MPSC Recruitment: मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या एका MPSC Advertisement 2023 मध्ये एकूण ६७३ आणि दुसऱ्या MPSC Advertisement मध्ये ३७८ जागांसाठी अर्ज मागवण्यात आले होते.
या दोनी MPSC Advertisement मिळून एकूण १०५१ जागांसाठी हि भरती होणार आहे. यामध्ये दोन वेगवेगळ्या परीक्षांसाठी हि भरती घेण्यात येणार आहे. काय आहे तो मोठा निर्णय चला पाहूया.
MPSC Advertisement
१) महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-2023
२) महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा मुख्य परीक्षा – 2022
या दोन्ही परीक्षांमधील, महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-2023 या जाहिरातीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अर्ज करण्याचा अंतिम दिनांक आधी २२ मार्च २०२३ हा नियोजित केला होता. आणि यामुळे बरेच विध्यार्थी मित्र नाराज होते कि खूपच लवकर हि अर्ज करण्याची अंतिम दिनांक नियोजित करण्यात आली होती.
आणि त्यातून संकेतस्थळाचे हि काही तांत्रिक अडथळे विध्यार्थ्यांना जाणवत होते, या कारणास्तव आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सुधारित अंतिम दिनांक जाहीर केली आहे. त्यानुसार आता महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-2023 या परीक्षेच्या जाहिराती साठी अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २२ मार्च वरून थेट 03 एप्रिल 2023 असा नियोजित करण्यात आला आहे.
या बातमी मुळे निश्चितच सर्व विध्यार्थी मित्रांना आनंद झाला आहे.
तुम्हाला या MPSC आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या दोन्ही जाहिरातींची
सविस्तर माहिती पाहायची असेल तर