राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१६ - Paper 2

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१६ - Paper 2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :

परिच्छेद (प्रश्न क्रमांक 41 ते 45) :
         जगात स्वतंत्र बुद्धी फार थोडी असते. सनातनी लोक दहा हजार वर्षांपूर्वीच्या ऋषींचे गुलाम होतात. तर नवीन लोक पाश्चिमात्य पंडितांचे गुलाम होतात ! परंतु भारतीय संस्कृती स्वतंत्र दिवा लावावयास सांगत आहे. तुमच्या देशाच्या स्थितीचा विचार करा, परंपरेचा विचार करा. आजूबाजूच्या देशांचाही विचार करा, आणि स्वतःच्या समाजाला काय हितकर ते बघा.
          बुद्धिवादी मनुष्य निर्भय असतो. तो कोणाचे तुणतुणे वाजवीत बसणार नाही. तो आपल्या विशंकतेने पुढे पाऊल टाकील. जुने लोक कलियुग, कलियुग म्हणतात. नवीन लोक यंत्रयुग, यंत्रयुग म्हणतात. गांधी म्हणतील, “मी माझे युग निर्माण करीन. मी चरख्याचे युग आणीन. ग्रामोद्योगाचे युग आणीन.” बुद्धिमान मनुष्य री ओढीत बसणार नाही. तो स्वत:च्या विचारांचे युग आपल्या भोवती निर्माण करू पाहतो.
         सत्याची तहान या सत्यकामाच्या भूमीत आज उत्पन्न झाली आहे की नाही ? मानवजातीने जे जे उद्योग सुरु केले आहेत, जे जे विचार प्रांत उत्पन्न केले आहेत, त्या सर्व ठिकाणी आपण गेले पाहिजे. यंत्रशास्त्र, वास्तुशास्त्र, शिल्पशास्त्र, शिक्षणशास्त्र, साहित्य, कला, रसायन, व्यायाम, क्रीडांगणे, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, मानसशास्त्र या सर्व सत्याच्या साक्षात्कारांच्या क्षेत्रात न थकता, न दमता पुढे घुसणारे लोक भारतीय संस्कृतीच्या उपासकांत निर्माण झाले पाहिजे. प्रयोग केले पाहिजेत. हीच परमेश्वराची पूजा. देवाने दिलेले वाढविणे म्हणजेच त्याची पूजा. परमेश्वराने दिलेल्या बुद्धीचा विकास करणे म्हणजेच खरा धर्म.
            त्या त्या काळातील प्रश्न त्या त्या विचारवंतांना सोडवावयाचे असतात. अर्वाचीन बुद्धीसमोर अर्वाचीन प्रश्न आहेत. भारतीय संस्कृतीत ही हिम्मत नाही का ? जगातील राष्ट्रांच्या मांडीला मांडी लावून बसण्याचा हक्क वेद घोकून मिळणार नाही, पूर्वजांची स्तुतिस्तोत्रे गाऊन मिळणार नाही. नवीन प्रश्नांस आपण हात घातला पाहिजे. प्रयोगालये म्हणजे होमशाळा काढल्या पाहिजेत. होऊ देत सुरु प्रयोग-सत्य-देवाचे सर्वांगीण स्वरूप समजून घेण्याचे प्रयोग.
            आता कोठेही अड़ता कामा नये. आपले घोडे सर्वत्र दौडत जाऊ देत. ग्रामसंघटन, खादीशास्त्र, समाजशास्त्र, नवनीतिवाद, कोणतेही क्षेत्र असो, त्याविषयात आपण घुसू व नवीन ज्ञान निर्मू. ठिकठिकाणी संग्रहालये, प्रयोगालये, ग्रंथालये स्थापू, बौद्धिक व वैचारिक सहकार्य मिळवू. ज्ञान ही सहकार्याची वस्तू आहे. पूर्वीच्या शेकडो विचारांच्या खांद्यावर नवीन विचार उभा राहत असतो. गांधी टिळकांच्या कल्पनांचा विकास करतील. जवाहरलाल गांधींना पुढे नेतील. ज्ञानाच्या प्रत्येक प्रांतात अशी स्थिती आहे. तेथे अहंकार नाही, नम्र व निष्ठापूर्वक, ज्ञानेश्वराची पूजा आहे.
          निर्मळ विचार व शुद्ध दृष्टी यांची आज नितांत आवश्यकता आहे. येथे अधीरता नको, उताविळी नको, स्वार्थ नको, आळस नको. निर्मळता हवी असेल तर खोल अभ्यासाची आवश्यकता आहे. प्रयत्न व कष्ट यांची जरूर आहे. समाजाबद्दल प्रेम व कळकळ यांची जरूर आहे. समाजाला सुखी कसे करता येईल, ही तळमळ लागली म्हणजे मग तुम्ही विचार करू लागाल मग जो विचार स्फुरेल त्याचा आचार सुरु होईल, आणि या विचाराला व आचाराला 'युगधर्म' असे नाव दिले जाईल.

41.

खाली दिलेल्या दोन विधानांपैकी कोणते अयोग्य आहे/आहेत ?

अ. सामाजिक हित म्हणजेच वैयक्तिक हित.

ब. ज्याची इतर री ओढतात तो बुद्धीवादी.

42.

पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?

अ. जगात अनुकरण करणारे न करणा-यांपेक्षा अधिक. 

ब. भारतीय संस्कृती म्हणजे वेद घोकणे, पूर्वजांची स्तुतीसुमने गाणे.

43.

खाली दिलेल्या दोन विधानांपैकी कोणते अयोग्य आहे ?

अ. युगधर्म गाठावयाचा असेल तर परंपरांचा विचार करण्याची गरज नाही.

ब. बुद्धीवादी मनुष्य कोणाचीही स्तुती करीत नाही.

44.

पुढे दिलेल्या दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ? 

अ. देवाने दिलेल्या बुद्धीचा विकास म्हणजेच युगधर्म.

ब. ज्ञान केवळ सहकार्यानेच मिळते.

45.

उता-याला शीर्षक द्या.

Passage (Questions number 46 to 50) :
           Two musicians dwelling in one house gave lessons to pupils on the piano, and the man next door, who objected to his peace being disturbed in this way, took his revenge by banging on tin cans, and otherwise making things unpleasant for the musicians. I do not know what the law said on the subject. It may be admitted that the annoyances were equal in effect, but they were not the same in motive. In the one case, the motive was the reasonable one of earning an honest living; there was no deliberate intention of being offensive to the neighbours. In the other case, the motive was admittedly to make a demonstration against the neighbours. What is to be done in such circumstances ? It is not an offence to play the piano in one's own house even for a living. On the other hand, it is hard, especially if you don't like music, or perhaps even more if you do, to hear the scales going on, on the piano next door, all day.
               The question of motive does not seem to be relevant. If my neighbour makes noises which render my life intolerable, it is no answer to say that he makes them for a living and without intending to destroy my peace. He does destroy my peace and it is no comfort to be assured that he does not mean to. Hazlitt insisted that a man may play the trombone in his own house all day if he took reasonable measures to limit the annoyance to his neighbours; but Hazlitt has probably never lived beside a trombone. I find my argument is leading me to the side of the tin can gentleman, and I don't want it to do that, for my sympathies are with the musicians. And yet -
              Well, let us avoid a definite conclusion altogether and leave the incident to make us generally a little more sensitive about the feelings of our neighbours. They cannot expect us never to play the piano; but the amenities of neighbourliness require that we should mutually avoid being a nuisance to each other as much as we can.

46.

Fill the blank space with the best among the given options : 

The probability is strong that the musicians _________. 

47.

Fill the blank space with the best among the given options :

"... or perhaps even more if you do ..." in the last sentence of the first paragraph suggests that ____________ .

48.

Which of the following statements is supported by the passage ?

49.

Fill the blank space with the best among the given options : 

The writer is suggesting that ___________. 

50.

Fill the blank space with the best among the given alternatives :

"It is no comfort to be assured that he does not mean to" can be re-written as ___________ . 

51.

प्रत्येक खेळ साहित्य संच खोक्यात बांधला आहे आणि हे छोटे खोके पुन्हा वाहातुक खोक्यांत बांधले आहेत.
लॉरीच्या सामान ठेवण्याच्या भागात असे किती खोके मावतील ?

तथ्य 1- प्रत्येक वाहतुक खोका घनाकार असून त्याच्या एका बाजूचे माप पन्नास सेंटीमीटर आहे.

तथ्य 2- लॉरीचे सामानाच्या जागेचे क्षेत्रफळ तीस चौरस मीटर आहे.

प्रश्नाचे उत्तर देण्याच्या संदर्भात तथ्य 1 व 2 चे उचित वर्णन करणा-या पर्यायाची निवड करा.

52.

पुढे दिलेल्या आकृतीचा अभ्यास करून छोट्या चौकटींत दिलेल्या चिन्हांनी केलेल्या कृतिमालिकांचे आकलन करून घ्या. या कृतींच्या विसंकेतित अर्थाच्या आधारे दिलेल्या कृतिमालिकेतील प्रश्नचिन्हासाठी पर्याय निवडा. 

53.

एका व्यक्तीला तळ्याभोवती असलेल्या तीन देवळात कमळे वहायची आहेत. तो फुले तोडणार एवढ्यात त्याने तळ्याच्या देवतेचा आवाज ऐकला. तिने फुले तोडण्याच्या तीन अटींची घोषणा केली. “प्रत्येक देवळात जाण्यापूर्वी तुझ्या हातील सर्व फुले तू तळ्यात धुतली पाहिजेत. लक्षात ठेव की तू जेव्हा तळ्यात फुले धुशील तेव्हा त्यांची संख्या दुप्पट होईल. एकही फुल वाया न घालवता तू प्रत्येक देवतेला समान संख्येइतकी फुले घालायला हवीत. जेव्हा तू शेवटच्या देवळातून बाहेर पडशील तेव्हा तुझ्या हातात एकही फूल शिल्लक रहाता कामा नये. तूला एकदाच फुले तोडता येतील.” व्यक्तीने सुरुवातीला कमीत कमी जितकी फुले तोडली पाहिजेत आणि तिने प्रत्येक देवतेला कमीत कमी किती फुले वाहिली पाहिजेत त्या संख्या निवडा.

54.

विधाने :

सर्व शिक्षक डॉक्टर्स आहेत. 

सर्व डॉक्टर्स इंजीनिअर्स आहेत.

सर्व इंजीनिअर्स विद्यार्थी आहेत. 

जर वरील सर्व विधाने सत्य असल्यास पुढीलपैकी कोणता/ते निष्कर्ष सत्य आहेत ? निष्कर्ष :

I. काही विद्यार्थी शिक्षक आहेत.

II. सर्व डॉक्टर्स विद्यार्थी आहेत. 

III. काही इंजीनिअर्स शिक्षक आहेत.

IV. सर्व डॉक्टर्स शिक्षक आहेत.

55.

रवीचा जन्म 5 मे 1992, सोमवारी झाला. प्रत्येक वाढदिवसाला तो चित्रपट पहायला जातो. मात्र वाढदिवस मंगळवारी किंवा बुधवारी असल्यास तो चित्रपट पाहत नाही. पहिल्या दहा वाढदिवसांपर्यंततो किती वेळा चित्रपट पाहू शकणार नाही ?

56.

अली बालाचा भाऊ आहे. कल्लू अलीचे वडील आहेत. दामू निलाचा भाऊ आहे. निला बालाची मुलगी आहे. तर दामूचे काका दर्शवणारा पर्याय निवडा.

57.

स्तंभ I मधील शब्दांसाठी स्तंभ II मध्ये काही संकेतांक दिलेले आहेत. या पद्धतीचा अभ्यास करा व विचारलेल्या प्रश्नासाठी दिलेल्या चार पर्यायापैकी योग्य पर्याय निवडा.

58.

मालिकेच्या 5 व्या स्थानासाठी दिलेल्या पर्यायातून तार्किकदृष्ट्या सर्वात उचित प्रतिमा निवडा.

59.

एली, जानू, मिला, देऊ आणि एकू हे मित्र आहेत आणि ते केर, तेर, नेर, सेर आणि मेर या पाड्यांत रहातात, मात्र या क्रमानेच तेथे राहातात असे नाही. प्रत्येकजण वेगवेगळ्या पाड्यात रहातात. जानू व मिला तेरचे नाहीत. जानू व एकू केर व नेरचे नाहीत. एली व मिला नेर, सेर, व मेरचे नाहीत. देऊ व एकू हे तेर व मेरचे नाहीत. पुढील पर्यायांतून चुकीचा पर्याय निवडा

60.

K या ग्रहावर दिवस हे एकक 36 तासांचे आहे आणि प्रत्येक तास हा 120 मिनिटांचा आहे. या ग्रहावरील व्यक्तीसाठी एका बिंदूभोवतींचे अंश पृथ्वीवर विभाजित केलेल्या 360 ऐवजी 720 आहेत. त्यांच्या घड्याळाची तबकड़ी 36 तास दाखवते. K-ग्रहाचे घड्याळ 9:48 ही वेळ दाखवत असेल तर तास व मिनिट काट्यादरम्यानचे अंश दाखवणारी संख्या निवडा.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१६ - Paper 2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.