Aadhar Card Pan Card Link Last Date: मित्रांनो, आयकर विभागाने वारंवार सांगून सुद्धा अजूनही लोकांनी आपले पॅन कार्ड आधार कार्ड सोबत लिंक केलेले नाहीये. आता आयकर विभागाने सक्त ताकीतच दिली आहे, तुम्ही जर तुमचे पॅन कार्ड आधार कार्ड सोबत लिंक केलेले नसेल तर 31 मार्च नंतर तुम्हाला किमान एक हजार रुपये दंड आकारला जाणार आहे.
आयटी विभागाने सुद्धा पब्लिक नोटिफिकेशन मध्ये असं जाहीर केला आहे की (Aadhar Card And Pan Card Link Last Date) तुम्हाला तुमचे पॅन कार्ड आधार कार्ड सोबत लिंक करणे अनिवार्य आहे. आणि जर तुम्ही या सूचनेचे पालन केले नाही तर 1 एप्रिल 2023 नंतर जे पॅन कार्ड लिंक केलेले नसतील म्हणजेच अनलिंग असतील ते पॅन कार्ड पूर्णपणे रद्द करण्यात येणार आहेत.
मित्रांनो, आधार कार्ड आणि पॅन कार्ड एकमेकांना लिंक कसे करायचे याबद्दल आम्ही एक सविस्तर आर्टिकल या आधीच लिहिले आहे. ते पाहण्यासाठी येथे क्लिक करा
म्हणजेच मित्रांनो Aadhar Card And Pan Card Linking 1 एप्रिल 2023 नंतर तुमच्याकडे पॅन कार्ड असूनही त्याचा उपयोग होणार नाही कारण ते पॅन कार्ड तुम्हाला कुठेच युज करता येणार नाही. शासनाने आधार कार्ड ला पॅन कार्ड सोबत लिंक करण्यासाठी ३१ मार्च हि अंतिम दिनांक दिली आहे. तुम्ही जर हे आता केले तर सध्या तुम्हाला फक्त १००० रुपये दंड भरून ते लिंक करता येणार आहे.
जर तुम्ही देखील तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड एकमेकांशी लिंक केलेले नसेल तर ते आजच करून घ्या. कारण 31 मार्चला आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. 31 मार्चनंतर पॅन कार्ड हा केवळ एक प्लास्टिकचा कागद होईल आणि नंतर त्याचा वापर करून ना तुम्ही इन्कम टॅक्स भरू शकाल ना कुठली तुमची बँकेची ट्रांजेक्शन करू शकाल.
आणि जर तुम्हाला तुमचे आधार कार्ड पॅन कार्ड सोबत लिंक कसे करायचे याबद्दल माहिती नसेल तर काळजी करू नका. खालील लिंक चा वापर करून तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने तुमचे पॅन कार्ड तुमच्या आधारसोबत लिंक करू शकता.
पण त्याआधी खरंच तुमचे आधार कार्ड पॅन कार्ड सोबत लिंक आहे की नाही हे पाहण्यासाठी या लिंकचा वापर करा. – येथे क्लिक करा
आणि जर आता तुमचे आधार कार्ड लिंक नसेल तर या लिंकचा वापर करून तुम्ही तुमचे पॅन कार्ड आणि आधार कार्ड एकमेकांसोबत लिंक करू शकता. – येथे क्लिक करा
मित्रांनो या आर्टिकलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून आपल्या नातेवाईकांमधील कोणालाही विनाकारण एक हजार रुपये टॅक्स भरावा लागणार नाही. तसेच त्यांना त्यांच्या ट्रांजेक्शन मध्येही अडथळे येणार नाहीत.
मित्रांनो तुम्हाला हे आर्टिकल कसे वाटले? हे आम्हाला खाली कमेंट करून नक्की कळवा. जेणेकरून आम्ही असेच नवनवीन आर्टिकल्स तुमच्यासाठी उपलब्ध करून देऊ, धन्यवाद.