राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१२ GS-4

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१२ GS-4 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
101.

भारताचे 2010-11 या वर्षाचे एकूण अन्नधान्य उत्पादन किती ?

102.

कुळाच्या हक्कासंबंधी सुधारणेत खालील कोणत्या बाबींचा समावेश करण्यात आला ?

अ. भूधारणाधिकार

ब. चकबंदी

क. जमिनीचे पुनर्वाटप

ड. जमिनीचे भाडे आकारणी नियमीत करणे

योग्य पर्याय निवडा :

103.

भारत सरकारने _______ व ________ ह्या दोन गहू जाती देशातील अन्नधान्य उत्पादन वाढविण्यासाठी आयात केल्या.

104.

ग्रामीण पायाभूत विकासासाठी ________ या संस्थेने राज्यातील सिंचन प्रकल्प जलदगतीने कार्यान्वित होण्यासाठी विकास निधीची स्थापना केली.

105.

सन 2012-13 या वर्षासाठी गहू या पिकासाठी किमान आधारभूत किंमत गतवर्षीच्या तुलनेत _______ रुपयांनी वाढविण्यात आली.

106.

सर्वसाधारण व्यक्तीसाठी शाकाहारी समतोल आहारात प्रतीदिनी ________ ग्रॅम तृणधान्यांचा समावेश असावा.

107.

शेणखतामध्ये ________ टक्के नत्र असते.

108.

संपूर्ण देशभरात दुपारचे जेवण योजना (MDM) अंतर्गत _______ मुलांना जेवण देण्यात येते.

109.

किसान क्रेडिट कार्ड योजना कोणत्या कर्जासाठी लागू आहे ?

110.

पश्चिम बंगालमधील डाव्या सरकारने 1977 साली _______ जमीन सुधारणापद्धत अंमलात आणली.

111.

विविध संपदेच्या जसे की, शेतीविषय, वनशास्त्र, भूशास्त्र, जल, महासागर, इत्यादिच्या ______  बाह्यप्रक्षेपित संवेदनाने समर्थ केले आहे.

अ. मानचित्रण

ब. अध्ययन

क. बोधक/नियंत्रण

ड. व्यवस्थापन

योग्य पर्याय निवडा :

112.

भारताने अवकाशमोहिम 2025 मध्ये खूप महत्त्वाकांक्षी योजना आखल्या आहेल त्या कोणत्या ?

अ. टीव्ही, फोन, मोबाईल, बँकिंग, सुरक्षा या बाबी उपग्रहामार्फत गावोगावी उपलब्ध होतील.

ब. खूप अधिक वजन अवकाशात नेणारा अग्निबाण बनवणार.

क. अवकाशात भारतीय अंतराळवीर पाठवणार.

ड. पुन्हापुन्हा वापरता येणारे अवकाशयान बनवणार.

इ. चंद्रावर चाकांची गाडी असणारे यान उतरवणार.

फ. आपातकालीन परिस्थिती, हवामान, नैसर्गिक साधन संपत्तीच्या योग्य निरीक्षणासाठी अधिक क्षमतेने फोटो घेण्याचे तंत्रज्ञान बनवणार.

योग्य पर्याय निवडा :

113.

भारतातील चार महत्त्वाचे अणु वीजनिर्मिती प्रकल्प खाली दिले आहेत. वीजनिर्मितीच्या क्षमतेनुसार त्यांचा उतरता क्रम लावा :

अ. KAPS, काक्रापार, गुजरात

ब. RAPS, रावतभाटा, कोटा, राजस्थान

क. KAPS, कैगा, कर्नाटक

ड. TAPS, तारापूर, ठाणे, महाराष्ट्र

योग्य पर्याय निवडा :

114.

जलशुद्धीकरणासाठी सौरऊर्जा चलित पोर्टेबल डोमेस्टिक बँकीश वॉटर रिवर्स ओस्मोसिस (BWRO) तंत्रज्ञान बी.ए.आर.सी. (BARC) ने विकसित केलेले आहे. हे तंत्रज्ञान कशावर आधारीत आहे ?

115.

अवकाश संशोधन मंडळाची (COSPAR) उद्दीष्टे 
अ. अवकाशातील वैज्ञानिक संशोधनाला बढती देणे.

ब. परिणाम, माहीती आणि अभिप्राय यांची देवाणघेवाण. 

क. जाहीर चर्चा करणा-या साधनांची तरतूद करणे.

ड. वैज्ञानिक अवकाश संशोधनावर परीणाम करणा-या अडचणीवर चर्चा करणे.

योग्य पर्याय निवडा :

116.

महाराष्ट्रातील महाबळेश्वर येथे उघडण्यात येणा-या हाय लॅटीट्यूड क्लाउड फिजिक्स लॅबॉरेटरीत (high
latitude cloud physics laboratory) खालीलपैकी कोणत्या क्षेत्रांचा अभ्यास केला जाईल ?

अ. ढगांची घडण आणि त्यांची प्रतिकृती  

ब. खगोलशास्त्र  

क. अंतरिक्षातून पृथ्वीकडे येणा-या शक्तीशाली किरणांचा अभ्यास (वैश्विक किरणांचा अभ्यास)

ड. हवामान अंदाज

योग्य पर्याय निवडा :

117.

अणुशक्ती केन्द्रामधून तयार होणा-या इंधनकच-याची विल्हेवाट कशी लावतात ?

अ. गटारे, नाले, नद्यांमध्ये पाण्यासोबत सोडून देतात.

ब. वस्तीपासून दूर उघडयावर फेकून देतात.

क. स्टेनलेस स्टीलच्या डब्यात कायमचे बंद करून तळघरातच साठवतात.

ड. समुद्राच्या तळाशी डबाबंद केलेला कचरा नेऊन टाकतात.

योग्य पर्याय निवडा :

118.

डॉ. होमी भाभा यांनी तयार केलेल्या भारताच्या 3 टप्पा अणुऊर्जा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी प्रत्येक टप्यात वापरात येणा-या विक्रियकांचा योग्य अनुक्रम निवडा.

अ. थोरीअम इंधन म्हणून वापरणारा जडपाणी विक्रीयक,

ब. प्लुटोनिअम इंधन म्हणून वापरणारा द्रूतगति प्रजनक विक्रीयक.

क. थोरीअम इंधन म्हणून वापरणारा प्रगत अणूउर्जा तंत्र विक्रीयक.

ड. युरॅनिअम इंधन म्हणून वापरणारा जडपाणी, विक्रीयक.

योग्य पर्याय निवडा :

119.

पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

अ. गॅमा किरणोत्सार साध्या अल्युमिनिअम फॉईलने अडवता येतात.

ब. अल्फा किरणोत्सार कातडीने अडतो पण बीटा किरणोत्सार मात्र हाडांपर्यंत पोहोचू शकतो.

क. बीटा किरणोत्सार 20 इंच जाडीच्या काँक्रीटच्या भिंतीतून आरपार जाऊ शकतो.

ड. गॅमा किरणोत्सार शिशाची भिंत, स्टेनलेस स्टीलची भिंत किंवा काँक्रिटची भिंत अडवू शकते.

120.

चंद्रयान-1 चे शोध आंतराष्ट्रीय दैनिकांत प्रकाशित झालेले आहेत. कोणते अभ्यास चंद्रयान-1 कडून झाले आहेत ? 

अ. चंद्राचे रासायनिक मानचित्रण (मॅपिंग)

ब. चंद्राचे खनिजशास्त्रिय मानचित्रण (मॅपिंग)

क. चंद्राचे फोटोजिओलोजिकल (चित्र-भूशास्त्रीय) मानचित्रण

ड. चंद्राचे जीवशास्त्रविषयक मानचित्रण (मॅपिंग) 

योग्य पर्याय निवडा :

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१२ GS-4 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.