दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट क (मुख्य) परीक्षा पेपर १ - २०१७

दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट क (मुख्य) परीक्षा पेपर १ - २०१७ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :

खालील उतारा वाचा व त्यावरील प्रश्न क्र. 21 ते 25 सोडवा.                                                                       १९७५ या वर्षी युनोने स्त्री दशक जाहीर केले. त्यानिमित्ताने संपूर्ण जगात स्त्रियांच्या प्रश्नांचे विचारमंथन झाले. भारतात यानंतर अनेक स्त्री संघटनांची स्थापना झाली. स्त्री प्रश्नांवर तळमळीने कार्य करण्यासाठी अनेक कार्यकर्त्या पुढे आल्या. समविचारी स्त्रियांचे संघटन तयार झाले आणि यातूनच स्त्रीवादी नियतकालिकांची निर्मिती होऊ लागली. या आधीही स्त्रियांसाठी नियतकालिके चालविली गेली पण त्यांचे स्वरूप पुरुषसत्ताक परिप्रेक्ष्यातून स्त्रियांचा विचार करणारे होते त्यामुळे स्त्रीच्या ‘आदर्श पत्नी' व 'आदर्श माता' या रूपांवर भर देण्यात आला. माजघराच्या चौकटीत राहून स्त्रियांची करमणूक व्हावी. कुटुंबाला उपयुक्त गोष्टी त्यांनी करत राहाव्यात असे या नियतकालिकांचे स्वरूप होते. स्त्रीवादी नियतकालिके मात्र स्त्रियांचे समग्र माणूसपणाचे भान जागृत करण्यासाठी प्रयत्नशील होते त्यामुळे पारंपरिक नियतकालिकांपेक्षा या नियतकालिकांचे स्वरूप वेगळे होते. त्यामुळे या नियतकालिकांना ब-याच काळापर्यंत पुरुषांची हेटाळणी सहन करावी लागली.                                                                                    १९७५ नंतर स्त्रीवादी चळवळीत जे नवे मूल्यभान निर्माण झाले त्याला खतपाणी घालण्याचे महत्त्वपूर्ण काम स्त्रीवादी नियतकालिकांनी केले. स्त्री प्रश्नांचा समग्र विचार करून स्त्रियांचे प्रश्न बौद्धिक पद्धतीने, आग्रहपूर्वक मांडण्याचा प्रयत्न केला. स्त्रीवादी, स्त्रीवादी चळवळ तसेच स्त्रीवादी साहित्य आणि समीक्षा याविषयी प्रभावी मांडणी या नियतकालिकांमधून झाली. चळवळीत काम करणा-या स्त्रियांची मते जाणून घेण्यासाठी या नियतकालिकांचा उपयोग झाला. मराठीतील स्त्रीवादी नियतकालिकांचा आढावा पुढीलप्रमाणे घेता येईल. बायजा-सौदामिनी राव, प्रेरक ललकारी-शारदा साठे, महिला आंदोलन पत्रिका-मीनाक्षी साने, मिळून सा-याजणी-विद्या बाळ, प्रतिबिंब -प्रतिमा कुलकर्णी, आम्ही मैतरणी-मीनाक्षी मून, डॉ. निलम गो-हे-आम्ही स्त्रिया, सुमन बंग-सखी, स्त्री उवाच हे वार्षिक यासारखी स्त्री प्रश्नांना प्राधान्य देणारी नियतकालिके मराठीत निर्माण झाली. या सगळ्या नियतकालिकांचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व नियतकालिकांच्या संपादकपदी स्त्रिया आहेत. चळवळीत काम करणा-या अनेक स्त्रियांनी या नियतकालिकांमधून स्त्री प्रश्नांचे विचारमंथन केले आणि स्त्रीवादाचे विविध आयाम ही स्पष्ट केले. स्त्रियांच्या मूलभूत गरजांपासून स्त्रीवादाच्या सैद्धान्तिक मांडणीपर्यंतचे लेखन नियतकालिकांमधून झाले. स्त्रीवादी ललित साहित्याला या नियतकालिकांमुळे मोठेच पाठबळ मिळाले. स्त्रीवादी साहित्याची वेगळी वैशिष्ट्ये विशद करण्यासाठी मदत झाली. एकंदरीत पारंपरिक पुरुषसत्ताक विचारप्रणालीला छेद देऊन स्त्रीवादी मानवतावादाचा
अंगीकार करून नवसमाज निर्मितीची स्वप्ने या नियतकालिकांनी बघितली.

21.

स्त्रीवादी नियतकालिकांचे स्वरूप वेगळे होण्याचे कारण काय ?

22.

स्त्रीवादी नियतकालिकांनी कोणते महत्त्वपूर्ण काम केले ?

23.

दिलेल्या उतान्यास योग्य शीर्षक द्या.

24.

वरील उता-यातून लेखकाची कोणती भूमिका दिसून येते ?

25.

दिलेल्या उता-यातून कोणता निष्कर्ष काढता येतो ?

26.

पुढील विधाने वाचा :
(a) दासी, दृष्टी या नामाचे अनेकवचन या-कारान्त होते.

(b) वाळू, वस्तू या नामाचे अनेकवचन वा-कारान्त होते.

पर्यायी उत्तरे : 

27.

पुढे काही संख्याविशेषणे दिली आहेत. त्याच्या जोड्या जुळवा :

28.

पुढे दिलेल्या गटात परभाषीय शब्द नसलेला गट ओळखा. 

29.

पुढीलपैकी तत्सम शब्द नाहीत.

30.

पुढीलपैकी कोणता शब्द सामासिक आहे ?

31.

पुढील जोड्या जुळवा :

32.

वामनरावांची आता अन्नान दशा झालीय, पण एकेकाळी या घरात _____
या वाक्यात पुढीलपैकी कोणता वाक्यप्रचार योग्य आहे 

33.

नकारार्थी वाक्यांना काय म्हणतात ?

34.

पुढीलपैकी सर्वनामोत्पन्न सर्वनामे कोणती ?
(a) हा - असा, असला, इतका, एवढा

(b) जो - जसा, जितका, जेवढा

(c) तो - तसा, तसला, तेवढा

पर्यायी उत्तरे :

35.

जोड्या जुळवा :

36.

'पक्षी आकाशात उडाला' या वाक्यातील प्रयोग ओळखा. 

37.

मुलांनो, चांगला अभ्यास करा. हे वाक्य कोणत्या प्रकाराचे आहे ? 

38.

तानाजी लढता लढता मेला. हे वाक्य कोणत्या प्रकाराचे आहे ?

39.

तो आजारी होता म्हणून तो शाळेत गैरहजर राहिला. या वाक्यातील प्रकार ओळखा.

40.

एकमेकाशी संबंध असलेली दोन किंवा अधिक केवलवाक्य दिली असता ती एकत्र करून त्यांचे वाक्य बनविणे यास _______ म्हणतात.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट क (मुख्य) परीक्षा पेपर १ - २०१७ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.