राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१५ - Paper 1

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१५ - Paper 1 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
1.

4 डिसेंबर 1947 रोजी हैदराबाद राज्य मुक्ती संग्रामात पुढीलपैकी कोणी निझामावर बाँब टाकून त्याचा वध करण्याचा प्रयत्न केला ?

2.

चुकीची जोडी ओळखा :

3.

उत्तरेकडील पुष्कळशा हिंदू निर्वासितांना या राज्याने आणि शहराने आकर्षित केले. समकालीन वर्णनावरून असे वाटते की हे शहर श्रीमंत आणि खूप सुंदर असावे. अब्दूर रझाक म्हणतो, “पृथ्वीतलावर इतरत्र कुठेही असे शहर डोळयांनी बघितले नाही, किंवा संपूर्ण पृथ्वीवर असे शहर आहे असे कानांनी ऐकले नाही.' या वाक्यांतून कोणत्या राज्याचा आणि शहराचा उल्लेख केला आहे ?

4.

1930 च्या दशकातील जागतिक महामंदीमुळे पुढीलपैकी काय झाले ?

अ. मुंबईची लोकसंख्या घटली.

ब. अहमदाबादमधील कापडगिरण्यांची संख्या घटली.

क. मुंबई गिरणीमालकांनी कामगारांच्या वेतनात 30 - 50% कपात केली.

ड. वरील सर्व पर्याय योग्य. 

5.

हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दूत” असे जिनांचे वर्णन कोणी केले आहे ?

6.

अगदी सुरवातीची संस्कृत नाटके त्यानी लिहीली. ती ताडपत्रावर लिहिलेली हस्तलिखीते तुकड्यांच्या स्वरूपात खरे तर आहेत, व आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती गोबीच्या वाळवंटाच्या सीमेवरील तुरफान या ठिकाणी सापडली. प्राचीन भारतातील हा कोणता लेखक आहे ?

7.

1926 साली मुंबई कायदेमंडळात _____________ यांनी असे विधेयक मांडले की ‘ग्रामजोशांना' संस्कार करायला बोलावले नसेल, तर त्यांना दक्षिणा मागण्याचा हक्क राहणार नाही.

8.

खाली नमुद केलेली चीड आणणारी कृत्ये कोणी केली होती ?

अ. भारतीय नागरी सेवेत प्रवेश करण्याचे वय कमी करणे,

ब. वृत्तपत्र स्वातंत्र्यावर नियंत्रण घालणे.

क. 1878 चा शस्त्र कायदा.

ड. ब्रिटीश उत्पादनावरील आयात कर काढून टाकणे.

9.

पुढीलपैकी कोणते दोन वर्ग गणपती उत्सवाच्या आयोजनाच्या विरुद्ध होते ?

अ. रानडेंच्या विचारसरणीचे उदारमतवादी हिंदू 

ब. राष्ट्रीय सभेतील कर्मठ राजकारणी

क. बौद्ध

ड. जैन 

10.

रावसाहेब पेशवे, भाऊसाहेब लिमये, गणेश केशव लिमये, भाऊराव लिमये, भाऊसाहेब काशीनाथ खाजगीवाले, राजेसाहेब, विठ्ठल छत्रे आणि बळवंत जगदंब ही नावे पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने घेतली होती ? 

11.

पुढीलपैकी कोणती संघटना स्त्रियांनी स्त्रियांसाठी प्रथम उभारली होती ?

12.

क्रिप्स यांचे भारतीय मित्र ___________ हे देखील त्यांच्यावर इतके नाराज झाले कि त्यांनी कबूल केले, “ही एक खेदाची गोष्ट आहे की क्रिप्स सारखी व्यक्तीही स्वत:ला सैतानाचा वकील बनू देते.” 

13.

पुढील कोणते विधान अयोग्य आहे ?

अ. 2014 च्या भारताच्या लोकसभा निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी सर्वात उत्तुंग म्हणजे जवळपास 66% होती.

ब. या पूर्वीचा सर्वात मोठा आकडा 1984 मधील होता, तो होता सुमारे 54%. 

14.

__________ स्फुर्ती घेऊन 1893, मध्ये टिळकांनी गणपती सणाचे सार्वजनिक उत्सवात रूपांतर केले. 

15.

वालचंद उद्योगसमूहाने स्वातंत्र्यपूर्व काळात पुढीलपैकी कोणत्या उद्योगांची स्थापना केली ?

अ. हिंदुस्थान एअरक्राफ्ट

ब. सिंधिया स्टीम नॅव्हिगेशन

क. प्रीमिअर ऑटोमोबाइल्स

ड. हिंदुस्थान मोटर्स

16.

आपले क्रिकेट दैवत सचिन तेंदुलकर नेहमी 10 क्रमांकाच्या जर्सीत असे.
फुटबॉल चे काही खेळाडू सुद्धा दैविक शक्ती / कला प्राप्त आहेत. त्यांचे चेंडू पळविण्याचे, इतर खेळाडूंना चेंडू पास करावयाचे व गोल करावयाचे कौशल्य डोळयाचे पारणे फेडते. हे खेळाडू 10 क्रमांकाच्या जर्सीत असतात. पुढीलपैकी कोण 10 क्रमांकाच्या जर्सीत नसते / नव्हते ? 

(a) मेस्सी

(b) पेले

(c) नेमार

(d) मॅराडोना

(e) बँगियो

(f) काका

(g) रोनाल्डो

(h) रूनी

पर्याय : 

17.

पृथ्वीच्या अंतर्गत भागात जस जसे खोल जावे तस तसे सरासरी तापमानात वाढ कशी होते ? 

18.

मंगळा संबंधी खालील विधानांचा विचार करा :

अ. विरळ वातावरण

ब. शुष्क नदी पात्र

क. -30° से. ते - 100° से. तापमान

ड. फोबोस हा एकमेव उपग्रह

वरील विधानापैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

19.

समुद्रास मिळण्यापूर्वी खालीलपैकी कोणती नदी विस्तीर्ण वाळवंटातून प्रवास करते ?

20.

खालीलपैकी कोणता भाग ज्वालामुखीशी संबंधीत नाही ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१५ - Paper 1 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.