PSI Main 2017 - Paper 1 Questions And Answers:
तद्भव शब्द असलेला अचूक शब्दांचा गट कोणता?
योग्य पर्याय निवडा.
(a) घास, ओट, काम, दूध
(b) सार, इबा, गुढी, तपास
(c) परंतु, ग्रंथ, नदी, कर्म
(d) घर, गाव, कोवळा, घाम्
पर्यायी उत्तरे
जोड्या जुळवा :
राम आणि लक्ष्मण यांच्यात कारण नसताना दुही माजविण्याचे काम लोक करीत आहेत. या वाक्यातील वाक्प्रचार कोणता? अचूक सांगा.
(a) दुही करणे
(b) दुही माजणे
(c) भांडण लावणे
(d) मतभेद होणे
पर्यायी उत्तरे :
मराठीतील मूळ सर्वनामापैकी लिंग व वचनाप्रमाणे बदलणा-या सर्वनामांचा गट ओळखा.
(a) मी, तू, तो, हा, जो
(b) मी, तू, काय, हा, जो
(c) कोण, काय, आपण, स्वतः
(d) तो, कोण, मी, तू,
पर्यायी उत्तरे :
मूळ शब्दातील अन्त्य स्वर हस्व असला तर सामान्यरूपाच्या वेळी तों_______ होतो.
मधू लाडू खात असतो. या वाक्याचे रीति भविष्यकाळी रूप कोणते ?
'वर' या नामाचे शब्दजाती बदलून शब्दयोगी परिवर्तन असे होईल, अचूक उदाहरण ओळखा.
तो नेहमी उशिरा येऊन झटपट काम करतो या वाक्यातील क्रियाविशेषण व प्रकार कोणता?
(a) नेहमी - सातत्यदर्शक क्रियाविशेषण
(b) उशिरा - कालवाचक क्रियाविशेषण
(c) झटपट - रीतिवाचक क्रियाविशेषण
(d) काम - गतिवाचक क्रियाविशेषण
पर्यायी उत्तरे :
अनुरूप, अनुसार, यासारखे शब्द जोडताना मागील शब्दाचे सामान्यरूप होऊन मग __________ संधी होतो.
योग्य विधान ओळखा.
खालील शब्दसमूह अचूक शब्दाने पूर्ण करा.
माणसांचा जमाव तसे सैनिकांचे _________ .
व्याकरणातील 'लिंग' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?
है रमेशचे अक्षर चांगले आहे का? या वाक्याचे रूपांतर उद्गारार्थी वाक्यात कसे होईल?
पासून व पलीकडे या शब्दयोगी अव्ययांचा उपयोग कोणत्या विभक्ती कार्यासाठी केला आहे ? अचूक पर्याय निवडा.
पुढील विधान वाचा.
प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली वाक्ये ही संयुक्त वाक्य असतात; तर गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययानी - जोडलेली वाक्ये ही मिन्नवाक्य असतात.
खालील उतारा वाचून त्या खालील प्र.क्र. 56 ते 60 ची उत्तरे लिह्म :
भारतीय समाजजीवनाचे विश्लेषण करताना पूर्वपरंपरा, आजचे वास्तव आणि जनमानस या तिन्ही गोष्टी एकवटून विचारात घेतल्या पाहिजेत. आपल्या परंपरेत व्यापक व सुसंघटित अशा सामाजिक एकात्मतेच्या जाणिवेचा अभाव आहे. बहुविध बाह्य प्रवाहांना सामावून घेण्याकडे तिचा कल असल्यामुळे तिचे स्वरूप सामान्यतः छोट्या छोट्या स्वायत्त घटकांचा समुच्चय असे बनले आहे. अनेक गावांचा समुच्चय म्हणजे देश, अनेक जार्तीचा समुच्चय म्हणजे समाज, अनेक पंथांचा समुच्चय म्हणजे धर्म अशीच भारतीयांच्या मानसिकतेची घडण झाली आहे. त्यामुळे आपल्या देशातील सामान्य माणसाची अस्मिता ही कुटुंब, जात आणि पंथ ह्या लहान लहान घटकांशीच जखडली आहे.
'वसुधैव कुटुंबकम्', 'हे विश्वचि माझे घर' या वचनांमधून व्यक्त होणारा उदात्त भावही छोट्याशा कुल-गोवातील कौटुंबिक जिव्हाळ्यावरच आधारित आहे. ज्ञात ही तर येथील जनसामान्यांनीच नव्हे, तर मोठमोठ्या तत्त्वचिंतकांनीही निसर्गसिद्ध वा ईश्वरप्रणीत मानली होती. विवाहविधि आणि अन्नोदक व्यवहार यांवरील बारीकसारीक निबंधांमुळे संकुचित जातीय भावनेला विलक्षण बळकटी येत गेली. साहजिकच जातिनिरपेक्ष सामाजिक जाणिवेला आपल्या सामूहिक जीवनात नेहमीच गौण लेखले गेले. भारतात अनेक राजकोय स्थित्यंतरे झाली, साम्राज्ये उदयास आली आणि अस्ताला गेली; पण स्वयंपूर्ण गावगाड्यावर, ब्रिटिश राजवट येईपर्यंत तरी, अशा घडामोडींचा परिणाम झाला नाही. आपल्या देशात केंद्रवर्ती बलाढ्य धर्मशासन वा धर्मपीठ कधी अस्तित्वात आले नाही. त्यामुळे लहान-मोठ्या लोकसमूहांचे उपासना-स्वातंत्र्य येथे नेहमीच अबाधित राहिले. परस्परविरोधी अशा कितीतरी तत्त्वप्रणाली येथे आग्रहाने मांडल्या गेल्या. वैदिक परंपरेत तर अनेक पंथोपपंथ होतेच, पण अवैदिक परंपरेतही वारंवार विघटन होतच होते. जैन धर्मात श्वेतांबर व दिगंबर है दोन मुख्य प्रवाह. त्यांच्या पुन्हा शाखा व उपशाखा होत्या. बौद्ध धर्मात हीनयान व महायान हे मुख्य प्रवाह. त्यांपैकी प्रत्येकाचे उपप्रवाह
आहेतच. हिंदू धर्मातील शैव, वैष्णव, नाथ, शाक्त, लिंगायत हे पंथ सर्वपरिचित आहेत. कुटुंब, जात, गाव, वतन, राज्य, धर्मपंध या सर्व संस्था आपापल्या अधिकारक्षेत्रात निर्वेधपणे वर्चस्व गाजवत होत्या. यांपैकी कुणीही दुस-याच्या परंपरागत प्रभावक्षेत्रात जरासुद्धा अतिक्रमण केले नाही. त्यामुळे बहुविधता, बहुसत्ताकेंद्रे, समावेशकता आणि समन्वयदृष्टी ही भारतीय समाजाच्या भौतिक व सांस्कृतिक वास्तवाची प्रमुख लक्षणे होत असे म्हणता येईल. यातून आपल्यापुरते पाहण्याची संकुचित वृत्ती निर्माण झाली. समाजाच्या दुस-या घटकावर आपत्ती आली, अन्याय झाला तरी 'मला काय त्याचे' अशी उदासीनतेची, स्वयंकेंद्रिततेची प्रवृत्ती जोपासली गेली. या काळात अनेकविध घटकांना एकत्र जोडणारा भारतीय तत्त्वाचा धागा अस्तित्वातच नव्हता असे नाही; पण तो अगदीच क्षीणबल होता आणि त्याचे भानही बहुतांशी नगर विभागातील मूठभर उच्चवर्णीयांनाच काय ते होते.
भारतीय समाजात सामाजिक एकात्मतेचा अभाव आहे. असे लेखकास का वाटते ?
जातिनिरपेक्ष समाज का निर्माण होऊ शकत नाही? लेखकाचे मत काय?
भारतात विविध धर्म, पंथोपंथांची विविधता असूनही जातीयता का नष्ट झाली नाही ?
(a) प्रत्येक धर्म, पंथोपंथांचे उपासना स्वातंत्र्य अबाधित होते.
(b) कोणत्याच धर्म, पंथाने जातीयता नष्ट करण्याचा प्रयत्न केला नाही.
(c) जातीयता नष्ट करण्याचे मार्गच नव्हते.
(d) भारतीय समाजात आपल्यापुरते पाहण्याची प्रवृत्ती होती.
पर्यायी उत्तरे :
अनेकविध घटकांना एकत्र जोडणारा भारतीय तत्वाचा धागा कोणता असावा असे लेखकास वाटते?
आपल्या देशातील माणसांची कोणती प्रवृत्तीं सदर उता-यातून लेखकाने स्पष्ट केली आहे ?
आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा
Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.