ASO 2014 - Main Paper 1

ASO 2014 - Main Paper 1 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.

खालील म्हण पूर्ण करा. पर्यायी उत्तरांतील योग्य पर्यायी उत्तर सांगा.
'अडाण्याची मोळी ________

42.

खालील शब्द कोणत्या ‘शब्दसिद्धी' प्रकारचा आहे ?

'मस्तक'

43.

भावे प्रयोगाचे लक्षण नसलेले उदाहरण कोणत्या पर्यायी उत्तरात आहे?

44.

खालीलपैकी कोणता शब्द शुद्धलेखन नियमांनुसार अचूक आहे ?

45.

खालीलपैकी कोणता शब्द अरबी भाषेतून आला आहे?

46.

'भद्रजन' या शब्दाचा खालीलपैकी कोणता शब्द विरुद्धार्थी आहे?

47.

पर्यायी उत्तरांतून योग्य ते पर्यायी उत्तर शोधा.

‘भाषा नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते. कारण -

48.

'ळ' वर्ण कोणत्या प्रकारचा आहे?

49.

‘तो घोड्यास पळवतो' या वाक्यातील पळवतो या क्रियापदाचा उपप्रकार कोणता?

50.

गंगेत गवळ्यांची वस्ती' या वाक्यात कोणती शब्दशक्ती आहे ? 

पुढील उतारा वाचून त्याखालील प्रश्न क्रमांक 51 ते 55 ची उत्तरे लिहा.
     प्राचीन काळांत सहज ओझरती नजर फेकली, तरी विचारांची प्रचंड चळवळ दिसून येईल. यास्काचार्याच्या नुसत्या निरुक्तांत पाहिले तर वेदांच्या अभ्यासासाठी निरनिराळ्या दृष्टीच्या शेंकडों मंडळांची नांवे त्यांत आलेली आहेत. इतिनैरुक्तिकाः, इति आख्यायिकाः, इति ऐतिहासिका: अशी निरनिराळी अभ्यासमंडळे यास्क देत आहेत. तसेच उपनिषत्काली सर्वत्र तत्त्वज्ञानाचीं प्रचंड व अखंड चर्चा चाललेली दिसते. शेंकडों मते, शेंकडों पंथ, शेंकडों सूक्ष्म छटांचे तत्त्वज्ञानी आपणांस दिसून येतात.
     मीमांसक ईश्वर मानीत नसत; चार्वाकपंथी परलोक वगैरे मानीत नसते. कणाद वगैरे सारी सृष्टि परमाणूपासून झाली असे म्हणत. बुद्धपंथी सारे क्षणिक आहे असे मानीत. शेकडों मतें होती; परंतु कुणाचा छळ झाला नाहीं. युरोपमध्ये नवविचार देणान्यांच्या होळ्या करण्यात आल्या. भारतात तसे झाले नाही. प्रत्येकाच्या प्रामाणिक मताला येथे मान देण्यात येत असे.
     ज्ञान म्हणजे पोरकटपणा समजण्यात येत नसे. एकेक गोष्ट समजून घ्यावयास तपेंच्या तपें देत. उपनिषदांत अनेक ठिकाणी ज्ञानासाठी ब्रह्मचर्यपालन करून कशी तपश्चर्या करीत, कसे चिंतनांत गढून जात, ते आले आहे. ज्ञान मागण्यासाठी वाटेल त्याच्याकडे जाते. ब्राह्मण क्षत्रियाकडे जाई. क्षत्रिय ब्राह्मणाकडे जाई. ब्राह्मण तुलाधारासारख्या वैश्याकडे ज्ञानासाठी नम्रपणे जाई. ज्ञान कोटेंहि असो, ते पवित्र आहे. सूर्याचा प्रकाश कोठूनही आला तरी तो घेतला पाहिजे. झाडांची मुळे मिळेल तेथून ओलावा घेण्यासाठी धडपडत असतात. त्याप्रमाणेच ज्ञानोपासकाचीं दृष्टि हवी. देवांचा कच दैत्यांच्या गुरुकडेहि जाईल आणि दैत्यांचा गुरुहि शत्रूकडेच्या शिष्याला प्रेमाने सारे ज्ञान देईल. ज्ञानाच्या प्रांतात शत्रु - मित्र नाहीं.
      समाजाला नवविचार देणे म्हणजे फोर थोर साधनाच आहे. विचाराचा डोळा समाजाला देणे याहून धन्य तर दुसरे काय आहे? चिंतन करून आपणांस जो विचार सुचला, त्याला पूज्य मानून तो सदैव प्रकट केला पाहिजे. त्याची वाढ केली पाहिजे, तो सर्वांसमोर निर्भयपणे मांडला पाहिजे. तो सोडता कामा नये.
      ज्ञानाचे बाह्य स्वरूप कोणतेही असेल. त्या त्यो बाह्यांगाची पूजा करण्यासाठी मनुष्य नि:स्वार्थपणे कसा धडपडतो आहे, ते पाहिले पाहिजे. ज्ञानाचे बाह्यांग व्याकरण असेल. व्याकरणरूपी परब्रह्माची एखादा पाणिनी अहोरात्र पूजा करू पाहील. त्या पाणिनीस भगवान ही पदवी भारतीय संस्कृती देईल. शंकराचार्य पाणिनीचा उल्लेख भगवान पाणिनी असा सदैव करतात. पाणिनी ज्ञानाच्या एका स्वरूपात रमले. त्यांना दुसरे तिसरे कांहींच सुचत नव्हते, रुचत नव्हते. व्याकरण म्हणजे त्यांची वेदान्त. जे कोणी येतील त्यांना ते व्याकरण शिकवीत. एके दिवशी तपोवनांत ते व्याकरण शिकवीत असता एकदम एक वाघ आला. वाघाला पाहून पाणिनी पळाले नाहींत. वाघाला पाहून व्याघ्र शब्दाची ते व्युत्पत्ती सांगू लागले! वाघ हुंगत हुंगत येत होता. पाणिनी म्हणाले. “वास घेत घेत येणारा हा पाहा वाघ.'' 'व्याजिघ्रति स व्याघ्रः' पाणिनी व्युत्पत्ती सांगण्याच्या आनंदात होते. शिष्य केंव्हाच पळून गेले होते ! वाघाने पाणिनीवर झडप घालून त्यांना खाऊन टाकलें! ज्ञानाची किती थोर उपासना! ज्ञानाची उपासना करणारा सर्व काहीं विसरून जातो. त्याच त्या विचारांशीं तो तन्मय होतो. त्याची जणू समाधि लागते. समाधि म्हणजे सर्वत्र ध्येयाचाच साक्षात्कार होणे. समाधि म्हणजे ध्येयतर सृष्टी चे विस्मरण! समाधि म्हणजे सर्व सृष्टीचे विस्मरण नव्हे.

51.

सर्वात थोर साधना कोणती ?

52.

वैचारिक भिन्नता असूनही भारतात विचारवंताचा छळ का झाला नाही ?

53.

तत्त्वज्ञानाची अखंड चर्चा कोणत्या काळात चाललेली दिसते ?

54.

पाणिनीने कोणत्या गोष्टीला परब्रह्म मानले होते ?

55.

ज्ञानाची उपासना करणा-याची अवस्था कशी होते? 

पुढील उतारा वाचून त्याखालील प्रश्न क्रमांक 56 ते 60 ची उत्तरे द्या.
      जीवनाच्या कितीतरी परीक्षांमध्ये आपल्याला अपयश येते. पण केवळ अपयश आले म्हणून आपण धीर सोडता कामा नये. हिंमत धरून आणि आपल्या अपयशाची कारणे समजावून घेऊन योग्य दिशेने आत्मविश्वासपूर्वक व जोमाने आपण प्रयत्न केले तर आपले ईप्सित साध्य होण्याच्या मार्गात कोणतेच अडथळे येणार नाहीत. ज्ञान-संपादनाची आपली आवड व यशाची ईर्षा आपण कायम राखली तर अपयशामुळे आपण अधिक कार्यक्षम व कार्यप्रवण बनू शकतो, असाच आपल्याला अनुभव येईल.
      संगीत, नाटक, चित्रकला ह्यांसारख्या कलांनी माणसाच्या जीवनाला समृद्धी आणलेली आहे, मानवाला सुसंस्कृत बनविले आहे. परंतु एखादा माणूस साक्षर असूनदेखील सुसंस्कृत नसतो. कारण जीवनातील आनंद कसा लुटावा हे त्याला ठाऊक नसते. कलेचे रहस्य जाणण्याची दृष्टी त्याला प्राप्त झालेली नसते. त्यामुळे जीवनात त्याचे मन कोठेच रमत नाही. त्याला कशापासून देखील विरंगुळा मिळत नाही. अशा प्रवृत्तीपासून आपण दूर राहिले पाहिजे. माझ्या जीवनाकडे मी जेव्हा दृष्टिक्षेप टाकतो त्यावेळी सुदैवाने मला जीवन आनंदमय वाटते व नव्या क्षितिजांच्या ओढीने माझे मन अद्यापही भारावून जाते.
      माणसाने आपल्या जीवनातील वास्तवता लक्षात घ्यावयास हवीच. निव्वळ स्वप्नसृष्टीत काही आपण वावरू शकत नाही. ध्येयवादी वृत्तीने कार्य करीत असताना स्वप्नाळू श्रद्धा उपयोगी पडत नाही. जीवनातील कटू सत्यावर प्रकाश टाकणाच्या व वास्तवतेची झळ कमी करणान्या हास्यरसाची जोड त्याला हवीच. गंभीर गोष्टींकडेसुद्धा काहीशा स्मित वदनाने पाहता येण्याएवढा सोशिकपणा अंगी असावयास हवा. रोजच्या व्यवहारात अशा वृत्तीने जर आपण काम करू शकलो तर क्षणाक्षणाला जीवनाचा आनंद आपल्याला लुटता येईल. ।
     काहीतरी नवे शोधावे व जे सापडले त्यात रस घ्यावा अशा प्रवृत्तीने आपण जीवन जगलो तरच त्याला जगणे म्हणता येईल. ह्यात काय आहे? त्यात काय आहे? अशा तुसड्या वृत्तीने आपण जर प्रत्येक क्षण वाया घालविला तर जीवनाचा लपंडाव आपण हरलोच असे समजावयास हरकत नाही. जीवनात जे सुखाचे क्षण येतात ते सूर्याच्या कोवळ्या किरणासारखे सोनेरी व सतेज असतात. ते क्षणभर राहतात आणि नंतर कडक होतात. परंतु ज्यावेळी हे किरण कोवळे दिसतात त्यावेळी त्यांचे ते तेज, ते रम्य स्वरूप पाहून मनाला आल्हाद वाटतो, गंमत वाटते.

56.

जीवनातील आनंद कसा लुटावा ?
(अ) कलेचे रहस्य जाणण्याची दृष्टी प्राप्त करावी.

(ब) जीवनात मन भरकटत ठेवावे.

(क) विरंगुळ्यापासून दूर राहून.

(ड) नव्या क्षितिजाची ओढ लावून घ्यावी.

पर्यायी उत्तरे : 

57.

जीवनातील सुखाचे क्षण कसे असतात?
(अ) ते सूर्याच्या कोवळ्या किरणासारखे सोनेरी व सतेज असतात.

(ब) ते सूर्याच्या कोवळ्या किरणासारखे क्षणभर राहतात आणि नंतर कडक होतात.

पर्यायी उत्तरे : 

58.

कोणत्या कलांनी माणसाच्या जीवनाला समृद्धी आणलेली आहे ?

(अ) साहित्य 

(ब) नाटक

(क) चित्रकला

(ड) संगीत

पर्यायी उत्तरे : 

59.

कोणत्या प्रवृत्तीला जगणे म्हणता येईल?
(अ) काहीतरी नवे शोधणे.

(ब) तुसड्या वृत्तीने वागणे.

(क) जे सापडेल त्यात रस घेणे.

(ड) नाहक प्रत्येक क्षण वाया घालविणे.

पर्यायी उत्तरे :

60.

माणसाने आपल्या जीवनात कोणती गोष्ट लक्षात घ्यावयास नको?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

ASO 2014 - Main Paper 1 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.