जे निवडक प्रकाशाचे किरण शोषून घेतात, त्याच्या बदलत्या

प्रमाणावरचा सिद्धांत वातावरण बदलाच्या कोणत्या सिद्धांतानुसार पाच मूलभूत परिणाम ग्राह्य धरून त्यावर आधारित बर्फाळ प्रदेशातील बर्फाचे प्रसरण आणि आकुंचनाचे गणितीय मॉडेल दिले गेले आहे ?

34.

वनस्पतीपासून मिळविलेल्या सजीवांमध्ये सक्रीय असणा-या संयुगाची यादी :

(a) निकोटीन - तंबाखू वनस्पतीपासून

(b) निबीडाईन - कडू लिंबापासून

(c) रोटीनोन - डेरिस इलिप्टिकापासून

(d) पायरीभ्रम - क्रायसँथमम सिनक़रीफोलोअमपासून

अदिम लोकांनी वनस्पतीचे सार काढून,सजीवांमध्ये सक्रीय असणारे संयुग मिळविले व त्याचा वापर मासे स्तंबीत करण्यासाठी केला ?

यासाठी वरीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे ?

35.

जैवविविधतेच्या हासासंबंधी घटक :
(a) भू वापरातील बदलामुळे होणारा वसतीस्थानांचा हास.

(b) प्रदूषणामुळे होणारा वसतीस्थानांचा हास.

(c) शिकार करणे.

(d) रोग व साथीचे रोग पसरणे.

(e) प्रजातीचा अति उपसा.

वरीलपैकी कोणता/कोणते घटक पाणी हे वसतीस्थान असणाया ठिकाणची जैवविविधता कमी होण्यास मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरतो/ठरतात.

36.

अनेकअंगी दारिद्रय निर्देशांकाने 1997 मध्ये कोणत्या निर्देशांकाची जागा घेतली?

37.

भारतातील भूअधिकार सुधारणा धोरणाचे खालीलपैकी कोणते ध्येय नव्हते ?

38.

खालील विधाने नियोजन आयोगाने दिलेल्या भारतीय दारिद्र्याच्या अंदाजासंबंधी आहेत.
(a) भारतातील महत्त्वाच्या राज्यांमध्ये दारिद्रयाचे सकेंद्रण झालेले दिसते.

(b) शहरी दारिद्र्यातील घट ही ग्रामीण दारिद्र्याच्या घटीपेक्षा अधिक आहे.

(c) दारिद्याचा दर हा हिमाचल प्रदेश, हरियाणा आणि बिहारमध्ये वाढला आहे.

(d) नियोजन आयोगाने लकडावाला तज्ज्ञ गटाचे दारिद्र्याचे अंदाज मान्य केले आहेत.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

39.

आर्थिक प्रगतीसाठी वित्त उभे करण्याच्या खालीलपैकी कोणत्या पद्धतीमुळे भाववाढ निर्माण होऊ शकते?

40.

दारिद्र्य तफावत गुणोत्तर हे शिर गणती गुणोत्तरापेक्षा निरपेक्ष दारिद्रय मापनाचे जास्त चांगले मापक आहे कारण

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१३ - Paper 1 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.