राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१२ GS-2

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१२ GS-2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.

खालीलपैकी भारतीय रिर्झव बँकेचे गव्हर्नर कोण नव्हते ?

22.

भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका प्रथमतः केंव्हा दुरुस्त करण्यात आली ?

23.

पुढील राज्यांचा निर्मितीनुसार क्रम लावा ?

24.

भारतीय संविधानाने नागरिकांना आर्थिक न्यायाची खात्री कशाद्वारे दिली ?

25.

खालीलपैकी कोणत्या भारतीय राज्यघटनेच्या वैशिष्ट्यावरुन असे निदर्शनास येते की, वास्तविक कार्यकारी सत्ता पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली कार्य करणाच्या मंत्रीमंडळाच्या हातात आहे ?

26.

भारतीय संविधानाच्या 19(1) व्या कलमात खालीलपैकी कोणत्या स्वातंत्र्याचा विशेषत्वाने समावेश नाही ?

27.

खालीलपैकी कोणती संसदीय समिती नाही ?

28.

जनहितार्थ याचिकेचा उद्देश काय आहे ? 

अ. सामाजिक न्याय प्रस्थापित करणे

ब. सर्वसामान्य जनतेला पाठिंबा देणे

क. व्यक्तीहित जोपासण्याचा प्रयत्न करणे

ड. सामाजिक समता प्रस्थापित करणे

खालीपैकी योग्य पर्याय निवडा :

29.

आंतरराज्यीय नद्या व नद्या खोरे विवादांबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?

30.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाचे प्रथम मुख्य न्यायमूर्ति कोण होते ?

31.

खाली दिलेली भारतीय राज्यघटनेची वैशिष्टये आणि त्यासमोर दिलेले स्रोत तपासून योग्य पर्याय निवडा.
अ. कॅबिनेट व्यवस्था - फ्रान्स

ब. मूलभूत हक्क - सोव्हिएत युनियन

क. उर्वरित अधिकार - ऑस्ट्रेलिया

ड. मार्गदर्शक तत्त्वे - जर्मनी

32.

घटनेच्या कलम 16 संदर्भात खालील विधाने तपासा आणि उत्तराचा योग्य पर्याय निवडा :
अ. पोटकलम 4-A चा 77 व्या घटनादुरुस्तीद्वारे समावेश केला गेला.

ब. पोटकलम 4-A हे पदोन्नतीमधील आरक्षणासंदर्भात आहे.

क. पोटकलम 4-A हे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्ग यांच्या हिताकरता,
पदोन्नतीमधील आरक्षणासंदर्भात आहे.

33.

घटनेमधे मूलभूत कर्तव्यांचा समावेश_________च्या शिफारशीवरून करण्यात आला.

34.

संसद सदस्याच्या राजकीय पक्षाच्या, इतर राजकीय पक्षाशी विलिनीकरणासंदर्भात कोणते विधान बरोबर 
नाही ?

अ. सदर संसद सदस्य ज्या पक्षामधे विलिनीकरण झाले आहे, त्या पक्षाचा सदस्य बनतो.

ब. जर विलिनीकरण मान्य नसेल, तर सदर सदस्य अपात्र ठरतो.

क. निवडणूक आयोग संसदीय पक्षाची मान्यता रद्द करतो.

ड. संसदीय पक्षाच्या दोन तृतियांश सदस्यांनी जर विलिनीकरण मान्य केले, तरच ते घडते.

35.

खालीलपैकी कोणती/त्या संस्था वैधानिक नाहीत ?

अ. राष्ट्रीय विकास परिषद

ब. विद्यापीठ अनुदान आयोग

क. नियोजन आयोग

ड. केंद्रीय दक्षता आयोग

36.

 गॅट्स (GATS) करारानुसार उच्चशिक्षणाचा अंतर्भाव सेवा क्षेत्रात केल्यामुळे कोणते परिणाम संभवतात ?
अ. परदेशातील विद्यापीठांना देशातील उच्चशिक्षण क्षेत्रात प्रवेश मिळणार नाही.

ब. एक सदस्यराष्ट्राला दुस-या सदस्य राष्ट्रामध्ये सेवेवर आधारित व्यवसाय, धंदा, संस्था सुरू करण्याची
मुभा असेल.

क. भारतात आपल्या शाखा काढण्याचा अधिकार परदेशातील शिक्षण संस्था/विद्यापीठाला मिळू शकेल.

ड. या शिक्षण संस्थांवर भारत सरकारचे फारसे नियंत्रण असणार नाही.

वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?

37.

 जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात होणा-या स्पर्धेत तग धरुन राहण्यासाठी देशी विद्यापीठांनी
काय केले पाहिजे ?

अ. विद्यापीठ आणि महाविद्यालयांचे सबळीकरण करणे.

ब. विद्यापीठ आणि महाविद्यालयांनी आपली शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे.

क. विद्यापीठ आणि महाविद्यालयांना स्वायत्तता प्रदान करणे.

ड. विद्यापीठ आणि महाविद्यालयांचे खाजगीकरण करणे. 

वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?

38.

शिक्षण हा सेवाक्षेत्रातील अत्यंत महत्त्वाचा घटक असून सेवा क्षेत्रात शिक्षणाची भूमिका कोणती ?

अ. भांडवल, श्रम आणि संयोजन यामध्ये सकारात्मक, विकासाभिमुख बदल घडवून आणणे.

ब. सेवा क्षेत्रातील अन्य उत्पादक सेवांचा पुरवठा करण्यासाठी कुशल मनुष्यबळ निर्माण करणे.

क. अपारंपारिक उर्जास्रोताबाबत जनजागृती करणे.

वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?

39.

उच्च शिक्षणावरील वाढता खर्च नियंत्रित करण्यासाठी शासनाने कोणते मार्ग अवलंबिले आहेत ?
अ. दूर शिक्षणपद्धतीचा स्वीकार व प्रसार. 

ब. उच्च शिक्षण क्षेत्रात खाजगी प्रयत्नांना उत्तेजन

क. उच्च शिक्षणावरील शासकीय खर्चाच्या कपातीचे धोरण. 

ड. औपचारिक शिक्षणाला उत्तेजन.

खालीलपैकी योग्य पर्याय निवडा :

40.

शिक्षण क्षेत्राने देशासमोरील आव्हाने पेलण्यास शिक्षक प्रशिक्षणात गुणवत्ता व दर्जा सुधारण्यासाठी कोणते उपाय केले पाहिजेत ?

अ. समाजातील अधिक बुद्धिमान युवांना शैक्षणिक सेवाक्षेत्राकडे आकृष्ट करुन घेणे.

ब. प्रशिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी कार्यप्रणाली विकसित करणे.

क. शिक्षक प्रशिक्षणासाठी सोईसुविधांची निर्मिती करणे.

वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१२ GS-2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.