राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१६ GS-2

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१६ GS-2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
101.

खालीलपैकी कोण 'अखिल भारतीय सेवांचे जनक' म्हणून ओळखले जातात ?

102.

भारताच्या नियंत्रक व महालेखापरिक्षकाबाबत खालील विधाने विचारात घ्या :

(a) केन्द्र व राज्यांच्या महसूलातून होणारया खर्चाचे लेखा-परीक्षण करणे.

(b) संसदेने मंजूर केलेल्या रकमेपेक्षा जास्त रक्कम केन्द्र शासनाकडून काढण्यात आलेली नाही याची खात्री करणे.

(c) केन्द्र आणि राज्याच्या आर्थिक देवाण-घेवाणीतील बिनचूकपणा अथवा अन्य बाबतीत मतप्रदर्शन करणे.

(d) खर्चातील नियम व अधिनियमाच्या अनियमिततेची प्रकरणे निदर्शनास आणणे.

सदरहू विधानांपैकी कोणती बरोबर आहेत ?

103.

जोड्या लावा. 

104.

भारताच्या अर्थ मंत्रालयाच्या आय-व्यय विभागाचे भाग हे आहेत :

(a) महसूल विभाग

(b) नागरी खर्च विषयक विभाग

(C) अंदाज पत्रकीय विभाग

(d) संरक्षण विषयक खर्चाचा विभाग

पर्यायी उत्तरे :

105.

'यशदाची' उद्दिष्टे ही आहेत :

(a) राज्य शासनाच्या आर्थिक व सामाजिक कार्याच्या विकासासाठी आधुनिक व्यवस्थापन शास्त्राला एक मुख्य साधन म्हणून प्रोत्साहन देणे. 

(b) व्यवस्थापकीय कौशल्याचा विकास करणे. 

(c) संघटकीय कार्यक्षमतेचा विकास करणे. 

(d) नेतृत्व आणि निर्णय निर्धारण क्षमतेचा विकास करणे.

पर्यायी उत्तरे :

106.

'अखिल भारतीय सेवे' संबंधी खालील विधाने विचारात घ्या :

(a) त्या ब्रिटीश राजवटीची निर्मिती आहे.

(b) त्या केंद्र आणि राज्यांसाठी सामाईक असतात.

(c) त्या केंद्र आणि राज्य शासनांना जोडणारा मौल्यवान दुवा उपलब्ध करतात.

(d) त्या अखिल भारतीय स्तरावर समान शैक्षणिक पात्रता आणि एकाच वेतन श्रेणीने भरती केल्या जातात. 

पर्यायी उत्तरे :

107.

खालीलपैकी कोणते सत्य आहे?

(a) राष्ट्रीय प्रशासन संस्था 1959 मध्ये स्थापन करण्यात आली.

(b) राष्ट्रीय प्रशासन संस्थेचे 1974 साली 'लाल बहादुर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन संस्था' असे नामकरण करण्यात आले.

(c) केंद्रीय पोलीस प्रशिक्षण महाविद्यालयाचे 1975-76 साली 'सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस संस्था असे नामकरण करण्यात आले.

पर्यायी उत्तरे :

108.

खालील विधाने विचारात घ्या : 

(a) 'नागरी सेवा' (Civil Service) हा शब्दप्रयोग सर्वप्रथम ईस्ट इंडिया कंपनीच्या नोकरवर्गासाठी वापरला गेला.

(b) आय सी एस (ICS) चे ब्रिटीशांची नागरी सेना असेही वर्णन केले गेले.

(c) अनुच्छेद 309 सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांच्या नोकर वर्गास लागू होत नाही.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?

109.

लोकलेखा समितीबाबत खालीलपैकी कोणते सत्य आहे ?

(a) ती सर्वात जुनी आर्थिक समिती आहे.

(b) तिचे वर्णन अंदाज समितीची 'जुळी बहिण' असे केले जाते.

(c) तिचे निष्कर्ष हे पूर्वलक्षी स्वरूपाचे (Ex-post facto) असतात.

(d) तिचे कार्य हे केवळ शव विच्छेदनाचे आहे.

पर्यायी उत्तरे : 

110.

नवीन अखिल भारतीय सेवांची निर्मिती _______________ करू शकतात.

111.

भारताच्या संचित निधीतून देयके (Payments) देण्यासाठी ______________ द्वारे अधिकृत केले जाते. 

112.

LBSNAA बाबत योग्य विधाने ओळखा :

(a) नॅशनल अकॅडमी ऑफ अॅडमिनीस्ट्रेशन (NAA) ची स्थापना 1959 मध्ये करण्यात आली होती.

(b) ऑक्टोबर, 1972 मध्ये NAA चे नामांतर 'लाल बहादुर शास्त्री अकॅडमी ऑफ अॅडमिनीस्ट्रेशन' असे करण्यात आले.

(c) सप्टेंबर, 1975 मध्ये 'नॅशनल' हा शब्द अकॅडमीला जोडण्यात आला.

पर्यायी उत्तरे :

113.

योग्य विधाने ओळखा - (भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक) :

(a) नियंत्रक व महालेखा परिक्षकांचे कार्यालय 1920 मध्ये स्थापन झाले.

(b) त्यांची नेमणूक राष्ट्रपतीद्वारे केली जाते.

(c) तो सर्व प्रकारच्या बाह्य प्रभाव व दबावापासून मुक्त असतो.

(d) तो भारतीय लेखांकन व लेखापरीक्षा विभागाचा प्रशासकीय प्रमुख असतो.

पर्यायी उत्तरे : 

114.

भारतीय अभियांत्रिकी सेवेची शिफारस _______________ केली होती.

115.

योग्य विधाने ओळखा - (सार्वजनिक उपक्रमावरील समिती) :

(a) सार्वजनिक उपक्रमावरील समितीची स्थापना 1964 मध्ये करण्यात आली होती.

(b) सध्या समितीमध्ये लोकसभेतून 10 सदस्य आणि राज्यसभेतून 5 सदस्य असतात.

(c) समिती ही नियंत्रक व महालेखा परिक्षकांचा सार्वजनिक उपक्रमावरील अहवाल तपासते. 

पर्यायी उत्तरे :

116.

प्रशिक्षणाची उद्दिष्ट्ये विचारात घ्या :

(a) नोकरवर्गाच्या कार्यक्षमतेत वाढ करणे.

(b) कार्यक्षम-लायक अधिका-यांची दुसरी फळी निर्माण करणे.

(c) सनदी सेवकांना जनतेप्रती जबाबदार बनविणे,

(d) सनदी सेवकांची मानसिक, नैतिक आणि आध्यात्मिक क्षमता वाढविणे. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

117.

भारतात सरकारी कर्मचा-यांसाठी आचारसंहिता म्हणजे :

(a) सेवेतील सचोटी

(b) सेवेतील अनुशासन

(c) सेवेत वेळेत कार्य करणे

(d) सेवेत असताना राजकारणापासून तटस्थता

पर्यायी उत्तरे :

118.

पदप्रवेश प्रशिक्षणाच्या पुढील तीन प्रमुख पायच्या असतात :

(a) पायाभूत प्रशिक्षण

(b) संस्थात्मक किंवा व्यावसायिक प्रशिक्षण

(c) सेवाअंतर्गत प्रशिक्षण

(d) जिल्हा किंवा क्षेत्र प्रशिक्षण

पर्यायी उत्तरे :

119.

भारतीय वनसेवेची निर्मिती कधी करण्यात आली ?

120.

भारताच्या नियंत्रक व महालेखा परिक्षकाला संविधानाच्या ______________ या कलमांद्वारे विशेष दर्जा दिला गेला आहे.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१६ GS-2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.