ASO 2011- Main Paper 1

ASO 2011- Main Paper 1 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
101.

खालील पर्यायात कोणती म्हण नाही ते ओळखा.

102.

खाली दिलेल्या वाक्यसंग्रहावर म्हण शोधून काढा. 

"माधवराव मुळचेच स्वभावाने भिडस्त होते त्यामुळे लोक त्यांच्याकडून मागून नेलेली वस्तू किंवा पैसे त्यांना वरत करायचेच नाहीत. हळू हळू त्यांच्याकडे जे होते ते सर्व गेले. आणि एके दिवशी भीक मागण्याची पाळी माधवरावांवर आली." 

103.

“शरणागती पत्करणे' - यासाठी पुढील कोणता वाक्प्रचार लागू पडणार नाही ?

104.

'शहाण्याला शब्दाने सांगितले की, तो उमजतो पण मुर्खाला छडीशिवाय भागत नाही. या संदर्भावरुन म्हण
ओळखा. 

105.

पुढील शब्दांतून प्रत्यय साधित शब्द ओळखा.

106.

चोराच्या मनात चांदणे' या म्हणीला समानार्थी म्हण ओळखा. 

107.

संकेतार्थ नसलेले वाक्य ओळखा.

108.

समीरला वर्गात व्याख्यान देणं फार सोपं वाटायचं पण जेंव्हा तो प्राध्यापक झाला तेव्हा त्याला वर्गात व्याख्यान
देणं सोपं नसल्याचा अनुभव आला.' म्हणतात ना

109.

हाक मारतांना नावापुढे कोणते विरामचिह्न वापराल ?

110.

‘नम्रतेने, विनयशीलतेने चांगल्या चांगल्या गोष्टी साध्य होतात.' हा अर्थ स्पष्ट करण्यासाठी पुढीलपैकी म्हण
निवडा. 

111.

वाक्याचा प्रकार ओळखा. 

अनर्थाला कारणीभूत असणारं आपलं अज्ञान दूर करण्यासाठी आपण झटू या.' 

112.

पुढे दिलेल्या चार पर्यायांपैकी एक म्हण ओळखा. 

खालील उतारा वाचून त्या खालील प्रश्न क्रमांक 111 ते 115 ची उत्तरे लिहा :

            आपल्या भारतीय संस्कृतीत महाभारताचे स्थान आगळेच आहे. व्यास महर्षीनी लिहिलेल्या या महाकाव्याची थोरवी इतकी महान आहे की, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपण त्यापासून बोध घेऊ शकतो. महाभारताचा उत्कर्ष बिंदू म्हणजे कौरव-पांडवां मधील महायुद्ध. हे युद्ध लढले गेले कुरुक्षेत्रावर. प्राचीन काळात याच ठिकाणी वैदिक वाङ्मय लिहिले गेले. धार्मिक परंपरा, सामाजिक प्रथांचा उगमही याच ठिकाणी झाला. त्यामुळे या जागेला भारतीय संस्कृतीचे जन्मस्थान मानले जाते. महाभारतातील युद्धाच्या खाणाखुणा आजही भद्रकाली मंदिर, ब्रह्मसर, बाणगंगा, ज्योतिसार या ठिकाणी जपलेल्या आहेत. कुरुक्षेत्र हे 51 शक्तिपीठांपैकी एक पीठ आहे. महाभारतातील युद्धाचे सर्वात मोठे फलित म्हणजे 'श्रीमद्भगवद्गीता'. युद्धासाठी समोर उभे ठाकलेले आप्तस्वकीय पाहून गोंधळलेल्या अर्जुनाला धीर देऊन कर्मयोगाचा जो उपदेश भगवान श्रीकृष्णांनी केला, तो म्हणजे जगद्वंद्य ‘भगवतगीता', कुरुक्षेत्रावरील ज्योतीसार येथे भगवद्गीता सांगितल्याचे मानले जाते. ज्या वटवृक्षाखाली श्रीकृष्णाने हा उपदेश केला, तो वटवृक्ष आजही पाहायला मिळतो. याच ठिकाणी श्रीकृष्णाने आपले विराट रूप दर्शन देऊन तोच या जगाचा प्रतिपालक आहे आणि संहारकही आहे याची प्रचिती दिली.
        कुरुक्षेत्रावर भगवान श्रीकृष्णाच्या बहुरंगी व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडविणारे संपन्न म्युझियमही आहे. प्राचीन कालखंडातील विविध हस्तलिखिते, चित्रे, शिल्पे, कलाकृती, उत्खननात सापडलेले अवशेष इथे ठेवलेले आहेत. कुरुक्षेत्राचे दर्शन घेतल्यानंतर आपण प्राचीन गौरवशाली परंपरेचा हिस्सा आहोत या विचाराने मन भरून येते.

113.

महाभारताचा उत्कर्ष बिंदू कोणता ?

114.

भारतीय संस्कृतीचे जन्म स्थान कोणते ?

115.

महाभारतातील युद्धाचे सर्वात मोठे फलित म्हणजे. 

116.

श्रीकृष्णाने कुरुक्षेत्रावर कोणाला उपदेश केला ?

117.

श्रीकृष्णाने आपले विराटरूप दर्शन देऊन कशाची प्रचिती दिली ?आप्तस्वकीय असल्याची

खालील उतारा वाचून त्या खालील प्रश्न क्रमांक 116 ते 120 ची उत्तरे लिहा :
               दुःखे येतात ती आपली कसोटी पाहण्यासाठीच येतात. त्यावेळी न डगमगणे हाच खरा पुरुषार्थ. भट्टीतून तावून सुलाखून निघाल्याखेरीज सोन्याला तेज चढत नाही किंवा टाकीचे घाव सोसल्याखेरीज दगडाला देवपण येत नाही, हे आपणाला माहीत नाही काय ? पैलू पाडल्याशिवाय हियालासुद्धा किंमत येत नाही. आपणावर कोसळणारी दुःखे ही अशीच आपल्या व्यक्तिमत्त्वाला पैलू पाडण्यासाठी निर्माण झाली आहेत असे आपण का समजू नये ? शिवाय असे पाहा, जगात दुःखे आहेत म्हणून सुखाची किंमत आपणास कळते ना? जगात अंधारी रात्र आहे म्हणूनच चंद्राला महत्त्व. त्याचप्रमाणे दुःख आहे म्हणूनच जगात सुखाचे महत्त्व आहे असे तुम्हाला नाही वाटत ? नुसते गोड जेवण जेवण्याचा तुम्ही कधी प्रयत्न केला आहे काय ? नुसत्या गोडाने तोंडाला कशी मिठी बसते, हे तुम्हाला माहीत आहेच. केवळ सुखच जगात असते तर अशीच आपली स्थिती झाली नसती का ? शिवाय दुःखानंतर सुख आले म्हणजे त्याची लज्जत काही न्यारीच असते असा अनुभव कुणाला नाही ? परीक्षेसाठी मरमर कष्ट केल्यानंतरच निकालाच्या आनंदाची खरी गोडी आपणास कळते. असे जर आहे तर वर्तमानकाळच्या दुःखाबद्दल आपण कुरकूर का करावी ? आणि दुःख पर्वताएवढे असे का मानावे ?

118.

या उता-यात पुरुषार्थ कशाला म्हटले आहे ?

119.

दगडाला देवपण कशामुळे येते ?

120.

सुखाची किंमत कशामुळे कळते ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

ASO 2011- Main Paper 1 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.