राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१६ - Paper 1

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१६ - Paper 1 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
1.

मात्र, अश्म युगानंतर लगेचच लोह युगाची सुरवात झाली, आणि मध्यंतरीच्या काळातील ताम्र युगाच्या खुणाही सापडत नाहीत.

2.

दोन कोरड्या रोट्या, एक पेलाभर पाणी आणि प्रत्येक संपादकियाबद्दल दहा वर्षे सक्तमजुरी' या पगारावर कोणत्या वृत्तपत्राने संपादकपदाची जाहिरात दिली होती ?

3.

मुंबई आणि महाराष्ट्र यांच्यातील नाते वर्णन करताना जशी गरुडाला पंखं आणि वाघाला नखं असे वर्णन कोणत्या कवी ने केले ?

4.

खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा.

अ. यांना गंगाधर गाडगीळांसारखे अर्थशास्त्राचे विद्वान ‘आधुनिक भारताचे शिल्पकार' मानतात.

ब. दादाभाई नौरोजी व न्या. रानडे यांचा आर्थिक राष्ट्रवादाचा पाया त्यांच्या विचारात आढळतो.

क. भारतीय जीवनात त्यांनी शेतीचे महत्त्व जाणले होते.

5.

खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा.

अ. ते पक्के महाविदर्भवादी होते.

ब. महाविदर्भास उपप्रांताचा दर्जा द्यावा ही-धनंजयरावांची कल्पनाही त्यांना मान्य नव्हती.

क. त्यांना महाविदर्भ हे स्वतंत्र राज्य असावे असे सतत वाटे.

6.

पुणे येथे ____________ उत्सव साजरा केल्यावर दहा दिवसातच पुण्याचे कलेक्टर श्री. रँड व दुस-या अधिका-याची, सरकारी घरातून परत येताना गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

7.

तरूण बंगाली यंग इटली' शी परिचित होते. ___________ यांच्या भाषणातून त्यांचा यंग इटली' शी परिचय झाला होता.

8.

प्रशासकीय सेवांसाठी विद्यापीठाची पदवी ही आवश्यक बाब असू नये असे कोणत्या आयोगाने म्हटले आहे ?

9.

खालील विधाने वाचून उत्तराचा योग्य पर्याय निवडा.

प्राचीन काळात भारतीयांनी ग्रीक नाण्यांचे अनुकरण केले, कारण 

अ. भारतीय नाण्यांचे वजन व आकार अनिश्चित असे. 

ब. ग्रीकांची नाणी आकर्षक होती. 

क. ग्रीकांची नाणी निश्चित वजनाची होती. 

ड. भारतीय नाणी अहतमुद्रा पद्धतीची असते.

10.

पाकिस्तान' हा शब्द सर्वप्रथम कोणी वापरला ?

11.

ख्रिस्त पूर्व 323 मध्ये बॅबीलोन येथे अॅलेक्झांडरचा मृत्यू झाल्याची बातमी आली आणि __________ आणि __________ यांनी लोकांना परकीय आक्रमका विरुद्ध भडकवले.

12.

पुढील विधानात कोणाचे वर्णन केले आहे ?

मुळात तो तुर्कस्तान मधील एक गुलाम होता. त्याच्या लहानपणी एका व्यापा-याने त्याला निशापूरला आणले, तिथे त्याला काझी फकरुद्दीन अब्दूल आझीझ कुफी यांनी विकत घेतले. काझीच्या मुलाने त्याला एका व्यापा-इखत्यार-उद्दीन मुहम्मदयाला विकले आणि व्यापा-याने त्याला मुहम्मद घोरीला विकले.

13.

इंग्रजी शिक्षित बंगाली पहिल्या पिढीचा परवलीचा शब्द __________ ही होता.

14.

जोड्या जुळवा :

15.

पुढीलपैकी विजोड व्यक्ती ओळखा. 

अ. चाणक्य

ब. विष्णुगुप्त

क. रामगुप्त

ड. कौटिल्य

इ. विष्णू शर्मा

फ. पक्षिण स्वामी

 

16.

खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत ?

अ. नजिकच्या काळातील संशोधन असे दर्शविते कि भारतीय व आशियाई तबकांच्या अभिसरणामुळे भूखंड कवचाचे हिमालयीन प्रदेशामध्ये 500 किमी ने संक्षेपण झालेले आहे.

ब. हिंद महासागराच्या सागर तळाचा महासागरी कटकापासून विस्तार झालेलाही दिसतो.

17.

भारतातील जल सिंचनासंदर्भात खालीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने सत्य आहे/आहेत ?
अ. फिरोज शाह तुघलकने सुदर्शन सरोवर बांधले होते.

ब. पुण्य गुप्तने पश्चिम यमुना कालवा बांधला. 

18.

खालील दोन विधानांपैकी कोणते विधान बरोबर आहे ?

अ. चुंबकीय अनुनाद प्रतिमा (MRI) शरीराच्या कोणत्याही भागाची छेद प्रतिमा निर्माण करते.

ब. सी.टी. स्कॅन क्ष-किरण व एम्.आर.आय. पेक्षा उच्च दर्जाची आहे.

19.

खालील वाक्ये वाचा आणि दिलेल्यापैकी योग्य पर्याय निवडा :

अ. एल-निनो म्हणजे फक्त उष्ण विषुववृत्तीय प्रवाहाचा विस्तार होय.

ब. एल-निनो म्हणजे “बाल ख्रिस्त” होय.

क. एल-निनो म्हणजे डिसेंबरमधील नाताळाच्या/ख्रिस्तमसच्या काळात दिसणारा प्रवाह होय.

ड. एल-निनो, भारतामध्ये दीर्घ काळासाठीच्या मान्सून पर्जन्याच्या अंदाजासाठी वापरण्यात आणला जातो.

20.

पुढील शिखरे ऊँचीच्या उतरत्या क्रमाने लावा :

अ. नंदा देवी

ब. कांचनजंगा

क. गंगोत्री

ड. बद्रीनाथ

ड. नंगा पर्वत 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१६ - Paper 1 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.