राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१६ - Paper 2

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१६ - Paper 2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :

परिच्छेद (प्रश्न क्रमांक 21 ते 25) :
           जेव्हा लहान मोठ्या गोष्टींतील सौंदर्य ओळखणे सोपे होते आणि जेव्हा स्वत:च्या एकमेवत्वामुळे आश्चर्यचकित करणाच्या गोष्टींच्या तुलनेत सामान्य वस्तूंमधील सुसंगतीत ते आपण अधिक पाहतो तेव्हा सौंदर्यशास्त्राच्या इतिहासात बंधमुक्त होण्याचा काळ येतो. यातून असंही घडतं की आपल्याला प्रतिसादांच्या पाय-यांतून जावे लागते जेव्हा सौंदर्याच्या प्रतिरूपणात आपण सहजतेने प्रसन्न करणा-या आणि साचेबद्ध मान्यतेचा मुकुट ल्यालेल्या सर्व बाबी टाळण्याचा प्रयत्न करतो. यातून आपल्याला सामान्याच्या सामान्यत्वाचा अतिशयोक्ती करण्यासाठी बंडखोरी करण्याचा मोह होतो व परिणामी त्या गोष्टींना आपण आक्रमकतेने असामान्य करतो. सुसंगती प्रस्थापित करण्यासाठी आपण विसंगती निर्माण करतो जी सर्व प्रतिसादांचे घटक असते. सध्याच्या काळात आपण अशा सौंदर्यात्मक प्रतिसादांची चिन्हे पाहतोच आहोत, जी सिद्ध करतात की माणसाला शेवटी एकदाचे समजले आहे की फक्त व्यक्तीच्या बोधाचे संकुचित्व हे त्याच्या सौंदर्यात्मक जाणिवेचे क्षेत्र कुरूपता व सौंदर्य यात तीव्र विभाजन करते. जेव्हा माणसाकडे वस्तूला स्वत:च्या स्वार्थापासून आणि संवेदनांच्या लालसेच्या अट्टाग्रही दाव्यांपासून अलग झालेल्या स्वरूपात पाहण्याची ताकद असते, फक्त तेव्हाच त्याला सर्वत्र असलेले सौंदर्य पाहण्याची खरी दृष्टी प्राप्त होते. केवळ तेव्हाच तो पाहू शकतो की आपल्याला सुखद न वाटणारे कुरूप असतेच असे नाही, कारण त्याचे सौंदर्य सत्यात असते.
             जेव्हा आपण म्हणतो की सौंदर्य सर्वत्र आहे तेव्हा आपल्याला असे म्हणायचे नसते की कुरुपता हा शब्द भाषेतून नाहीसा केला पाहिजे, असे म्हणणे म्हणजे असत्य असे काही नसते असे म्हणण्याइतकेच मूर्खपणाचे ठरेल. असत्य हे खात्रीने अस्तित्वात आहेच, पण ते विश्वप्रणालीत असत नाही तर ते आपल्या आकलनाच्या क्षमतेत त्यातील नकारात्मक भाग म्हणून असते. याच पद्धतीने आपल्याला झालेल्या सत्याच्या अर्धवट साक्षात्कारामुळे आपल्या जीवनातून व आपल्या कलांतून सौंदर्याची विकृत अभिव्यक्ती होते आणि त्यामुळे कुरूपता येते. काही प्रमाणात आपण जे आपल्यात आहे, आणि जे इतर सर्वात आहे अशा सत्याच्या नियमांच्या विरोधात आपले जीवन मार्गस्थ करू शकतो आणि त्याचप्रमाणे सार्वत्रिक असलेल्या सुसंवादाच्या शाश्वत नियमाला उलटे फिरवत कुरूपता निर्माण करू शकतो.
 

21.

या परिच्छेदाचे सर्वात शक्य प्रयोजन निवडा. 

22.

संकुचित बोधामुळे व्यक्तीला प्राप्त झालेल्या सौंदर्य भानाचा परिणाम नसलेली कृती निवडा.

23.

संबंधित व्यक्तीच्या सौंदर्यात्मक संवेदनेने बंधमुक्ती प्राप्त केली आहे हे निर्देशित करणाच्या वर्तनाची निवड करा.

अ. सर्वांना सहजतेने प्रसन्न करणाच्या विविध पैलूंना व्यक्ती स्वत:च्या सौंदर्याच्या अभिव्यक्तीमध्ये समाविष्ट करते.

ब. साचेबद्ध मान्यतेमुळे ज्या प्रतिरूपणांची सौंदर्यपूर्ण अशी स्तुती केली जाते त्यामुळे व्यक्ती भारावून जात नाही.

क. गोष्टी विप स्वरूपात पाहिल्या जाऊ नयेत म्हणून व्यक्ती स्वत:ची आकलनाची ताकद वाढवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करते.

24.

कुरूपता हा शब्द भाषेतून नाहीसा करण्याच्या कृतीला लेखक मूर्खपणा म्हणण्याचे/ची कारण/णे निवडा. 

अ. वास्तवाच्या अपूर्ण आकलनाच्या परिणामी आपल्याला गोष्टी कुरूप वाटतात. ब. कच-याच्या जागा सर्वांसाठीच कुरूप असतात,

क. गोष्टीतील साधी सुसंगती पाहणे शक्य होत नाही तोपर्यंत त्या आपल्यासाठी कुरूपता प्रतिरूपित करतात. 

25.

या परिच्छेदाच्या लेखकाचे सौंदर्य हे मनाच्या स्थितीवर अवलंबून असून ते तिला प्रसन्नतेचा भास देणाच्या त्या गोष्टीच्या बाह्यलक्षणांवर अवलंबून नसते अशी धारणा आहे या भाष्याला बळकटी देणाच्या विधानाची/नांची निवड करा. करा.

अ. सर्वव्यापी असलेल्या सुसंगतीच्या शाश्वत नियमाच्या विरोधात जाऊन आपण कुरूपतेला जन्म देतो.

ब. बोधाचे संकुचित्व व्यक्तीच्या सौंदर्यभानाला कुरूपता व सौंदर्य यात तीव्रतेने विभागते.

क. व्यक्तीची वस्तूला स्वत:च्या स्वार्थापासून आणि संवेदनांच्या लालसेच्या अट्टाग्रही दाव्यापासून वेगळ्या स्वरूपात पाहण्याची ताकद, तिला सर्वत्र असलेले सौंदर्य पाहणे शक्य करते.

परिच्छेद (प्रश्न क्रमांक 26 ते 30) :
            डोडो मृत पावला. प्रवासी कबुतर लुप्त झाले. परंतू “एकांडा जॉर्ज” - प्रसिद्ध गालॅपॅगोस् कासव-ज्याच्या मृत्यु पश्चात्, त्याची प्रजाती संपली असे वाटत होते, त्या प्रजातीचे नशीब चांगले होते.
             एका शास्त्रीय शोधमोहिमे अंतर्गत त्याच्या रक्तानात्याचे काही नातलग जिवंत आणि सुदृढ आढळून आले आहेत. काळजीपूर्वक केलेल्या पैदाशीमुळे आता जॉर्जच्या प्रजातीचे पुनरुज्जीवन करणे शक्य आहे अशी आता जीवशास्त्र अभ्यासकांना आशा आहे.
                शास्त्रज्ञांना आता असे वाटते की, प्रथमत: गालॅपॅगोस् कासवांच्या कमीत कमी आठ प्रजाती होत्या, त्यापैकी, किमान तीन अस्तंगत झाल्या आहेत. ज्यातील एक आहे “पिंटा” बेटावर रहाणारे कासव, त्यातील शेवटचा, जॉर्ज, 1972 साली एकटाच भरकटत फिरत असलेला आढळला ज्याला ममतेने ताब्यात घेतले गेले. वयाच्या 100 व्या वर्षापुढे सन् 2012 मध्ये त्याचे निधन झाले व नाजुक नैसर्गिक पर्यावरणावर मानवाने जगभर गेली दोन शतके केलेल्या घणाघाती आघाताचे, दुष्परीणाम पुन्हा एकदा समोर आले.
         पण, आता अस्तंगत गालॅपॅगोस् कासवाच्या गोष्टीने एक, आशादायी वळण घेतले आहे.
         असे दिसते की एका शतकापेक्षा अधिक काळापूर्वी काही नाविकांनी त्यांना नको असलेल्या-पाठीवर उंचवटा असलेल्या कासवांना-इसाबेल बेटावरील वॉर्फ ज्वालामुखी जवळील बॅकबे येथे सोडून दिले. परंतू नशीबाने कासव पाण्याबाहेर मानकाढून पाठीवर तरंगू शकते. बरीच कासवे किना-यावर आली. लाव्हायुक्त क्षेत्रातून हळू हळू पलीकडे गेली आणि इसाबेलच्या स्थानिक घुमटाकार कासवांबरोबर त्यांनी पैदास केली.
           2008 साली, शास्त्रज्ञांनी ज्वालामुखीच्या बाजूच्या 1600 पेक्षा अधिक कासवांचे रक्ताचे नमूने गोळा केले आणि त्यांना क्रमांकीत केले. प्रयोगशाळेत अनुवंशशास्त्राचे एक महद आश्चर्य समोर आले. (89) एकोणनव्वद कासवांचा काही भाग “फ्लोरीआना” प्रजातीचा होता. त्यांचा पूर्ण जनुके - “डीनए” प्रोफाईल एका शास्त्रीय वस्तुसंग्राहलायातून मिळवण्यात आला.

            काही जनुके अशी माहिती देत होती की त्यांचे पालक हे जिवंत, शुद्ध जनुकधारी फ्लोरीआना कासव होते. जे ध्वनित करते की, ती प्रजाती अजून अस्तंगत झालेली नसावी.
          17 कासवांमध्ये जास्त प्रमाणात “पिंटा” जनुके होती. कासवाचे आयुष्य 150 वर्षांपेक्षा जास्त असते. म्हणजेच त्याकासवांपैकी काही जण जॉर्जचे जवळचे, रक्ताचे नातलग ही असू शकतात.

          गेल्या महिन्यात, शास्त्रज्ञ पुन्हा एकदा त्यांना शोधायला गेले. त्यांची योजना अशी होती की, त्यांच्यातली “पिंटा आणि फ्लोरीआना” जनुके अधिक असलेली कासवे पकडून वेगवेगळी करून त्यांची पैदास वाढवणे जेणे करून जवळपास मूळ प्रजातीच्या जनुकांसारखीच् कासवे वाढवता येतील.
         येत्या काही पिढयात, साधारणतः 95 टक्के नष्ट झालेली पूर्वजांची जनुके मिळवता येतील असा शास्त्रज्ञांना विश्वास आहे.

26.

शास्त्रीय जनुकीय प्रकल्प सुरू होण्यासाठी कोणाचा मृत्यु कारणीभूत होता ? 

27.

उता-यानुसार अस्तंगत झालेले प्राणी कोणते ?

अ. डोडो

ब. प्रवासी कबुतर 

क. पिंटा गालॅपॅगोस् कासव

ड. फ्लोरिआना गालॅपॅगोस् 

28.

स्थानिक कासवांमध्ये स्थलांतरीत कासवापेक्षा वेगळे काय होते ?

29.

कासवे नाहीशी झाली कारण

30.

जॉर्ज मध्ये जास्तकरून कोठली जनुके आढळली ?

परिच्छेद (प्रश्न क्रमांक 31 ते 35) :
          प्रकाश रसायन शास्त्र म्हणजे सौर/प्रारित उर्जेच्या सहाय्याने घडून येणा-या रासायनिक अभिक्रिया किंवा रासायनिक प्रक्रियेमध्ये घडणारे बदल व अभिक्रियेच्या वेगातील बदल होय.
            सामान्य रासायनिक किंवा औष्णिक अभिक्रिया या अणू-रेणूमधील परस्पर टक्करांमुळे सक्रिय होतात. या अभिक्रियांचे वैशिष्ट्य असे की सदर अभिक्रिया स्वाभाविकपणे होत असताना मुक्त उर्जा कमी होत असेल तरच घडून येतात. असे असताना ही प्रकाश रासायनिक अभिक्रियांमध्ये प्रत्येकवेळी मुक्त उर्जा कमी होतेच असे नाही. प्रकाश रासायनिक अभिक्रियेची प्रक्रिया सुरु होण्या साठी, दृष्य/अतिनील अभिप्रेरकाच्या रेणुनी उपलब्ध प्रकाशापैकी निश्चित तरंग लांबीचा प्रकाश शोषण करणे आवश्यक असते. निसर्गात ब-याच प्रकाश रासायनिक अभिक्रिया उदा. सूर्यप्रकाशामुळे रंगीत कपड्यांचा रंगउडणे, प्रकाशसंश्लेषण ई होत असतात. खर तर ठराविक क्षमतेपेक्षा जास्त प्रकाश उर्जा शोषणामुळे रेणू विभाजन होऊ शकते. अशा प्रकारचे उर्जा शोषण हे अणू-रेणूचे उत्तेजीकरण करू शकते; आणि जर हे उत्तेजीकरण पुरेसे जास्त असेल तर त्याच्या सहाय्याने रासायनिक अभिक्रिया घडू शकते. अशा प्रकारे जिथे फक्त औष्णिक उर्जा अभिक्रिया घडविण्यास अथवा अभिक्रियेचा दर बदलण्यास पुरेशी नसते, तिथे अणू-रेणूने शोषूण केलेली सौर उर्जा उपयुक्त ठरू शकते.
             विनाउत्प्रेरकाच्या रासायनिक अभिक्रियांच्या दरात बदल अभिक्रियाकारकांची संहती कायम ठेवून फक्त तापमानात बदल करून करता येतो. प्रकाश रासायनिक अभिक्रियांमध्ये मात्र शोषण होणा-या प्रकाशाच्या कमी अधिक तीव्रतेने ही रासायनिक अभिक्रियांच्या वेगावर नियंत्रण ठेवणे शक्य होते. म्हणजेच अभिक्रियाकारकांच्या उत्तेजित रेणूंची संख्या प्रकाश पूरवठ्यावर अवलंबून असते. तात्पर्य अभिक्रियाकारकाच्या उत्तेजित रेणूचे प्रमाण अभिक्रियाकारकाला दिलेल्या प्रकाश पूरवठ्याशी प्रमाणित असते. म्हणजेच पुरेशा तीव्रतेचा प्रकाश पूरवठा केल्यास तापमान न वाढविता रासायनिक अभिक्रिया घडवून आणणे शक्य होते जे औष्णिक रासायनिक अभिक्रियांमध्ये अतिअधिक तापमाना-शिवाय शक्य नाही. प्रकाश रासायनिक अभिक्रियांचे उत्तेजन हे तापमानावर आधारित नसल्याने या अभिक्रिया तापमान विमुक्त असतात असे म्हणता येईल. प्रकाश रासायनिक अभिक्रियांच्या वेगात जर तापमान बदलामुळे कोणताही फरक पडत असेल तर तो प्रामुख्याने औष्णिक अभिक्रियामुळे असतो जो उत्तेजित प्रक्रियेपाठोपाठ येतो.

31.

सौर किंवा प्रकाश रासायनिक अभिक्रिया या ______________ शोषणामुळे घडून येतात.

32.

खालीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ? 

अ. औष्णिक अभिक्रिया ह्या तापमानावर अवलंबून असतात. 

ब. प्रकाश रासायनिक अभिक्रियांच्या वेग हा कोणताही प्रकाश वापरून नियंत्रित करता येतो. 

क. अभिक्रियाकारकांच्या उत्तेजीत रेणूंची संख्या ही प्रकाशाच्या तीव्रतेच्या मात्रेवर अवलंबून असते.

33.

सौर किंवा प्रकाश रासायनिक अभिक्रियेत सक्रियकरण उर्जा ही ______________ अवलंबून असते.

34.

निसर्गात, ____________ हे सौर/प्रकाश रासायनिक अभिक्रियेचे उदाहरण आहे. 

35.

ठराविक सौर किंवा प्रकाश रासायनिक अभिक्रियांमध्ये मुक्त उर्जा ___________. 

परिच्छेद (प्रश्न क्रमांक 36 ते 40) :
            धर्मनिरपेक्षतेचा संबंध चांगल्या किंवा वाईट लोकांशी नाही. तिचा संबंध असहिष्णुतेचे सार्वजनिक प्रदर्शन न सहन करणा-या न डगमगणाच्या कायद्याशी आहे. उद्या काय वाढून ठेवले आहे याची भीती न बाळगता सर्वसामान्य लोक सर्वसामान्य आयुष्य जगू शकतील याची खात्री करणे म्हणजे धर्मनिरपेक्षता. कायदा तुमच्या बाजूने असेल तर तुम्हाला कशाचीच तमा बाळगण्याची गरज नाही.
           कायदाच आपल्याला 'धर्मनिरपेक्ष बनवतो, निधर्मी दृष्टीकोन किंवा चर्च बंद करण्यामुळे आपण धर्मनिरपेक्ष होत नाही. वास्तविक पाहता पोपची अवज्ञा, घटस्फोट, पुनर्विवाह या घटनांमुळे आठवा हेन्री धर्मनिरपेक्ष ठरत नाही. व्हॅटीकनला त्याचे वागणे पसंत नसेल तर ते गेले उडत, धर्मनिरपेक्षता म्हणजे चर्च आणि राज्यसंस्थेला वेगळे करणे अशी भोळी भाबडी समजूत या ऐतिहासिक वास्तवामुळेच पसरली.
              वास घ्या, जा शिकार करा आणि मारा असे आदेश चर्चने दिले म्हणून युरोपमध्ये धार्मिक छळ चालू राहीला असे नाही तर आता राजानेच तसे आदेश दिले होते. धर्ममार्तंडांच्या निर्विवाद सत्तेची जागा आता राजांच्या सत्तेने घेतली होती.

              केवळ लोकशाहीच्या आगमनानंतरच धर्मनिरपेक्षता प्रत्यक्षात आली. आपण अचानक चांगले झालो किंवा आपल्या क्रुर हृदयांच्या जागी प्रेमळ हृदयांची स्थापना झाली असे नाही. आता जातीयवादी/जमातवादी आणि धार्मिक हिंसेसाठी कायद्यात शिक्षेची तरतूद झाली आणि त्यामुळेच खरा फरक पडला.
              जेव्हा कायदा सांप्रदायिक असहिष्णुतेच्या विरोधात कोणत्याही अपवादाशिवाय पद्धतशीरपणे काम करतो तेव्हा : धर्मनिरपेक्षता ही एक सवय बनते. मधुर आणि चंचल राजकीय व्याख्याने आणि शाळेतील नीतीशास्त्राचे धडे नव्हे तर असहिष्णुतेविषयी असहिष्णु असणारा कायदा आपल्याला सभ्य बनायला शिकवतो. जरी इतर समुदायांना जागा करून देणे किंवा सहन करणे क्लेशदायक असेल परंतु कायदा मोडण्यामुळे होणारे क्लेश या पेक्षा खूपच अधिक असतील.
              सामाजिक आणि आर्थिक असुरक्षिततेमुळे असहिष्णुतेला प्रेरणा मिळते हे सार्वकालीन सत्य आहे. जेव्हा नोक-यांचा तुटवडा भासू लागतो, एखाद्याच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचते त्यावेळी आपण इतर समुदायांना दोष द्यावयास लागतो आणि त्यांच्यामध्ये आपल्याला सर्व वाईट गोष्टी दिसू लागतात. याच्याशी सामना करण्याची सर्वाधिक उत्तम पद्धत कोणती, शब्दांची की कृतीची ? फाळणी नंतरचे स्फोटक वातावरण आणि तशातही धार्मिक भावनांना आपल्या नवजात लोकशाहीवर कब्जा मिळवण्यापासून रोखण्यात नेहरू कसे यशस्वी झाले ते आठवा. ते बरेचसे यशस्वी झाले याचे श्रेय जाते त्यांच्या नोकच्या देण्याच्या, धरणे बांधण्याच्या आणि पोलादाचे कारखाने उभे करण्याच्या आश्वासनांना. ते शुद्ध सहिष्णुतेविषयी किंवा धर्मनिरपेक्षतेविषयी क्वचितच बोलले त्यांनी फक्त कृती केली.
                आज धर्मनिरपेक्षता आणि ढोंगी धर्मनिरपेक्षता याविषयी बाष्कळ चर्चा आणि एकमेकांवर दोषारोप चालू असतात कारण भांडणाच्या दोन्ही बाजूंना आपल्या अर्थ व्यवस्थेचा विकास कसा करता येईल याची सुतराम कल्पना नाही, हे तुमच्यासाठी द्विपक्षीय सहकार्य आहे, भारतीय पद्धतीचे !
 

36.

लेखकाचा असा दावा आहे की

37.

पुढील दोन विधानापैकी कोणते योग्य आहे ? 

अ. हेन्री VIII ख्रिस्ती धर्माविरुद्ध होता.

ब. धर्मनिरपेक्षता संबंधित आहे केवळ सर्वसामान्य लोकांशी म्हणजे ते सर्वसामान्य आयुष्य जगू शकतील.

38.

लेखकाच्या मते ______________ युरोपमध्ये धार्मिक छळ चालू होता. 

अ. चर्चच्या राज्यात

ब. आठव्या हेन्रीच्या राज्यात

क. लोकशाहीच्या प्रस्थापनेनंतर

ड. अ, ब आणि क या वर उल्लेखिलेल्या तिन्ही पर्यायांमधील राजवटींमध्ये

39.

लेखकाच्या मते धर्मनिरपेक्षता म्हणजे

40.

पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ? 

अ. कोणत्याही पार्टीला आर्थिक व्यवस्थेचा विकास कसा करावयाचा हे माहीत नाही म्हणून दोन्ही असुरक्षित आहेत.

ब. नेहरूंनी फाळणी नंतरच्या स्फोटक वातावरणात धर्मनिरपेक्षता पाळण्या ऐवजी आर्थिक विकासाला प्रोत्साहित केले.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१६ - Paper 2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.